बँकेत चेक कसा भरावा – कोणताही बँक चा चेक कसा भरायचा ? | How To Fill Cheque In Marathi ? | How To Write Cheque In Marathi ,नमस्कार मित्रमंडळी !!! चेक म्हणजे काय ?आज आपण बघणार आहोत की बँक चेक कसे भरावे ?
जेव्हाही आपण बँकेमध्ये एखादे नवीन अकाउंट ओपन करतो तेव्हा आपल्याला चेक बुक दिल्या जातेकिंवा ऑप्शन असते की आपल्याला अकाउंट साठी चेक बुक हवे आहे की नाही. जास्त तर लोक हे बँकेमधून चेक बुक घेत असतात परंतु चेक बुक नेमका भरायचा कसा याबद्दल त्यांना पुरेशी माहिती नसते त्यामुळे त्यांच्याकडून भरपूर चुका होऊन त्यांना चेक फाडून फेकावा लागतो.
यामुळे तुम्हाला चेक भरणे योग्य पद्धतीने आले पाहिजे. तर या लेखात आपण बघणार आहोत की चेक कसा भरायचा, चेक भरतानी कोण कोणती काळजी घ्यायची. बँक चा चेक कसा भरायचा ? | How To Fill Cheque In Marathi ? | How To Write Cheque In Marathi
चेक म्हणजे काय ? What Is Cheque In Marathi
चेक म्हणजे सामान्य दिसणारा कागदाचा तुकडा जो के खूप विशेष असतो.यामुळे आपण लाखोचे देवाण-घेवाण करू शकतो. हा सामान्य कागदाचा तुकडा म्हणजेच चेक कोणत्याही अटी शिवाय बँकेला आदेश देतो, स्पष्ट करतो की मीच चेक धारकाला किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ज्याला आपल्याला चेक द्यायचे त्याला एवढी रक्कम अदा करण्याचे वचन देत आहे.
हा एक धनादेश असतो, म्हणजेच एक देयक पत्र असते. चेक मध्ये देणाऱ्याचे नाव असते किंवा कोणत्याही कंपनी अथवा फर्म चे नाव असू शकते. या चेक मध्ये अक्षरात आणि अंकात देयक राशी लिहिलेली असते आणि सर्वात शेवटी सिग्नेचर म्हणजेच सही असते.
बँकेत चेक कसा भरावा – कोणताही बँक चा चेक कसा भरायचा ? – How To Fill Cheque In Marathi
बँक मध्ये चेक भरणे खूप काही कठीण नाही,इथे तुम्ही कोणत्याही बँकेचे मग ते एसबीआय बँक (SBI Bank) असो किंवा बँक ऑफ इंडिया (Bank Of India) अथवा दुसरी कोणतीही बँक असो, सर्व बँकेचे चेक भरण्याची पद्धत ही जवळपास सारखीच असते. चेक चा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो,
जर तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असतील तर चेकच्या माध्यमातून तुम्ही पैसे देऊ शकता किंवा एखाद्याला बँक डिटेल्स द्यायची असेल तर तुम्ही कॅन्सल चेक चा उपयोग करू शकता अथवा कोणाला पैसे द्यायचे असतील तर चेकच्या माध्यमातून त्या चेकचे सेल्फ चेक म्हणून उपयोग करू शकता तर चला जाणून घेऊया बँक मध्ये चेक कसे भरावे.
पे (Pay) च्या ठिकाणी काय लिहावे ?
तुम्ही कोणत्याही बँकेच्या चेक ला बघा मग ते एसबीआयचे असो अथवा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा दुसऱ्या कोणत्याही बँकेचे असू द्या.सर्व बँकेच्या चेक मध्ये वरच्या साईडला पे (Pay) चे ऑप्शन असते. पे (Pay) च्या ऑप्शन मध्ये लेना दाराचे नाव लिहावे, लेनदारचे नाव स्पष्ट आणि अचूक लिहिणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडून नाव लिहिण्यात काही चुका झाल्या तर तो चेक कॅन्सल करून नवीन चेक भरावा लागेल.
रुपीज (Rupees) च्या या ठिकाणी काय लिहावे ?
आता रुपीज या ठिकाणी तुम्ही लेनदारला जेवढे रोख रक्कम लागते किंवा तुम्ही जेवढी रोख रक्कम देऊ इच्छिता तेवढे रुपये त्या चेक मध्ये लिहावे. या राशीला तुम्हाला एका साईडने गणित भाषेत म्हणजेच गणितीय अंकात लिहावे लागेल आणि दुसऱ्या साईडला मराठी भाषेत लिहावे लागेल.
उदाहरणसाठी:
रुपीज (Rupees) च्या लाईन मध्ये 10000 हे मराठीत (दहा हजार )असे लिहिले जाईल.
आणि गणितीय अंकात 10000 असे लिहिले जाईल.रुपये लिहिल्यानंतर तुम्हाला मात्र लिहिणे खूप आवश्यक आहे कारण असे लिहिल्यास बँक फक्त तेवढेच पैसे देते जेवढे तुम्ही चेक मध्ये लिहिलेले असते.
इशू डेट (Issue Date)
तुम्हाला चेकच्या वरच्या कोपऱ्यात एक दिनांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल, तिथे तुम्हाला चेक देण्याचे दिनांक लिहावे लागेल. ही दिनांक तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक टाकावी लागेल, तुम्ही दोन महिन्याच्या आतील दिनांक टाकू शकता कारण तो लेनदार दोन महिन्याच्या आत बँकेमध्ये जाऊन आपला चेक क्लिअर करू शकतो.
सही करा (Signature )
तुम्हाला सर्वात शेवटी (Authorised Signatory) हा ऑप्शन दिसेल, तुम्ही जारी केलेल्या चेक वरती तुम्ही तुमची सही करू शकता. तुमची सही ही स्पष्ट आणि अचूक असणे आवश्यक आहे, जर सही मध्ये कोणतीही चूक झाली तर बँकेद्वारा हा चेक रद्द करण्यात येतो.
बँक चेक भरतानी घ्यावयाची काळजी :
- 1.आपल्याला लेनदारचे नाव स्पष्ट आणि अचूक लिहिणे आवश्यक आहे आणि तेच नाव भरा ज्या नावावर लेनदारचे बँक अकाउंट असतील.
- 2.आपल्याला चेक वरती कोणत्याही प्रकारचे खाडा- तोड करायची नाही, असे झाल्यास आपला चेक बाउन्स होऊ शकतो.
- 3.चेक वर लिहिलेले रोख रक्कम स्वच्छ अक्षरात व क्लियर असली पाहिजे, ज्यामुळे पेमेंट करता वेळेस कोणतीही समस्या व्हायला नको.
- चेक भरल्यानंतर बियरर (Bearer) च्या ऑप्शनला कॅन्सल करून टाका.
- चेक वरती कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास त्याचे कला कॅन्सल करा, आणि चेक पुन्हा भरा.
- चेक जारी करता द्वारा आपल्या चेक वरती सही असणे आवश्यक आहे कारण सही मध्ये कोणतीही शंका आल्यास तो चेक बँकेद्वारा थांबवण्यात येतो, व चेक ची ची तपासणी केली जाते.
चेक मध्ये कोण-कोणती माहिती असते ?
IFSC Code
कोणत्याही चेक वरती एक अकरा अंकीय एक कोड दिलेला असतो त्यास आयएफएससी कोड म्हणतात, हा कोड शक्यतर चेकच्या वरच्या बाजूला असतो, किंवा चेक मध्ये कुठे दिलेला असतो. हा कोड बँकेच्या ब्रांच ची माहिती सांगतो. आणि बँकेच्या लोकेशन बद्दल माहिती देत असतो.
Bank Account Number
आता त्या चेकच्या खाली दहा अंकी नंबर दिलेले असतात, हे नंबर खाता धारकाचे अकाउंट नंबर असते.
Cheque Number
या चेक च्या शेवटी गणितीय अंकात तीन गट मिळतात, ज्यामध्ये प्रथम गट चे नंबर क्या चेकचे नंबर असतात जो की चेक आमदारा च्या नावावर जारी केलेला असतो.
MICR Code
त्याच सिरीज च्या दुसऱ्या ग्रुप मध्ये 9 अंकाचा एक ग्रुप असतो ज्याला एम आय सी आर कोड (MICR Code)असे म्हणतात.हा एम आय सी आर कोड चेक नंबरच्या जस्ट जवळ असतो .हा कोड पण बँक लोकेशन आणि बँक ब्रांच च्या बद्दल माहिती उपलब्ध करून देतो.
- IMPS संपूर्ण माहिती – IMPS म्हणजे काय , कार्य, फायदे, लिमिट, चार्जेस
- NEFT संपूर्ण माहिती – नेफ्ट म्हणजे काय , कार्य, फायदे, लिमिट, चार्जेस
- ऑर्डर चेक कसा भरायचा ? – Order Cheque In Marathi
- कोणताही बँक चा चेक कसा भरायचा ? – How To Fill Cheque In Marathi
- कॅन्सल चेक कसा तयार करावा ? – Cancel Cheque In Marathi
बुलढाणा अर्बन बँक माहिती – बुलढाणा अर्बन बँक बद्दल संपूर्ण माहिती
- बँक म्हणजे काय व्याख्या ? बँकेचे कार्य – बँकेचे प्रकार
- पेमेंट बँक म्हणजे काय असते ? पेमेंट बँकेचा उद्देश्य , पेमेंट बँकेचे कार्य
- चेक म्हणजे काय ? चेकचे किती प्रकार आहेत – चेक कसे कार्य करते
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
- शेड्युल बँक म्हणजे काय ? शेड्यूल बँकेचे कार्य