बँक डिपॉझिट स्लिप कशी भरावी ? बँक कॅश डिपॉझिट स्लीप कसे भरायचे ? – How To Fill Cash Deposit Slip In Marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
Rate this post

बँक डिपॉझिट स्लिप कशी भरावी ? बँक कॅश डिपॉझिट स्लीप कसे भरायचे – How To Fill Cash Deposit Slip In Marathi –नमस्कार मित्रमंडळी !!! आपण आज या लेखात जाणून घेणार आहोत की बँक कॅश डिपॉझिट स्लीप कशा प्रकारे भरायचे. आजच्या या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचे स्वतंत्र बँक खाते कोणत्या ना कोणत्या बँकेत अवश्य असते. आणि आजच्या काळात बँक चेक, डेबिट कार्ड,  क्रेडिट कार्ड, आणि ऑनलाईन देवाण-घेवाण खूप सामान्य गोष्ट झालेली आहे.

प्रत्येक व्यक्ती आज आपल्या जवळ मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन देवाण-घेवाण करत असतात. मग ते फोन पे च्या माध्यमातून असो, गुगल पे च्या माध्यमातून असो हे सर्व बँकेशी कनेक्ट असतात. याद्वारे सामान्य माणूस हा नेट बँकिंगचा लाभ घेऊ  शकतात. जेव्हाही तुम्ही कोणत्याही बँकेत रोख रक्कम जमा करण्यासाठी जातात अशा वेळेस बँकेमध्ये खूप असे लोक असतात जे तुमच्या जवळ येऊन तुम्हाला फॉर्म भरण्यास सांगतात जसे की चेक भरण्यास,कॅश जमा पावती  भरण्यास सांगतात.

आपण स्वतः पहिल्यांदा बँक पावती भरतांना थोडे कन्फ्युज होतो, नेमके भरायचे काय असे आपल्याला प्रश्न पडतात, अशात आपण घाबरून जातो तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. 

बँक कॅश डिपॉझिट स्लीप कसे भरायचे ? – How To FillCash Deposit Slip In Marathi

बँक डिपॉझिट स्लिप कशी भरावी ? बँक कॅश डिपॉझिट स्लीप कसे भरायचे ? –How To Fill Cash Deposit Slip In Marathi

बँक जमा पावती भरणे खूप सोपे आणि सरळ आहे. बँक जमा पावती सर्वांना माहीतच असते ज्याला लिहिता वाचता येते त्यांना माहीतच असते परंतु कधी भरलेले नसल्यामुळे लोकांना पहिल्या वेळेस टेन्शन येऊन जाते कि भरायचे कसे ? तर काळजी  करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला बँक  जमा पावती कशी भरायचे हे स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊया –

1.सर्वप्रथम तुम्हाला पावतीच्या वरच्या कोपऱ्यात त्या दिवसाचे दिनांक टाकायची आहे ज्या दिवशी तुम्ही बँक कॅश डिपॉझिट स्लीप/ बँक जमा पावती भरायचे असे. 

2.त्यानंतर साईडला तुम्हाला त्या बँक यांचे नाव लिहावे लागेल जिथे तुम्ही  रोख रक्कम जमा करणार आहात. 

3.त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा सेविंग अकाउंट नंबर भरायचे आहे ज्यामध्ये तुम्ही रोख रक्कम जमा करणार आहात. 

4.आता स्वतःचे संपूर्ण नाव त्या जमा पावती मध्ये लिहा. 

5.यानंतर खालच्या कॉलम मध्ये तुम्हाला  विवरण द्यायचे असते की तुम्ही रोख रक्कम चेक मध्ये जमा करणार आहात की कॅश मध्ये जमा करणार आहात. जर तुम्हाला रोख रक्कम कॅश  मध्ये  करणार आहात तर विवरण च्या खाली कॅश लिहा, जर चेक मध्ये रोख रक्कम जमा करणार आहात तर खाली चेक लिहा. 

6.आता तुम्हाला जेवढे ही रोख रक्कम जमा करायचे आहे त्याला पावतीच्या मध्यभागी  एक रेष ओढून घ्या आणि सर्वात शेवटी  टोटल च्या ऑप्शन मध्ये आपली एकूण जमा राशी लिहा .

7.त्यानंतर पुढच्या कॉलम  मध्ये तुमची एकूण जमा राशी शब्दात लिहा मग ते मराठीत  किंवा इंग्रजी भाषेत लिहू शकता.

बँक कॅश डिपॉझिट स्लीप/बँक कॅश जमा पावती दुसरी कॉफी  कसे भरायचे ?

बँक कॅश डिपॉझिट स्लीप कसे भरायचे ? – How To FillCash Deposit Slip In Marathi

बँक कॅश डिपॉझिट स्लिप ची दुसरी पावती भरणे खूप काही अवघड नाही, याला देखील आपण पहिल्या पावती प्रमाणे पटकन भरू शकतो.  तर चला जाणून घेऊया– 

1.सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या अकाउंट ला निवडायचे आहे. जसे की  सेविंग अकाउंट, करंट अकाउंट.

  1. यानंतर तुम्हाला बँक कॅश डिपॉझिट भरायचे आहे त्या दिवसाची दिनांक टाका.
  2. त्यानंतर बँकेच्या ब्रांच चे नाव टाका जिथे तुमचे खाते आहे.
  3. पुढच्या कॉलम  मध्ये आता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर भरा. 

5.जर तुम्ही 50000 पेक्षा जास्त रोख रक्कम  जमा करणार आहात तर तुमच्या  पॅन कार्ड ची संपूर्ण माहिती त्यात अवश्य टाका.

  1. त्यानंतर तुम्ही चेकच्या माध्यमातून पैसे जमा करणार आहात तर जेके संपूर्ण माहिती टाका. जर रोख रक्कम नगदी जमा करणार आहात तर नगदी रोख रक्कम ची माहिती भरा. 

7.जर तुमच्याकडे 30000 आहे तर तुमच्याकडे 500च्या किती नोटा, 2000च्या किती नोटा हे सर्व त्या बॉक्स मध्ये लिहा आणि सर्वात शेवटी तुम्ही टोटल चे ऑप्शन मध्ये तुमची  एकूण राशी लिहा. 

8.सर्वात शेवटी टोटल राशी  लिहता वेळेस एक रेष ओढून एकूण राशी मराठीत किंवा इंग्रजी भाषेत शब्दात लिहा. 

9.सर्वात शेवटी तुम्हाला तुमची स्वाक्षरी करावी लागेल. 

10.जर तुम्ही रोख रक्कम चेकच्या माध्यमातून जमा करणार आहात तर चेक जारी करणारे बँकेचे नाव लिहा.

  1. सर्वात शेवटी चेक नंबर लिहा. 

बँक कॅश डिपॉझिट क्लिप सोबत कॅश कसे जमा करायचे ? 

1.आता तुम्ही बँक कॅश डिपॉझिट पावती भरली आहे आता या पावती सोबत नगदी रोख रक्कम घेऊन बँक कॅशियर जवळ जा.

2.यानंतर बँक कॅशियर बँक कॅश  डिपॉझिट स्लीप ला व्यवस्थित चेक करेल. 

3.आता तो बँक कॅशियर तुमच्या पावतीवर शिक्का मारेल. एक पावती त्याच्याकडे ठेवणे आणि दुसरी  पावती तुमच्याकडे दिली जाईल. 

4.यानंतर काही मिनिटात तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मेसेज येऊन जाईल की तुमची रोख रक्कम बँक मध्ये जमा झालेली आहे. 

तर मित्रांनो अशाप्रकारे आपण आतापर्यंत बघितले की बँक कॅश  डिपॉझिट स्लीप कसे भरायचे, आतापर्यंत तुम्हाला बँक पावती भरता  आलेच असेल. तुम्ही आता स्वतः पावती भरू शकता .

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.