सत्यापन (Verification) आणि मूल्यांकन (Valuation) यातील फरक ? सत्यापन आणि मूल्यांकन यातील फरक – Satyapan Ani mulyankan yatil Fark

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (1 vote)

सत्यापन (Verification) आणि मूल्यांकन (Valuation) यातील फरक ? Satyapan Ani mulyankan yatil Fark,सत्यापन आणि मूल्यांकन यातील फरक , – सत्यापन आणि मूल्यांकन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी किंवा ह्या दोन क्रिया एकमेकांना पूरक असल्या तरी हे दोन भिन्न/ वेगवेगळे विषय असल्यामुळे ह्या दोन्ही मधील फरक पुढीलप्रमाणे सांगता येईल–

नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात  सत्यापन आणि मूल्यांकन यामधील फरक याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार  आहोत.सत्यापन म्हणजे काय आणि मूल्यांकन म्हणजे काय हे देखील थोडक्यात जाणून घेणार आहोत. तरी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला यामधील फरक करण्यास मदत होईल.

 

सत्यापन आणि मूल्यांकन यातील फरक - Satyapan Ani mulyankan yatil Fark

सत्यापन आणि मूल्यांकन यातील फरक – Satyapan Ani mulyankan yatil Fark

 सत्यापन आणि मूल्यांकन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी किंवा ह्या दोन क्रिया एकमेकांना पूरक असल्या तरी हे दोन भिन्न/ वेगवेगळे विषय असल्यामुळे ह्या दोन्ही मधील फरक पुढीलप्रमाणे सांगता येईल–

सत्यापन (Verification) मूल्यांकन (Valuation)
1.सत्यापनाची व्याप्ती मूल्यांकनापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. काही वेळेस सत्यापनात मूल्यांकनाचा समावेश केला जातो.1.मूल्यांकनाची व्याप्ती सत्यापनापेक्षा कमी आहे. मूल्यांकनात सत्यपणाचा समावेश केला जात नाही.
2. सत्यापनाचा हेतू मालमत्ता अथवा देयता अस्तित्वात आहे किंवा नाही याची तपासणी करणे हा असतो.2. मूल्यांकनाचा हेतू अस्तित्वात असलेली मालमत्ता अथवा देयतेचे मूल्य योग्य आहे अथवा नाही हे ठरविणे हा असतो.
3.  मालमत्तेची अफरातफर, खोटी मालमत्ता दाखविणे, मालमत्ता असून उल्लेख न करणे, इत्यादी लबाडी, खोट्या गोष्टी उघडीस आणणे हा सत्यापनाचा उद्देश असतो.3. मालमत्तेचे ताळेबंदातील मूल्य आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त लावणे, मूल्यांकनाची अयोग्य व व्यवहारी पद्धती वापरणे यासारख्या लबाड्या उघडीस आणणे हा मूल्यांकनाचा उद्देश असतो.
4. सत्यापनात काही चूक झाल्यास अंकेक्षकास  जबाबदार धरले जाते. मालमत्तेचे सत्यापन करणे हे अंकेक्षकाचे महत्त्वाचे कर्तव्य मानण्यात येते. या कर्तव्यात काही चूक झाल्यास किंवा अंकेक्षकाने काही निष्काळजीपणा केल्यास तो जबाबदार धरला जातो.4. मूल्यांकनात काही तांत्रिक चूक झाल्यास अंकेक्षकाला जबाबदार धरले जात नाही. तो मूल्य  निर्धारक(valuer) आहे असे  मानण्यात येत नाही. संस्थेच्या अधिकाऱ्याने मालमत्तेचे ठरविलेले मूल्य व्यापारी तत्त्वानुसार ठरविले आहे एवढी खात्री अंकेक्षकाने करून घ्यायची असते.
5. ताळेबंदातील मालमत्तेच्या याद्यांची तपासणी वेगवेगळ्या खर्चाच्या पावत्या, हिशोबाची पुस्तके, दस्तऐवज यावरून करण्यात येते. 5.ताळेबंद्यातील मालमत्तेचे मूल्यांकन करताना खर्चाच्या पावत्या  म्हणजेच पुस्तक तपासण्यापेक्षाही ज्या

 

तत्त्वानुसार मूल्यांकन करण्यात येते, ते तत्व प्रामुख्याने तपासले जाते. 

सत्यापन म्हणजे काय – What Is Verification In Marathi

सत्यापन म्हणजे सत्य सिद्ध करणे अथवा त्याची खात्री पटवणे, संपत्तीचे सत्यापन म्हणजे संपत्ती बाबत सत्य सिद्ध करणे होय.

जिंदगीचे/मालमत्तेचे सत्यापन म्हणजेच मालमत्तेचे मूल्य, मालकी व मालकी हक्क अस्तित्व, ताबा आणि तिची भारयुक्तता म्हणजेच तिच्या कारणावर काही कर्ज काढलेले असल्यास त्याची चौकशी करणे होय.

  मालमत्तेचा सत्यापन म्हणजेच मोजमाप म्हणजे तिच्या खरेपणा सिद्ध करणे होय. 

 

मूल्यांकन म्हणजे काय – What Is Valuation In Marathi

मूल्यांकन हा सत्यापनाचाच एक भाग आहे म्हणून मूल्यांकनाचा अभ्यास सत्यापनाबरोबर केला पाहिजे. संपत्ती म्हणजेच मालमत्तेची योग्य आणि अचूक मूल्यांकन केल्याशिवाय अचूक नफा/ तोटा काढता येत नाही. कोणत्याही संपत्तीच्या उपयुक्ततेच्या आधारावर तिचे मूल्य ठरविणे म्हणजेच मूल्यांकन होय. थोडक्यात, व्यवसायातील मालमत्तेचे मूल्य किती आहे ते ठरविणे यालाच मालमत्तेचे मूल्यांकन असे म्हणतात. 

 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment