मूल्यांकन म्हणजे काय ? मूल्यांकनाचे महत्त्व आणि पद्धती, नियम ,मूल्यांकनाचे उद्देश – valuation Information in Marathi 

मित्रांसह शेअर करा - Share this
3.2/5 - (11 votes)

मूल्यांकन म्हणजे काय ? मूल्यांकनाचे महत्त्व आणि पद्धती, नियम ,मूल्यांकनाचे उद्देश – valuation Information in Marathi ,नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात मूल्यांकनाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या लेखांमध्ये आपण मूल्यांकन म्हणजे काय, मूल्यांकनाचे सत्यपणाचे आवश्यक अंग, मूल्यांकनाचे पद्धती, मूल्यांकनाचे महत्त्व याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला मूल्यांकनाबद्दल माहिती  प्राप्त होण्यास मदत होईल. 

मूल्यांकन म्हणजे काय  Evaluation Information in Marathi 

मूल्यांकन म्हणजे काय ? valuation Information in Marathi 

       मूल्यांकन हा सत्यपणाचाच एक भाग आहे म्हणून मुलांकनाचा अभ्यास सत्यापनाबरोबर केला पाहिजे. संपत्ती अगर मालमत्तेचे योग्य आणि अचूक मूल्यांकन केल्याशिवाय अचूक नफा अगर तोटा काढता येत नाही .कोणत्याही संपत्तीच्या उपयुक्ततेच्या आधारावर तिचे मूल्य ठरविले म्हणजेच मूल्यांकन होय. थोडक्यात, व्यवसायातील मालमत्तेचे मूल्य किती आहे ते ठरविणे यालाच मालमत्तेचे मूल्यांकन असे म्हणतात.

 

Evaluation meaning in Marathi – मूल्यांकनच्या मराठी मध्ये अर्थ 

इव्हॅल्युशन ला मराठी मध्ये मूल्यांकन म्हणतात 

 

 मूल्यांकनाचे सत्यापनाचे आवश्यक अंग आहे 

        एखाद्या मालमत्तेविषयी ती व्यवसायाच्या मालकीची आहे व तिच्या उपयोग व्यवसायातच होत आहे, या निष्कर्षापुरतेच अंकेक्षकाचे काम नसते,तर त्यापेक्षा अंकी शकाची पुढची जबाबदारी मोठी समजली जाते आणि ती म्हणजे त्या मालमत्तेचे खरे मूल्य काय ते ठरविणे ;म्हणूनच असे म्हटले जाते की, मूल्यांकन हे सत्यपनाचे आवश्यक अंग आहे. मूल्यांकनाशिवाय  सत्यापनाला अर्थ नसतो. 

तर   सत्यापनाशिवाय मूल्यांकनाचा अर्थ उरत नाही. काही जाणकारांच्या, तज्ञांच्या मते जर मूल्यांकन आणि सत्या पण या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत असे गृहीत धरले तर ती फार मोठी चूक ठरेल; कारण सत्यापनातच  मूल्यांकन समाविष्ट आहे असे जाणकारांचे ठाम मत आहे .जोपर्यंत ताळेबंदातील मालमत्तेचे मूल्ययोग्य लिहिले जात नाही तोपर्यंत ताळेबंद योग्य आणि बरोबर आहे असे  मानले जाणार नाही. मूल्यांकन म्हणजे मालमत्तेच्या मूल्यांचे परीक्षण होय, तर सत्यापन म्हणजे मालमत्तेचे अधिकार,प्रकार यांचे सूक्ष्म परीक्षण होय .

 

मूल्यांकनाचे सर्वसाधारण नियम 

  • स्थिर संपत्ती (Fixed Assets) :-
  • सर्वसाधारणपणे जी संपत्ती परत विक्रीसाठी विकत घेतली जात नसते आणि जिच्या सहाय्याने व्यवसाय चालविला जातो व जी उज्वल स्वरूपाची असते अशा संपत्ती / मालमत्तेस स्थिर संपत्ती अगर स्थिर मालमत्ता म्हटले जाते .स्थिर संपत्तीचे मूल्यांकन करताना तिचा बाजारभाव लक्षात घेतला जात नाही, तर खरेदी किंमत व ती वापरल्याबद्दल ताळेबंदाच्या तारखेपर्यंतचे झीज /  घसारा रूपाने होणारे एकंदर नुकसान वजा करून मूल्यांकन ठरविले जाते .त्यालाच स्थिर मालमत्तेचे उपयोगिता मूल्य असेही म्हणतात. उपयोगिता मूल्य हे पुढील  सूत्राने देखील काढता येते .

 

स्थिर मालमत्तेचे वर्तमान मूल्य = मूळ किंमत अगर लगत मूल्य ( Cost price) – घसारा 

 

मूळ किंमत ( Cost price) =खरेदी किंमत +  खरेदीवरील खर्च (वाहतूक,  जकात, वगैरे)

 

            घसारा अगर झीज = मूळ किंमत –  स्थिर मालमत्तेचे मोडमूल्य

                                           ———————————————-

                                           स्थिरसंपत्ती /  मालमत्तेचे आयुष्य ( वर्षात) 

 

  • अस्थिर मालमत्ता /  चलसंपत्ती (Liquid Assets) :-  सर्वसाधारणपणे जी मालमत्ता परत विक्रीसाठी विकत घेतलेली असते किंवा तिच्यावर काही प्रक्रिया करून विकण्यात येते त्या  मालमत्तेला /  संपत्तीला असतील संपत्ती असे म्हणतात. अशा संपत्तीचे /  मालमत्तेचे मूल्यांकन करताना तिची खरेदी किंमत आणि बाजारभाव विचारात घेतला जातो आणि त्या दोन्हीपैकी जी किंमत कमी असेल त्या किमतीने मूल्यांकन केले जाते. 

 

मूल्यांकनांच्या पद्धती 

 

  • मूळ किंमत /  लगत मूल्य ( Cost price) :-संपत्ती अगर मालमत्ता खरेदी करण्याकरिता किंवा निर्माण करण्याकरिता  येणारा खर्च म्हणजे मूळ किंमत होय. यामध्ये मालमत्तेच्या स्थापनेसाठी, खरेदीसाठी येणारा खर्चही विचारात घेतला जातो. 


  • बाजार मूल्य अगर विपणीमूल्य  ( Market Value ) :-  ताळेबंदाच्या दिवशी ज्या मूल्यास मालमत्तेची बाजारात विक्री केली असता जे मूल्य येऊ शकेल ते मूल्य म्हणजे बाजारमूल्य होय.


  • पुस्तकी मूल्य ( Book Value ) :-   व्यवसायाच्या लेखा पुस्तकात ताळेबंदाच्या दिवशी मालमत्तेचे असलेले मूल्य म्हणजे पुस्तकी मूल्य होय.


  •  प्रतिस्थापन /  पुन: स्थापन मूल्य (Replacement Value) :- जुन्या मालमत्ते ऐवजी नवीन मालमत्तेची स्थापना केली तर येणारा खर्च म्हणजे प्रतिस्थापना मूल्य होय. यामध्ये नवीन मालमत्तेची किंमत, स्थापना करण्यासाठी येणारा खर्च, खरेदीचा खर्च यांचाही समावेश होतो. 

       

  •  प्राप्य मूल्य ( Realisable Value ) :-आता बाजारात विकून जे मूल्य मिळते त्या मूल्याला प्राप्य मूल्य असे म्हणतात. विक्री किमतीतून दलाली, वेतन तसेच अन्य विक्री खर्च वजा केले जातात. 


  • उपयोगीता मूल्य अगर चालू व्यवसायसंस्थेचे मूल्य (Going Concern Value) :-व्यवसायाला मालमत्तेचा जो उपयोग होतो त्या आधारावर हे मूल्य ठरविले जाते. यास Historical or Token Value म्हटले जाते .मालमत्तेच्या मूळ किमतीतून घसारा वजा करून हे मूल्य काढले जाते .


  •   अवशिष्ट मूल्य अगर मोडमूल्य (Scrap Value) :- मालमत्ता निरोपयोगी झाल्यानंतर अगर तिचे योगिता संपल्यानंतर विकून आलेल्या मूल्यास अवशिष्ट मूल्य म्हणतात. ह्याला Break -up Value असेही म्हणतात.

 

मालमत्तेच्या अचूक मूल्यांकनासाठी लक्षात घ्यावयाचे घटक 

            एखाद्या विशिष्ट मालमत्तेचे अचूक मूल्यांकन, त्या मालमत्तेचे स्वरूप, आकार, उपयोग, आयुष्य यावर अवलंबून असते. तथापि संपत्तीचे /  मालमत्तेचे मूल्यांकन करताना खालील घटक लक्षात घेणे आवश्यक ठरते.

  1. मालमत्तेची मूळ किंमत  
  2. मालमत्तेचे कार्यक्षम आयुष्य :- ज्या काळात मालमत्ता कार्यरत /  कार्यशील राहू शकेल असा कालावधी
  3. झिज  /  घसारा किंवा  वापरामुळे होणारे नुकसान
  4.  मोड मूल्य / अवशिष्ट मूल्य
  5. मालमत्ता निरुपयोगी होण्याची शक्यता 

 

मूल्यांकनाचे उद्देश 

         उपयुक्ततेच्या आधारावर मालमत्तेच्या निश्चित मूल्यांची तपासणी करणे हा मूल्यांकनाचा प्रमुख उद्देश असला तरी या संदर्भात मुलांकनाचे उद्देश पुढीलप्रमाणे सांगता येतील. 

  1. व्यवसायांची मालमत्ता आणि देणे योग्य मूल्याने ताळेबंदात दाखविली असल्याबद्दल खात्री करून घेणे.
  2. मूल्यांकनासाठी योग्य पद्धतीचा अवलंब केला असून त्या पद्धतीत वारंवार बदल केला जात नाही याविषयी खात्री करून घेणे.
  3. ताळेबंद कर तयार करताना मालमत्तेचे मूल्य व्यवस्थापकांच्या सोयीसाठी कमी अगर जास्त दाखविल्यास त्याचा शोध घेऊन व्यवस्थापकांची / व्यवसायिकांची लबाडी उघडकिस आणणे. 
  4. व्यवसायाच्या मूळ आर्थिक स्थितीचे ज्ञान होण्यासाठी
  5.  विविध मालमत्ता वर घसारा / झीजयांची तरतूद योग्यच केली आहे याविषयी खात्री करून घेणे. 

मूल्यांकन कशासाठी वापरले जाते?

मूल्यमापन हा शिक्षणाला पाठिंबा देण्याचा एक मार्ग आहे

मूल्यांकनाचा उद्देश काय आहे?

व्यवसायांची मालमत्ता आणि देणे योग्य मूल्याने ताळेबंदात दाखविली असल्याबद्दल खात्री करून घेणे

मूल्यांकनच्या मराठी मध्ये अर्थ 

इव्हॅल्युशन ला मराठी मध्ये मूल्यांकन म्हणतात 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment