अंकेक्षण म्हणजे काय ? अंकेक्षणाचे महत्त्व काय ? –audit meaning in marathi, Auditing information in Marathi , नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात अंकेक्षण (Auditing) याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षणाचे स्वरूप आणि व्याप्ती, अंकेक्षणाचे महत्त्व, त्याची उद्दिष्टे व त्याचे फायदे याबद्दल संपूर्ण माहिती विस्तारात जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला अंकेक्षण बद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होण्यास मदत होईल.
अंकेक्षण म्हणजे काय – Auditing information in Marathi
अंकेक्षण हे ऑडिटिंग या शब्दाचे मराठी भाषांतर असून अंकेक्षणाला लेखापरीक्षण, हिशेब- तपासणी, इत्यादी प्रतिशब्द देखील आहेत. अंकेक्षणाला आज फार व्यापक, प्रगत व व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेले आहे तरी अंकेक्षणाची सुरुवात फार पूर्वी झालेली आहे.
इंग्रजीत Auditing या शब्दाची व्याप्ती लॅटिन भाषेतील Audire ( ऑडायर ) या शब्दापासून झाली असे मानले जाते.ऑडायरया शब्दाचा अर्थ एकणे असा होतो. अगदी पूर्वीच्या काळी हिशेब तपासण्याची पद्धती आजच्या पद्धतीपेक्षा फारच वेगळी होती. लिहिलेले हिशेब एखाद्या अनुभवी व तज्ञ व्यक्तीला वाचून दाखवले जात असत व ती तज्ञ व्यक्ती ते हिशोब एकूण त्या हिशोबाबाबत आपला अभिप्राय निर्णय देतच असे. अशा रीतीने Audiver म्हणजे एकूण घेणार आहे या शब्दापासून Auditor हा शब्द निर्माण होऊन तो रूढ झाला.
ज्यांचे हिशेब तपासावयाचे आहेत त्यांचे हिशेब ऐकून घेणारी व या पद्धतीने हिशोबांची पुस्तके तपासून देऊन त्यावर अभिप्राय वर निर्णय देणारी व्यक्ती म्हणजे ऑडिटर व अशा ऑडिटरने केलेल्या कामास ऑडिटिंग / अंकेक्षण असे म्हणतात. अंकेशनाच्या कार्याचा व कर्तव्याचा उल्लेख प्रथम पंधराव्या शतकात लुका पैसे आली या इटालियन गणिती ने आपल्या द्विनोंद पद्धतीवरील पुस्तकात केलेला आहे.
औद्योगिक क्रांती नंतर खऱ्या अर्थाने अंकेक्षणाला महत्त्व वाढत गेले व आज अंकेक्षण हे अपरिहार्यच होऊन बसलेले आहे. औद्योगिक क्रांती पूर्वी व्यवसायांची क्षेत्र मर्यादित होते. व्यवसायाचे मालक स्वतः आपल्या व्यवसायाची व्यवस्थापन करणे, हिशेब ठेवणे, देखरेख करणे इत्यादी कार्य करीत असत. व्यवसायाची मालकी स्वतःकडेच असल्यामुळे हिशोब, आर्थिक व्यवहार इतरांकडून तपासून घेऊन ते बरोबर आहे किंवा नाही याची खातर जमा करून घेण्याची आवश्यकता भासत नसे. व्यवसायाचे प्रमाण व स्वरूप मर्यादित असल्यामुळे तसेच व्यवसायासंबंधीच्या कायदेशीर गोष्टी फारशा गुंतागुंतीच्या नसल्यामुळे हिशेब ठेवणे, विविध नोंदी करणे, इत्यादी गोष्टी सुलभरीत्या केल्या जात असत.
हिशोब ठेवण्याचे कार्य जो करीत असे तोच हिशोब बरोबर आहे किंवा नाही याची खात्री देखील करत असे. या सर्व गोष्टींमुळे स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करून हिशेब तपासणी करण्याची आवश्यकता भासत नसे; परंतु औद्योगिक क्रांती नंतर मात्र व्यवसायांची स्वरूप बदलत गेले. श्रम विभागणीच्या तत्वांची अंमलबजावणी होऊन संघटनांचे स्वरूपात बदल झाला. व्यवसाय- संघटना नवीन नवीन रूपे धारण करू लागल्या, कंपन्यांची स्थापना ही मोठ्या प्रमाणावर होऊ लागले.
त्यांचे आकारमान वाढत गेले. निर्णय घेणे, हिशेब ठेवणे, इत्यादी कार्य तज्ञ व्यवस्थापक करू लागले. कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी, नोकर वर्गाने कंपन्यांचा कारभार योग्य प्रकारे चालविला आहे किंवा नाही ,त्यांचे पैशाचे व्यवहार, मालमत्तेसंबंधीचे व्यवहार व त्याबाबतची हिशेब योग्य तऱ्हेने ठेवले आहे किंवा नाही ते तपासून घेण्यासाठी अंकेक्षणाची गरज भासू लागली.
अंकेक्षणाची व्याख्या व अर्थ – Auditing Meaning In Marathi
1) मोंटगोमेरी – अंकेक्षण म्हणजे एखाद्या व्यवसायातील किंवा अन्य संघटनेच्या आर्थिक व्यवहारांची सत्यता आणि त्यांचे परिणाम तपासून व पडताळून पाहण्याच्या उद्दिष्टाने त्या व्यवसायाचे किंवा संघटनेच्या हिशोबांच्या पुस्तकांचे तसेच मूळ कागदपत्रांचे परीक्षण करणे व त्याबाबत अहवाल देणे होय.
2) लॉरेन्स आर.डीक्सी – संबंधित व्यवहारावरून सर्व नोंदी पूर्णपणे व योग्य प्रकारे केलेल्या आहेत तसेच त्या व्यवहारांचे बिनचूक व परिपूर्ण प्रतिबिंब हिशोबाच्या पुस्तकांमध्ये असल्याची खातर जमा करण्याच्या हेतूने हिशोबांचे परीक्षण किंवा तपासणी करणे म्हणजेच अंकेक्षण होय. काही व्यवहारांच्या बाबतीत ते व्यवहार अधिकृत असल्याचेही खात्री करून घेणे आवश्यक असते.
3) आर.जी. विल्यम्स – व्यवसायाची किंवा धंद्यांची वास्तव संपत्तीत स्थिती सत्य व बिनचूक दाखवण्यासाठी ताळेबंद योग्य प्रकारे तयार करण्यात आलेला आहे किंवा नाही याबाबतची खात्री करून घेण्याच्या दृष्टीने व्यवसायाचे किंवा धंद्याच्या हिशोबांच्या पुस्तकांचे, खात्यांचे, प्रमाणकांचे, कागदपत्रांचे परीक्षण करणे म्हणजेच अंकेक्षण होय.
4) स्पाय सर अँड पेगलर – अंकेक्षण म्हणजे व्यवसायाचे जमाखर्चाची, हिशेबपुस्तकाची, खाती, प्रमाणके, इत्यादींची अशा प्रकारे तपासणी किंवा परीक्षण करणे, की ज्यावरून अंकेक्षक स्वतःची अशी खात्री करून घेतो की, त्याला देण्यात आलेल्या माहितीनुसार व हिशेबांच्या पुस्तकावरून व्यवसायाचा तयार केलेला ताळेबंद योग्य पद्धतीने तयार केलेला असून त्यावरून व्यवसायाच्या संपत्तीत परिस्थितीचे वास्तव व योग्य स्वरूप समजते. त्याचप्रमाणे व्यवसायाचे नफा– तोटा पत्रक त्या संबंधित आर्थिक कालावधीतील खरा व वास्तव नफा किंवा तोटा दर्शविते किंवा नाही हेही तो तपासून पाहतो व जर अंकेक्षकाचे ज्या काही बाबतीत समाधान झाले नाही त्याबाबत अंकेक्षक संबंधितांचा अहवाल सादर करतो.
अंकेक्षणाचे प्रकार आणि त्याच्या कामाच्या स्वरूपावरून अंकेक्षणाचे प्रकार.
व्यवसाय संघटन पद्धती आणि व्यवसायांचे स्वरूप व गरजेनुसार अंकेक्षणाचे प्रकार पुढीलप्रमाणे दर्शविता येतील .
(क) नियामक अंकेक्षण (Statutory Audit ):-
जे अंकेक्षण कायद्यातील विविध तरतुदीप्रमाणे संबंधित संस्थांच्या बाबती करणे आवश्यक असते अशा अंकेक्षणाला नियमक अंकेक्षण असे म्हणतात . नियामक अंकेक्षणाला वैधानिक अंकेक्षण, कायदेशीर अंकेक्षण अशा संज्ञा – प्रतिसंज्ञाही वापरल्या जातात. विविध कायद्यानुसार निरनिराळ्या संस्थांच्या जमाखर्चांची, हिशेबांच्या पुस्तकांची तपासणी किंवा अंकेक्षण त्या त्या कायद्यातील विविध तरतुदीनुसार करणे आवश्यक ठरते. म्हणजेच अशा प्रकारचे अंकेक्षण करणे हे त्या संस्थेच्या मालकांच्या इच्छेवर अवलंबून नसते, तर कायद्यातील विविध तरतुदीनुसार करणे सक्तीचे असते. म्हणून अशा अंकेक्षणाला सत्तांचे अंकेक्षण किंवा अनिवार्य अंकेक्षण असे म्हणतात .
नियामक अंकेक्षणाचे ढोबळमानाने पुढील तीन प्रकार पडतात.
- कंपनीचे अंकेक्षण (Company Audit) :- 1956 च्या भारतीय कंपनी कायद्यानुसार ज्या कंपन्यांची स्थापना करण्यात आलेली असते अशा कंपन्यांना आपल्या हिशेबपुस्तकांचे अंकेक्षण मान्यता प्राप्त अंकेक्षकाकडून करून घेणे आवश्यक करण्यात आलेले आहे. त्या कायद्यांमध्ये कंपनीच्या अंकेक्षकांची कर्तव्य ,अधिकार, नियुक्ती, इत्यादी बाबतीत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
- विश्वस्त संस्थांच्या हिशेब – पुस्तकांचे अंकेक्षण :- लोकपयोगी सार्वजनिक कार्यासाठी अज्ञान व्यक्ती, विधवा, मृत, अपंग, दुर्बल, इत्यादींना सहाय्य करण्याच्या दृष्टीने विश्वस्त संस्थांची स्थापना करण्यात येते.. विश्वस्त संस्थांचा कारभार योग्य रीतीने चालावा, विश्वस्तांनी व अन्य संबंधितांनी विश्वस्त संस्थेच्या मालमत्तेची अफरातफर करू नये,तसेच हिशोबामध्ये गैरप्रकार करून विश्वस्त संस्थेच्या पैशांचे, मालमत्तेचे अपहरण करू नये, या दृष्टीने विश्वस्त संस्थांच्या हिशेबांचे अंकेक्षण योग्य अहर्ता प्राप्त अंकेक्षकाकडूनझाले पाहिजे असे बंधन टाकण्यात आलेले आहेत.
- सहकारी संस्था, बँका, इत्यादींचे अंकेक्षण :- कंपन्या, विश्वस्त संस्था यांच्याप्रमाणे इतर अनेक संस्था विशिष्ट उद्दिष्टांनी विशेष कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या असतात. यामध्ये 1949 बँकिंग कायद्यानुसार नोंदविलेल्या बँका, सहकारी कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध संस्था, विमा कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या विमा कंपन्या, इत्यादी अनेक संस्थांचा समावेश होतो. ज्या विशेष कायद्यान्वये या संस्थांची स्थापना करण्यात आलेली असते, त्या कायद्यांमध्ये त्या संस्थांच्या अंकेक्षणाबाबतच्या तरतूदही करण्यात आलेल्या असतात.
(ख) खाजगी अंकेक्षण (Private Audit) :-
अर्थव्यवस्थेतील उद्योग – व्यवसाय करणाऱ्या सर्वच संस्थांना अंकेक्षण करणे हे कायद्याने सक्तीचे केलेले नाही परंतु अशा संस्था देखील स्वेच्छेने आपल्या व्यवसायांच्या हिशेबांचे अंकेक्षण योग्य अशा अंकेक्षणाकडून करून घेतात.या अंकेक्षणाला खाजगी अंकेक्षण असे म्हणतात येईल. या संस्थांच्या हिशेबांचे अंकेक्षण करणे किंवा न करणे हे त्या संस्थाचालकांच्या किंवा मालकांच्या मर्जीवर अवलंबून असते म्हणून अशा अंकेक्षणाला ऐच्छिक अंकेक्षण असेही म्हणतात. खाजगी संस्थांचे खाजगी संस्थांचे अंकेक्षण करताना अंकेक्षकाची नेमणूक, कर्तव्य, अधिकार, जबाबदारी, कामाचे स्वरूप, इत्यादी सर्व गोष्टी द्या व्यवसाय संस्थेच्या मालक आणि अंकेक्षक यांच्यामध्ये एक करार करून निश्चित केल्या जातात व त्यानुसार अंकेक्षण केले जाते. अशा खाजगी किंवा ऐच्छिक अंकेक्षणाप्रमाणे व्यक्तिगज जमाखर्चांचे अंकेक्षण (Audit of the accounts of individuals) ; व्यक्तिगत व्यापारी संस्थेच्या हिशेबांचे अंकेक्षण (Audit of the accounts of sole trader of entrepreneur) ;संस्थांच्या हिशेबांचे अंकक्षण (Audit of the accounts of partnership firms),इत्यादींचा समावेश होतो.
(ग) सरकारी अंकेक्षण (Government Audit) :-
केंद्र सरकारी, राज्य सरकार, तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या जमाखर्चांचे, हिशेबांच्या पुस्तकांचे अंकेक्षण योग्य प्रकारे होण्यासाठी हिशेब व अंकेक्षण खात्यांची ( Accounts and Audit Department) स्थापना केलेली आहे. या खात्यांचा ( Comptroller and Auditor General) हा सर्वोच्च अधिकार असते. विविध सरकारी खाती व सरकारी संस्था यांच्या जमाखर्चांचे, हिशोबांच्या पुस्तकांचे अंकेक्षण हिशेब व अंकेक्षण खात्यामार्फत केले जाते. या अंकेक्षणाचा प्रमुख हेतू सरकारी पैशांचा, सार्वजनिक मालमत्तेचा दुरुपयोग केला जात नाही हे पाहणे हा असतो.
अंकेक्षणाचे स्वरूप व व्याप्ती – Nature And Scope Of Auditing In Marathi
अंकेक्षण हे शास्त्रीय पद्धतीने व पद्धतशीरपणे करण्यात येते व अंकित क्षणाचे काम हे विशिष्ट गुणवत्ता असलेल्या तज्ञ, अनुभवी व्यक्तीकडून केले जाते. हिशेबांच्या पुस्तकातील नोंदी केवळ तांत्रिकदृष्ट्या तपासून त्यावर खुणा करणे म्हणजे अंकेक्षण नव्हे; तर विशिष्ट अशी पूर्वनियोजित उद्दिष्टे दृष्टीसमोर ठेवून हिशेब- पुस्तकांचे, खात्यांची विश्वसनीयता, सत्यता जाणून घेण्यासाठी संबंधित कागदपत्रांची, हिशोबांच्या पुस्तकांची केलेली म्हणजे अंकेक्षण होय.
- अंकेक्षण करताना संबंधी संस्थेच्या, व्यवसायाच्या अगर संघटनेच्या जमाखर्चाची, हिशोबांच्या पुस्तकांचे, विविध खात्यांची गणितीय शुद्धता तपासली जाते.
- प्रत्येक आर्थिक व्यवहार योग्य प्रकारे कीर्ती नोंदविला गेला आहे किंवा नाही याची खात्री करून घेतली जाते.
- कीर्तीतील सर्व नोंदी योग्य त्या खात्यात किंवा खतावणीत नोंदविल्या आहेत याची खातर जमा करणे.
- कीर्ती व खतावणी यामधील विविध खात्यात सर्व बेरजा, वजाबाकी, खात्यामधील शिल्लक, इत्यादींची तपासणी करणे.
- जमाखर्चासाठी, हिशोबांसाठी दाखल केलेले दस्तवेज, कागदपत्रे, प्रमाणके, पावत्या इत्यादी योग्य प्रकारे व कायदेशीर रित्या तयार करण्यात आलेले आहेत याची खात्री करून घेणे.
- तेरीज- पत्रक तपासणे.
- व्यापारी पत्रक,नफा- तोटा पत्रक, ताळेबंद इत्यादी तपासून अशी सर्व पत्रके योग्य व बरोबर आहेत याची खात्री करून घेणे.
- ताळेबंदातील देयता व मालमत्ता यांची सत्यापन व मूल्यांकन करणे.
- व्यवहारा संबंधित काही शंका निर्माण झाल्यास त्याबाबत समाधान होऊन खात्री पटेपर्यंत तपासणी करणे.
- अंकेक्षणाचे कार्य पूर्ण झाल्यावर अंकेक्षणाचा अहवाल संबंधितांना सादर करणे व योग्य प्रकारे प्रमाणपत्र देणे.
अंकेक्षणाचे महत्त्व – Importance Of Auditing In Marathi
हिशोब ठेवणे ही गरज आहे, तर अंकेक्षण करणे ही चैन आहे अशा आशयाची विधाने पूर्वी केलेल्या आढळून येते. परंतु ते बरोबर नाही, कोणत्या संस्थेला हिशेब ठेवणे तर आवश्यक वाटतेच, पण केवळ लिहून अपेक्षित हेतू सफल होत नाही; तर ठेवलेले हिशेब बरोबर आहेत किंवा नाही हे तपासून पाहणे ही आवश्यक असते., संस्थेचा व्यवसायाचा व्याप वाढत गेल्यास एकाच व्यक्तीला सर्व ठिकाणी, सर्वच बाबतीत वैयक्तिक लक्ष देत आहेत येणे,
नियंत्रण ठेवता येणे शक्य नसते, ज्या व्यवसायात, संस्थेत किंवा संघटनेत वेगवेगळी कामे करण्यासाठी वेगवेगळी कर्मचारी नेमली जातात, ज्या व्यवसाय संस्थांचा कामाचा व्याप प्रचंड आहे आणि प्रामुख्याने ज्या उद्योग- व्यवसा मालकी व व्यवस्थापन यांच्यामध्ये फारकत असते, अशा बाबतीत अंकेक्षणाची आवश्यकता खूप महत्त्वपूर्ण असते.
1)व्यवसायाची सत्य आर्थिक स्थिती समजते:
अंकेक्षणामुळे हिशेबाची पुस्तके विंचूक लिहून ती अध्ययावत ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. या हिशेबांच्या पुस्तकावरून उद्योग- व्यवसायाची वार्षिक खाते, वार्षिक पत्रके तयार करण्यात येतात.
अंकेक्षक हिशोबांची पुस्तके, खाती योग्य रीतीने तपासून ते अचूक असल्याचे प्रमाणपत्र देतो. त्याचप्रमाणे नफा- तोटा पत्रक योग्य नफा किंवा तोटा दर्शवते किंवा नाही व ताळेबंदही खरी व योग्य परिस्थिती दर्शवतो किंवा नाही याबाबतही अंकेक्षकाला आपले मत त्याच्या अहवालात नमूद करावे लागते.
2)आवश्यक माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंकेक्षणाचे महत्त्व:
अंकेक्षणामुळे हिशेब लिहिण्याची जबाबदारी असणारा कर्मचारी वर्ग तत्पर, जागृत व दक्ष असतो. त्यामुळे हिशेब पुस्तके अध्यायावत व योग्य प्रकारे लिहिली जातात आणि परिणामतः व्यवस्थापनाला किंवा अंकेक्षकाला आवश्यकता भासते तेव्हा हिशोबासंबंधीची आवश्यक माहिती विना विलंब प्राप्त होऊ शकते.
3)हिशोबातील चुका लक्षात येऊन चुकांना, अफरातफरीला काय बंद बसतो:
जमा खर्च, हिशेब लिहिताना जर काही चुका झाल्या असतील तर त्या हिशेब तपासणी( अंकेक्षण) करताना त्वरित लक्षात येतात. तसेच लबाडी, अफरातफर केलेली असल्यास ती सुद्धा उघडीस येते. त्याचप्रमाणे अंकेक्षण केले जाते ही गोष्ट माहित असल्यामुळे संबंधित कर्मचारी अफरातफर, लबाडी करण्याचे धाडस सहसा करीत नाहीत,हिशेबही योग्य प्रकारे लिहिण्याची खबरदारी घेतात.थोडक्यात, अंकेक्षणामुळे हिशेब लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यावर एक प्रकारचा वचक निर्माण होऊन हिशेबातील चुकांना, अप्रतफ्रींना किंवा लबाडीला पायबंद बसतो.
4)हिशेप– पद्धतीतील दोष व उनिवा दूर करता येतात:
अंकेक्षणामुळे हिशोबाची पुस्तके योग्य प्रकारे तपासणी जात असल्यामुळे लेखापाल तर सर्व हिशेब योग्य प्रकारे, काळजीपूर्वक लिहिण्याचा प्रयत्न करतोच, पण एवढे करूनही त्यामध्ये काही दोष, राहिलेल्या असल्यास अंकेक्षक त्या उनिवा, दोष दाखवून देतो. योग्य पद्धतीचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शनही करतो. त्यामुळे हिशेब विभागाच्या कार्याचा दर्जा उंचावतो.
5)कर्ज मिळवता येणे शक्य होते:
उद्योग- व्यवसायाला अनेक गोष्टींसाठी कर्ज पुरवठ्याची आवश्यकता असते. असा कर्ज पुरवठा बँका किंवा बँकेततर वित्तीय संस्था करतात. बँका व अन्य कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था कर्ज देताना उद्योग- व्यवसाय संस्थेच्या अंकेक्षित हिशोबावर, नफा तोटा पत्रकावर, ताळेबंदावर जास्त विश्वास ठेवतात व त्यावरून कर्ज द्यावयाची किंवा नाहीत, द्यावयाची झाल्यास किती प्रमाणावर द्यावयाची हे ठरू शकतात. म्हणजेच अंकेक्षित हिशेब पुस्तकांच्या आधारावर उद्योग- व्यवसाय संस्थांना कर्ज मिळवणे सुलभ होते.
अंकेक्षणाची उद्दिष्टे – Purpose Of Auditing In Marathi
अंकेक्षणाचे अथवा हिशेब तपासणीचे उद्देश दोन प्रकारचे असतात.
1) मुख्य उद्देश
2) दुय्यम अथवा पूरक उद्देश.
1)मुख्य उद्देश
- हिशेब लेखनात कार्यक्षमता (Efficiency) आणि अचूकता किंवा तंतोतंतपणा (Accuracy) यांना प्रोत्साहित करणे.
- वार्षिक लेखांच्या सत्तेविषयी खात्री करून घेणे: अंकेक्षणाने व्यवसायाच्या व्यापार आणि नफा तोटा लेखा आणि ताळेबंद यांची काटेकोर तपासणी करून, नफा- तोटा खात्यावरून संबंधित कालावधीत व्यवसायाने कमविलेल्या नफ्याचे वास्तविक परिणाम कळते आणि ताळेबंदावरून व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचे वास्तव चित्र स्पष्ट होते याची खात्री करून घ्यावयाची असते. हा अंकेक्षणाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे.
- लेखी नियमानुसार ठेवल्याची खात्री करून घेणे: व्यवसायाचे लेख हे संबंधित व्यवसायाच्या परंपरेनुसार आणि त्या व्यवसायाला लागू असलेल्या नियमांना अनुसरून ठेवले आहेत आणि त्यात कोणतीही अनियमितता नाही हे पाहणे हा अंकेक्षणाचा उद्देश असतो.
2)दुय्यम / पूरक उद्देश
- लेखाकर्मातील चुका शोधून काढणे: लेखी लिहीत असताना कर्मचाऱ्याकडून नकळत काही चुका होतात. उदाहरणार्थ, एकच व्यवहार दोनदा लिहिणे किंवा एखाद्या व्यवहार नोंद न होणे अथवा चुकीच्या रकमेने , खुणेने नोंद होणे.
काही वेळा लेखाकर्माच्या नियमांचे पुरेसे ज्ञान नसल्याने अथवा इतर कारणाने चुका होतात. उदाहरणार्थ, नफा तोटा खाते तयार करताना महसुली आणि भांडवली खर्चाची आकारणी योग्य रीतीने न होणे.
- हिशेबातील लबाडी, कपट,अफरातफर शोधून काढणे:चुका नकळत किंवा नियमांच्या अज्ञानामुळे होतात आणि काळजीपूर्वक काम केल्याने त्या टाळताही येतात. परंतु लबाडी, कपट किंवा अफरातफर ही मालकाला धोका देण्याच्या उद्देशाने मुद्दाम, जाणून-बुजून केलेली असते. लेखाकर्माच्या नियमांचे पुरेसे ज्ञान असूनही, स्वतःच्या स्वार्थासाठी पैशांची अफरातफर करण्यासाठी, कर्मचारी मुद्दाम चुकीच्या नोंदी करतो. अशा लबाडीचे किंवा अफरातफरीचे व्यवहार शोधून काढणे हे अंकेक्षणाचे उद्दिष्ट असते.
- लबाडी, अफरातफर यांना आळा घालने :लबाडीचे व्यवहार नुसते शोधून अंकेक्षणाचे काम संपत नाही.भविष्यात असे लबाडीचे व्यवहार पुन्हा न होण्याच्या दृष्टीने लेखाकर्म यंत्रणेत किंवा पद्धती सुधारणा सुचविण्यासाठी हिशेब तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हा एक अंकिशनाचा उद्देश असतो.
अंकेक्षणाचे फायदे – (Advantages Of Auditing)
लोकेशन ही आता चैनीची बाब राहिली नसून हिशेब म्हटले की त्याचे अंकेशन, असे समीकरणच तयार झाले आहे.केवळ चुकांचा शोध किंवा दुरुस्ती यासाठी अंकेशन आवश्यक नसून अंकेशनामुळे हिशेब्राच्या कामात कार्यक्षमता आणि अचूकता निर्माण होऊ शकते हे आपण अभ्यासले आहेत. अशा अंकेक्षणाचे फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील–
1.लेखापुस्तके अद्ययावत राहतात: अंकेशन नियमितपणे होत असल्याने त्यासाठी जमा खर्च पूर्ण लिहिले असणे आवश्यक असते. त्यामुळे व्यवसायाची लेखापुस्तके अद्ययावत लिहिली जातात.
- व्यवसायाची वास्तविक आर्थिक स्थिती कळते: व्यवसायाच्या वार्षिक खात्यांचे अंकेशन केल्यामुळे व्यवसायाची खरी आर्थिक स्थिती काय आहे ते संचालकांना भागधारकांना व सामान्य जनतेला ही कळते.
- व्यवसाय विक्रीच्या वेळी खरेदी प्रतिफल ठरविण्यास मदत: व्यवसाय विकताना किंवा व्यवसायाचे संयुक्त स्कंध प्रमंडळात रूपांतर करताना व्यवसायाचे खरेदी प्रतिफल अंकेशित लेखांच्या आधारावर काढण्यास खरेदीदार व विक्रेता दोघांचीही तयारी असते. त्यामुळे संपत्ती आणि देयतांचे विशेषत: नावलौकिकाचे मूल्यांकन करणे सोपे जाते.
4.भागीदारांमध्ये सामजस्य: भागीदारीचे लेखी अंकेक्षित असतील तर भागीदारांमध्ये परस्पर विश्वास कायम राहतो. त्यांना शंका राहत नाही.
5.कर आकारणीसाठी सोयीचे: अंकेक्षित लेखे विश्वसनीय असल्याने त्यांच्या आधारे आयकर किंवा विक्री कराचे करणे सोयीचे होते.
सोप्या शब्दात ऑडिट म्हणजे काय?
ऑडिट म्हणजे एखाद्या संस्थेच्या आर्थिक अहवालाची तपासणी – वार्षिक अहवालात सादर केल्याप्रमाणे – त्या संस्थेच्या स्वतंत्र व्यक्तीकडून .
आयटी ऑडिटिंगचा उद्देश काय आहे?
आयटी नियंत्रणे कॉर्पोरेट मालमत्तेचे संरक्षण करतात, डेटा अखंडता सुनिश्चित करतात आणि व्यवसायाच्या एकूण उद्दिष्टांशी संरेखित आहेत की नाही हे माहिती तंत्रज्ञान ऑडिट निर्धारित करतात .
आयटी ऑडिटर्स काय करतात?
आयटी ऑडिटर काय करतो? आयटी ऑडिटर्सना संस्थेची IT प्रणाली आणि पायाभूत सुविधा शक्य तितक्या सहजतेने आणि कार्यक्षमतेने चालतील याची खात्री करण्याचे काम दिले जाते
कंपनीसाठी ऑडिट महत्वाचे का आहे?
लेखापरीक्षण महत्त्वाचे असते कारण ते आर्थिक स्टेटमेन्टच्या संचाला विश्वासार्हता प्रदान करते आणि भागधारकांना खात्री देते की खाती खरी आणि न्याय्य आहेत
आर्थिक लेखा परीक्षक काय करतो?
कॉर्पोरेट दस्तऐवजांमध्ये त्रुटी आणि फसवणूक शोधण्यासाठी आर्थिक लेखापरीक्षक जबाबदार असतो. कंपनीची आर्थिक विधाने बरोबर आहेत आणि सामान्यतः स्वीकारल्या गेलेल्या लेखा तत्त्वांचे पालन करतात याची खात्री करण्यासाठी ते लेखा विश्लेषण करतात.