भारतातील पैसा बाजार म्हणजे काय ? भारतातील पैसा बाजाराचे स्वरूप, महत्त्व ,पैसा बाजाराची वैशिष्ट्ये – Indian Money Market In Marathi,नमस्कार मित्रमंडळी !!! आपण या लेखात भारतातील पैसा बाजाराविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात आपण पैसा बाजाराचे महत्त्व,त्याचे वैशिष्ट्ये, भारतीय पैसा बाजाराचे स्वरूप याबद्दल संपूर्ण माहिती विस्तारात जाणून घेणार आहोत. आर्थिक व्यवहारात सहभागी झालेले उद्योजक, व्यापारी, शेतकरी वगैरेंना वेगवेगळ्या कारणांसाठी व वेगवेगळ्या मुदतीसाठी कर्जाची आवश्यकता असते.
या कर्जाची गरज भागीविण्याची कार्य ज्या व्यवस्थेतून होते त्या संदर्भात पैसा बाजाराचा विचार केला जातो. शेतकऱ्यांना बी-बियाणे ,खते, कीटकनाशके यांच्या खरेदीसाठी तसेच शेतात काम करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्यासाठी अल्पकालीन कर्जाची आवश्यकता असते. दैनंदिन खर्च भागवण्यासाठी व्यापारी, उद्योजक यांनाही अल्पकालीन कर्जाची गरज असते. उद्योजक, व्यापारी, शेतकरी वगैरेंच्या अल्पकालीन कर्ज विषयक गरजा भागवण्याचे कार्य पैसा बाजार करत असतो.
पैसा बाजार म्हणजे काय – What Is Indian Money Market In Marathi
पैसा बाजार म्हणजे ज्या ठिकाणी खरेदीदार व विक्रेते एकत्र येतात आणि वस्तू व सेवांची किंमत निश्चित होऊन देवाणघेवाण होते असे ठिकाण होय. या अर्थाने बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण नाहीतर ज्या ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री होते त्या सर्वच ठिकाणी बाजार अस्तित्वात येतो.
पैसा बाजार या संज्ञेचा अर्थ पाहताना चलनाची खरेदी विक्रीचे होते तो बाजार म्हणजे पैसा बाजार असा अर्थ घेणे योग्य ठरणार नाही. पैसा बाजारात चलनाची देवाण-घेवाण होत नाही तर भांडवलाची देवाण-घेवाण होते. कर्ज व्यवहाराच्या रूपात ही देवाण-घेवाण होत असते. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे ते आपल्याकडील पैसा ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्यांना वापरण्यासाठी देतात. कर्ज घेणारे पैसे वापरण्याचा मोबदला म्हणून व्याज देतात.
अल्पमुदतीची कर्जे मार्फत दिली घेतली जाते या यंत्रणेला पैसा बाजार असे म्हणतात.
विशिष्ट असे ठिकाण नाही तर शेतकरी, उद्योजक, व्यापारी वगैरेंची अल्पकालीन स्वरूपाच्या कर्जाची गरज भागवण्याची ती यंत्रणा आहे.
भारतीय पैसा बाजाराचे महत्त्व – Importance Of Indian Money Market In Marathi
आर्थिक व्यवहाराच्या पातळीत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत आहे. त्याचबरोबर उद्योग, व्यापार, शेती अशा अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्षेत्राच्या कर्जाच्या गरजा वाढलेल्या आहेत. अल्पकालीन, मध्यम कालीन व दीर्घकालीन अशा सर्वच प्रकारच्या कर्जाची या क्षेत्रांना आवश्यकता आहे. त्यापैकी अल्पकालीन कर्जाची गरज पूर्ण करण्याची कार्य पैसा बाजार करतो. विकसित पैसा बाजार हा देशातील शेती, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. या वेगवेगळ्या क्षेत्रांची अल्पकालीन कर्जाची गरज भागविणाऱ्या पैसा बाजाराचे महत्व पुढील प्रमाणे आहे –
शेती, उद्योग व सेवा क्षेत्राच्या विकासास मदत
शेतकरी, उद्योजक, व्यापारी, वगैरेंना वेगवेगळ्या कारणांसाठी व कालावधीसाठी भांडवलाची आवश्यकता असते. अल्पकालीन भांडवलाची त्यांची गरज पैसा बाजारा मार्फत पूर्ण केली जाते. शेतकऱ्यांना शेतातील मजुरांची मजुरी देण्यासाठी, बी- बियाण्यांच्या खरेदीसाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. उद्योजक, व्यापारी यांना अल्पकालीन देणे देण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज असते. अशा प्रकारची भांडवल पैसे बाजाराच्या वेगवेगळ्या उपबाजारातून उपलब्ध होते. त्यामुळे उद्योग, शेती व सेवा क्षेत्राच्या अल्पकालीन कर्जाच्या गरजा पूर्ण होऊन या क्षेत्राचा विकास होण्यास मदत होते
2.सरकारला कर्जाची उपलब्धता
उत्पन्न व खर्चाचा मेळ बसत नाही तेव्हा सरकारला कर्जाची आवश्यकता भासते. पैसे बाजारातून अल्पकालीन स्वरूपाचे कर्जे सरकारला घेता येतात. सरकार कोषागार विपत्राची (Treasury Bill) विक्री करून अशी कर्ज घेत असते. सरकारला मध्यवर्ती बँकेकडून पैसा उपलब्ध होऊ शकतो. परंतु त्यामुळे देशातील चलनाचा पुरवठा वाढवून चलनवाढ किंवा भाव वाढ होण्याची शक्यता असते. परंतु सरकार पैसे बाजारातून कर्ज घेत असल्याने अर्थव्यवस्थेत चलन वाढ होण्याची शक्यता उरत नाही.
3.व्यापारी व सहकारी बँकांना सहाय्य
व्यापारी व सहकारी बँकांना आपल्याकडील उपलब्ध निधी कर्जाऊ देण्यासाठी आणि आवश्यकता असेल तेव्हा कर्ज उभारण्यासाठी पैसा बाजार उपयुक्त ठरतो. या बँकांकडे जमा झालेल्या ठेवींपैकी काही रक्कम ठेवीदारांनी मागणी करतात त्यांना परत करण्यासाठी बँका स्वतःजवळ ठेवतात. त्यानंतर उरलेली रक्कम त्यांना कर्ज देण्यासाठी वापरता येते. या बँका जेव्हा अशी रक्कम दीर्घकाळासाठी गुंतवू शकत नाहीत तेव्हा त्यांना अल्पकाळासाठी पैसा गुंतविण्याची संधी पैसा बाजार उपलब्ध करून देतो. तसेच बँकांना ठेविदारांची पैशाची मागणी पूर्ण करण्यासाठी जर पैशाची आवश्यकता भासली तर असा पैसा या बँका पैसा बाजारातून कर जाऊ घेऊ शकतात.
4.व्यक्ती व संस्थांना गुंतवणुकीची संधी
व्यक्ती, बँ व करू इच्छिणाऱ्या संस्था यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कर्जाऊ निधीची गुंतवणूक करण्याची संधी पैसा बाजारामुळे उपलब्ध होते. पैसा बाजारात अल्पमुदतीसाठी गुंतवणूक करून या घटकांना उत्पन्न मिळवता येते. अल्पमुदतीसाठी सुरक्षित व फायदेशीर गुंतवणुकीची संधी वेगवेगळ्या व्यक्ती, बँका व इतर संस्थांना पैसे बाजारामुळे मिळते. त्यातून अशा निधीचा उत्पादक कार्यासाठी वापर केला जातो.
5.देशाच्या आर्थिक विकासात सहभाग
शेती, व्यापार, उद्योगधंदे, वाहतूक व दळणवळण वगैरे क्षेत्रांच्या विकासावर देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. या क्षेत्राच्या विकासासाठी त्यांच्या वित्तपुरवठ्याच्या गरजा भागविला जाणे आवश्यक असते. पैसा बाजाराच्या माध्यमातून अशा क्षेत्रांच्या अल्पकालीन वित्तपुरवठ्याच्या गरजा पूर्ण केल्या जातात. त्यामुळे या क्षेत्राच्या विकासाला व त्यातून देशाच्या आर्थिक विकासाला पैसा बाजाराची मदत होते.
थोडक्यात सांगायचे झाले तर पैसा बाजार व्यक्ती, विविध आर्थिक घटक व आर्थिक संस्था यांच्या अल्पकालीन कर्जाच्या गरजा पूर्ण करतो. तसेच त्यांच्याकडे कर्जाऊ निधी उपलब्ध आहे त्यांना या निधीची फायदेशीर व सुरक्षित गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देतो.
भारतीय पैसा बाजाराची वैशिष्ट्ये – Features Of Indian Money Market In Marathi
निधीची देवाण-घेवाण
पैसा बाजारात पैशाची खरेदी विक्री होत नाही तर कर्जाऊ रकमांची देवाण- घेवाण होतं असते. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा किंवा कर्जाऊ देण्यासाठी निधी उपलब्ध आहे आणि ज्यांना कर्ज निधीची आवश्यकता आहे असे दोन घटक एकत्र येतात. असे दोन घटक एकत्र येऊन कट जाऊ निधीच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार या बाजारात पार पाडतात. म्हणजे पैसा काही विशिष्ट कालावधीसाठी वापरण्यास देण्याचे व्यवहार पैसा बाजारात पार पडतात.
2.अल्पकालीन कर्जाची देवाण-घेवाण
उद्योजक,व्यापारी, शेतकरी वगैरेंना वेगवेगळ्या मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते. सर्व प्रकारच्या मुदतीच्या कर्जाची देवाण-घेवाण पैसा बाजारात होत नाही तर केवळ अल्पमुदतीच्या कर्जाची देवाण-घेवाण पैसा बाजारात होते. अल्पकाळ म्हणजे निश्चित किती कालावधी हे सांगणे कठीण असले तरी स्थूल मानाने 1 दिवस ते 6 महिने आणि अपवाद म्हणून 12 महिन्यांपर्यंत चाकाळ हा अल्पकाळ समजला जातो.
3.अनेक व्यक्ती व संस्थांचा सहभाग
पैसा बाजारात होणाऱ्या कर्जाच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारात कर्ज देणाऱ्या व कर्ज घेणाऱ्या अनेक व्यक्ती व संस्था सहभागी होतात. कर्ज देणाऱ्यात मध्यवर्ती बँक, व्यापारी बँक, सहकारी बँका, अल्पकाळासाठी पैसा उपलब्ध करून देणाऱ्या संस्था आणि खाजगी व्यक्ती यांचा समावेश होतो. कर्ज घेणाऱ्यात उद्योगपती, व्यापारी, शेतकरी, सरकार, बँका व इतर संस्था यांचा समावेश होतो.
4.उपबाजारांचे अस्तित्व
पैसा बाजारातील कर्ज व्यवहार हे वेगवेगळ्या पतपत्रांच्या सहाय्याने चालतात. या सर्व पतपत्रांचे स्वरूप वेगवेगळ्या असते त्यामुळे या निरनिराळ्या पतपत्रांचे स्वतंत्र असे उपबाजार निर्माण होतात. विशिष्ट पतपत्रांच्या बाजारात त्या पत्राच्या आधारे कर्ज व्यवहार पार पडतात. उदाहरणार्थ, हुंडी बाजारात हुंडीच्या आधारे कर्जाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार होत असतात.
भारतीय पैसा बाजाराचे स्वरूप – Nature Of Indian Money Market In Marathi
1.भारतीय रिझर्व बँक
भारतीय रिझर्व बँकेची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली. या बँकेकडे चलन निर्मितीची मक्तेदारी असून ती बँकांची बँक म्हणूनही कार्य करते. ही बँक भारतीय पैसा बाजारातील निधीचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. तसेच देशातील बँक व्यवसायावर, पैसा बाजारातील संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्यही ही बँक करते.
2.स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1955 मध्ये करण्यात आली. ही भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक आहे. देशभर या बँकेच्या मोठ्या प्रमाणावर शाखा असून त्यामार्फत ही बँक ठेवी गोळा करते. ही बँक भारतीय पैसा बाजाराच्या विकासास मदत करत असते.
3.राष्ट्रीयकृत बँका
भारतातील 14 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण 1969 मध्ये करण्यात आले. तर 1980 मध्ये आणखी सहा व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. राष्ट्रीय करणामुळे या बँकांच्या कर्ज विषयक धोरणात बदल घडून आला. लहान कर्जदारांना कर्ज देण्यास त्यांनी सुरुवात केली. या बँकांमुळे पैसा बाजारातील पैशांच्या पुरवठ्यात वाढ झाली. त्यामुळे पैसा बाजाराच्या विकासाला चालना मिळाली.
4.खाजगी क्षेत्रातील मोठ्या बँका
खाजगी क्षेत्रातील मोठ्या बँका पैसा बाजारात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. खाजगी क्षेत्रातील बँका निधीची गतिशीलता वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे पैसा बाजारातील कर्ज व्यवहारात सुधारणा होऊन या बाजाराच्या विकासास मदत होते.
पैसा बाजार म्हणजे काय ?
अल्पमुदतीची कर्जे मार्फत दिली घेतली जाते या यंत्रणेला पैसा बाजार असे म्हणतात.
मुद्रा बाजार आणि भांडवली बाजार म्हणजे काय?
मुद्रा बाजार हा अल्पकालीन कर्जाचा व्यापार आहे. हे सरकार, कॉर्पोरेशन, बँका आणि वित्तीय संस्थांमधला रोखीचा सतत प्रवाह आहे, एका रात्रीत कमी कालावधीसाठी आणि एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कर्ज घेणे आणि देणे. भांडवली बाजारात स्टॉक आणि बाँड या दोन्हीमधील व्यापाराचा समावेश होतो.
वित्तीय बाजार कसे कार्य करतात?
वित्तीय बाजार हे एक ठिकाण आहे जेथे कंपन्या आणि व्यक्ती विशिष्ट उत्पादन विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी करार करतात , जसे की स्टॉक, बाँड किंवा फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट. खरेदीदार सर्वात कमी उपलब्ध किमतीत खरेदी करू इच्छितात आणि विक्रेते सर्वाधिक उपलब्ध किमतीत विकण्याचा प्रयत्न करतात