व्यापारी बँकांची कार्ये ? व्यापारी बँकांची प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य – vyapari bank che karya in marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
3.5/5 - (6 votes)

व्यापारी बँकांची कार्ये ? व्यापारी बँकांची प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य – vyapari bank che karya in marathi , या लेखात आपण व्यापारी बँकेचे कार्य, प्राथमिक कार्य, व दुय्यम कार्य व त्याचे भाग पाहणार आहोत ते खालील प्रमाणे आहे.व्यावसायिक बँकांना अशा बँका म्हणतात ज्यांचे मुख्य काम जनतेचे पैसे सुरक्षितपणे जमा करणे आणि गरजू लोकांना त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारची कर्जे उपलब्ध करून देणे हे असते. व्यावसायिक बँका लोकांचे पैसे ठेवी म्हणून स्वीकारतात आणि गरज पडेल तेव्हा कर्ज म्हणून देतात.

आधुनिक आर्थिक संघटनेत व्यावसायिक बँका महत्त्वाची भूमिका बजावतात, या प्रकारच्या बँका प्रामुख्याने नफा मिळवण्याच्या उद्देशाने तयार केल्या जातात. व्यापारी बँकांची कार्ये आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) द्वारे नियंत्रित केली जातात.

व्यापारी बँकांची कार्ये  – Vyapari Bank Che Karya In Marathi

व्यापारी बँकांची कार्ये ? – vyapari bank che karya in marathi

आधुनिक काळात भारतात व्यापारी बँका शेती, उद्योग, सेवा, शिक्षण, व्यापार, पर्यटन इ. विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. व्यापारी बँकांच्या कार्याचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल

  1.  प्राथमिक कार्ये Primary Functions
  2.  दुय्यम कार्ये Secondary Functions
  3. इतर कार्य  Social Functions.

व्यापारी बँकांची प्राथमिक कार्ये (Primary functions)

व्यापारी बँका आपल्या सभासदांकडून ठेवी स्वीकारणे, कर्जे देणे, पतपैशाची निर्मिती करणे व सभासदांना विविध बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देणे. इ. कार्याचा समावेश प्राथमिक कार्यात केला

अ) ठेवी स्वीकारणे:

 बँका व्यक्ती, भागीदारी संस्था किंवा इतर संस्थांकडून ठेवी स्वीकारतात. ठेवी हेच बँकांच्या वित्त पुरवठा व उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा स्त्रोत आहे. पुढील प्रकारच्या ठेवी स्वीकारतात.

1)बचत खात्यातील  ठेवी: 

सर्वसाधारणपणे ठराविक उत्पन्न असणारे पगारदार बँकेत बचत  खाती उघडतात. अशी खाती थोडे पैसे भरून सुद्धा सुरू करता येतात. त्यामुळे मध्यवर्गीयांना अशी खाती उघडणे सोयीचे ठरते. यावर बँका मुदत ठेवीपेक्षा कमी दराने व्याज देतात. सध्या हा दर फक्त चार टक्के एवढाच आहे.

2 )चालू खाती: 

साधारणपणे व्यापारी लोक आपल्या दैनंदिन व्यवहार करण्यासाठी अशी खाती उघडतात. त्यामुळे धंद्यातील दैनंदिन व्यवहार पूर्ण करणे सोयीचे ठरते अशा खात्यात भरलेली रक्कम त्यांना आपल्या सोयीप्रमाणे केव्हाही व कितीही वेळा काढता येते. अशा ठेवीवर बँका व्याज देत नाहीत. अशा ठेवीतील साधारण सर्व रक्कम बँका रोख स्वरूपात ठेवतात.

3)मुदत ठेवी:

 इथे ग्राहक आपली रक्कम ठराविक मुदतीसाठी ठेवतात. ही मुदत पंधरा दिवसापासून पाच वर्षापर्यंत असू शकते. या ठेवीवर अधिक दराने व्याज दिले जाते आणि त्यातील रक्कम  मुदती आधी परत मिळत नाही. तशी मुदत संपण्याआधी काढून घ्यायची झाल्यास ठेवीवरील व्याज बुडते सध्या अशा ठेवीवर 5 ते 10% पर्यंत व्याज मिळते. प्रत्येक बँकेतील व्याजदर  वेगवेगळ्या असतात. व जेवढी मुदत जास्त असेल तेवढा दर अधिक असतो.

4) आवर्त ठेवी:

 यामध्ये ठराविक काळाने ठराविक रक्कम बँकेत भरावी लागते. उदाहरणार्थ. दर महिन्याला ठरलेली रक्कम खात्यात जमा करावी लागते. या खात्यावर जवळपास मुदत  ठेवीच्याच दराने व्याज दिले जाते.

ब) कर्ज देणे: 

बँक ग्राहकांना अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज देतात. या कर्जावर बँक व्याज आकारतात व बँका आपण स्वीकारलेल्या ठेवीवर अल्प दराने व्याज देतात परंतु दिलेल्या कर्जावर अधिक दराने व्याज आकारतात.अशा दोन्ही व्याजातील फरक हाच बँकेचा नफा होय. परंतु बँका ठेवीदाराच्या पैशातून अशी कर्ज देत असल्यामुळे स्वीकारलेल्या  सर्व  ठेवींची रक्कम त्यांना कर्ज म्हणून देता येत नाही. त्यातील काही भाग ठेवीदारांनी मागणी केल्यावर परत करता यावा म्हणून बाजूला काढून ठेवावा लागतो.

कर्जाचे प्रकार:

1) अधिकोष

ही सवलत फक्त चालू खाते धारकांना दिली जातेइथे ग्राहक बँकेतील आपल्या ठेवी पेक्षा अधिक पैसे बँकेतून काढू शकतो. त्यासाठी बँकेची बोलणी करून मर्यादा आधी ठरवून घ्यावी लागते. जेवढे अधिक पैसे काढलेले असतील त्यावर बँकेला व्यास द्यावे लागते.

2) कॅश क्रेडिट:

 इथे कर्जदाराशिवाय आणखीन  एखादा जमीनदार घेऊन मालावर किंवा व्यक्तिगत पत्तेवर कर्ज दिले जाते.. जेवढे पैसे घेतले असतील तेवढ्यात व्याज आकारल्या जातो.

3) हुंड्या वटविणे:

 आज-काल  लोक हुंडीची मुदत संपेपर्यंत थांबत नाहीत बँका या हुंड्या  वटवून लगेच  थोडे कमी पैसे देतात. मुदत संपताच हुंडी स्वीकारलेल्या कडून किंवा हुंडी काढणाऱ्या कडून बँकेला पैसे मिळतात. कमिशन घेतात.

4) अल्पमुदतीची कर्ज:

 अशी कर्ज बँका अत्यंत अल्पमुदतीसाठी काही तारण ठेवून घेऊन  देतात.  इथे कर्ज परत करण्यासाठी ठरलेली मुदत नसते बँका आपल्याला पैशाची गरज भासतात अशी कर्ज परत मागू शकतात. साधारणपणे अशी कर्ज शेअर बाजारातील  दलालांना दिल्या जातात. 24 तासात किंवा एक आठवड्यात कर्ज परत करण्यास सांगितले जाते इथे बँका ठरलेली सर्व रक्कम कर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा करतात. संपूर्ण रकमेवर बँका व्याज आकारतात.

5) ठराविक मुदतीची कर्ज:

 अशी कर्जे एक ते वीस वर्षासाठी व्यापारी उद्योगपती वगैरेंना देण्यात येतात. पाच वर्षापेक्षा अधिक मुदतीसाठी कर्ज घेतल्यास व्याजाचे दर अधिक असत. परंतु एक ते दोन वर्षासाठी घेतले तर व्याजदर कमी असते.

6) एकत्रितपणे दिलेली कर्ज: 

काही वेळा दोन ते तीन बँका एकत्र येऊन एकाच तारणावर कर्ज देतात. अशा कर्जांना एकत्रितपणे दिलेली कर्ज म्हणतात. इथे कर्जाची रक्कम मोठी असते.

7) ग्राहक कर्ज: अशी कर्ज सामान्य ग्राहकांना वॉशिंग मशीन, टीव्ही, एअर कंडिशनर  उच्च शिक्षण महागडी कॅमेरे, लग्न इत्यादीसाठी दिली जातात. अशी कर्जे ठरलेल्या मुदतीत हप्त्याने परत केली जातात.

8) पतनिर्मिती:

 पतनिर्मिती हे बँकांच एक प्रमुख कार्य समजले जात. म्हणून असं नेहमी म्हटलं जातं की बँका पत निर्माण करतात. पतनिर्मिती म्हणजे एखादी व्यक्ती किंवा संस्था दुसऱ्याला कर्ज देते.

 क) चेक निर्मिती:

 हे सुद्धा बँकेचे एक महत्त्वाचंकार्य समजलं जातं दुसऱ्यांची देणे चेकने देण्याची पद्धत. रोख रक्कम देण्यापेक्षा पैसे चेकने अधिक सुलभ व सोयीची पद्धत समजली जाते.

1) वाहक चेक: 

वाहक चेक बँकेत नेऊन कोणीही पैसे लगेच मिळू शकतो. चेक सादर करणाऱ्याच्या कोणालाही चेकचे पैसे मिळतात.

2) रेखांकित चेक:

 रेखांकित चेकमध्ये चेकच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात दोन समांतर रेघा मारलेल्या असतात अशा चेकचे पैसे लगेच मिळत नाहीत चेक ज्याच्या नावावर त्याच्या बँक खात्यात तो प्रथम भरावा लागतो पैसे बँकेच्या खात्यात जमा होतात.

व्यापारी बँकांची दुय्यम कार्ये 

आजच्या गतीमान जगात व्यापारी बँका वरील कार्याबरोबरच व्यक्ती,समाज, अर्थव्यवस्था व भांडवली बाजाराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून अनेकविध स्वरूपाची कार्ये पार पाडतात. त्यांनाच व्यापारी बँकाची दुय्यम कार्ये म्हणून संबोधले जाते. ती दुय्यम कार्ये पुढीलप्रमाणे-

ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून केली जाणारी कार्य

1) पैसे पाठविणे– आहे काम चेक, ड्रॉप व टेलिग्राफिक ट्रान्सफर वगैरे मार्गाने केले जाते बँका या सेवासाठी नाममात्र शुल्क आकारतात.

2) ग्राहकांनी सांगितलेली काही कामे करणे. उदाहरणार्थ, विम्याचा हप्ता  वेळेवर भरणे, क्लब ची वर्गणी भरणे इत्यादी.

3) पैसे गोळा करणे जसे भागा वरील लाभांश, कर्ज रोख्या वरील व्याज गोळा करणे वगैरे.

4) खरेदी व विक्री. बँक ग्राहकांच्या वतीने भागांची किंवा कर्जरोख्यांची खरेदी किंवा विक्री करतात.

5) विश्वस्थ बँकाविश्वस्थ म्हणून काम करतात. तसेच एखाद्या ग्राहकांच्या इच्छपत्राची अंमलबजावणी करतात. म्हणजेच ग्राहकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या मालमत्तेची वाटणी करतात. यामध्ये ग्राहकांचे विशिष्ट मालमत्ते संबंधात काही अधिकार असतील तर त्यांच्या  वाटणीचाही समावेश आहे.

 व्यापारी बँकांची इतर सेवा

याशिवाय व्यापारी बँका ग्राहकांना उपयुक्त अशा विविध सेवा पुरवितात.

1)सेल्फ डिपॉझिट वॉल्ट: 

विविध आकाराचे लोकर ग्राहकांना ठराविक मासिक भाडं घेऊन पुरविले जातात. सेल्फ डिपॉझिट वर्ड बहुतेक ठिकाणी तळघर ठेवलेली असतात. खोलीच्या भीती आग वगैरे न लागणाऱ्या अशा असतात. म्हणजे ग्राहकांच्या मालमत्तेची सुरक्षितता कटाक्षाने सांभाळली जाते.. लॉकर मधील वस्तू ग्राहकांच्या ताब्यात असतात परंतु ठराविक कार्यपद्धतीचा अवलंब करून किंवा नियमांचे पालन करूनच ग्राहकाला तिथे प्रवेश दिला जातो.

2)पतपत्र:

बँका व्यापारांना परदेशातून उधारीवर माल खरेदी करणे सोयीचे व्हावे म्हणून त्यांना पतपत्र देतात. हा आपल्या देशातील बँकेने परदेशातील बँकेला आपल्या ग्राहकांनी दिलेले चेक्स व हुंडीवर पैसे देण्यासाठी दिलेला आदेश असतो. ग्राहकाला किती रकमेपर्यंत ही सवलत उपलब्ध करून द्यावी  याचा उल्लेख असतो. पैसे देणारी परदेशी बँक नंतर आपल्या देशातील बँकेकडून ती रक्कम वसूल करून घेते.

 3)प्रवासी चेक:

 प्रवासात पैसे चोरीला जाऊ नये म्हणून बँका परदेशी   जाणाऱ्या ग्राहकाला हे चेक देतात.

 4)परकीय चलन:

परकीय चलनासाठी बँकेत स्वतंत्र  विभाग असतो. इथे परदेशी  चलनापोटी भारतीय रुपये किंवा भारतीय चलना पोटी परदेशी चलन मिळवण्याची व्यवस्था असते.

 5)एटीएम व क्रेडिट कार्डची सवलत:

एटीएम कार्ड मुळे ग्राहकाला आपल्या खात्यातील रक्कम आपल्या सोयीप्रमाणे 24 तास केव्हाही काढता येते. क्रेडिट कार्ड मुळे ग्राहकाला ठराविक रकमेपर्यंतचा माल उधारीवर खरेदी करता येतो.संबंधित व्यापाऱ्यांना किंवा उपहारगृहांना बँक लगेच पैसे देते व नंतर ती रक्कम ग्राहकांकडून वसूल करते.

व्यापारी बँकांची इतर कार्य:

1) मर्चंट बँकिंग: 

अशा बँका पुढील विविध सेवा पुरवितात. उदाहरणार्थ

अ) कंपनीचे भाग भांडवल बाजारात आणणे व कंपन्यांना ब)

भाग भांडवल गोळा करण्यास मदत करणे.

ब)नवीन प्रकल्प तयार करणे व त्यासाठी वित्त पुरवठा करणे.

क) कंपन्यांना सल्ला देणे.

ड) गुंतवणुकी संबंधित सल्ला देणे इत्यादी.

2)गृह कर्ज:

 घराच्या तारणावर गृह कर्ज दिले जाते., स्टेट बँक बँक ऑफ बडोदा वगैरे बँकांनी गृह कर्ज देण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. स्थापना केलेली आहे.

3) बीज भांडवल पुरवठा: 

या विभागातर्फे नवीन उद्योजकांना धंदा सुरू करण्यासाठी बीज भांडवल पुरवले जाते या कंपन्या नवीन व अपरिचित असल्यामुळे अशांना वित्त पुरवठा मिळविणे अवघड जाते कारण पैसे देणाऱ्यांना यात मोठा धोका पत्करावा लागतो. नवीन तंत्रज्ञान अशा छोट्या कंपन्यांची स्थापना करतात. अशा कंपन्यांना त्यांच्या मालाचा बाजार मिळवून देण्याचे काम केले जाते स्टेट बँक वगैरे बँकांनी अशा कामासाठी स्वतंत्र उप कंपन्यांची स्थापना केलेली आहे.

4) फॅक्टरींग :

फॅक्टरी म्हणजे आपल्या ग्राहकांची एनी वसूल करण्याचे काम बँका करतात येथे बँका आपल्या ग्राहकाला येणे असलेली येणे त्यांच्याकडून खरेदी करतात. त्यामुळे एक व्यापाराला उधारीवर माल विक्री करणे सोपे होते त्याची उधारीची रक्कम त्याच्याकडून खरेदी करून बँक त्याला लगेच रोख रक्कम देते. थोडक्यात ही एक कर्ज वसुलीची पद्धत आहे. नंतर बँक ग्राहकांची आणि वसूल करते. या कामासाठी ही स्टेट बँक कॅनरा बँक वगैरे बँकांनी स्वतंत्र उप कंपन्यांची स्थापना केलेली आहे.

5) म्युच्युअल फंड: 

म्युच्युअल फंड ही एक वित्तीय क्षेत्रातील मध्यस्थ असून विविध गुंतवणुकी दाराची बचतीची रक्कम एकत्र करून त्याची विविध कंपन्यांच्या भागांमध्ये व कर्जरोख्यांमध्ये तज्ञांच्या  साह्याने गुंतविते. ही गुंतवणूक एकाच कंपनीच्या भागांमध्ये न करता अनेक कंपन्यांच्या भागांमध्ये करण्यात येते. त्यामुळे गुंतवणूक बुडवण्याचा धोका राहत नाही. एका कंपनीला तोटा झाला तर दुसऱ्या कंपनीला फायदा झालेला असतो.

असे पण म्हणजे परस्पर सहकार्याचे उदाहरण आहे कारण ऐकून सर्व कंपन्यांकडून मिळालेला लाभांश व व्याजाचा रकमेचा प्रशासकीय खर्च वजा करून बाकी सर्व रक्कम गुंतवणूकदारांमध्ये वाटली जाते. पण ही शेअर बाजार व गुंतवणूकदार यांच्यामध्ये मध्य स्थानाची भूमिका बजावते गुंतवणुकी दाराची बचत एकत्र करून गुंतवणूक केली जाते व त्यातून सर्वाधिक उत्पन्न मिळण्याचा प्रयत्न केला जातो.

व्यापारी बँकेचे कार्य काय आहे?

व्यापारी बँकेचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे पत निर्माण करणे. इतर वित्तीय संस्थांप्रमाणेच त्यांचे उद्दिष्टही नफा मिळवणे हे आहे. बँका त्यांच्या ठेवीदारांकडून ठेवी इतर ग्राहकांना कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देतात.

व्यापारी बँका विविध प्रकारच्या ठेवी स्विकारतात.

होय, व्यापारी बँका वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी स्वीकारतात.

व्यापारी बँका काय करतात?

व्यापारी बँका पत निर्माण करतात

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment