अग्रहक्क भाग म्हणजे काय ? अग्रहक्क भागाचे प्रकार आणि अग्रहक्क भागाची वैशिष्ट्ये – agrahakka bhag in in marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
4/5 - (6 votes)

अग्रहक्क भाग म्हणजे काय ? अग्रहक्क भागाचे प्रकार आणि अग्रहक्क भागाची वैशिष्ट्ये – agrahakka bhag in in marathi,नमस्कार मित्रमंडळी!!!! आपण या लेखात अग्रहक्क भाग म्हणजे काय असते याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

यात आपण अग्रहक्क भाग म्हणजे काय, त्याची व्याख्या,  त्याचे प्रकार,त्याची वैशिष्ट्ये याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला अग्रहक्क भाग याबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होण्यास मदत होईल. 

अग्रहक्क भाग म्हणजे काय - agrahakka bhag in in marathi

अग्रहक्क भाग म्हणजे काय – agrahakka bhag in in marathi

 कंपनीच्या भागांना लाभांश व भांडवलाची परतफेड करताना अग्रक्रम देते अशा भागांना अग्रह भाग असे म्हणतात.

 अग्रह भागधारकांना दोन बाबतीत अग्रहक्क प्राप्त होतात. त्यांचा पहिला  अग्रहक्क हा लाभांशाच्या बाबतीत असतो. अग्रहक्क भागांवर त्यांची विक्री करताना प्रमंडळाने जाहीर केलेल्या दराने लाभाशी दिला जातो आणि समहक्क भागांवर लाभांश देण्या अगोदर अग्र हक्कांच्या भागांवर लाभांश द्यावा लागतो.त्यांचा दुसरा अग्रहक्क हा भांडवलाच्यापरत  परतफेडीच्या संदर्भात असतो.  प्रमंडळाचे विसर्जन झाल्यास समहक्क भागधारकांची भांडवलाची रक्कम परत करण्याअगोदर हक्क भागधारकांची पूर्ण रक्कम त्यांना परत करणे बंधनकारक असते. अग्रहक्क भागांच्या मतदानाच्या अधिकारावर मर्यादा असतात. 

 

 अग्रहक्क भागाची व्याख्या

कंपनी  ज्या भागांना लाभांश व भांडवलाची परतफेड करताना अग्रक्रम देते अशा  भागाला अग्रहक्क भाग असे म्हणतात.

 अग

अग्रहक्क भागाची वैशिष्ट्ये

1)लाभांशासाठी अग्रहक्क

अग्रहक्क भागधारकांना कंपनीच्या वार्षिक निवड नफा वाटपाच्या रकमेवर प्रथम हक्क असतो. म्हणून समहक्क भागधारकांच्या अगोदर लाभांश दिला जातो.

 

2) भांडवल परतफेडीचा अग्रहक्क

 कंपनी विसर्जना वेळी भांडवलाची परतफेड करताना अग्रहक्क भागधारकांना समहक्क भागधारकांच्या अगोदर प्रथम अग्रक्रम देऊन परतफेड केली जाते. म्हणून भांडवल नुकसानी पासून अग्रहक्क भागधारकांचे संरक्षण होते.

 

3) निश्चित परतावा

  अग्रहक्का भागधारकांना निश्चित दराने/ स्थिर दराने लाभांश दिला जातो. कंपनी अग्रह भागांची विक्री करतानाच निश्चित करत असते. आणि हा लाभांश कंपनीच्या नफ्यातून दिला जातो.

 

4)भांडवलाचे स्वरूप 

अग्रहक्क भाग भांडवल हे मुदतीचे भांडवल आहे. एका ठराविक कालावधी संपल्यानंतर या भांडवलाची परतफेड केली जाते. म्हणून आग्रहक्क भाग भांडवल कायमस्वरूपी नसते.

 

5) बाजारा मूल्य

   अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांशाचा दर स्थिर असल्यामुळे त्यांची बाजार मूल्य बदलत नाही. समहक्क भागांच्या तुलनेत या भागांच्या मूल्यात वाढ किंवा घट होत नाही. 

6)जोखीम 

अग्रहक्क भागधारकांना स्थिर दराने लाभांश व कंपनी विसर्जना वेळी भांडवलाची परतफेड याला प्रथम प्राधान्य दिले  जाते. म्हणून यांचे भांडवल सुरक्षित असते. यांना जोखीम नसते. 

7)दर्शनी मूल्य 

समहक्क भागांच्या तुलनेत अग्रहक भागांचे दर्शनी मूल्य हे जास्त असते. उदाहरणार्थ, समहक्क भागांचे दर्शनी मूल्य दहा रुपये असेल तर अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य शंभर रुपये असेल. 

8)गुंतवणुकदारांचे स्वरूप 

ज्या गुंतवणूकदाराला जास्तीच्या लाभांशाची अपेक्षा नसते व भांडवलाच्या परतफेडीवर सुरक्षितता हवी असते. असे गुंतवणूकदार अग्रहक्क भागांची खरेदी करून आपले भांडवल गुंतवतात. 

 

अग्रहक्क भागांचे प्रकार 

 

1)परतफेडीनुसार प्रकार

 ज्या अग्रहक्क  भागांची परतफेड विशिष्ट मुदतीनंतरकरण्याचा अधिकार प्रमंडळाला असते अशा भागांना परतफेड करावयाचे अग्रहक्क  भाग असे म्हणतात. ज्या अग्रहक्क  भागांची परतफेड प्रमंडळाचे विसर्जन झाल्यानंतरच करावी लागते त्यांना परतफेड न करावयाचे अग्रहक्क भाग असे म्हणतात. प्रमंडळाला विशिष्ट कालावधीसाठी भांडवलाची गरज असल्यास प्रमंडळ परतफेड करावयाच्या अग्रहक्क  भागांची विक्री करून असे भांडवल मिळविते. 

 

2)नफ्यातील सहभागानुसार प्रकार

 ज्याअग्रहक्क  भागांवर ठरलेल्या दराने लाभांश दिल्यानंतर उपलब्ध असलेल्या अतिरिक्त किंवा जास्त नफ्यातून आणखी लाभांश दिला जातो अशा अग्रहक्क भागांना नफ्यात सहभाग असणारे अग्रहक्क  भाग असे म्हणतात. या प्रकारच्या नेहमीच्या दराने लाभांश दिला जातो. परंतु प्रमंडळाला एखाद्या वर्षी मोठ्या प्रमाणात नफा झाल्यास त्या नफ्यातील काही भाग जादा लाभांशाच्या स्वरूपात या अग्रहक्क भागांवर दिला जातो.

 

3)लाभांश साठविण्यानुसार प्रकार 

ज्या अग्रहक्क  भागांवर लाभांश दिला गेला नसल्यास लाभांशाची रक्कम न बुडता ती साचत जाते आणि ज्यावेळी लाभांश देण्यासाठी पुरेसा नफा शिल्लक असतो.त्यावेळी ही संपूर्ण साचलेली लाभांशाची रक्कम अग्रहक्क  भागधारकांना दिली जाते अशा अग्रहक्क  भागांना लाभांशी साठविणारे अग्रहक्क  भाग असे म्हणतात.

या प्रकारच्या अग्रहक्क  भागांवर लाभांशांची रक्कम बुडत नाही तर ती सात जाते आणि ज्यावेळी प्रमंडळाला पुरेसा नफा मिळवतो त्यावेळी ही लाभांशाची रक्कम भागधारकांना मिळते.अग्रहक्क  भागांवर त्यांची विक्री करताना ज्या दराने लाभांश दिला जाईल तो दर जाहीर केलेला असतो. लाभांशाची रक्कम प्रमंडळाच्या नफ्यातून देण्याचे  असते.

त्यामुळे एखाद्या वर्षी प्रमंडळाला  पुरेशा प्रमाणात नफा न झाल्यास अग्रहक्क  भागांवर देखील तो उडतो आणि साठविला जात नाही अशा अग्रहक्क  भागांना  लाभांश न साठविणारेअग्रहक्क  भाग असे म्हणतात. या प्रकारचे भाग धारण करणाऱ्या भागधारकांना मिळालेला लाभांश पुढील कालावधीच मंडळाच्या नफ्यातून मागण्याचा अधिकार राहत नाही.

 

4)परिवर्तनानुसार प्रकार 

ज्या अग्रहक्क  भागांची विक्री करताना प्रमंडळाने असे जाहीर केलेले असते की, या अग्रहक्क  भागांच्या रकमेचे पूर्णपणे किंवा अंशतः प्रमंडळाच्या समहक्क भागात एका विशिष्ट मुदतीनंतर आणि एका विशिष्ट किमतीला परिवर्तन करण्यात येईल त्यांना परिवर्तनीय अग्रहक्क  भाग असे म्हणतात.

या प्रकारचे अग्रहक्क भाग विकत घेणाऱ्या गुंतवणूकदारांना परिवर्तनाच्या अगोदरच्या काळात अग्रहक्क  भागांचे ठराविक दराने लाभांश व परतफेडीत प्राधान्य यासारखे फायदे मिळतात तर परिवर्तनानंतर हे गुंतवणूकदार समूहक्क भागधारक होत असल्यामुळे त्यांना प्रमंडळाच्या वाढत्या नफ्यात अधिक दराने लाभांशात सहभागी होता येते आणि परिवर्तनाच्या वेळी असलेल्या मंडळाच्या समहक्क भागांच्या बाजारभावापेक्षा कमी रकमेत त्यांना असे समभाग प्राप्त होतात. 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment