जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय ? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य, स्थापना , कर्ज योजना , DCC बँकेचा अर्थ काय, CC बँक कधी सुरू झाली?- District Central Cooperative bank in marathi , भारतात सहकारी चळवळीची सुरुवात सन 1904 च्या पहिल्या सहकारी कायद्याने झाली.
पूर्वी देशातील शेतकरी कर्जबाजारी सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला होता शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सावकाराकडून केले जात होते.म्हणून सन1904 च्या पहिला सहकारी कायद्यात सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती.
ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था सभासदांकडून तसेच बिगर सभासद व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात ठेवी मिळू शकते अशी अपेक्षा होती.पण प्रत्यक्षात तसे घडले नाही भांडवल वाढवण्यात आणि शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यशस्वी झाले नाही सन 1904 च्या पहिल्या सहकारी कायद्यातील त्रुटी विचारात घेऊन दुसरा सहकारी कायदा जास्त व्यापक करण्यात आला.
सन 1912 मध्ये भारताचा दुसरा सहकारी कायदा मंजूर करून सर्व क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सन 1912 च्या दुसऱ्या सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार अस्तित्वात आली.भारतातील सहकारी चळवळीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सन 1914 साली सर.ईडी.मॅकलेगण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीने 1915 मध्ये सरकारकडे आपला अहवाल सादर केला होता सहकारी चळवळीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वाच्या शिफारशी मॅकलेगण समितीने सुचवल्या मॅकलेगण समितीने मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करण्याची शिफारस केली होती
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय ? – District central cooperative bank in marathi
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नेमका अर्थ आता आपण समजून घ्या राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था त्यात मध्यस्थ साधणारी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होय.जिल्ह्यातील सर्व प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांनी एकत्र येऊन मध्यवर्ती सहकारी संघ स्थापन केल्यास त्यास मध्यवर्ती सहकारी बँक असे म्हणतात.मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे बँकेचे उद्दिष्टात इतर संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी उभारण्याचा समावेश असेल अशी सहकारी बँक परंतु यात नागरी सहकारी बँकेचा समावेश होत नाही.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 6 नुसार पुढील प्रमाणे व्याख्या करण्यात आलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विशिष्ट जिल्हा स्थापन झालेली असते, जी बँक आपल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांना आपल्या भांडवलाच्या कुवतीनुसार कर्ज देते आणि सहकारी कायद्याच्या व बँकिंग कायद्याच्या चौकटीत राहून इतर बँकिंग व्यवहार करते.
श्री जे. पी. नीयोगी.यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे अशी सहकारी बँक जी जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी गोळा करते. अशी प्राथमिक नागरी सहकारी बँक नसते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापना – DCC बँक कधी सुरू झाली?
राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली या बँकेचे कार्यक्षेत्र जिल्हा पुरते मर्यादित असते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्य सहकारी बँकेच्या सभासद असतात. महाराष्ट्रात अकोला येथे पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली.
dcc bank Full form in marathi – DCC बँकेचा अर्थ काय?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला इंग्रजीमध्ये म्हणतात म्हणजेच DCC बँक होय.
Dcc bank चा फुल फॉर्म District Central Co- Operative Bank आहे .
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्य (Functions Of District Co– Operative Bank in marathi
जिल्हा मध्यवर्ती बँकेला आणि कार्य करावे लागतात.ते कार्य खालील प्रमाणे आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्य फंक्शन्स ऑफ डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकारी पतपुरवठा संस्था व इतर सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करण्यासाठी निधी गोळा करते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी ही प्राथमिक सहकारी संस्था व राज्य सहकारी बँक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते.
1.ठेवी स्वीकारणे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा गावपातळीपर्यंत काम करत असल्याने तेथील सहकारी संस्था व व्यक्ती यांच्याकडून विविध प्रकारचे ठेवा जमा करून जनतेला बचतीची सवय लावण्याचे काम या बँका करत असतात यामध्ये चालू ठेवी ,बचत ठेवी, मुदत ठेवी, पुनरावृत्ती ठेवणे .इत्यादी प्रकारच्या ठेवी स्वीकारतात.
2.कर्जपुरवठा करणे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सभासद असलेल्या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना कर्जपुरवठा करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात जिल्ह्यातील कृषी पतसंस्थांना शेतीसाठी हंगामी कर्जे दिली जातात. एक ते पंधरा महिन्यापर्यंत पीक कर्ज वाटप केले जाते त्यांना अल्प मुदतीची कर्जे असे म्हणतात.
शेतकऱ्यांना विहीर खोदणे, शेतीची देखभाल करणे शेतीची अवजारे खरेदी करणे, शेततळे इत्यादी साठी एक ते पाच वर्षापर्यंत मध्य वृत्तीची कर्ज दिली जातात. या बँका दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करू शकत नाही.
कारण कर्जपुरवठा करण्यासाठी ग्रामीण व राष्ट्रीय कृषी विकास बँक म्हणजे नाबार्ड कार्य करत असते. दीर्घ मुदतीचा म्हणजे पाच ते पंचवीस वर्ष मुदतीचा कर्जपुरवठा करण्यासाठी या बँकेकडून पुरेसे भांडवल उपलब्ध नसते. जिल्हा पुरते मर्यादित कार्यक्षेत्रअसल्यामुळे ठेवी व भांडवल कमी पडत असते.
तारण मालमत्तेचे योग्य मूल्यमापन व कर्जवसुलीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा उपलब्ध नसते अल्प व मध्यम वृत्तीच्या कर्ज पुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते.
3.जिल्ह्यातील सहकारी संस्थांची बँक
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांची सहकारी संस्थांची नियंत्रक बँक म्हणून ही बँक कार्य करते. सहकारी संस्थांची बंकर म्हणून त्यांचा पैसा सुरक्षित सांभाळणे ,धनादेश स्वीकारणे ,धनादेश वटवणे, पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे, अधिकर्ष सवलत देणे,सभासद संस्थांचे राखीव निधी सुरक्षित ठेवणे. इत्यादी कार्ये मध्यवर्ती सहकारी बँक करते.
4.राज्य सहकाराची बँक
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्य सरकारची बँक म्हणून कार्य करते.शैक्षणिक संस्था,जिल्हा परिषद पंचायत समिती, ग्रामपंचायत सहकार खाते, यांची या बँकेत खाते असतात.जिल्ह्यातील सहकार खात्याचे सर्व आर्थिक व्यवहार या बँकेमार्फत होतात.ग्रामीण विकासाचा सरकारच्या अनेक योजना जिल्हा परिषदेमार्फत कार्यनियुक्त होतात. त्यामुळे जिल्हा पातळीवर ही राज्य सरकारची बँक कार्य करते.
5.शाखा विस्तार करणे
जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय असते. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये संपर्क साधण्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा असणे गरजेचे असते.तसेच ग्रामीण भागामध्ये बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे असते. म्हणून जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा विस्तार करण्याची कार्य ही बँक करत असते.
6.जिल्हा सहकारी चळवळीचे नेतृत्व करणे
जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये संपर्क साधण्याचे कार्य मध्यवर्ती सहकारी बँक करते त्यासाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या स्थापनेसाठी मार्गदर्शन करते ही बँक राज्य सहकारी बँक कडून आलेल्या कर्जाचे वाटप जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना करते .जिल्ह्यातील सहकारी चळवळीला गती देणे, निकोप वाढ करणे,विकासात समतोल प्रस्थापित करून मार्गदर्शन व नियंत्रण करणे, जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करणे.इत्यादी कार्य या बँकेला करावे लागतात.
7.तारणावर कर्ज पुरवठा करणे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जनतेला सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज देते. सहकार खरेदी-विक्री संस्थांना त्यांच्याकडील शेतीमालाच्या तारणावर सूत गिरण्या साखरकारखाने यासारख्या औद्योगिक सहकारी संस्थांना त्यांच्याकडील मालाच्या तारणावर ही बँक कर्ज पुरवठा करते.
8.नियंत्रण देखरेख व मार्गदर्शन करणे
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या व्यवहारांची निरीक्षण करणे,कर्जाच्या योग्य कारभारावर देखरेख ठेवणे,सभासद संस्थांना त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करणे,इत्यादी कार्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते.
9.जिल्ह्यातील पतपुरवठ्यात समतोल साधणे
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांची खाती व ठेवी या बँकेत असतात ही बँक आपल्या कार्यक्षेत्रातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या सहकारी संस्थांकडून ठेवी स्वीकारून आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या संस्थांना कर्ज रूपाने भांडवल उपलब्ध करून देते व पतपुरवठ्यात समतोल राखते.
10.ग्राहक सेवा
सामान्य व्यक्ती आपल्या ठेवी या बँकेत ठेवून आपल्या ग्राहकांना कर्ज देणे पैशाचे स्थलांतर करणे सुरक्षित खानांची सोय उपलब्ध करून देणे धनादेश वटवणे वीज बिल, विमा हप्ते भरणे यासारखी कामे करतात त्याचबरोबर आपल्या सभासदांना क्रेडिट कार्ड,स्मार्ट कार्ड,डेबिट कार्ड, ग्रीन कार्ड, एटीएम कार्ड,आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीसी. इत्यादी सेवाही उपलब्ध करून इत्यादी सेवाही उपलब्ध करून देत असतात.
थोडक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करते. त्यामुळे राज्य सरकारला सहकारी धोरणांची आखणी करता येते. राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शेतकऱ्यांकरिता अनेक योजना जाहीर करते या योजनांची कार्यवाही सुद्धा सहकारकडून केली जाते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यावर जिल्ह्याच्या सहकारी विकास म्हणजे जिल्ह्याचा सहकारी विकास अवलंबून असतो त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते.
- चेक म्हणजे काय ? चेकचे किती प्रकार आहेत – चेक कसे कार्य करते
- NEFT संपूर्ण माहिती – नेफ्ट म्हणजे काय , कार्य, फायदे, लिमिट, चार्जेस
- IMPS संपूर्ण माहिती – IMPS म्हणजे काय , कार्य, फायदे
- डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय – डिमांड ड्राफ्ट काय असते ?
- क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? क्रेडिट कार्ड कसे काढावे
- डेबिट कार्ड म्हणजे काय असते ? आणि डेबिट कार्ड चे प्रकार
- CVV Code म्हणजे काय असते ? CVV क्रमांकाचे महत्त्व , ATM कार्ड मध्ये CVV Code कुठे असते
- RTGS म्हणजे काय ? RTGS कसे करावे
- शेड्युल बँक म्हणजे काय ? शेड्यूल बँकेचे कार्य
- रिटेल बँकिंग म्हणजे काय ? रिटेल बँकिंग चे प्रकार
- विदेशी बँक म्हणजे काय ? विदेशी बँकेची भूमिका , विदेशी बँकेची नावे
- सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
- व्यापारी बँक म्हणजे काय आहे ? व्यापारी बैंकांची कार्ये, व्यापारी बँकेचे प्रकार
1.DCC बँकेचा अर्थ काय?
DCC बँकेचा अर्थ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतात .
2. DCC बँक RBI च्या अंतर्गत आहे का?
DCC बँक RBI च्या अंतर्गत आहे
3.भारतात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कधी व कोठे सुरू झाली?
मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही मुंबई जिल्ह्यातील सर्व संलग्न सहकारी संस्थांची एक केंद्रीय वित्तपुरवठा संस्था आहे, जी “मुंबई बँक” म्हणून प्रसिद्ध आहे आणि सन 1974 मध्ये MCS कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहे आणि तिचे कामकाज सुरू झाले. 12 फेब्रुवारी 1975.
4.dcc bank Full form in marathi
Dcc bank चा फुल फॉर्म District Central Co- Operative Bank आहे