बँक म्हणजे काय ? बँकेचे प्राथमिक आणि दुय्यम कार्य – Bank Che Prathmik ani duyyam Karya, नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात बँक म्हणजे काय,याची कार्य कोणती असतात, प्राथमिक आणि दुय्यम कार्यानुसार याची विभागणी कशाप्रकारे केली आहे याची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.
बँक म्हणजे काय ? बँकेचे प्राथमिक आणि दुय्यम कार्य
बँक म्हणजे काय, विविध अर्थशास्त्रज्ञ,बँकिंग व्यवसायातील तज्ञ आणि विविध कायदे यामध्ये बँकांच्या व्याख्या केलेल्या आहेत. प्रत्येक व्याख्येत त्या तज्ञ व्यक्तीच्या मते महत्त्वाचे असलेल्या कार्याचे समावेश केलेला आहे. कायद्यातील व्याख्यामध्ये बँकांनी कोणती कार्य केलीच पाहिजे याचा उल्लेख आहे आता आपण काही महत्त्वाच्या व्याख्या बघणार आहोत ते
खालील प्रमाणे –
- प्राध्यापक आर. एस. सेअर्सने केलेली व्याख्या – बँका ह्या अशा संस्था आहेत कर्जाला, म्हणजेच त्यांनी लोकांकडून स्वीकारलेल्या ठेवींना, रोजच्या व्यवहारातील कर्ज अथवा देणी फेडण्यासाठी मान्यता लाभलेली आहे.
- बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये दिलेली व्याख्या – कलम 5 – उपकलम ( क) भारतामध्ये बँकिंगचा व्यवसाय करणारी कोणतीही कंपनी म्हणजे बँक.
कलम 5 – उपकलम (ब) ज्या व्यवसायात कर्ज देण्याच्या हेतूने अथवा गुंतवणुकीसाठी लोकांकडून ठेवी स्वीकारल्या जातात व या ठेवी ठेवीदारांच्या मागणीनुसार अथवा धनादेश, ड्राफ्ट्स ऑर्डर अथवा इतर मार्गाने परत करावयाच्या असतात त्या व्यवसायास बँकिंगचा व्यवसाय असे म्हणतात.
- सर जॉन पेन गेट यांनी केलेली व्याख्या – कोणतीही व्यक्ती अथवा संस्था अथवा कोणीही जर ठेवी स्वीकारत नसतील,चालू खाते उघडू देत नसतील, धनादेश देत नसतील, त्यांच्यावर काढलेल्या धनादेशाचे पैसे देत नसतील आणि ग्राहकांच्या धनादेशाचे पैसे गोळा करत नसतील तर ती बँक होऊ शकणार नाही.
बँक म्हणजे काय – What Is Bank In Marathi
बँक एक संस्था आहे जी वित्तीय सेवा प्रदान करते जसे की जमर रक्कम स्वीकार करणे, कर्ज देणे आणि गुंतवणूक बद्दल मार्गदर्शन करणे इत्यादी. बँक एक प्रकार चा वित्तीय संस्थानआहे आणि वित्तीय मध्यस्थच्या श्रेणीमध्ये येते. बँक जी सर्वात महत्वपूर्ण सेवा प्रधान करत असते त्यामधून काही जमा रक्कम घेणे, कर्ज देणे, आणि गुंतवणूक बद्दल योग्य मार्गदर्शन करणे आहे.
- बँका लोकांकडून ठेवी गोळा करतात.
- या ठेवी चालू खाते, बचत खाते, इत्यादी स्वरूपात असतात.
- लोकांकडून घेतलेल्या ठेवी बँकेच्या दृष्टीने त्यांनी घेतलेली कर्जे असतात.
- या ठेवी स्वीकारण्याचा हेतू लोकांना कर्ज देणे हा असतो.
- ठेवी स्वीकारण्यामागील दुसऱ्या हेतू गुंतवणूक करणे हा असतो.
- बँकांची कर्जे – लोकांकडून स्वीकारलेल्या ठेवी- यांचा वापर लोकांचे देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी अथवा लोकांची कर्ज फेडण्यासाठी केला जातो.
- ठेवीदारांच्या ठेवी मागणी केल्यावर धनादेश, ड्राफ्ट, ते ऑर्डर इत्यादी मार्गाने परत करावयाचे असतात.
- बँका ग्राहकांसाठी धनादेशाचे पैसे गोळा करतात.
बँकेची प्राथमिक कार्य – Primary Function Of Bank In Marathi
बँकेत सोडण्याची व्याख्या आपण बघितलेली आहे. बँक व्यवसाय नियमन कायदा 1949 च्या कलम पाच मध्ये बँकेची कार्य दिलेली आहे.ही कार्य बँकेची प्रमुख कार्य आहेत. या कार्यांना बँकेची प्राथमिक कार्य असेही म्हणतात. ही कार्य पार पाडणे बँकेवर बंधनकारक असते. ही कार्य एखादी संस्था करणार नाही तर संस्थेत बँक असे म्हणता येणार नाही. बँकेची प्राथमिक कार्य खालील प्रमाणे आहे –
(1) ठेवी स्वीकारणे
(2) कर्ज देणे
ठेवी स्वीकारणे
बँकिंगच्या व्यवसायातील सुरुवात ठेवी स्वीकारणे या कार्यापासून झालेली आहेत. उदाहरणार्थ, व्याजाच्या रूपाने उत्पन्न मिळते, बचतीची सवय लागते, पैसे सुरक्षित राहतात, ठराविक रकमेची बचत ठराविक काळाने करणे अनिवार्य आहे, भविष्यकाळाची रतूद होते, ठेवीदारांना विविध सोयी व सवलती मिळतात.
ठेवी स्वीकारण्याचे कार्य बँकांबरोबर बँके तर वित्तीय कंपन्या ही करत असतात. परंतु बँका आणि या संस्थांच्या ठेवी स्वीकारण्याच्या कामात फरक आहे. बँक व्यवसाय नियमन कायद्याचे कलम 5 मध्ये बँकेचे ठेवींचे वैशिष्ट्य दिलेले आहे. बँका मागणी ठेवी स्वीकारतात. मागणी ठेवी ठेवीदारांनी मागणी केल्यावर परत करावयाच्या असतात. बँका व्यतिरिक्त वित्तीय कंपन्या मागणी ठेवी स्वीकारत नाहीत.
त्या ठराविक मुदतीनंतर परत करावयाच्या मुदतीच्या ठेवी स्वीकारतात.बँका मागणी आणि मुदतीच्या अशा दोन्ही प्रकारचे ठेवी स्वीकारतात. बँकेने स्वीकारलेल्या मागणी ठेवीतील रक्कम गरजेनुसार धनादेश, पैसे काढण्याची पावती, ड्राफ्ट इत्यादींच्या सहाय्याने काढता येते. बँका व्यतिरिक्त वित्तीय कंपन्या मागणी ठेवी स्वीकारत नसल्याने अशा पद्धतीने पैसे काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून ठेवीन बाबत येत नाही.
आपल्या ग्राहकांच्या विविध गरजा विचारात घेऊन बँकांनी विविध प्रकारची खाती सुरू केली आहे.
बँकेमध्ये खालील प्रकारची खाती उघडता येतात –
- चालू खाते
- बचत खाते
- आवर्त ठेव खाते
- मुदत ठेव खाते
2.कर्ज देणे
विविध खात्यांवर जमा केलेला पैसा बँका कर्ज देण्यासाठी वापरतात. कर्ज देताना बँका कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची चारित्र्य, आर्थिक स्थिती, पैसे परत करण्याची त्याची क्षमता, कर्जासाठी कोणते तारण देण्यात येणार आहे, कर्जाचा हेतू, मध्यवर्ती बँकेकडून कर्ज देण्यासंबंधी आलेल्या सूचना, इत्यादी बाबी विचारात घेऊन कर्ज देण्याचा निर्णय घेतात. बँका कर्ज देताना रोखता, लाभता, सुरक्षितता आणि धोक्याची विभागणी या बँकिंगच्या व्यवसायाच्या मूलतत्त्वांचा विचारही करतात. बँका खालील प्रमाणे कर्ज देतात –
अ) जादा उचल सवलत (Overdraft)
आ) रोख कर्ज (Cash Credit)
इ) कर्ज (Loan)
अ) जादा उचल सवलत
ज्या व्यक्तींचे चालू खाते बँकेत असते त्यांना जागा उचल सवलत अथवा अधिकर्ज सवलत देण्यात येते. या सवलतीत ग्राहकाला त्याच्या खात्यामध्ये असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याचा अधिकार देण्यात येतो. ही सवलत साधारणता कमी मुदत आणि कमी रकमेसाठी देण्यात येते. ही सवलत साधारणता वैयक्तिक कारणावर देण्यात येते. वापरलेल्या रकमेवर व्याज आकारण्यात येते. ही सवलत ज्यांना देण्यात येते त्यांच्याकडून काही बँका सेवा शुल्कांच्या स्वरूपात काही रक्कम घेतात.
आ)रोख कर्ज
पैशाची गरज असलेल्या व्यक्तीस रोग कर्ज देण्यात येते. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाने खाते सुरू करण्यात येते व रोख कर्जाची रक्कम रोख कर्ज खात्यास जमा करण्यात येते.. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीस कर्जाच्या रकमेइतके धनादेश काढण्याचा अधिकार देण्यात येतो. विविध प्रकारच्या कागदावर रोख कर्ज देण्यात येते. ही पद्धत भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते.
इ) कर्ज
गरजू व्यक्तींना ठराविक रक्कम विशिष्ट मुदतीसाठी कडे जाऊ देण्यात येते.. ही रक्कम एकदम घेता येते. काही वेळा ग्राहकांच्या गरजेप्रमाणे ही रक्कम हप्त्यांमध्येही देण्यात येते.. कर्जाच्या रकमेवर व्याज आकारण्यात येते. जमीन, इमारत माल,सोने, कंपन्यांचे भाग, सरकारी कर्जरोखे, इत्यादींच्या तारणावर कर्ज देण्यात येते. तारणावर कर्ज देताना तफावत ठेवण्यात येते.
जर कारणाची रक्कम 100 रुपये असेल आणि 60 रुपये त्यावर कर्ज दिले तर येथे 40 रुपयांची दफावत ठेवली असे म्हणतात. कारण विकून कर्ज वसुलीची वेळ आली तर व्याजासहित सर्व रक्कम वसूल करता यावी म्हणून तफावत ठेवण्यात येते. कर्ज वेगवेगळ्या हेतून साठी देण्यात येते. कर्जाचा हेतू, कर्जाची रक्कम, मुदत, मध्यवर्ती बँकेकडून या संदर्भात आलेल्या सूचना, इत्यादींवर व्याजाचा दर अवलंबून असतो.
बँकेची दुय्यम कार्य – Secondary Function Of Bank In Marathi
व्यापारी बँका प्राथमिक अथवा प्रमुख कार्याबरोबर दुय्यम कार्य करत असतात. जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या जास्तीत जास्त सेवा देण्याकडे बँकांचा प्रयत्न असतो. बँकिंगच्या व्यवहारांमध्ये जास्त स्पर्धा झालेली आहे. त्यामुळे कर्ज देण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर करणे अवघड जात आहे.
काही बँका आपला नफा वाढवण्यासाठी सेवा शुल्कंद्वारे जास्त पैसे मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. बँकांना या सेवा देणे वैकल्पिक असले तरी त्यांची उपयुक्तता वाढविण्यासाठी दुय्यम कार्याचा उपयोग होतो. बँकांची दुय्यम कार्य दोन प्रकारची आहेत.
1) ग्राहकांचे हस्तक म्हणून कार्य
2) अन्य उपयुक्त कार्य
1)ग्राहकांचे हस्तक म्हणून कार्य
बँका ग्राहकांच्या वतीने ही कार्य करीत असतात. म्हणून करण्यात येणारी कार्य पुढील प्रमाणे आहे –
- ग्राहकांसाठी पैसे देणे आणि पैसे घेणे
बँका घर भाडे, विम्याची हप्ते, विजेची बिले,इत्यादी ग्राहकांच्या सूचना प्रमाणे देतात. व्याज,लाभांश, पेन्शन ,इत्यादी रखमा ग्राहकांच्या वतीने गोळा करतात. या सेवेसाठी नाममात्र सेवाशुल्क आकारण्यात येते.
- पैसा पाठविण्याच्या सवलती
सध्या मोठ्या प्रमाणावर व संपूर्ण जगामध्ये व्यवहार होतात. त्याची एका दुसऱ्या पैसे आवश्यक असते. सर्वसामान्य लोकांना कमी खर्चात, लवकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठविण्याची सोय हवी असते. धनादेश, ड्राफ्ट, मेल ट्रान्सफर आणि टेलिग्राफी ट्रान्सफर इत्यादींच्या साह्याने पैसे पाठविण्यात येतात.
- सरकारी कर्जरोखे, कंपन्यांचे भाग आणि कर्जरोखे, इत्यादींची खरेदी विक्री करणे
बँकांना वेगवेगळ्या भाग बाजाराची ज्ञान असते. या विषयातील आणि व्यवहारातील ज्ञान असलेले लोक बँकेमध्ये असतात. सामान्य माणसांना असे असे ज्ञान असत नाही. बँकेकडे असलेल्या ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी सामान्य लोक बँकेला कर्जरोखे,भाग, इत्यादींची खरेदी विक्री करण्यास सांगतात. या कामासाठी बँका मोबदला घेतात.
2)अन्य उपयुक्त कार्य
सर्वसामान्य ग्राहक,व्यापारी आणि कारखानदार यांना उपयुक्त असलेल्या विविध सेवा बँक देतात. प्रमुख उपयुक्त कार्य खालील प्रमाणे आहेत
- पतपत्र देणे
विदेशी व्यापारात निर्यात व्यापारी उधारीवर आयात व्यापारात माल विकण्यापूर्वीत्याच्या बाजारातील पती विषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. तसेच आयात व्यापारच्या देशातील बँकेकडून पतपत्र देण्यास आयात व्यापाऱ्यास सांगत असतो. या पत्रांमध्ये बँक आपल्या ग्राहकांच्या पतविषयक माहिती देते. तसेच विशिष्ट रकमेपर्यंतची हमी पत्रात देण्यात येते . विदेशी व्यापाराबरोबरच अंतर्गत व्यापारातही अशा प्रकारच्या पत्रांचा उपयोग होतो.बँकांच्या पदपत्रामुळे मोठ्या प्रमाणावर व्यापार करणे सोपे जाते.
- प्रवासी धनादेश देणे
प्रवासामध्ये पैसे चोरीला जाणे शक्य असते. हा धोका टाळण्यासाठी बँका प्रवासी धनादेश देतात. प्रवासी धनादेश वेगवेगळ्या रकमेचे असतात. धनादेश विकत घेताना धनादेशाची रक्कम आणि सेवेचा मोबदला बँकेला द्यावा लागतो. हे धनादेश बँकेच्या शाखावर अथवा प्रतिनिधी बॅंकावर काढले जातात. प्रवासी धनादेशाबरोबरच परिचय पत्र दिले जाते. प्रवासामध्ये गरज लागल्याप्रमाणे बँकेच्या शाखांमध्ये अथवा प्रतिनिधी बँकेमध्ये जाऊन परिचय पत्रावरील नमुन्याच्या स्वाक्षरीप्रमाणे धनादेशावर स्वाक्षरी केल्यानंतर त्या धनादेशाचे पैसे दिले जातात.