कर्जरोखे म्हणजे काय ? कर्जरोख्यांची व्याख्या आणि कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये – karjrokhe mhanje kay in marathi,Debentures information in Marathi ,कर्जरोखेधारक कोणाला म्हणतात, कर्जरोखे प्रमाणपत्र संकल्पना , नमस्कार मित्र मंडळ!!! आपण या लेखात कर्जरोख्याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.
यात आपण कर्जरोखे म्हणजे नेमके काय असते, त्याची व्याख्या काय आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला कर्जरोख्याबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होण्यास मदत होईल.
कर्जरोखे म्हणजे काय ? – karjrokhe mhanje kay
कर्जाऊ भांडवलाच्या उभारणीतील एक मुख्य स्रोत म्हणजे कर्जरोखे होय.दीर्घ व माध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी याचा उपयोग होतो. कंपनीच्या वित्तीय संरचनेमध्ये महत्त्वपूर्ण स्थान पटकावले आहे. कर्जरोखे ही संज्ञा मूळ लॅटिन शब्द डीबेर यापासून आली असून याचा अर्थ ऋणी असणे असा होतो. कंपनी कायदा 2013 मध्ये कर्जरोख या शब्दांची स्पष्ट व्याख्या केलेली नाही.
कंपनी कायदा 2013, कलम 2(30) मध्ये फक्त असे नमूद केले आहे की. कर्जरोखे या शब्दांमध्ये कर्जरोखेसाठा, बंधपत्रे तसेच इतर प्रतिभूतीचा समावेश होतो. ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसतेही! या परिभाषेअंतर्गत कर्जरोख्यांमध्ये कर्जरोखे साठ्यांचा ही समावेश केला आहे. कर्जरोखे म्हणजे असा दस्तावेज जो कर्जनिर्मिती करतो किंवा कर्जांची पोच देतो. साधारण सर्व कर्जरोख्यांसाठी कंपनीची मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा विनातारणही कर्जरोखे असू शकतात.
कर्जरोख्यांची व्याख्या – Debentures details in Marathi
टोफन यांनी दिलेली व्याख्या :- कर्जरोखा हा कंपनीने धारकास दिलेला कर्जांच्या पुराव्याचा दस्तावेज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते.
वरील व्याख्येनुसार कर्जरोखा म्हणजे कर्ज घेतल्याचा पुरावा होय. कर्जरोखा म्हणजे कंपनीच्या मुद्रेखाली दस्ताऐवज असून तो कर्जरोखे प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिला जातो.
कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये : – Debentures features in Marathi
- वचन:- कर्जरोखे म्हणजे त्यावर नमूद केलेली ठराविक रक्कम कर्जाऊ घेतल्याचे वचन आहे.
- दर्शनी मूल्य :- या कर्जरोख्यांचे दर्शनी मूल्य हे तुलनेने जास्त असते. उदा. रु.100 किंवा रु.100 च्या पटीत असते.
- रक्कम परतफेडीची वेळ :- कर्जरोख्यांची मुदलाची रक्कम ठराविक मुदतीनंतर परत केली जाते. कर्जरोखे प्रमाणपत्रावर कर्जाऊ रक्कम परत करण्याची तारीख नमूद केलेली असते.
- परतफेडीसाठी प्राधान्य :- कंपनीच्या इतर दावेदारांपेक्षा कर्जरोखी धारकांना भांडवल परतफेडीसाठी प्राधान्य दिले जाते.
- परफेडीचे आश्वासन :- कर्जरोखे हे दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात. कर्ज ठराविक मुदतीत परत करण्याची हमी यामध्ये दिलेले असते.
- व्याज :- कर्जरोख्यांना निश्चित दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते .व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते. कंपनीने नफा कमावला असेल किंवा नसेल तरीही व्याज देणे कंपनीत बंधनकारक आहे.
कर्जरोख्या संबंधित घटक :
अ) कंपनी :- कर्ज घेणारी संस्था होय.
ब) विश्वस्त :- कंपनी जर 500 पेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे विकत असेल तर कंपनी कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करते. या विश्वस्तामार्फत कंपनी कर्जरोखेधारकांशी व्यवहार करते. विश्वस्त व कर्जरोखे धारक यांच्याशी कंपनी करार करते. या करारास विश्वस्त करार असे म्हणतात. यामध्ये कंपनीचे कर्तव्य व कर्जरोखेधारकांचे हक्क नमूद केलेले असतात.
कर्जरोखेधारक कोणाला म्हणतात
क) कर्जरोखेधारक :- या व्यक्ती कंपनीस कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देतात. त्यांना या कर्जांचा पुरावा म्हणून कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जाते.
- कर्जरोखे वाटपाचा अधिकार :- कंपनी कायदा 2013, कलम179 (3) च्या नुसार संचालक मंडळाकडे कर्जरोखे वाटपाचा अधिकार असतो.
- कर्जरोखेधारकांचा दर्जा :- कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको आहेत. कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेले कर्ज असून त्यांना स्थिर दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते व असे व्याज कर्जरोख्यांची परतफेड करेपर्यंत दिले जाते.
(10) मतदानाचा हक्क नाही :- कंपनी कायदा 2013 कलम 71 (2) नुसारकंपनी मतदानाचा हक्क असलेल्या
कर्जरोख्यांचे वाटप करू शकत नाही. कर्जरोखे धारक कंपनीच्या साधारण सभेत मतदानाचा हक्क बजावू
शकत नाहीत.
(11) तारण :- साधारणत: स्थिर भाग असलेली मालमत्ता किंवा तरती धार असलेली मालमत्ता तारण देऊन
कर्जरोखे सुरक्षित केले जातात.जर कंपनी व्याज देण्यास किंवा भांडवलाची परतफेड करण्यास तयार नसेल
तर कर्जरोखे धारक कंपनीची मालमत्ता विकून त्यांचे पैसे वसूल करू शकतात.
(12) नोंदणी :- कर्जरोख्यांची किमान एका मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
(13) हस्तांतरण :- हस्तांतरणाच्या दस्ताऐवजद्वारे कर्जरोख्यांचे सहजपणे हस्तांतरण केले जाते.
कर्जरोखे संबंधित महत्वपूर्ण प्रश्न
कर्जरोखेधारक कोणाला म्हणतात
या व्यक्ती कंपनीस कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देतात. त्यांना या कर्जांचा पुरावा म्हणून कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जाते
कर्ज रोखे विश्वस्त करार म्हणजे काय?
कर्जरोखे विश्वस्त करारामध्ये कराराच्या नियम व अटी लेखी स्वरूपात असतात कर्जरोखे विश्वस्त करारा कंपनीच्या मालमत्तेचे विश्वासकडे दिली जाणारी कायदेशीर साधन दस्तावेज आहे
भारतात रोखे कोण जारी करतात?
हे रोखे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकारच्या वतीने दर 2 ते 3 महिन्यांनी जारी केले जातात