बँका आणि एनबीएफसी मध्ये काय फरक आहे – बँक आणि बिगर बँकिंग संस्थांमध्ये अंतर | Bank and NBFC difference in Marathi, नमस्कार मित्रमंडळी!!!! आपण या लेखात बँक आणि बँकेतर वित्तीय संस्थांमध्ये फरक सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
तसेच यात आपण बँक म्हणजे काय असते आणि बँकेतर वित्तीय संस्था काय असतात याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला यामधील फरक आणि याची माहिती मिळण्यास मदत होईल.
बँका आणि एनबीएफसी मध्ये काय फरक आहे – Bank and NBFC difference in Marathi
बँका (Bank) | बँकेतर वित्तीय संस्था (NBFC) |
1.लोकांकडून मागणी केल्यावर परत करावयाच्या बोलीवर अथवा धनादेश, ड्राफ्ट आदेश किंवा इतर साधनांद्वारे काढून घेण्याच्या बोलीवर ठेवी स्वीकारल्या जातात या ठेवी कर्ज देणे आणि गुंतवणूक करण्यासाठी स्वीकारल्या जातात. | 1. बँकेतर वित्तीय मध्यस्थ संस्था ही सज्ञा आर्थिक विषयाच्या लिखाणामध्ये वापरण्यात येणारी सर्वसाधारण सज्ञा आहे. ही संज्ञा अशा वित्तीय संस्थांना संबोधण्यासाठी वापरण्यात येते की, ज्यांची देणे वित्तीय व्यवहार पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येत नाही. |
2. भारतातील सर्व बँकांचा संघटन प्रकार कंपनी हा असतो. | 2. बँकेतर वित्तीय संस्था या कंपन्या अथवा विशेष कायद्याने स्थापन झालेल्या संस्था किंवा सहकारी संस्था अथवा एक लाख रुपयांपेक्षा जास्त भांडवल असलेल्या भागीदारी संस्था असतात. |
3. बँकांचे कामकाज बँक व्यवसाय नियमन कायदा 1949 ने नियंत्रित केले जाते. | 3. बँकेतर वित्तीय संस्थांची कामकाज प्रामुख्याने 1934 च्या रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या कायद्याने नियंत्रित केले जाते. रिझर्व बँक या कायद्यानुसार नियम तयार करून नियंत्रण ठेवत असते. |
4. विविध प्रकारच्या ठेवी आणि भाग भांडवल म्हणून पैसे जमा करतात. | 4. बँकेतर वित्तीय संस्था परत घेता येणारे आणि परत घेताना येणारे भाग भांडवल तसेच मुदतीच्या ठेवी आणि प्रवेश शुल्क इत्यादी मार्गांनी पैसे जमा करतात. |
5. बँका मुदतीच्या आणि मागणी ठेवी स्वीकारतात.
मुदतीच्या हेवी ठराविक मुदतीनंतर परत करावयाच्या असतात. तर मागणी ठेवी मागणी केल्यानंतर परत करावयाच्या असतात. | 5. बँकेतर वित्तीय संस्था फक्त मुदतीच्या ठेवी स्वीकारतात. या मागणी ठेवी स्वीकारत नाहीत. |
6.बँकांच्या मागणी ठेवी काढण्यासाठी धनादेशाचा वापर केला जातो. | 6. बँकेतर वित्तीय संस्थांच्या ठेवी काढण्यासाठी धनादेशाचा वापर करता येत नाही. |
7. हे विमा व पत हमी महामंडळाकडून सर्व परवानाधारक बँकांमध्ये प्रत्येक ग्राहकाने एक लाख रुपये पर्यंत ठेवलेल्या ठेवींचा विमा उतरविलेला असतो. | 7.बँकेतर वित्तीय संस्थाकडील ठेवींचा विमा उतरविलेला नसतो. त्यामुळे यांच्या ग्राहकांना जास्त धोका स्वीकारावा लागतो. |
8. बँकांच्या शाखा मोठ्या प्रदेशात पसरलेल्या असतात. बँका विविध प्रकारच्या सेवा देतात. ग्राहकांच्या गरजेप्रमाणे विविध प्रकारच्या खात्यांमध्ये बँका पैसे स्वीकारतात. | 8. बँकेतर वित्तीय संस्था बँकांपेक्षा आकाराने लहान असतात. त्या देत असलेल्या सेवांची संख्या कमी असते. त्यामुळे यांची उपयुक्तता कमी होते.या संस्था मागणी ठेवी स्वीकारत नाही. यांच्याकडील ठेवींचा विमा उतरविलेला नसतो. त्यामुळे यांच्या ठेवीचे प्रमाण कमी असते. |
9. बँका मोठ्या प्रमाणावर कर्ज देतात. कर्ज देताना या फार जास्त धोका स्वीकारत नाहीत.मूर्ततारणावर बँका कर्ज देतात. | 9.बँकेतर वित्तीय संस्था लहान प्रमाणावर कर्ज देतात. लाभतेच्या तत्त्वाला या जास्त महत्व देतात. रोखतेच्या तत्वाला या जास्त महत्व देत नाहीत. या जास्त धोका स्वीकारतात. |
10. बँकांचे ठेवी आणि कर्ज यावरील व्याजदर कमी असतात. | 10. बँकेतर वित्तीय संस्थांचे ठेवी आणि कर्ज यावरील व्याजदर बँकांच्या व्याजदरापेक्षा 2 ते 3% जास्त असतात. |
बँक म्हणजे काय – What Is Bank In Marathi
भारतामध्ये बँकिंगचा व्यवसाय करणारी कोणतीही कंपनी म्हणजे बँक होय.
ज्या व्यवसायात कर्ज देण्याच्या हेतूने अथवा गुंतवणुकीसाठी लोकांकडून ठेवी स्वीकारल्या जातात व या ठेवी ठेवीदारांच्या मागणीनुसार अथवा धनादेश, किंवा इतर मार्गाने परत करावयाचे असतात त्या व्यवसायास बँकिंगचा व्यवसाय असे म्हणतात.
सर जॉन पॅगेट- कोणतीही व्यक्ती अथवा संस्था किंवा कोणीही जर ठेवी स्वीकारत नसतील, चालू खाते उघडू देत नसतील, धनादेश देत नसतील, त्यांच्यावर काढलेल्या धनादेशाचे पैसे देत नसतील आणि ग्राहकांच्या धनादेशाचे पैसे गोळा करत नसतील तर ती बँक होऊ शकणार नाही.
बँकेची कार्य
- बँका लोकांकडून ठेवी स्वीकारतात
- या ठेवी चालू खाते, बचत खाते यांच्या स्वरूपात असतात.
- लोकांकडून घेतलेल्या ठेवी बँकांच्या दृष्टीने त्यांनी घेतलेली कर्ज असतात.
- या ठेवी स्वीकारण्याचा हेतू लोकांना कर्ज देणे हा असतो.
- ठेवी स्वीकारण्यामागील दुसरा हेतू गुंतवणूक करणे हा असतो.
- बँकांची कर्ज, लोकांकडून स्वीकारलेल्या ठेवी, यांचा वापर लोकांचे देवाण-घेवाण यांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी किंवा लोकांची कर्जे खेळण्यासाठी केला जातो.
बिगर बँकिंग संस्थांमध्ये म्हणजे काय – What Is NBFC In Marathi
बँकेत तर वित्तीय संस्था या वित्तीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहेत. या संस्था बँका नाहीत. या संस्था वित्तीय क्षेत्रातील मध्यस्थ आहे.
बँकेतर वित्तीय मध्यस्थ ही संज्ञा आर्थिक विषयाच्या लिखाणामध्ये वापरण्यात येणारी सर्वसाधारण संज्ञा आहे. ही संज्ञा अशा वित्तीय संस्थांना संबोधण्यासाठी वापरण्यात येते की ज्यांची देणे वित्तीय व्यवहार पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येत नाहीत अथवा स्वीकारण्यात येत नाही.
बँकेतर वित्तीय मध्यस्थ ही सज्ञा आर्थिक विषयाच्या लेखनामध्ये वापरण्यात येणारी सर्वसाधारण संज्ञा आहे.
ज्या वित्तीय संस्थांची देणी आर्थिक व्यवहारात अथवा कर्ज व्यवहार पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येत नाही त्या संस्थांना संबोधण्यासाठी ही संज्ञा वापरण्यात येते.
NBFC ची भूमिका काय आहे?
NBFC व्यक्तींना, लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना आणि पारंपारिक बँकांद्वारे सेवा देत नसलेल्या इतर व्यवसायांना आर्थिक सेवा प्रदान करतात
Nbfcs कसे काम करतात?
NBFC या वित्तीय संस्था आहेत ज्या कर्ज, विमा आणि मालमत्ता व्यवस्थापनासह विविध वित्तीय सेवा आणि उत्पादने प्रदान करतात, परंतु त्यांच्याकडे बँकिंग परवाना नाही
भारतातील बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची कार्ये
पर्यायी आर्थिक सेवा, जसे की गुंतवणूक (सामूहिक आणि वैयक्तिक दोन्ही), जोखीम एकत्र करणे, आर्थिक सल्लामसलत, दलाली, मनी ट्रान्समिशन आणि चेक कॅशिंगची सुविधा देतात