शिखर बँक म्हणजे काय ? शिखर बँक ( राज्य सहकारी बँक) संपूर्ण माहिती – Shikhar Bank Information In Marathi , शिखर बँक ( राज्य सहकारी बँक) संपूर्ण माहिती.नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात शिखर बँकेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. शिखर बँक म्हणजे काय,चिकन,शिखर बँक कोणत्या प्रकारे पैसे गोळा करते, शिखर बँकेची कार्य कोणकोणती आहेत, शिखर बँकेची झालेली प्रगती याविषयी संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.
शिखर बँक म्हणजे काय – Shikhar Bank Information In Marathi
सरकार खाते हा घटक राज्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. साहजिकच राज्यातील सहकारी बँक ही सहकारी वित्त व्यवहारांच्या सर्वोच्च स्थानी असते. म्हणून या बँकेला शिखर बँक किंवा केंद्रस्थानी असणारी बँक असे म्हटले जाते. प्रत्येक राज्यात एक याप्रमाणे राज्य सहकारी बँका स्थापन करण्यात आलेले आहेत.
प्राथमिक पतसंस्था, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि व्यक्तिगत सभासद यांनी या बँका स्थापन केलेले आहेत.
राज्य सहकारी बँक/ शिखर बँक ही त्या राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांचा महासंघ( फेडरेशन) असते. ती भारतीय रिझर्व बँक आणि जिल्हा बँक यामधील दुवा असते. त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांची समतोल प्रगती घडवणे, त्यांना अर्थसहाय्य देणे आणि त्यांच्यासाठी निरसन गृह म्हणून जबाबदारी घेणे ही या बँकेच्या स्थापने मागील उद्दिष्टे आहेत.
शिखर / सहकारी बँकेचे पैसा गोळा करण्याचे मार्ग
राजे सहकारी शिखर बँका खालील मार्गाने भांडवल उभारणी करतात –
1)समभागांची विक्री
जिल्हा मध्यवर्ती बँका, व्यक्तिगत सभासद, अन्य सहकारी संस्था समभाग खरेदी करून भांडवल पुरवतात. राज्य सरकारही या बँकेचे समभाग खरेदी करते.
2)ठेवी
सरकार, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था,व्यक्तिगत खातेदार यांच्याकडून या बँका मागणी व मुदत बंद ठेवी गोळा करतात. त्यावर त्या व्यापारी बँकेपेक्षा 0.25% अधिक व्याज देतात.
3)कर्जे
भारतीय रिझर्व बँक आणि नाबार्ड या संस्थांकडून राज्य सहकारी/ शिखर बँक कर्ज घेते. रिझर्व बँकेच्या कलम 17 अन्वये राज्यातील नागरी सहकारी बँकांना राज्य सहकारी बँक कर्ज देते. त्यातून या बँका लघु उद्योगांना कर्ज देतात. नाबार्ड विषयक कायद्याच्या कलम 21 नुसार शेती व्यवसायाला जिल्हा बँकांमार्फत कर्ज देण्यासाठी नाबार्ड राज्य सहकारी बँकेला कर्ज देते. तसेच 1990 च्या कृषी व ग्रामीण कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नाबार्ड राज्य सहकारी बँकेमार्फत व्यापारी बँका व सहकारी बँकांना अर्थसहाय्य देते.
4)निधी
राखीव निधी, इमारत बांधली निधी, लाभांश समानीकरण निधी, बुडीत व संशयास्पद कर्ज निधी, घसारा निधी, धर्मदायनिधी, वगैरे विविध प्रकारचे निधी राज्य सहकारी बँक/ शिखर बँक आपल्या नफ्यातून उभारते. जोपर्यंत त्याचा त्या कारणासाठी वापर करावा लागत नाही तोपर्यंत या सर्व निधींचा राज्य सहकारी बँक भांडवल म्हणून वापर करते.
शिखर/ सहकारी बँकेचे कार्य
- या बँकांवर राज्यातल्या सहकारी चळवळीचा विकास घडवण्याची तसेच त्यावर नियंत्रण ठेवून वळण लावण्याची जबाबदारी असते. त्यामुळे सर्व सहकारी संस्थांना बँकेमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. सहकार क्षेत्रातील पतविषयक धोरण हे राज्य सहकारी बँका ठरवतात.
- रिझर्व बँकेच्या वतीने नाबार्ड व राज्यातील सहकारी संस्था यांच्यामध्ये राज्य सहकारी बँका या मध्यस्थ/ दुवा म्हणून भूमिका घेतात. त्याचबरोबर व्यापारी बँकिंगच्या ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, बिल वटवणे, इत्यादी कार्य हे या बँका करतात.
- काही जिल्हा सहकारी बँकांना वर्षातील काही काळात अधिक अर्थसाहयाची गरज असते. त्याचवेळी काही बँकांजवळ अतिरिक्त निधी पडून असतात. राज्य सहकारी बँक/ शिखर बँक ही समाज शोधण्याचे कार्य करते.
- शिखर बँक/ सहकारी बँक अतिरिक्त निधी गोळा करून ते गरजू बँकांना उपलब्ध करून देते. म्हणजेच राज्य सहकारी बँका या राज्यातील सहकारी संस्थांच्या पालक असतात.
- राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँकांना अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची कर्ज देते. सरकारी व अन्य तसेच अन्य तारण योग्य मालमत्तेच्या तारणावर अन्य सहकारी संस्थांना देण्यासाठी म्हणून अधिकर्ष सवलत, रोख कर्जे आणि अल्पमुदती हुंड्याची वटवणूक अशा मार्गांनी अल्पमुद्दी कर्ज देते. आवश्यक झाल्यास दुष्काळी परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यामुळे बँकांना व सहकारी संस्थांना आपली कर्ज वसूल करता न आल्यास ही बँक अल्पमुदती कर्जाचे मध्यम व दीर्घ मुदती कर्जात रूपांतर करते.
- शेती विकासाच्या हेतूने जिल्हा बँकांना मध्यम मुदती कर्जे राज्य सहकारी बँक देते. तसेच सहकारी संस्थांचे समभाग खरेदी करणे, कृषीमाल प्रक्रिया संस्था गुंतवणूक करणे यासाठी जिल्हा बँका आणि प्राथमिक सहकारी संस्थानाही ती मध्यम मुदती कर्ज देते. तसेच लघु उद्योगांना सहाय्य करणाऱ्या नागरी सहकारी बँकांनाही राज्य सहकारी बँक फेर वित्तपुरवठा करते.
- प्रकल्प पुरवठा हे या बँकेचे एक महत्त्वाचे कार्य आहे.कृषी पूरक व्यवसाय, जलसिंचन योजना, ग्रामीण कारागीर, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, नाबार्ड, औद्योगिक विकास बँक, लघुउद्योग विकास बँक, वगैरे मार्फत या संदर्भात वेगवेगळ्या योजना आहेत त्यासाठी राज्य सहकारी बँकेला अर्थसहाय्य मिळते व त्यानंतर ती हा वित्तपुरवठा जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका यांच्यामार्फत गरजूंना उपलब्ध करून देते.
- सामान्यतः राज्य सहकारी बँक/ शिखर बँक ही अप्रत्यक्ष वित्त पुरवठा करणारी संस्था आहे. तरीदेखील काही बँकांनी मात्र सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, ग्राहक भांडारांचा महासंघ, राष्ट्रीय डेअरी विकास संस्था, राज्य वीज मंडळ, राज्य अन्नधान्य महामंडळ अशा संस्थांना प्रत्यक्ष अर्थसाह्य दिलेले आहे.
शिखर / सहकारी बँकेने केलेली प्रगती
1951 मध्ये एकूण 16 राज्य सहकारी / शिखर बँका होत्या. त्यांचे स्वनिधी सुमारे दोन कोटी रुपये होते. तर त्यांच्याजवळ 21 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. मार्च 2000 अखेर त्यांची संख्या 29 झाली आहे. त्यांचे सोनिधी 3,618 कोटी रुपयांचे होते. 29,475 कोटी रुपयांच्या त्यांच्या एकूण ठेवी होत्या तर 58, 671कोटी रुपयांची एकूण कर्ज त्यांनी दिलेली होती.. थकीत कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या 19 टक्के इतके होते.
शिखर बँक म्हणजे काय असतं ?
राज्य सहकारी बँक/ शिखर बँक ही त्या राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांचा महासंघ( फेडरेशन) असते. ती भारतीय रिझर्व बँक आणि जिल्हा बँक यामधील दुवा असते
राज्य सहकारी बँक कशी काम करते?
ते ‘ एक व्यक्ती, एक मत ‘ या तत्त्वावर काम करतात. या बँका सदस्यांच्या मालकीच्या असल्याने, संचालक मंडळाची निवड लोकशाही पद्धतीने केली जाते
राज्य व्यवस्थापित सहकारी बँक म्हणजे काय?
राज्य सहकारी बँक ही भारतातील राज्य स्तरावर आयोजित सहकारी बँक आहे. राज्य सहकारी बँका भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि संबंधित राज्य सरकारांद्वारे नियंत्रित केल्या जातात.