शाश्वत विकास म्हणजे काय ? शाश्वत विकासाची संकल्पना , शाश्वत विकासाचा अर्थ व व्याख्या, शाश्वत विकासाची उद्दिष्टे – Shaswat Vikas in Marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
4.8/5 - (5 votes)

शाश्वत विकास म्हणजे काय ? शाश्वत विकासाची संकल्पना , शाश्वत विकासाचा अर्थ व व्याख्या, शाश्वत विकासाची उद्दिष्टे – Shaswat Vikas in Marathi  – शाश्वत विकास आम्हाला नेहमी आमच्या संसाधनांचे संवर्धन आणि वाढ करण्यास प्रोत्साहित करतो, आम्ही तंत्रज्ञान विकसित आणि वापरण्याच्या पद्धती हळूहळू बदलून. सर्व देशांनी रोजगार, अन्न, ऊर्जा, पाणी आणि स्वच्छता या मूलभूत गरजा पूर्ण केल्या पाहिजेत.

शाश्वत विकासाची संकल्पना - Shaswat Vikas in Marathi

शाश्वत विकासाची संकल्पना – Shaswat Vikas in Marathi

 शाश्वत विकासाची संकल्पना (Concept of Sustainable Development) : ‘विकास’ याचा अर्थ स्पष्ट करणे खूप कठीण आहे. कारण समान सरासरी उत्पन्न असणाऱ्या दोन देशातील लोकांचा जीवन दर्जा (Quality of Life) वेगवेगळा असू शकतो.

 

शाश्वत विकासाची गरज

 

युनोच्या (United Nations) कागदपत्रानुसार जीवनाची अपेक्षा, प्रौढ साक्षरता, शिक्षण, सरासरी उत्पन्न यावरून मानवी विकास स्पष्ट होतो. मानवी विकासामध्ये मनुष्याच्या आरोग्यमय जीवनापासून ते आर्थिक, राजकीय स्वातंत्र्यापर्यंतच्या सर्व बाबी समाविष्ठ होतात.

शाश्वत विकास ही संकल्पना अलीकडचीच आहे. निसर्ग व नैसर्गिक साधने संरक्षणाच्या आंतरराष्ट्रीय संघाने सादर केलेल्या १९८० च्या जागतिक संरक्षक योजनेचे (World Conservation Strategy) ची संकल्पना प्रथमच वापरली.

Sustainble म्हणजे शाश्वत, टिकाऊ, चिरस्थायी, स्वयंपोषणक्षम होय. सध्या प्रत्येक देश विकासासाठी प्रयत्न करतो. मात्र एकदा विकास झाल्यानंतर तो चिरकाल टिकविणे महत्त्वाचे असते.

 

“विकास व पर्यावरणावरील जागतिक आयोगाने” शाश्वत विकास ही संज्ञा सामान्य वापरात आणली. आपले सामाईक भविष्य (Our Common Future) या अर्ध वार्षिक अहवालामध्ये ही संज्ञा सांगितली होती. ती ब्रुटलैंड अहवाल म्हणूनही ओळखली जाते.

 

शाश्वत विकासाचा अर्थ व व्याख्या :

शाश्वत विकास ही संकल्पना सखोल असून सर्वांशीच संबंधित आहे. भविष्यकालीन विकासाच्या गरजांच्या संदर्भासह सध्याचा विकास असे शाश्वत विकास मानतो. उपलब्ध साधनसंपत्तीच्या अतिरिक्त पिळवणुकीने भविष्यकालीन पिक्यांसाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. 

साधनसामग्रीच्या शाश्वत उपयोगावर भविष्यकालीन यांच्या गरजांचा विचार करून निर्णय घेणे योग्य असते. शाश्वत विकास, अर्थशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण व विशेष प्रकारची संकल्पना असून एका बाजूला ती प्रत्यक्षपणे विकासाच्या अर्थशास्त्राला संबंधीत आहे तर दुसऱ्या बाजूला ती पर्यावरणाचा अंतर्गत भाग असते.

‘शाश्वत विकास’ या संकल्पनेच्या व्याख्या पुढीलप्रमाणे मांडता येतील.

“शाश्वत विकास म्हणजे असा विकास की जो भविष्यकालीन पिढ्याच्या त्यांच्या स्वत:च्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी कोणतीही तडजोड न करता सध्याच्या गरजा पूर्ण करणे होय.”

– यूटलँड अहवाल.

“शाश्वत विकास म्हणजे असा विकास कि जो मानवी गरजांचे समाधान चिरकाल टिकवणे आणि मानवी जीवनाचा दर्जा सुधारणे हे साध्य करणे होय.”

– रॉबर्ट अॅलन (Robert Allen )

वरील व्याख्यावरून शाश्वत विकासाचा अर्थ स्पष्ट होतो की, तळागाळातील पातळीवरील गरीबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे व त्यांच्या भौतिक जीवनाच्या पातळीत वाढ करणे होय.

 

शाश्वत विकास संकल्पना कोणी मांडली – 

जागतिक शिखर परिषद (Earth Summit) सध्या वाढत्या पर्यावरण समस्येने अनेक देशांचे लक्ष शाश्वत विकासाकडे वेधले गेले आहे. त्यातून जगातील सर्व राष्ट्रांची याविषयावर चर्चा व जागरूकता निर्माण होण्यासाठी वसुंधरा शिखर परिषद दरवर्षी भरवावयाचे ठरले. सन १९८८ मध्ये हवामान बदलाच्या ‘आंतरशासकीय चौकशीची ‘समिती’ निर्माण झाली (Intergovernmental Panel of Climate Change IPCC) यायोगे हरितगृह गॅस सोडण्याचे प्रमाण कमी करता येईल. अलीकडे अनेक कारणांनी जगातील तापमान सातत्याने वाढत आहे. यासाठी एखाद्याच देशाला जबाबदार धरता येणार नाही. यामध्ये हरितगृहातील वायूंचा (Green house gases) तापमान वाढविण्यातील हिस्सा प्रतिदिन वाढत आहे.

ऑक्टोबर २००८ मध्ये जागतिक शिखर परिषदेमध्ये २००७ च्या आंतरराष्ट्रीय हरित शिखर परिषदेकडे वाटचाल व त्यात शाळा, व्यावसायिक, सहकारी अधिकारी, माध्यमे, उद्योग यांचा सहभाग वाढवला. तसेच दुसरी जागतिक हवामान परिषद १९९० मध्ये क्योटो (Kyoto) येथे भरवली. यामध्ये १७४ देश सामील झाले होते.

 

शाश्वत विकासाची उद्दिष्टे : 

  • सर्व लोकांच्या जीवनाची गुणवत्ता वाढविणे.
  • सर्वांच्या मूलभूत गरजा भागवून राहणीमान उंचावून आर्थिक विकास सुधारणे.
  • सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी देणे व शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक स्वच्छतेसाठी सहकार्य करणे.
  • पिया पियामधील एकता वाढविणे.
  • देशातील नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक संसाधने, संपत्तीचा साठा अबाधित ठेऊन, आर्थिक विकासाचा जास्तीत जास्त निव्वळ फायदा मिळविणे.
  • भविष्यकालीन पिढ्यांसाठी अडचणीचे वाईट ठरू नये अशा दृष्टीने सामाजिक व सांस्कृतिक, नैसर्गिक, मानवी भांडवलाचा साठा राखणे व वाढविणे यासाठी आर्थिक विकासाची गती वाढविणे.
  • नैसर्गिक भांडवली साठा घटू नये अशी शक्तीमान शाश्वती तयार करणे,
  • जगातील निरपेक्ष गरीबी कमी करणे.

 

शाश्वत विकासासाठीचे धोरण (Policies for Sustainable Development) :

सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादीचा दर्जा घसरल्याने लोकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो, आर्थिक उत्पादकता घटते आणि सुखसोयी कमी होतात. त्यासाठी योग्य धोरण स्विकारणे ही काळाची गरज ठरते. ते पुढीलप्रमाणे-

  • दारिद्र्य पटविण्यासाठी, नवीन रोजगार संधी देण्यासाठी मोठमोठे प्रकल्प राबविले पाहिजेत,
  • अनुदान (Subsidies) पटविल्यास किंवा काढून टाकल्यास देशाला अनेक बाजूंनी फायदेशीर ठरेल.
  • बाजारावर आधारित दृष्टिकोन स्वीकारावा.
  • संपत्तीच्या हांची विभागणी करावी..
  • विक्री वाढीसाठी किंमत घट, संस्थावाद इत्यादींना उत्तेजन द्यावे..
  • दर्जापट रोखण्यासाठी नियंत्रण असावे.
  • देशांतर्गत व परदेशी व्यापारवाढीसाठी योग्य धोरण आखावे.
  • समाजजागृती व समाजाचा सहभाग मोठा असावा,
  •  जागतिक आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणात्मक प्रयत्नामध्ये आवश्यक सहभाग असावा.

 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment