खाजगी बँक म्हणजे काय ? खाजगी बँक माहिती , भारतातील खाजगी बँक – Private bank information in Marathi , नमस्कार मित्र मंडळ!!! आपण या लेखात खाजगी बँकेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अनेक लोकांना खाजगी बँकेविषयी मनात वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न असतात की खासगी बँक काय आहे, त्याचे फायदे कोण-कोणते, त्याचे महत्त्व काय ? तर काळजी करण्याची आवश्यकता नाही, आम्ही तुम्हाला या लेखात या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला खाजगी बँकेविषयी माहिती मिळविण्यास सोपे होईल.
वर्तमान काळात भारतामध्ये अनेक खाजगी बँका (Private Bank) आहेत. खाजगी बँकेचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे की सरकारी बँके पेक्षा जास्त सुविधा या खाजगी बँकेद्वारे ग्राहकांना दिली जाते. हेच कारण आहे की मोठ्या प्रमाणामध्ये खातेधारक हे खाजगी बँकेमध्ये आपले खाते उघडतात.
जर तुम्हालाही खाजगी बँकेमध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्हाला खाजगी बँका बद्दल माहिती असणे आवश्यक आहे, यासाठी तुम्हाला हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचावा लागेल जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होईल.
खाजगी बँक म्हणजे काय – खाजगी बँक माहिती | Private Bank In Marathi
खाजगी बँक म्हणजे ज्याचा सरकार जवळ कोणतेही स्वामित्व नसते म्हणजेच खाजगी बँकांचा मालकीचा हक्क हा सरकार ऐवजी कोणत्याही एखाद्या वैयक्तिक व्यक्तीकडे असतो. खाजगी बँकेचा मालकीचा हक्क हा सरकारकडे नाही तर एका सामान्य व्यक्ती कडे असतो. खाजगी बँकेचा मालिक कोणताही एखादा व्यक्ती असू शकतो, ज्याच्या द्वारे खासगी बँकेला चालवले जाते.
खाजगी बँकेची संपूर्ण जबाबदारी कोणत्याही एका व्यक्तीकडे असते. खाजगी बँकेला कोणताही इंडिव्हिज्युअल व्यक्ती चालू शकतो बस त्याच्याकडे तेवढे पैसे असले पाहिजे आणि सरकारकडून खाजगी बँक चालवण्यासाठी मान्यता प्राप्त असले पाहिजे.
जर सहकारी बँकेचा विचार केला तर सरकारची सरकारी बँकेमध्ये संपूर्ण भागीदारी असते. असे खाजगी बँकेमध्ये नसते. यासाठी या बँकांना खासगी बँकांच्या रूपांमध्ये ओळखले जाते. याच बँकांना खाजगी बँक म्हटले जाते.
खाजगी बँकेमध्ये खाते उघडण्याचे फायदे – Advantages Of Opening Account In Private Bank In Marathi
- खाजगी बँकेत आपण केव्हाही कोणत्याही कार्याला सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकतो. ज्या प्रकारे सरकारी बँकांमध्ये गर्दी असते त्यामुळे लोक खाजगी बँकेतून उपायोजना करू शकतो. बँकेच्या संबंधित कोणतेही काम काही मिनिटामध्ये खाजगी बँकेतून पूर्ण करू शकतो.
- खासगी बँकेतून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लोन सहजपणे प्राप्त करू शकतो.जर तुम्ही कोणत्याही खाजगी बँकेचे ग्राहक आहात तर जास्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही.लोन साठी फॉर्म भरू शकता.
- सरकारी बँकेच्या तुलनेत खाजगी बँकेमध्ये व्याजदर जास्त मिळते.जर तुमचा खाजगी बँकेमध्ये बचत खाता आहे तर या बँकेमधून तुम्ही अधिक लाभ प्राप्त करू शकता.
- खाजगी बँकेमध्ये प्रत्येक वेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची योजना प्रकाशित केली जाते.यामुळे ग्राहकांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळतात.
- अनेक प्रकारच्या खाजगी बँकेमध्ये इन्शुरन्स सुविधा प्राप्त होऊन जाते. या बँकेतून कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स सोप्या पद्धतीने शकतो यासाठी तुम्हाला बँक इन्शुरन्स फॉर्म भरावा लागेल. अनेक प्रकारच्या सरकारी योजना देखील खाजगी सेक्टर बँक द्वारा ग्राहकांना दिले जातात.
- खाजगी बँकेमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या इन्वेस्टमेंट प्लांट देखील मिळून जातील. एफडी घेऊ शकता. अधिक व्याजदर सोबत आरडी करून घेऊ शकता.याव्यतिरिक्त स्टॉक मार्केट मध्ये म्युचल फंड मध्ये गुंतवणूक साठी डिमॅट अकाउंट देखील ओपन करू शकता. सोबतच बँकेच्या म्युचल फंड ची एसआयपी देखील घेऊ शकता.
- खाजगी बँकेत खाते उघडल्यानंतर तुम्ही एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, चेक बुक, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सुविधा तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. जे अनेक सरकारी बँकेद्वारा या सर्व सुविधांचा लाभ भेटू नाही शकत.
- जर तुम्हाला कधी गरज पडली तर बँक स्टेटमेंट खाजगी बँकेकडून केव्हाही आपल्या अकाउंटचा स्टेटमेंट घेऊ शकता. ज्याचे कसल्याही प्रकारचे चार्ज लागत नाही.
- पेमेंट करण्यासाठी अनेक विकल्प मिळून जातात जसे की RTGS,NEFT,IMPS याव्यतिरिक्त UPI आणि अशा अनेक ऑप्शन मिळून जातील. ज्यामुळे ग्राहकांना सरळ पद्धतीने एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे पाठवणे सोपे होईल.
याप्रकारे खाजगी बँकेचे खूप मोठे आणि वेगवेगळे फायदे आहेत. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट बँकेमध्ये अकाउंट ओपन करावे लागेल.
भारतातील पहिली खाजगी बँक कोणती – भारतातील पहिली खाजगी बँक
भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिली बँक इंडसलँड बँक आहे. त्याची स्थापना 1994 मध्ये SP हिंदुजा यांनी केली होती आणि आता त्याचे भारतात 760 शाखा असलेले उत्कृष्ट बँकिंग नेटवर्क आहे.
भारतात खाजगी क्षेत्रातील किती बँका आहेत?
रिझर्व बँकेच्या वेबसाईट नुसार भारतात खाजगी क्षेत्रातील 21 बँक आहेत, ज्या खालील प्रमाणे
भारतातील खाजगी बँक – खाजगी बँकेची सूची – Private Bank List in Marathi
क्रम | बँकेच्या | शाखांचे | स्थापना | मुख्यालय |
1 | एक्सिस बँक | 4528 | 1993 | मुंबई, महाराष्ट्र |
2 | बंधन बँक | 670+ | 2015 | कोलकाता, पश्चिम बंगाल |
3 | सीएसबी बँक | 417 | 1920 | त्रिशूर, केरल |
4 | सिटी यूनियन बँक | 700+ | 1904 | कुंभकोणम, तमिलनाडु |
5 | डीसीबी बँक | 334 | 1930 | मुंबई, महाराष्ट्र |
6 | धनलक्ष्मी बँक | 270+ | 1927 | त्रिशूर शहर, केरल |
7 | फेडरल बँक | 1284 | 1931 | अलुवा, कोच्चि |
8 | एचडीएफसी बँक | 5430 | 1994 | मुंबई, महाराष्ट्र |
9 | आईसीआईसीआई बँक | 5288 | 1994 | मुंबई, महाराष्ट्र |
10 | आईडीबीआई बँक | 1892 | 1964 | मुंबई, महाराष्ट्र |
11 | आईडीएफसी प्रथम बँक | 260 | 2015 | मुंबई, महाराष्ट्र |
12 | इंडसइंड बँक | 2000 | 1994 | पुणे, महाराष्ट्र |
13 | जम्मू और कश्मीर बँक | 1038 | 1938 | श्रीनगर, जम्मू और कश्मीर |
14 | कर्नाटक बँक | 857 | 1924 | मंगलुरु, कर्नाटक |
15 | करूर वैश्य बँक | 779 | 1916 | करूर, तमिलनाडु |
16 | कोटक महिंद्रा बँक | 1500+ | 2003 | मुंबई, महाराष्ट्र |
17 | नैनीताल बँक | 150 | 1922 | नैनीताल, उत्तराखंड |
18 | आरबीएल बँक | 398 | 1943 | मुंबई, महाराष्ट्र |
19 | साउथ इंडियन बँक | 876 | 1929 | त्रिशूर, केरल |
20 | तमिलनाडु मर्केंटाइल बँक | 509 | 1921 | तूतीकोरिन, तमिलनाडु |
21 | यस बँक | 1000+ | 2004 | मुंबई, महाराष्ट्र |
खाजगी बँकांची नावे – खाजगी बँकेची नावे
- ॲक्सिस बँक (Axis Bank)
- बंधन बँक ( Bandhan Bank)
- सीएसबी बँक ( CSB Bank)
- सिटी युनियन बँक ( City Union Bank)
- डीसीबी बँक ( DCB Bank)
- धनलक्ष्मी बँक ( Dhanalakshmi Bank )
- लक्ष्मी विलास बँक ( Lakshmi Vilas Bank )
- फेडरल बँक (Federal Bank )
- एचडीएफसी बँक ( HDFC Bank )
- आयसीआयसीआय बँक ( ICICI Bank )
- आयडीबीआय बँक ( IDBI Bank)
- आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank)
- इंडसइंड बँक ( IndusInd Bank )
- जम्मु अंड कशमिर बँक ( Jammu and Kashmir Bank )
- कर्नाटक बँक ( Karnataka Bank )
- कोटक महिंद्रा बँक ( Kotak Mahindra Bank )
- नैनीताल बँक ( Nainital Bank )
- आरबीएल बँक (RBL Bank )
- साऊथ इंडियन बँक ( South Indian Bank )
- तमिलनाड मार्केटाईल बँक ( Tamilnad mercantile Bank )
खाजगी बँकेचे व्याजदर – Private Bank Interest Rates
- वर्तमान मध्ये सर्व बँकेच्या तुलनेत युनिटी स्मॉल फायनान्स बँक 8.50% प्रति वर्षाची सर्वात जास्त व्याजदर एफडी प्रदान करते. यानंतर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 8.01% प्रति वर्षाचे सर्वात जास्त व्याज प्रदान करते.
- याच प्रकारे ESAF स्मॉल फायनान्स बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक एफबीवर वार्षिक 8.00% व्याज प्रदान करते. याव्यतिरिक्त फिंकेअर स्मॉल फायनान्स बँक, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक वार्षिक 7.75% ची अधिक व्याज प्रदान करते.
- जना स्मॉल फायनान्स बँक देखील एफडी वर 7.50% प्रतिवर्षी चे प्रदान करते खाजगी सेक्टर च्या बँकेमध्ये डीसीबी बँक, एस बँक, आरबीएल बँक,
- आयडीएफसी फर्स्ट बँक, बंधन बँक, फेडरल बँक, सीएसबी बँक, साऊथ इंडियन बँकआणि कॅनरा बँक 6.50% प्रति वर्ष चे व्याज प्रदान करते अशाप्रकारे खाजगी बँका व्याज प्रदान करत असतात.
- बँक म्हणजे काय व्याख्या ? बँकेचे कार्य – बँकेचे प्रकार
- पेमेंट बँक म्हणजे काय असते ? पेमेंट बँकेचा उद्देश्य , पेमेंट बँकेचे कार्य
- चेक म्हणजे काय ? चेकचे किती प्रकार आहेत – चेक कसे कार्य करते
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
- शेड्युल बँक म्हणजे काय ? शेड्यूल बँकेचे कार्य