म्युच्युअल फंड म्हणजे काय ? म्युच्युअल फंड चे प्रकार आणि फायदा ,म्युच्युअल फंड संपूर्ण माहिती | Mutual fund information in marathi , नमस्कार मित्र मंडळ!!! आपण या लेखात म्युच्युअल फंड याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. यात आपण म्युचल फंड नेमके काय असते,म्युचल फंडच्या काही महत्त्वाच्या योजना, त्याचे फायदे कोणकोणते आहेत आणि त्याची कार्य काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला म्युचल फंड बद्दल माहिती प्राप्त होण्यास मदत होईल.
पीटर लिंच यांच्या वरील वाक्यावरून आपण असे म्हणू शकतो की परस्पर निधी हा वैविध्यपूर्ण शोध आहे हा शोध वेळ नाही आणि ज्यांना हुशारीने भाग बाजारातील व्यवहारातून नफा मिळवायचा आहे आणि ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी थोडे पैसे आहेत परंतु ज्यांना या पैशाची विभागणी करायची आहे अशा गुंतवणूकदारांसाठी आहे.
परस्पर निधीची स्थापना सर्व जगामध्ये करण्यात आलेली आहे. भारतामध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि वित्तीय संस्थांनी इ.स. 1987 मध्ये आणि त्यानंतरपरस्पर निधींची स्थापना केली. इ.स.1993 मध्ये खाजगी क्षेत्रातील संस्थाआणि परकीय संस्थांना परस्पर निधी स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली.
जुलै 1997 मध्ये भारतामध्ये 36 परस्पर निधी कार्यरत होते.त्यांना 200 योजना होत्या आणि जवळजवळ यांची 81,000 कोटी रुपये मालमत्ता होती. वरील आकडेवावरून आपणास असे लक्षात येते की परस्परनिधींचा व्यवसाय वाढणारा व्यवसाय आहे.
म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutual fund information in marathi
म्युच्युअल फंड चा मराठी अर्थ परस्पर निधी असा होतो. म्हणजेच लोकांनी जमा केलेल्या रकमेला म्युच्युअल फंड आपण म्हणू शकतो.म्युच्युअल फंडमध्ये भरपूर लोकांचा पैसा एकत्र जमा करून शेअर बाजारा अथवा गुंतवणूक योजनांमध्ये लावल्या जातो. अशा प्रकारे म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जमा केलेल्या पैशांचा सामूहिक गुंतवणूक केल्या जाते. त्याचा जो देखील फायदा होतो तो देखील सर्व गुंतवणूक भागांमध्ये हिशोबाने वाटण्यात येते.
गुंतवणूक करणाऱ्या लोकांचा पैसा कुठे- कुठे आणि कसे गुंतवणूक करायचे, यासाठी एक तज्ञ लोकांची टीम निश्चित करते. ही टीम एक फंड मॅनेजरच्या अंडर कार्य करते. त्या टीम मध्ये मार्केट आणि शेअर बाजाराला समजणारे प्रोफेशनल ठेवण्यात येत.
कंपन्यांचे आणि त्यांच्या शेअर्सचे मागील रेकॉर्ड आणि समोरील संभावनांना लक्षात घेता ती टीम लोकांच्या पैशांचा अशाप्रकारे गुंतवणूक करतात की त्यामुळे कमीत कमी नुकसान सोबत एक चांगला रिटर्न प्राप्त होईल. अशाप्रकारे म्युच्युअल फंड तुम्हाला मोठमोठ्या किमतीचे गुंतवणुकामध्ये कमी पैसे लावून गुंतवणुकाचा लाभ प्राप्त करण्याची संधी उपलब्ध होते.
म्युच्युअल फंडाची व्याख्या – साध्या शब्दात म्युच्युअल फंड म्हणजे काय?
परस्पर निधीचा अर्थ खालील प्रमाणे काढता येईल. परस्परनिधी म्हणजे असा निधी की ज्यामध्ये समान आर्थिक ध्येयाने गुंतवणूकदार पैसे एकत्र करतात. हा पैसा युनिट खरेदी करून एकत्र आणण्यात येते. युनिटची किंमत कमी असते साधारणत: रुपये 500 इतक्या कमी रकमेपासून पैसे गोळा केले जातात.
जमा झालेली रक्कम निधीचे व्यवस्थापक निधीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विविध प्रकारच्या भाग, रोखे,इत्यादी मध्ये गुंतवितात. यापासून मिळालेले उत्पन्न आणि युनिट विकल्यानंतर मिळणारी भांडवलवृद्धी यांचे वाटप युनिट धारकांमध्ये युनिटच्या प्रमाणात वाटण्यात येते. यामुळे गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळविण्याचे समान आर्थिक ध्येय साध्य होते.
भांडवल बाजारात असलेल्या जास्त स्पर्धेमुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सर्व वित्तीय संस्था करत असतात. म्युच्युअल फंड सुद्धा गुंतवणूकदारांच्या गरजा विचारात घेऊन विविध योजना राबवितात आणि त्याद्वारे पैसे गोळा केले जातात.
म्युच्युअल फंड चे प्रकार – Mutual Fund Types in marathi
म्युच्युअल फंडचे प्रकार खालील प्रमाणे आहेत–
1) इक्विटी फंड – Equity fund in Marathi
इक्विटी म्युच्युअल चा अधिक तर पैसा शेअर मध्ये लावला जातो.अशा स्कीमच्या फंड मॅनेजरला कमीत कमी 65 टक्के रुपये शेअर मध्ये लावावी लागते. बाकी उरलेल्या पैशाला ते बोंड किंवा बँक मध्ये ठेवू शकतात. आता इक्विटी म्युचल फंड ला शेअर मध्ये गुंतवणूक केली जाते तर याचे रिटर्न पण शेअर मार्केटनुसार मिळतो.
म्हणजे कमाईची सर्वात जास्त संभावना असते परंतु यामध्ये रिस्क देखील जास्त असते.इक्विटी फंड मधून होणाऱ्या इन्कम वर भांडवली नफा कर लागत नाही, पण अल्पकालीन भांडवली नफा ला आपल्या इन्कम मध्ये जोडून टॅक्स कॅल्क्युलेशन मध्ये समावेश करतात.
2) डेब्ट फंड – Debt Fund in Marathi
या प्रकारच्या म्युचल फंड ची रक्कम ला मुख्यतः बॉण्ड्स आणि कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट मध्येगुंतवणूक केली जाते. कोणतीही डेप्थ म्युचल फंड मध्येही शर्यत अनिवार्य असते की त्यांचा कमीत कमी 65 टक्के पैसा बॉन्स किंवा डिपॉझिट मध्ये लावायला हवा.उदाहरणार्थ गव्हर्मेंट बोंड, कंपनी बोंड, कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट आणि बँक डिपॉझिट इत्यादी. उरलेल्या रक्कम ला म्हणजेच शेअर मध्ये लावला जाऊ शकतो. आता जसे डेफ्ट फंड ला फेस रिटर्न देणाऱ्या बॉण्ड मध्ये लावला जातो,
म्हणून यामध्ये रिस्क पण तुलनात्मक कमी असते. परंतु यातून तुम्हाला जास्त फायदा होण्याची संभावना नसते. पण चांगल्या डेप फंड तुम्हाला बँक फिक्स डिपॉझिट ची अपेक्षा चांगल्या प्रकारे रिटर्न देऊ शकतात.
जर तुम्ही आपल्याडेफ्ट फंडला तीन वर्षानंतर काढता तर यामध्ये दीर्घकालीन भांडवली नफा कर द्यावा लागतो. यादीर्घकालीन भांडवली नफा कर ची दर शिवाय indexation 10 प्रतिशत असेल आणि indexation सोबत 20 प्रतिशत असेल.
(1) म्युच्युअल फंडामध्ये महत्त्वाच्या योजना – Mutual Fund scheme in Marathi
(अ) कायम उपलब्ध असलेल्या योजना (Open Ended Schemes)
या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी विशिष्ट कालावधी नसतो. या योजना कायम उपलब्ध असतात. गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडून या योजनेतील युनिट खरेदी करून शकतात आणि पाहिजे तेव्हा फंडाला विकू शकतात.युनिटची खरेदी आणि विक्री निव्वळ मालमत्ता मूल्याशी निगडित असलेल्या किमतीला केली जाते. या योजनांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यांची रोखता होय. पाहिजे तेव्हा गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीचे रूपांतर पैशात करू शकतात.
(आ) विशिष्ट काळासाठी असलेल्या योजना (Close Ended Schemes)
या योजना विशिष्ट काळासाठीच्या असतात. योजनांचा कालावधी साधारणत: 3 वर्ष ते 15 वर्ष इतका असतो. या योजनांमध्ये योजना आणल्यापासून सुरुवातीच्या उपलब्ध काळामध्ये गुंतवणूक करता येते. त्यानंतर हे जर हे युनिट भाग बाजारांमध्ये नोंदविलेली असल्यास त्याभाग बाजारातून बाजारातील किमतीला खरेदी करता येतात आणि त्यांची विक्री करता येते. बाजारातील किंमत आणि निव्वळ मालमत्ता मूल्य यांच्या संबंध असतोच असे नाही. काही म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणूकदारांना जास्तीची सवलत म्हणून ठराविक काळासाठी पुनखरेदीची सोय उपलब्ध करतात.
(इ) मूल्यवृद्धी योजना (Growth Schemes)
या योजनांचे प्रमुख उद्दिष्ट मध्यम अथवा दीर्घकाळामध्ये भांडवल वृद्धी व्हावी असे असते. या योजनांमधून जमा झालेला पैसा प्रामुख्याने सर्वसाधारण भागांमध्ये गुंतवला जातो. ज्या कंपन्यांच्या भागांच्या किमती वाढणाऱ्या असतात त्या भागांना पसंती दिली जाते.
(ई) उत्पन्न योजना ( Income Schemes)
या योजनेचे मुख्य ध्येय स्थिर आणि नियमित उत्पन्न गुंतवणूकदारांना देणे हे असते. त्यामुळे या योजनेतून जमा होणारा पैसा स्थिर उत्पन्न देणाऱ्या कर्जरोखे आणि बॉड यामध्ये गुंतविण्यात येते. या योजनेमध्ये भांडवल वृद्धी अत्यंत कमी असते. निवृत्त झालेले लोक या योजनांमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात.
(उ) समतोल योजना (Balanced Schemes)
या योजना म्हणजे मूल्यवृद्धी योजना आणि उत्पन्न योजना यांचा मिलाफ आहे. या योजनांमध्ये जमा होणारा पैसा मूल्यावृद्धी होणारे भाग आणि नियमित उत्पन्न देणारी कर्जरोखे यामध्ये गुंतविण्यात येते. ठराविक काळानंतर गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची होणारी भांडवल वृद्धी आणि मिळणारे उत्पन्न वाटण्यात येते. भांडवल वृद्धी आणि नियमित उत्पन्न हवे असणाऱ्या गुंतवणूकदारांना या योजना सोयीच्या असतात.
(ऊ) कर वाचविणाऱ्या योजना ( Tax Savings Schemes)
या योजनांतील गुंतवणुकीवर विविध कर कायद्यांमध्ये सवलती दिल्या जातात. गरजेप्रमाणे या सवलती सरकार बदलत असते. उत्पन्न कर कायदा, संपत्ती कर कायदा यामध्ये या सवलती दिलेल्या असतात. कर भरणाऱ्या लोकांना या योजना सोयीच्या असतात.
(ए) भाग बाजाराच्या इंडेक्सशी निगडित असणाऱ्या योजना (Index Fund Schemes)
विशिष्ट भाग बाजारांच्या इंडेक्समध्ये होणाऱ्या बदलानुसार या योजनेच्या कामगिरीमध्ये बदल होत असतो. इंडेक्स मध्ये होणाऱ्या बदलाने मिळणाऱ्या उत्पन्न इतके उत्पन्न मिळाले तर जे समाधानी असतात त्यांना या योजना सोयीच्या आहेत.
(ऐ) विशिष्ट उद्योगांमध्ये गुंतवणूक करावयाच्या योजना (Specific Industry Schemes)
या योजनांमधून जमा होणाऱ्या पैसा विशिष्ट उद्योगांमध्ये गुंतवण्यात येतो. उदाहरणार्थ, सिमेंट उद्योग. ज्या गुंतवणूकदारांनी विशिष्ट उद्योगात गुंतवणूक करावयाची ठरविलेली असते त्यांना या योजना सोयीच्या आहेत.
(ओ) नाणे बाजाराच्या योजना ( Money Market Schemes)
काही देशांमध्ये परस्पर निधींना नाणे बाजारात गुंतवणूक करण्याची परवानगी दिलेली असते. या योजनांमधून गोळा होणारा पैसा अल्पमुदतीच्या, कमी धोक्यांच्या दस्तऐवजांमध्ये गुंतविला जातो. उदाहरणार्थ, ट्रेझरी बिले, व्यापारी प्रपत्रे, इत्यादी. या योजनेत रोखतेचे प्रमाण जास्त असते. नाणे बाजारातील व्याजदरांच्या बदलाप्रमाणे या योजनेचे उत्पन्न बदलत असते.
म्युचल फंडचे फायदे – Of Mutual Fund Benefits In Marathi
1)सोयीचे व्यवस्थापन
कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला विविध प्रकारच्या अडचणी आणि प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ, निर्णय घेण्यात व गुंतवणूकदारांना कळविण्यात कंपन्या फार वेळ घेतात, भाग दलाल आणि कंपन्यांशी सतत संपर्क ठेवावा लागतो इत्यादी. म्युचल फंडमध्ये( परस्पर निधीमध्ये) गुंतवणूक केल्याने हा त्रास वाचतो.
2)उत्पन्न मिळण्याची जास्त शक्यता
मध्यम आणि दीर्घ मुदतीचा विचार केला तर उत्पन्न मिळण्याची जास्त शक्यता असते. कारण म्युचल फंड विविध प्रकारच्या व्यवसायातील निवडक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
3) कमी खर्च
कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या खर्चाची तुलना करतात म्युचल फंडातील गुंतवणूक करण्यास खर्च कमी येतो. कारण दलाली आणि शुल्क कमी असते.
4) गरजेनुसार गुंतवणूक
विविध गर्जा पूर्ण करणाऱ्या योजना म्युचल फंडच्या असतात. प्रत्येक गुंतवणूकदारास त्याच्या वैयक्तिक गरजांप्रमाणे गुंतवणुकीची योजना निवडता येते.
5) योग्य नियंत्रण
सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कडे म्युचल फंड नोंदविलेले असतात. या निधींना सेबीच्या नियमांचे पालन करावे लागते. त्यामुळे गुंतवणूकदारांचे हित संरक्षण शक्य होते.
6) गुंतवणुकाची विभागणी
विविध प्रकारच्या व्यवसायातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये म्युचल फंड गुंतवणूक करतात. त्यामुळे धोक्याची विभागणी होते. एका प्रकारच्या कंपन्यांमध्ये नफा कमी झाला अथवा तोटा झाला तर तो दुसरीकडील गुंतवणुकीतून भरून निघतो.