गुंतवणूक म्हणजे काय ? गुंतवणुकीची व्याख्या, गुंतवणूक खात्याचा आराखडा – What Is Investment In Marathi, – नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात गुंतवणूक म्हणजे नेमके काय असते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे गुंतवणुकाची व्याख्या,गुंतवणूक खाते कोण बनवीत असतो, त्याचा आराखडा, वर्षा अखेरच्या गुंतवणुकीचे मूल्यांकन कशा पद्धतीने करायचे आणि गुंतवणूक खाते बंद कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्राप्त होण्यास मदत होईल.
गुंतवणूक म्हणजे काय – What Is Investment In Marathi
जो पैसा, पैसा मिळवून देतो त्याला गुंतवणूक असे म्हणतात.गुंतवणूक ही संकल्पना खूप व्यापक आहे. तरीही हिशोबशास्त्रामध्ये गुंतवणूक ही संकल्पना मर्यादित अर्थानेच वापरली जाते.भाग( शेअर्स), कर्जरोखे व बॉण्ड इत्यादी प्रतिभूतींमध्ये पैसे गुंतविणे म्हणजेच गुंतवणूक होय.
कंपन्यांनी गुंतवणूक केलेल्या प्रत्येक प्रतिभूतींचे म्हणजेच भाग, कर्जरोखे व बॉण्ड यांचे स्वतंत्र खाते उघडण्यात येते. या खात्यांवरून संबंधित प्रतिभूतींची सध्याची स्थिती कळते. हिशेब ठेवल्यामुळे केलेली गुंतवणूक लाभदायक आहे किंवा नाही हे त्वरित समजते.
गुंतवणुकीची व्याख्या – Definition Of Investment In Marathi
कंपनी किंवा व्यक्ती आपल्या जवळील जादा पैसा नियमित व निश्चित उत्पन्न मिळवण्यासाठी विविध प्रतिभूतींमध्ये गुंतविते यालाच गुंतवणूक असे म्हणतात.
सर्वसामान्य माणूस देखील आपल्या जवळील जास्तीचा पैसा विविध क्षेत्रात गुंतवतो. उदाहरणार्थ, काही लोक सोने व चांदीचे दागिने खरेदी करतील तर काही लोक शेती किंवा मोकळी जमीन खरेदी करतील. व्यक्तीप्रमाणेच भागीदारी संस्था व कंपन्या देखील आपल्या जवळील जास्तीचा पैसा इतर कंपन्यांची भाग( शेअर्स), कर्जरोखे ( डिंबेंचेर्स) व बॉण्ड इत्यादींमध्ये गुंतवतात यालाच गुंतवणूक असे म्हणतात.
गुंतवणूक खाते कोण बनवितो व का – Who Make Investment Account And Why
बॅंका, विमा कंपन्या, गुंतवणूक कंपन्या, काही व्यापारी व सावकार नफा मिळविण्याच्या हेतूने प्रतिभूती भाग, कर्जरोखे व यांची खरेदी विक्री करतात. या संस्था विविध प्रकारच्या प्रतिभूती धारण करतात.प्रत्येक प्रतिभूर्तींसाठी स्वतंत्र खाते उघडण्यात येते त्यालाच गुंतवणूक खाते असे म्हणतात. या खात्यावरून विशिष्ट प्रतिभूतीतील गुंतवणुकीवर नफा झाला की तोटा झाला हे समजते. त्याचप्रमाणे व्याज अथवा लाभांश किती मिळाला हे समजू शकते. गुंतवणूक खात्यामुळे दोन हेतू साध्य होतात–
1) विशिष्ट प्रतिभूती खरेदी- विक्री करून किती नफा अगर तोटा झाला हे ओळखता येते.
2) विशिष्ट प्रतिभूतींच्या गुंतवणुकीवर किती व्याज अथवा लाभांश मिळाला हे शोधता येते.
गुंतवणूक खात्याचा आराखडा – Form Of Investment Account In Marathi
गुंतवणूक खात्याच्या वरील बाजूला त्या भागाची अथवा कर्जरोख्याचे नाव लिहितात. व्यास देण्याच्या सारखा देखील गुंतवणूक खात्याच्या वरील बाजूलाच लिहिल्या जातात. या खात्याच्या नावे व जमा बाजूला पुढील रकमा असतात–
- दिनांक
- तपशील
- दर्शनी किंमत (Face Value)
- व्याज अथवा लाभांश (Interest Or Dividend)
- मूळ किंमत किंवा भांडवल (Cost Price/Capital)
गुंतवणूक खात्यातील घटक – Points Of Interest Account In Marathi
1)गुंतवणुकीची सुरुवातीची शिल्लक
वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणूक खात्यावर काही शिल्लक असेल तर ती शिल्लक गुंतवणूक खात्याच्या नावे बाजूला दर्शविली जाते. त्या गुंतवणुकीचे दर्शनी मूल्य व भांडवली मूल्य दर्शविले जाते.
2)गुंतवणुकीवरील येणे असलेले व्याज
वर्षारंभी गुंतवणुकीवर काही व्याज येणे असल्यास हे येणे व्याज गुंतवणूक खात्यामध्ये नावे बाजूला व्याज या रकान्यात दर्शविली जाते
गुंतवणूक खाते कसे बंद करायचे – Closing Of Interest Account In Marathi
गुंतवणूक खात्यातील वेगवेगळे रकाने पुढील प्रमाणे बंद करता येतात –
1.दर्शनी मूल्य (Face Value Column)
रकानेदर्शनी मूल्य रकान्यात जर काही शिल्लक असेल तर ती शिल्लक गुंतवणूक खात्याच्या जमा बाजूला दाखविली जाते.
2. व्याजाचा रकाना (Interest Column)
व्याजाच्या रकान्यातील म्हणजेच व्याज खात्याची शिल्लक नफा- तोटा खात्याला वर्ग केली जाते.
3.भांडवली मूल्य रकाना(Capital Value Column)
भांडवली मूल्य रकाने खाते बंद करण्यासाठी गुंतवणुकीची मूळ किंमत किंवा बाजारातील किंमत यामध्ये जी कमी असेल ती किंमत घेऊन गुंतवणुकीची किंमत काढली जाते.
वर्षाअखेरच्या गुंतवणुकीचे मूल्यांकन – Years Last Of Interest Valuation In Marathi
वर्षा अखेरच्या गुंतवणुकीची किंमत ओळखण्यासाठी मूल्यांकनाच्या तीन पद्धती आहेत. त्या खालील प्रमाणे–
- प्रथम आलेल्या मालाची प्रथम विक्री पद्धत (First-in-First-Out Method– FIFO)
- शेवटी आलेल्या मालाची प्रथम विक्री पद्धत – (Last- in- First- Out Method–LIFO)
- सरासरी किंमत पद्धत – (Average Cost Method )
मूळ किमतीची बाजारातील किमतीशी तुलना केली जाते व यामध्ये जी किंमत कमी असेल त्या किमतीने वर्षा अखेरच्या शिल्लक गुंतवणुकीचे मूल्यांकन केले जाते. नंतर भांडवल मूल्य रकान्यात वरील किमती लिहिल्या जाते व ह्या रकान्याच्या नावे व जमा बाजूचा फरक नफा तोटा खात्याला वर्ग केला जातो.
गुंतवणुकीची उत्तम व्याख्या कोणती?
गुंतवणुकीत कालांतराने त्याचे मूल्य वाढवण्यासाठी आज भांडवल वापरणे समाविष्ट आहे. गुंतवणुकीसाठी वेळ, पैसा, मेहनत, इ.च्या रूपात काम करण्यासाठी भांडवल घालणे आवश्यक आहे
गुंतवणूक म्हणजे काय?
गुंतवणुकीचा अर्थ प्रामुख्याने उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत मिळवणे किंवा विशिष्ट कालावधीत गुंतवणुकीतून नफा मिळवणे होय.
लवकर गुंतवणूक करणे महत्त्वाचे का आहे?
लवकर सुरुवात केल्याने गुंतवणूकदारांना अधिक जोखीम घेता येते आणि त्यांना अधिक चांगले परतावा मिळवण्याची संधी मिळते कारण ते दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर परिणाम न करता चुकीच्या निर्णयातून पुनर्प्राप्त होऊ शकतात .