धनादेश म्हणजे काय ? धनादेशाचे प्रकार ,आणि धनादेशाद्वारे पैसे पाठवण्याच्या पद्धती – Dhanadesh mhanje kay

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (3 votes)

धनादेश म्हणजे काय ? धनादेशाचे प्रकार आणि पैसे पाठवण्याच्या पद्धती – Dhanadesh mhanje kay – नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या देखात देशाच्या प्रकाराविषयी आणि तसेच पैसे कोण कोणत्या पद्धतीने पाठवता येतात याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

बँकेच्या व्यवसायामध्ये मागणी केल्यावर परत करावयाच्या बोलीवर पैसे स्वीकारले जातात. हे पैसे धनादेश( चेक), धनाकर्ष( ड्राफ्ट), इत्यादींच्या मार्गाने काढता येतात.

धनादेश म्हणजे काय - Dhanadesh mhanje kay

धनादेश म्हणजे काय – Dhanadesh mhanje kay

 चलनक्षम दस्ताऐवजाच्या कायद्यामध्ये  धनादेश म्हणजे– विशिष्ट बँकेवर काढलेली, मागणी केल्यावर दयावयाची व्यावहारिक हुंडी म्हणजे धनादेश होय. 

धनादेशाचे संबंधित तीन पक्ष असतात.

 1) धनादेश काढणारा, 

2) धनादेश  ज्या बँकेतवर  काढण्यात आलेला आहे ती बँक

 3) धनादेशाचे पैसे ज्याला मिळणार आहे ती व्यक्ती.

 

बँक ग्राहकांना छापील धनादेश देत असतात त्यावरच धनादेश काढावा लागतो. कायद्याने हे बंधन नसले तरी बँकांनी तसे नियम केलेले असतात. धनादेश पुस्तकात स्थळ प्रत असते अथवा धनादेश पुस्तकाचे शेवटी धनादेशाचे तपशील लिहिण्यास जागा असते. त्यामुळे धनादेश दिल्याच्या नोंदी राहतात.

 दिलेल्या धनादेश पुस्तकांची नोंद बँका ठेवतात.त्यामुळे धनादेशाचा गैरवापर होण्याचा धोका टाळतो. सध्या जवळजवळ सर्वच बँका मॅग्नेटिक  इंक  कॅरेक्टर  रेकग्रीशन चेक (MICR cheque) वापरतात 

MICR मध्ये पहिले 6 क्रमांक धनादेशांचे नंतरचे 3 क्रमांक शहरांचे असतात व नंतरचे 3 क्रमांक शाखेचा क्रमांक दर्शवितात. यामुळे धनादेशाचे पैसे लवकर मिळतात. नव्याने स्थापन झालेल्या बँकेमध्ये धनादेश व्यक्तिगत स्वरूपाचे असतात म्हणजे खातेदारांचे नाव धनादेशावर छापलेले असते .

 

धनादेशाचे प्रकार 

        धनादेशाचे प्रकार खालील प्रमाणे आहेत –

 

1.वाहन धनादेश (Bearer cheque)

  या धनादेशाचे पैसे वाहकाला मिळतात. या धनादेशाचे पैसे वाहकाला देताना त्यांची स्वाक्षरी धनदेशाच्या मागे घेण्यात येते .धनादेश हरवला अथवा चोरीला गेला तर ज्यांच्याकडे तो असेल त्याला धनादेशाचे पैसे मिळतात. 

 

2.आदेश धनादेश (Order cheque)

या धनादेशामध्ये पैसे एखाद्या व्यक्तीस अथवा तो सांगेल त्यालाच मिळतात.या धनादेशात वाहक धनादेशापेक्षा जोखीम कमी असते.

 

3.रेखांकित धनादेश – रेखांकित धनादेश म्हणजे काय

जेव्हा धनादेशावर दोन समांतर रेषा आखल्या जातात तेव्हा तो धनादेश रेखांकित होतो. साधारणत: या रेषा तिरप्या असतात. अशा धनादेशांचे पैसे बँकेमध्ये कॅशियरकडे मिळत नाहीत तर असा धनादेश बँकेमार्फत भरून पैसे गोळा केले जातात. रेखांकनांचे दोन प्रकार पडतात. 

 

1.सर्वसाधारण रेखांकित धनादेश :- या धनादेशावर दोन समांतर रेखा असतात व या धनादेशाचे पैसे कोणत्याही बँकेमार्फत गोळा करता येतात. 

2.विशिष्ट रेखांकित धनादेश :- जेव्हा रेखांकनामध्ये दोन समांतर रेषांमध्ये दुसऱ्या कोणत्याही बँकेचे नाव लिहिलेले असते तेव्हा त्यास विशिष्ट रेखांकित धनादेश असे म्हणतात. या धनादेशाचे पैसे ज्या बँकेचे नाव लिहिले असेल त्याच बँकेमार्फत मिळतात. 

      रेखांकणामध्ये अँड कंपनी, अकाउंट पेयी, नॉट नेगोशीएबल, इत्यादी शब्द वापरण्यात येतात. याचा परिणाम धनादेशाच्या स्वरूपावर होतो. 

 

पैसे पाठविण्याच्या पद्धती 

 

1.धनादेशाद्वारे पैसे पाठविणे :-

         ज्या लोकांचे खाते बँकेत आहेत आणि ज्यांनी खात्यावर ठराविक रक्कम ठेवणे मान्य केले आहे ,अशा लोकांना बँक धनादेशाचे पुस्तक देते. यातील धनादेशाचा वापर पैसे देण्यासाठी केला जातो. 

         धनादेशामध्ये, विशिष्ट व्यक्ती अथवा तो सांगेल त्यास अथवा धनादेशाच्या वाहकास, ठराविक रक्कम, त्याने मागणी केल्यावर द्यावी अशी ग्राहकाने आपल्या बँकेत केलेली अनिर्बंधित लेखी आज्ञा असते. त्यामुळे ग्राहक, कोठेही असलेल्या व्यक्तीस धनादेश पाठवून रक्कम देऊ शकतो. धनादेश वेगवेगळ्या प्रकारे व पद्धतीद्वारे काढले जातात व त्याद्वारे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविले जातात. धनादेशाचा वापर ज्या विविध प्रकारातून किंवा पद्धतीतून केला जातो. 

 

2.धनाकर्ष (ड्राफ्ट) :-

         धनाकर्ष म्हणजे बँकेने आपल्या शाखेवर काढलेल्या धनादेशच असतो. धनाकर्ष मिळविण्यासाठी बँकेत खाते असलेच पाहिजे असे बंधन नसते.जेवढ्या रकमेचा धनाकर्ष हवा आहे तेवढी रक्कम बँकेच्या मोबदल्याबरोबर दिल्यास धनाकर्ष मिळतो.धनाकर्षण मिळविताना बँकेमध्ये पैसा बरोबर धनाकर्षाची विशिष्ट पावती भरून द्यावी लागते.या पावतीवर तारीख, ज्याच्या नावे धनाकर्ष हवा आहे त्याचे नाव, ज्या शाखेवर धनाकर्ष हवा आहे त्या शाखेचे नाव, पत्ता, धनाकर्षाची रक्कम, धनाकर्षक घेणाऱ्याची सही, इत्यादी माहिती असते. धनाकर्ष मिळाल्यावर योग्य त्या व्यक्तीकडे पाठविण्यात येतो.

 

3.प्रवासी धनादेश :-

          प्रवासामध्ये पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी याचा उपयोग करतात. प्रवासी धनादेश वेगवेगळ्या रकमेचे असतात. प्रवासी धनादेशाचे पैसे आणि तो तयार करून पाठविण्यासाठी असलेला मोबदला बँक घेते. हे धनादेश घेताना बँक ओळखपत्र देते. हे धनादेश बँका आपल्या शाखावर अथवा प्रतिनिधी बॅंकावर काढतात. प्रवासामध्ये पैशांची गरज लागल्यास बँकेच्या शाखेमध्ये जाऊन ओळखपत्र दाखवून  परिचय पत्रावरील नमुन्याच्या सहीप्रमाणे सही केल्यास पैसे मिळतात. काही व्यापारी संस्था अशा प्रकारचे धनादेश स्वीकारतात. 

 

4.मेल ट्रान्सफर:-

        या प्रकारात त्याच बँकेमध्ये दुसऱ्या ठिकाणी असलेल्या खात्यावर पैसे पाठविता येतात. येथे धनाकर्ष मिळविताना भरून द्यावी लागते तशी पावती द्यावी लागते. बँक अशा प्रकारे पैसे पाठवल्याची सूचना टपालाद्वारे दुसऱ्या शाखेला देते. 

उदाहरण-

             समजा, पुण्याच्या एका बँकेमधून नगर येथील त्याच बँकेच्या शाखेतील खात्यावर 1,000 रुपये पाठवायचे असल्यास पैसे पाठविणारा नगरच्या बँकेतील किती नंबरच्या खात्यावर 1,000रुपये पाठवायचे आहेत याचा मजकूर पावती वर भरून देईल. त्यानंतर बँक तशी सूचना टपालाद्वारे नगरच्या शाखेमध्ये पाठवेल. येथे खातेदाराची आणि खात्यांची माहिती,रक्कम, सही, इत्यादी मजकूर द्यावा लागेल. बँक या सेवेसाठी काही मोबदला घेते.

 

5.टेलिग्राफी ट्रान्सफर:-

        जेव्हा पैसे जलद गतीने पाठवायचे असतात तेव्हा मेल ट्रान्सफर ऐवजी टेलिग्राफी ट्रान्सफर चा वापर केला जातो. मी ट्रान्सफर प्रमाणे येथे ज्या खात्यावरून पैसे पाठवायचे आहेत त्या खात्याचा नंबर आणि खातेदाराचे नाव आणि दुसरीकडे असलेल्या बँकेच्या शाखेमधील ज्या खात्यावर पैसे पाठवायचे आहेत त्या खात्याचा नंबर आणि  खातेदाराचे नाव, रक्कम, इत्यादी माहिती द्यावी लागते.त्याच्या हार्दिक टेलिग्राफी ट्रान्सफर ने पैसे पाठविताना पैसे पाठविण्याची सूचना सांकेतिक भाषेत पाठविली जाते. 

 

6.पे ऑर्डर:-

        पैसे पाठविण्याचा हा एक मार्ग आहे. पैसे कधी, कोणाला, कोठे पाठवायचे हे बँकेचा ग्राहक बँकेला कळवितो. ज्या व्यक्तीला पैसे द्यावयाचे असतात त्याच्या नावाने बँक पे ऑर्डर काढते. ही ऑर्डर हस्तांतरित करता येते. याबद्दल बँक मोबदला घेते.

उदाहरण-

             अबक या मुंबईच्या कंपनीत एक जून रोजी दहा हजार रुपये द्या अशा प्रकारे सूचना ग्राहकाने आपल्या बँकेत दिल्यावर 1 जून रोजी कंपनीच्या नावाने दहा हजार रुपयांची बँक पेऑर्डर काढेल. ही पे ऑर्डर धनादेशासारखीच असते.

7.क्रेडिट कार्ड:-

       ज्या ग्राहकांचे  बँकेची चांगले संबंध असतात  त्यांना बँक क्रेडिट कार्ड देतात. या कार्डच्या सहाय्याने ग्राहक वस्तू विकत घेऊ शकतो आणि सेवा वापरू शकतो. वस्तू विकणारे आणि सेवा देणारे क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँके कडून पैसे वसूल करतात. त्या बँकेच्या इतर शाखा मधून क्रेडिट कार्डचा वापर करून पैसेही मिळवता येतात. अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतामध्येही लहान प्रमाणावर क्रेडिट कार्ड वापरली जात आहेत. भारतामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ही पद्धत सुरू केलेली आहे.

8.डेबिट कार्ड :-

क्रेडिट कार्ड प्रमाणे याचा वापर होतो .हे कार्ड खात्यामध्ये पैसे असतील तरच वापरता येते.

9.एटीएम कार्ड :-

एटीएम ची सोय असलेल्या कोणत्याही ठिकाणाहून या कार्डच्या वापराने पैसे काढतात. प्रवासात या कार्डचा वापर होत असल्याने पैसे पाठविण्याच्या पद्धती ही एक उत्तम सोय आहे.

10.गिफ्ट चेक:-

 भेट देण्यासाठी काही बँका धनादेश देतात. हे शहराबाहेरही पाठविता येत असल्याने एक योग्य मार्ग आहे पैसे पाठविण्याचा. 

         

रेखांकित धनादेश म्हणजे काय?

जेव्हा धनादेशावर दोन समांतर रेषा आखल्या जातात तेव्हा तो धनादेश रेखांकित होतो

प्रवासी धनादेश म्हणजे काय?

प्रवासी धनादेशाचे पैसे आणि तो तयार करून पाठविण्यासाठी असलेला मोबदला बँक घेते. हे धनादेश घेताना बँक ओळखपत्र देते. हे धनादेश बँका आपल्या शाखावर अथवा प्रतिनिधी बॅंकावर काढतात.

धनादेशाचा वैधता कालावधी किती आहे?

भारतीय रिझर्व बँक  कडून जारी  केलेल्या नवी दिशा निर्देशानुसार, कोणत्याही बँक धनादेश वैधता (Validity) 3 महिने पर्यंत असते. ज्या तारखेला धनादेश जारी केल्या जातो त्यानंतर 3 महिने पर्यंत व्हॅलिडीटी असते

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment