नागरी सहकारी पतसंस्था म्हणजे काय ? नागरी सहकारी पतसंस्था माहिती, – nagari sahakari patsanstha information in marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (1 vote)

नागरी सहकारी पतसंस्था म्हणजे काय ? नागरी सहकारी पतसंस्था माहिती, – nagari sahakari patsanstha information in marathi , सहकार पतसंस्था संपूर्ण माहिती मराठी, नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखातत नागरी सहकारी पतसंस्था बद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत, या लेखात आपण नागरिक सहकारी पतसंस्थेचे संघटन, त्याचे पैसा गोळा करण्याचे मार्ग, त्याची कार्य, व दोष याबद्दल संपूर्ण माहिती विस्तारात जाणून घेऊया.

मागच्या लेखात आपण नागरी सहकारी बँके विषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली होती तसेच या लेखात आपण नागरी सहकारी पतसंस्था म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा, जेणेकरून तुम्हास नागरी सहकारी पतसंस्था याबद्दल माहिती मिळण्यास मदत होईल. नागरी सहकारी पतसंस्था म्हणजे काय ? नागरी सहकारी पतसंस्था माहिती, – Nagri pat Sanstha information in Marathi

नागरी सहकारी पतसंस्था म्हणजे काय - Nagri pat Sanstha information in Marathi

नागरी सहकारी पतसंस्था म्हणजे काय – nagari sahakari patsanstha information in marathi

छोटे व्यावसायिक, व्यापारी, मध्यमवर्गीय पगारदार, वगैरे यांची पतविषयक गरज व्यापारी बँकामार्फत भागवली न गेल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र अशा नागरी सहकारी बँका स्थापन झाल्या हे आपण याआधी पाहिलेच होते. 

या बँकाप्रमाणेच 1904 च्या सहकारी कायद्यान्वये नागरिक सहकारी पतसंस्था ही स्थापन करण्यात आल्या. त्यामध्ये जशा व्यापारी, व्यावसायिक, इतर व्यक्ती, वगैरेंना एकत्र येऊन निर्माण केलेल्या नागरी सहकारी पतसंस्था आहेत तसेच एका संस्थेतील किंवा संस्था समूहातील सेवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या पगारदार सेवकांचे सहकारी पतसंस्था ही आहेत.

 

 या संस्था दरमहा निश्चित अशी रक्कम सभासदांकडून गोळा करतात आणि त्यातून गरजूंना कर्ज देतात. बँकेच्या दर्जा मिळण्यासाठी त्यांच्याजवळ रिझर्व बँकेने ठरवलेले किमान भांडवल नसते. तसेच त्या इतर अटीही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे त्या कायमच नागरिक सहकारी पतसंस्था म्हणूनच कार्य करतात. त्यांच्यावर फक्त राज्याच्या सहकार खात्याचे नियंत्रण राहते. रिझर्व बँकेचे त्यांच्यावर नियंत्रण नसते.

 

नागरी सहकारी पतसंस्थेचे  संघटन- सहकार पतसंस्था संपूर्ण माहिती मराठी

10 किंवा त्यापेक्षा अधिक सभासद एकत्र येऊन संस्था स्थापन करतात. त्यानंतर संस्थेची सहकार खात्याकडे रीतसर नोंदणी केली जाते, वर्षातून किमान एकदा सर्व सभासदांची सर्वसाधारण सभा घेतली जाते. त्यामध्ये अहवाल, संस्थेचे व्यवहार आणि हिशेपत्रके सभासदांकडून मंजूर केली जातात. आवश्यकतेनुसार विशेष सर्वसाधारण सभा ही बोलवल्या जातात. सभासद आपल्या प्रतिनिधींचे संचालक मंडळ 5 वर्षांसाठी निवडतात.

 

 अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस व इतर प्रतिनिधी या मंडळात असतात. हे संस्थेची धोरणे निश्चित करतात. संस्थेचा कारभार चालवण्यासाठी ते विविध समित्या व पगारी सेवकांची नियुक्ती करतात. संस्थेचे हिशेब व व्यवहार अंतर्गत लेखापरीक्षक व सहकार खात्याचे लेखापरीक्षक यांच्याकडून तपासले जातात. त्यांचे शेरे व सूचनांची दखल घेऊन संचालक मंडळ संस्थेच्या कारभार चालवतात. 

 

नागरी सहकारी पतसंस्थेचे पैसा गोळा करण्याचे मार्ग

सदस्यत्व शुल्क, समभागांची विक्री यातून भांडवल उभारले जाते. त्याखेरीज सभासद दरमहा नियमितपणे वर्गणी जमा करतात. त्याखेरीस संस्था इतरांकडून ठेवी घेते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अन्य संस्थांकडून कर्ज घेते. न वाटलेल्या नफ्यातून विविध निधी निर्माण केले जातात. त्यांचाही भांडवल म्हणून उपयोग होऊ शकतो.

 

नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य

या पतसंस्था मुख्यतः आपल्या सभासदांना व्यक्तिगत हमी आणि जमीनदारांची हमी यांच्या आधाराने कर्ज देतात. मुख्यतः ही कर्जे उपभोगासाठी असतात. मौल्यवान उपकरणांची खरेदी, घर बांधणी- दुरुस्ती, धार्मिक कार्य  यांच्यासाठी कर्ज मिळतात. 

कर्जावर व्याजदर तुलनेने कमी असतो. तसेच लाभांशही कमी दराने वाटला जातो. व्यावसायिकांच्या पतसंस्थातील सदस्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कमी व्याजाने भांडवल उपलब्ध होते. तसेच या संस्था आपल्या सभासदांच्या कल्याणासाठी सामूहिक विमा, अपघात विमा, सवलतीच्या दराने विविध वस्तूंची विक्री यासारखे उपक्रम राबवतात.

 

नागरी सहकारी पतसंस्थेचे दोष 

अशा संस्था ठेवींवर जास्त दराने व्याज देतात. मात्र त्यामध्ये जोखीम जास्त असते. कारण ठेवीदारांना विम्याचे कोणतेही संरक्षण नसते. अकार्यक्षमता आणि गैरव्यवहार यामुळे अशा संस्था बुडण्याचे प्रकारही आज सतत घडत आहेत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई होण्याबाबत सध्याचे दिवाणी व फौजदारी कायदे अपुरे आहेत. त्यामुळे अशा संस्था व्यवहार करताना पुरेशी सावधान गिरी बाळगणे आज आवश्यक झालेले आहे. 

सहकारी पतसंस्था कायदा कोणी आणला?

चौधरी ब्रह्म पर्काश . या आयोगाने 1991 मध्ये आदर्श सहकारी कायदा सादर केला.

सहकारी पत म्हणजे काय?

सहकारी पतसंस्था या सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या आर्थिक संस्था आहेत आणि केवळ त्यांच्या सदस्यांसह बँकिंग कार्ये करतात 

भारतात किती सहकारी संस्था आहेत?

ICA सदस्य 290.06 दशलक्ष सदस्यांसह 854,355 सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करतात. भारतातील सहकारी संस्था मोठ्या प्रमाणावर क्रेडिट आणि नॉन-क्रेडिट क्षेत्रात आहेत

भारतातील सहकारी पतसंस्थांनी कोणते उद्दिष्ट साधले पाहिजे?

हकारी तत्त्वांनुसार स्व-मदत आणि परस्पर मदतीद्वारे सदस्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीला प्रोत्साहन देणे 

नवीन पतसंस्था सुरु करणे.

सहकारी पतसंस्था,मर्यादित पतसंस्था ,बिगरशेती पतसंस्था,महिलांची पतसंस्था,शहरी,ग्रामीण,विशिष्ठ सेवकांची नवीन पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सहायक निबंधक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करून सुरु करता येते.

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment