स्थिर भांडवल म्हणजे काय ? स्थिर भांडवल चा अर्थ आणि व्याख्या , वैशिष्ट्ये, फायदे – fixed capital information in marathi , fixed capital meaning in marathi –
कंपनीच्या भांडवल नियोजनात स्थिर भांडवल ठरविणे आवश्यक असते. स्थिर भांडवल ठरविण्यासाठी तज्ञ व्यक्तीची मदत घेतली जाते. त्याच्या सल्ल्यानुसार कंपनीच्या स्थिर भांडवलाची गरज आणि आवश्यकता विचारात घेऊन किती प्रमाणात स्थिर भांडवल असावे हे ठरविले जाते. भांडवल नियोजनामध्ये स्थिर भांडवल किती असावे हे ठरवून ते गोळा केले जाते आणि म्हणून असे ठरविलेले स्थिर भांडवल योग्य असणे आवश्यक
स्थिर भांडवल म्हणजे काय – fixed capital information in marathi
कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी भूमी, इमारत, फर्निचर, यंत्रसामग्री सारख्या स्थिर मालमत्तेची गरज भासते. या मालमत्तेचा उपयोग कंपनीला दिर्घकाळापर्यंत करता येतो. ही मालमत्ता कंपनीजवळ कायमस्वरुपी असते. म्हणून या मालमत्तेला कायम मालमत्ता असेही म्हणतात. स्थिर किंवा कायम मालमत्तेच्या खरेदीसाठी गुंतवण्यात येणाऱ्या भांडवलाला स्थिर भांडवल म्हणतात.
स्थिर भांडवलाचा अर्थ – fixed capital meaning in marathi
स्थिर भांडवल चा अर्थ – fixed capital ला मराठी मध्ये स्थिरभांडवल म्हणतात ज्याच्या अर्थ निश्चित भांडवल होतो
प्रारंभिक पदोन्नती, निश्चित भांडवल आणि खेळते भांडवल यासारख्या विविध उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी वित्ताची उपलब्धता सुनिश्चित करणे हे वित्तीय व्यवस्थापकाचे प्राथमिक कार्य आहे. स्थिर भांडवल भांडवलाचा संदर्भ देते, जे व्यवसायासाठी निश्चित मालमत्ता खरेदीमध्ये गुंतवले जाते.
स्थिर भांडवल ची व्याख्या
डोगलंड :-
स्थिर भांडवलात जमीन, इमारत, यंत्रे यासारख्या कायम अस्तित्त्व असणान्या मालमत्तेचा समावेश करता येईल.
जॉन शुबिन :-
जमीन, इमारत, यंत्रसामग्री व साहित्य यासारख्या मालमत्तेचा वापर करण्याच्या दृष्टीने गुंतलवलेल्या रक्कमेला स्थिर भांडवल म्हणतात. स्थिर भांडवल हा शब्द स्थिर मालमत्तेला सुद्धा उद्देशून वापरला जातो.
स्थिर भांडवलाची वैशिष्ट्ये
- स्थिर भांडवल ज्या मालमत्तेत गुंतवण्यात येते ती मालमत्ता व्यवसायात दिर्घकाळापर्यंत टिकून रहाते.
- स्थिर भांडवलामध्ये जमीन, इमारत, यंत्रसामग्री इ. मालमत्तेचा समावेश होतो.
- स्थिर भांडवलाचे रोख पैशात रुपांतर करता येत नाही.
- दिर्घकालीन गरजा भागवण्यासाठी स्थिर भांडवलाचा उपयोग केला जातो.
- स्थिर भांडवलाचा सतत वापर केल्याने त्याची झीज होत असते.
- स्थिर भांडवल अनेक मागांनी गोळा केले जाते. उदा. भाग, कर्जरोखे, वित्तीय संस्था, इ.
- स्थिर मालमत्ता ही खरेदी केल्यानंतर सहसा त्याची विक्री केली जात नाही.
- या भांडवलात गुंतवण्यात आलेले भांडवल व्यवसाय सुरु असेपर्यंत काढता येत नाही.
- स्थिर भांडवल हे स्थिर मालमत्तेच्या खरेदीसाठी गुंतवण्यात येते.
- या भांडवलामध्ये कंपनीच्या खर्चाचाही विचार केला जातो. उदा. नावलौकिक, स्वामित्त्व
हक्क इ. अशाप्रकारे स्थिर भांडवलाची विविधांनी अशी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत.
स्थिर भांडवलाचे फायदे – fixed capital Benefit in marathi
- व्यवसायाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करता येतात (Provides basic reqirement of business): व्यवसायाची स्थापना झाल्यानंतर असणाऱ्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्थिर भांडवलाची आवश्यकता लागते. या गरजा स्थिर भांडवलामुळे पूर्ण होतात.
- कार्यक्षमता वाढते (Raises Efficency): स्थिर भांडवलामुळे व्यवसायाची एकूण कार्यक्षमता वाढते. विशेषतः व्यवसायाचे आधुनिकीकरण करून व्यवसायाची वाढ आणि विस्तार करून कार्यक्षमता वाढविता येते. थोडक्यात स्थिर भांडवलामुळे व्यवसायाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
- कार्ये पूर्ण होतात (Ensures Orderly Functioning): स्थिर भांडवलामुळे व्यवसायाला स्थिरता लाभते. व्यवसायाला दिर्घ काळ आपले कार्य पूर्ण करता येतात.
- विस्तार आणि विभक्तीकरण साह्यभूत (Supports expansion and diversification programme): स्थिर भांडवलामुळेच व्यवसाय भविष्यकाळात व्यवसायाचा वाद आणि विस्तार करू शकतो. व्यवसायाचे विभक्तीकरण केल्यामुळे व्यवसायाला नफा मिळून व्यवसायाचा विस्तार करणे सोपे जाते. थोडक्यात स्थिर भांडवलामुळे व्यवसायाचा विस्तार आणि विभक्तीकरणाच्या कार्यक्रमाला हातभार लागतो.
- विस्तार करू शकतो. व्यवसायाचे विभक्तीकरण केल्यामुळे व्यवसायाला नफा मिळून व्यवसायाचा विस्तार करणे सोपे जाते. थोडक्यात स्थिर भांडवलामुळे व्यवसायाचा विस्तार आणि विभक्तीकरणाच्या कार्यक्रमाला हातभार लागतो.
- निकामी झालेली यंत्रसामग्री बदलता येते (Facilities replacement of absolete assets): व्यवसायात उपयोगात असणारी यंत्रसामग्री काही कालावधीनंतर निकामी होते. अशी यंत्रसामग्री विकून पुन्हा नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी स्थिर / भांडवलाचा उपयोग होतो. तसेच तंत्रज्ञानात नेहमी बदल होत असतात.
- अशावेळेस नवीन / आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी स्थिर करण्यासाठी भांडवल फायदेशीर ठरते.
- उत्पादन कार्यासाठी साहब ( Supports manufacturing activities): उत्पादन कार्य अखंड चालवण्यासाठी स्थिर भांडवलाचा उपयोग होत असतो.
स्थिर भांडवलाचे प्रमाण निश्चित करणारे घटक –स्थिर भांडवलाचे घटक
कोणत्याही व्यवसायाकरिता एकूण किती स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. याबाबत अचूक आकडा सांगणे परंतू विशिष्ट व्यवसायाकरिता स्थिर भांडवलाची मात्रा कमी किंवा जास्त लागेल याचा अंदाज सहज व्यक्त करता येतो.
व्यवसायाचा आकार :-
स्थिर भांडवलाचे प्रमाण व्यवसायाच्या आकारावर अवलंबून असते. उत्पादन मोठ्या प्रमाणावर होण्यात येत असेल तर जमीन, इमारत, यंत्रसामग्रीदेखील मोठ्या प्रमाणात आणावी लागते. व त्यासाठी स्थिर भांडवल मोठ्या प्रमाणावर लागेल याउलट उत्पादन लहान प्रमाणावर घेण्यात येत असेल तर स्थिर भांडवलही त्यामानाने कमी प्रमाणात लागेल.
व्यवसायाचे स्वरुप :-
व्यवसायात वस्तू निर्मितीचे कार्य केले जात असेल तर तेथे स्थिर भांडवलाचे प्रमाण जास्त लागते आणि व्यवसायात केवळ वस्तूंची खरेदी विक्री चालत असेल तर तेथे स्थिर भांडवल कमी लागते.
व्यवसाय प्रकार :-
मूलभूत किंवा लोकोपयोगी व्यवसायात स्थिर भांडवलाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. उदा. रेल्वे बसवाहतूक, पोलाद कारखाने, यंत्रसामग्रीचे कारखाने, इ. याउलट उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायात त्यामानाने कमी स्थिर भांडवल लागते. उदा. साबण, फेस पावडर.
खरेदी किंवा भाडे प्रकार :-
उत्पादनासाठी लागणारी स्थिर मालमत्ता कंपनीने रोखीने खरेदी केल्यास स्थिर भांडवल जास्त लागते. याउलट कंपनीने स्थिर मालमत्ता भाड्याने मिळवल्यास स्थिर भांडवल कमी लागते.
किंमत देण्याची पद्धत :-
स्थिर संपत्तीची खरेदी केल्यानंतर तिची किंमत ताबडतोब रोख स्वरुपात द्यावी लागत असल्यास कंपनीला स्थिर भांडवल जास्त लागते याउलट संपत्तीची किंमत दृष्टीने द्यावी लागत असेल तर कंपनीला स्थिर भांडवल कमी लागते.
उत्पादनाचे तंत्र
उत्पादनासाठी भांडवल प्रधान उत्पादनतंत्राचा अवलंब करण्यात येत असेल तर तेथे यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज भासेल. याउलट उत्पादनासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा अवलंब करण्यात येत असेल तर तेथे स्थिर भाडवल कमी प्रमाणात लागेल.
उत्पान पद्धती :-
एखादी कंपनी एखाद्या वस्तूचे सर्व भाग कारखान्यात तयार करुन वस्तूची निर्मिती करीत असेल तर तेथे स्थिर भांडवल जास्त लागेल पाउलट ती कंपनी त्या वस्तूचे सर्व भाग बाहेरून जाणून त्याची फक्त कारखान्यात जुळणी करीत असेल तर तेथे स्थिर भांडवल कमी लागेल.
विक्री पद्धती :-
जर कंपनी उत्पादित माल घाऊक व्यापाऱ्याला विकत असेल तर तेथे स्थिर भांडवल कमी लागेल याउलट कंपनी आपला माल स्वतः विकत असेल तर गोदामाची व्यवस्था करणे दुकानाची निर्मिती करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज असेल
स्थिर भांडवलाचे व्यवस्थापन
- सध्याच्या काळात म्हणजेच आधुनिक काळात स्थिर भांडवलाचे महत्त्व खूपच आहे. यामध्ये स्तिर भांडवला शिवया स्थिर मालमत्ता खरेदी केली जावू शकते. उदा. जमीन, इमारत, यंत्रसामग्री.
- व्यवसायात स्थिरता मिळवून देण्यासाठी व्यवसायाचे नूतनीकरण करणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे यात आधुनिकीकरणाला खूप महत्त्व आहे.
- नवीन नवीन शोध लागत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन कार्यात अधिकाधिक प्रगती घडवून आणणे हे कार्य स्थिर भांडवल व्यवस्थापनामूळेच होवू शकते.
- जागतिक पातळीवर माल विकल्प जावा म्हणून यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. हे उत्पादन करण्यासाठी स्थिर भांडवलाची गरज असते.
- कमीत कमी उत्पादन खर्चात वस्तू तयार करण्यासाठी जागतिक बाजारपेठ मिळवून देणे हे देखील स्थिर भांडवल करते.
अशा प्रकारे स्थिर भांडवल व्यवस्थापनाचे महत्त्व बाजारपेठेत खूपच महत्त्वाचे आहे..
- फायनान्स म्हणजे काय ? फायनान्स चे अर्थ, प्रकार, कार्य ,फायनान्स चे महत्त्व
- सूक्ष्म वित्तपुरवठा) मायक्रोफायनान्स म्हणजे काय ? मायक्रो फायनान्स चे फायदे ,
- व्यवस्थापन म्हणजे काय ? व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये , व्यवस्थापनाची कार्य स्वाध्याय , महत्त्व आणि फायदे
- स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ? स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, वैशिष्ट्ये, व्याप्ती, महत्व, मर्यादा
- भांडवल बाजार म्हणजे काय ? भांडवल बाजाराचे कार्य , महत्व , भूमिका, घटक
- वित्तीय प्रणाली म्हणजे काय आहे ? अर्थ , महत्त्व, कार्य, भारतीय वित्तीय प्रणाली
- फायनान्स म्हणजे काय ? फायनान्स चे अर्थ, प्रकार, कार्य ,फायनान्स चे महत्त्व
- सूक्ष्म वित्तपुरवठा) मायक्रोफायनान्स म्हणजे काय ? मायक्रो फायनान्स चे फायदे ,
- व्यवस्थापन म्हणजे काय ? व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये , व्यवस्थापनाची कार्य स्वाध्याय , महत्त्व आणि फायदे
- स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ? स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, वैशिष्ट्ये, व्याप्ती, महत्व, मर्यादा
fixed capital चा अर्थ
स्थिर भांडवल चा अर्थ – fixed capital ला मराठी मध्ये स्थिरभांडवल म्हणतात ज्याच्या अर्थ निश्चित भांडवल होतो
स्थिर भांडवलाच्या घटक
व्यवसायाचा आकार
व्यवसायाचे स्वरुप
व्यवसाय प्रकार
खरेदी किंवा भाडे प्रकार
किंमत देण्याची पद्धत