indian financial system pdf in marathi, financial system syba in marathi, भारतीय वित्तीय प्रणाली pdf in marathi – वित्तीय बाजार pdf in marathi | indian financial system pdf in marathi ,
भारतीय वित्तीय प्रणाली देशाच्या आर्थिक विकासात समाजातील व्यक्ति, विविध प्रकारचे व्यावसायिक, आणि उत्पादनसंस्था, शासन यांचा एकत्रित सहभाग असतो. या घटकांच्याबरोबर चलननिधी किंवा पैसा हा एक घटक असतो. चलन विकासाची प्रक्रिया गतीमान करण्याचा प्रयत्न करते, व्यक्ति, विविध उत्पादन आणि विक्रीयंत्रणेतील संस्था, सरकार यांना चलननिधींची गरज अनेक कारणांसाठी असते.
याचाच अर्थ असा होतो की उत्पादन, उपभोग, वितरण यासाठी अर्थव्यवस्थेत वित्तपुरवठा आवश्यक असतो. यासाठी अर्थव्यवस्थेत वित्तपुरवठ्याची अतिशय योग्य पद्धतीने काम करणारी यंत्रणा आवश्यक असते. या सर्व बाबींचा विचार वित्तीय प्रणाली या संकल्पनेद्वारे करण्यात येतो..
वित्तीय प्रणाली चा अर्थ – भारतीय वित्तीय प्रणाली मराठी
वित्तीय प्रणाली या संकल्पनेत बचत आणि गुंतवणूक हे दोन केंद्रीभूत घटक आहेत. यावरून वित्तीय रचनेचाअर्थ पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतो “देशातील बचत गुंतवणूक, वित्तीय दस्तऐवज आणि वित्तीय संस्था यांची एकत्रित कार्यरत असणारी प्रक्रिया म्हणजे वित्तीय प्रणाली होय.”
वित्तीय रचनेमध्ये व्यापारी बँका, वित्तीय महामंडळे, विमा कंपन्या, भविष्यनिर्वाह निधी, या वित्तीय संस्था कार्यरत असतात. व्यक्ति आणि संस्था यांच्याकडून होणारी बचत या संस्था गोळा करतात, अधिक बचतीसाठी प्रोत्साहन देतात. गोळा होणारी रक्कम विकास कार्यासाठी, उत्पादनकार्यासाठी इतर निर्मितीक्षम मूल्यांसाठी आवश्यक घटकांना पुरविली जाते.
उद्योजक व्यापारी, सरकार यांना बचतीतून गोळा होणारी रक्कम गुंतवणूकीसाठी वित्तपुरवठा म्हणून उपलब्ध करून दिली जाते. अशाप्रकारच्या वित्तपुरवठ्यामुळे उत्पादनवाढीला प्रेरणा मिळते. रोजगारसंधी निर्माण होऊन उत्पन्नपातळी वाढते यातून उपभोग वाढतो आणि त्याबरोबरच बचतीमध्येही वाढ होते.. ही सर्व प्रक्रिया आर्थिक विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करते.
भारतीय वित्तीय प्रणाली चे घटक (Components of Financial System)
वित्तीय रचनेमध्ये कर्ज देणे आणि घेणे म्हणजेच वित्तपुरवठ्याची देवाण-घेवाण हा महत्त्वाचा घटक आहे.. व्यक्ती, उद्योगसंस्था, व्यापारी संस्था, शासन यांच्याकडून कर्जाऊ निधीसाठी मागणी असते. भारतीय वित्तीय रचनेत वित्तपुरवठा हा कृषीक्षेत्र, उद्योगक्षेत्र, सेवाक्षेत्र आणि शासन यांच्यासाठी होत असतो. भारतीय वित्तीय रचनेत वित्तीय मध्यस्थ संस्था व महामंडळे आणि वित्तीय बाजारपेठा हे दोन महत्त्वाचे घटक आहेत.
भारतीय वित्तीय प्रणालीचे महत्त्व – indian financial system pdf in marathi
वित्तीय रचनेमध्ये व्यापारी बँका, वित्तीय महामंडळे, विमा कंपन्या, भविष्यनिर्वाह निधी, या वित्तीय संस्था कार्यरत असतात. व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून होणारी बचत या संस्था गोळा करतात, अधिक बचतीसाठी प्रोत्साहन देतात. गोळा होणारी रक्कम विकास कार्यासाठी, उत्पादनकार्यासाठी इतर निर्मितीक्षम मूल्यांसाठी आवश्यक घटकांना पुरविली जाते.
उद्योजक, व्यापारी, सरकार यांना बचतीतून गोळा होणारी रकम तवणुकीसाठी वित्तपुरवठा म्हणून उपलब्ध करून दिली जाते. अशाप्रकारच्या वित्तपुरवठ्यामुळे उत्पादनवाढीला प्रेरणा मिळते. रोजगारसंधी निर्माण होऊन उत्पादनपातळी वाढते यातून उपभोग वाढतो आणि त्याचरोबर बचतीमध्येही वाढ होते. ही सर्व प्रक्रिया आर्थिक विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करते.
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
- व्यापारी बँक म्हणजे काय आहे ? व्यापारी बँकेचे प्रकार , महत्त्व , व्यापारी बँकेची सूची
- विदेशी बँक म्हणजे काय ? विदेशी बँकेची भूमिका , विदेशी बँकेची नावे
- सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
- भारतीय रिझर्व बँक म्हणजे काय ? भूमिका ,मुख्य कार्य , स्थापना, राष्ट्रीयीकरण
- वित्तीय प्रणाली म्हणजे काय आहे ? अर्थ , महत्त्व, कार्य, भारतीय वित्तीय प्रणाली
भारतीय वित्तीय प्रणाली pdf in marathi – financial system syba in marathi
Download Now
स्थावर स्रोतांवर पैशाचा हक्क असतो. या पैशाच्या साहाय्याने बऱ्या स्रोतांची विभागणी करणे शक्य होते. या पैशाच्या जोरवर अर्थव्यवस्था कोणत्या आणि किती प्रमाणात वस्तू आणि सेवांचे उत्पादन करू शकेल आणि त्यात वाड करू शकेल हे ठरविले जाते. आर्थिक स्रोतांना ‘वित्त असे म्हणतात. अशा वित्ताची गरज व्यक्तीला आणि सरकारला असते.
सरकारला वित्ताची गरज ही उत्पन्न निर्माण करणारी मालमत्ता विकत घेण्यासाठी विविध संस्थांना यंत्रसामग्री खरेदी, कारखाना उभारणी, कामगारांचा पगार देण्यासाठी आणि कच्चा माल खरेदी इत्यादी कारणांसाठी असते. व्यापारी संस्थांना त्या व्यवहार
करीत असलेल्या वस्तु/माल खरेदी करण्यासाठी आणि तो गोदामात साठविण्यासाठी वित्ताची गरज असते. शेतीक्षेत्रात गाईगुरे, कृषी उपयोगी हत्यारे आणि अवजारे, विहीर खोदणे, अधिक जमीन विकत घेणे यासाठी वित्तीय गरज भासते. सरकारलासुद्धा विविध वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी आणि विकास कार्यक्रमांतर्गत विविध गुंतवणूक करण्यासाठी वित्त लागतेच. * भारतीय वित्तीय प्रणालीची रचना