खाजगी बँक म्हणजे काय ? खाजगी बँक माहिती , भारतातील खाजगी बँक – Private bank information in Marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
3.5/5 - (4 votes)

खाजगी बँक म्हणजे काय ? खाजगी बँक माहिती , भारतातील खाजगी बँक – Private bank information in Marathi , नमस्कार मित्र मंडळ!!! आपण  या लेखात खाजगी बँकेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अनेक लोकांना खाजगी बँकेविषयी  मनात वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न असतात की खासगी बँक काय आहे, त्याचे फायदे कोण-कोणते, त्याचे महत्त्व काय ? तर काळजी करण्याची आवश्यकता नाही, आम्ही तुम्हाला या लेखात या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला खाजगी बँकेविषयी माहिती मिळविण्यास सोपे होईल. 

 

वर्तमान काळात भारतामध्ये अनेक खाजगी  बँका (Private Bank) आहेत. खाजगी बँकेचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत.  अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे की सरकारी बँके पेक्षा जास्त सुविधा या खाजगी बँकेद्वारे ग्राहकांना दिली जाते. हेच कारण आहे की मोठ्या प्रमाणामध्ये खातेधारक हे खाजगी बँकेमध्ये आपले खाते उघडतात.

खाजगी बँक म्हणजे काय – खाजगी बँक माहिती   Private Bank In Marathi

 जर  तुम्हालाही खाजगी बँकेमध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्हाला खाजगी बँका बद्दल माहिती असणे आवश्यक आहे, यासाठी तुम्हाला हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचावा लागेल जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होईल. 

 

खाजगी बँक म्हणजे काय – खाजगी बँक माहिती |  Private Bank In Marathi

 खाजगी बँक म्हणजे ज्याचा सरकार जवळ कोणतेही स्वामित्व नसते म्हणजेच खाजगी बँकांचा मालकीचा हक्क हा सरकार ऐवजी कोणत्याही एखाद्या वैयक्तिक व्यक्तीकडे असतो. खाजगी बँकेचा मालकीचा हक्क हा सरकारकडे नाही तर एका सामान्य व्यक्ती कडे असतो. खाजगी बँकेचा मालिक कोणताही एखादा व्यक्ती असू शकतो, ज्याच्या द्वारे खासगी बँकेला चालवले जाते.

 

खाजगी बँकेची संपूर्ण जबाबदारी कोणत्याही एका व्यक्तीकडे असते. खाजगी बँकेला कोणताही इंडिव्हिज्युअल व्यक्ती चालू शकतो बस त्याच्याकडे तेवढे पैसे असले पाहिजे आणि सरकारकडून खाजगी बँक चालवण्यासाठी मान्यता प्राप्त असले पाहिजे.

जर सहकारी बँकेचा विचार केला तर सरकारची सरकारी बँकेमध्ये  संपूर्ण भागीदारी असते. असे खाजगी बँकेमध्ये नसते. यासाठी या बँकांना खासगी बँकांच्या रूपांमध्ये ओळखले जाते. याच बँकांना खाजगी बँक म्हटले  जाते. 

 

खाजगी बँकेमध्ये खाते उघडण्याचे फायदे – Advantages Of Opening Account In Private Bank In Marathi

  1. खाजगी बँकेत आपण केव्हाही कोणत्याही  कार्याला सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकतो. ज्या प्रकारे सरकारी बँकांमध्ये गर्दी असते त्यामुळे लोक  खाजगी बँकेतून उपायोजना करू शकतो. बँकेच्या संबंधित कोणतेही काम काही मिनिटामध्ये खाजगी बँकेतून पूर्ण करू शकतो.
  2. खासगी बँकेतून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा  लोन सहजपणे प्राप्त करू शकतो.जर तुम्ही कोणत्याही खाजगी बँकेचे ग्राहक आहात तर जास्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही.लोन साठी फॉर्म भरू शकता.
  3. सरकारी बँकेच्या तुलनेत खाजगी बँकेमध्ये व्याजदर जास्त मिळते.जर तुमचा खाजगी बँकेमध्ये बचत खाता आहे तर या बँकेमधून तुम्ही अधिक लाभ प्राप्त करू शकता.
  4. खाजगी बँकेमध्ये प्रत्येक वेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची योजना प्रकाशित केली जाते.यामुळे ग्राहकांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळतात. 
  5. अनेक प्रकारच्या खाजगी बँकेमध्ये इन्शुरन्स सुविधा प्राप्त होऊन जाते. या बँकेतून कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स सोप्या पद्धतीने शकतो यासाठी तुम्हाला बँक इन्शुरन्स फॉर्म भरावा लागेल. अनेक प्रकारच्या सरकारी योजना देखील खाजगी सेक्टर बँक द्वारा ग्राहकांना दिले जातात.
  6. खाजगी बँकेमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या इन्वेस्टमेंट प्लांट देखील मिळून जातील. एफडी घेऊ शकता. अधिक व्याजदर सोबत आरडी करून घेऊ शकता.याव्यतिरिक्त स्टॉक मार्केट मध्ये म्युचल फंड मध्ये गुंतवणूक साठी डिमॅट अकाउंट देखील ओपन करू शकता. सोबतच बँकेच्या म्युचल फंड ची एसआयपी देखील घेऊ शकता.
  7. खाजगी बँकेत खाते उघडल्यानंतर तुम्ही एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, चेक बुक, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सुविधा तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. जे अनेक सरकारी बँकेद्वारा या सर्व सुविधांचा लाभ भेटू नाही शकत. 
  8. जर तुम्हाला कधी गरज पडली  तर बँक स्टेटमेंट खाजगी बँकेकडून केव्हाही आपल्या अकाउंटचा स्टेटमेंट घेऊ शकता. ज्याचे कसल्याही प्रकारचे चार्ज लागत नाही. 
  9. पेमेंट करण्यासाठी अनेक विकल्प मिळून जातात जसे की RTGS,NEFT,IMPS याव्यतिरिक्त UPI आणि अशा अनेक ऑप्शन  मिळून जातील. ज्यामुळे ग्राहकांना सरळ पद्धतीने एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे पाठवणे सोपे होईल.

 याप्रकारे खाजगी बँकेचे खूप मोठे  आणि वेगवेगळे फायदे आहेत. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट बँकेमध्ये अकाउंट ओपन करावे लागेल. 

 

भारतातील पहिली खाजगी बँक कोणती – भारतातील पहिली खाजगी बँक 

भारतातील खाजगी क्षेत्रातील पहिली बँक इंडसलँड बँक आहे. त्याची स्थापना 1994 मध्ये SP हिंदुजा यांनी केली होती आणि आता त्याचे भारतात 760 शाखा असलेले उत्कृष्ट बँकिंग नेटवर्क आहे.

 

 

भारतात खाजगी क्षेत्रातील किती बँका आहेत?

रिझर्व बँकेच्या वेबसाईट नुसार भारतात खाजगी क्षेत्रातील 21 बँक आहेत, ज्या खालील प्रमाणे

 

भारतातील खाजगी बँक – खाजगी बँकेची सूची –  Private Bank List in Marathi 

क्रमबँकेच्याशाखांचेस्थापनामुख्यालय
1एक्सिस बँक45281993मुंबई, महाराष्ट्र
2बंधन बँक670+2015कोलकाता, पश्चिम बंगाल
3सीएसबी बँक4171920त्रिशूर, केरल
4सिटी यूनियन बँक700+1904कुंभकोणम, तमिलनाडु
5डीसीबी बँक3341930मुंबई, महाराष्ट्र
6धनलक्ष्मी बँक270+1927त्रिशूर शहर, केरल
7फेडरल बँक12841931अलुवा, कोच्चि
8एचडीएफसी बँक54301994मुंबई, महाराष्ट्र
9आईसीआईसीआई बँक52881994मुंबई, महाराष्ट्र
10आईडीबीआई बँक18921964मुंबई, महाराष्ट्र
11आईडीएफसी प्रथम बँक2602015मुंबई, महाराष्ट्र
12इंडसइंड बँक20001994पुणे, महाराष्ट्र
13जम्मू और कश्मीर बँक10381938श्रीनगर, जम्मू और कश्मीर
14कर्नाटक बँक8571924मंगलुरु, कर्नाटक
15करूर वैश्य बँक7791916करूर, तमिलनाडु
16कोटक महिंद्रा बँक1500+2003मुंबई, महाराष्ट्र
17नैनीताल बँक1501922नैनीताल, उत्तराखंड
18आरबीएल बँक3981943मुंबई, महाराष्ट्र
19साउथ इंडियन बँक8761929त्रिशूर, केरल
20तमिलनाडु मर्केंटाइल बँक5091921तूतीकोरिन, तमिलनाडु
21यस बँक1000+2004मुंबई, महाराष्ट्र

 

खाजगी बँकांची नावे – खाजगी बँकेची नावे

  1. ॲक्सिस बँक (Axis Bank)
  2. बंधन बँक ( Bandhan Bank)
  3. सीएसबी बँक ( CSB Bank)
  4. सिटी युनियन बँक ( City Union Bank)
  5. डीसीबी बँक ( DCB Bank)
  6. धनलक्ष्मी बँक ( Dhanalakshmi Bank )
  7. लक्ष्मी विलास बँक ( Lakshmi Vilas Bank )
  8. फेडरल बँक (Federal Bank )
  9. एचडीएफसी बँक ( HDFC Bank )
  10. आयसीआयसीआय बँक ( ICICI Bank ) 
  11. आयडीबीआय बँक ( IDBI Bank)
  12. आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank)
  13. इंडसइंड बँक ( IndusInd Bank )
  14. जम्मु अंड कशमिर बँक ( Jammu and Kashmir Bank )
  15. कर्नाटक बँक ( Karnataka Bank )
  16. कोटक महिंद्रा  बँक ( Kotak Mahindra Bank )
  17. नैनीताल बँक ( Nainital Bank )
  18. आरबीएल बँक (RBL Bank )
  19. साऊथ इंडियन बँक ( South Indian Bank )
  20. तमिलनाड मार्केटाईल बँक ( Tamilnad mercantile Bank ) 

 

खाजगी बँकेचे व्याजदर – Private Bank Interest Rates

  1. वर्तमान मध्ये सर्व बँकेच्या तुलनेत युनिटी स्मॉल फायनान्स बँक 8.50% प्रति वर्षाची सर्वात जास्त व्याजदर एफडी प्रदान करते. यानंतर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 8.01% प्रति वर्षाचे सर्वात जास्त व्याज प्रदान करते. 
  2. याच प्रकारे ESAF  स्मॉल फायनान्स बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक एफबीवर वार्षिक 8.00% व्याज प्रदान करते. याव्यतिरिक्त  फिंकेअर स्मॉल फायनान्स बँक, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक वार्षिक 7.75% ची अधिक व्याज प्रदान करते. 
  3. जना स्मॉल फायनान्स बँक देखील एफडी वर 7.50%  प्रतिवर्षी चे प्रदान करते खाजगी सेक्टर च्या बँकेमध्ये डीसीबी बँक, एस बँक, आरबीएल बँक, 
  4. आयडीएफसी फर्स्ट बँक, बंधन बँक, फेडरल बँक, सीएसबी बँक, साऊथ इंडियन बँकआणि कॅनरा बँक 6.50% प्रति वर्ष  चे व्याज प्रदान करते अशाप्रकारे खाजगी बँका व्याज प्रदान करत असतात. 

 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.