भांडवल बाजार म्हणजे काय ? भांडवल बाजाराचे कार्य , महत्व , भूमिका, भांडवल बाजाराचे घटक – Indian Capital Markets in Marathi ,भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये , भांडवल बाजाराचे महत्व , भांडवल बाजाराची कार्य ,भांडवल बाजाराची भूमिका
भांडवल बाजार म्हणजे काय – Indian Capital Markets in Marathi
दीर्घ मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण ज्या वित्तीय बाजारात होते त्यास भांडवलबाजार म्हणतात. मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाची देवाण घेवाण करणाऱ्या सर्व संस्थात्मक रचनेचा, समभाग बॉड्स कर्जरोखे इत्यादी दीर्घ मुदतीच्या वित्तीय साधनांचे व्यवहार करणाऱ्या यंत्रणेचा समावेश भांडवल बाजारात होतो.
उद्योगधंद्याना लागणाऱ्या स्थीर व कायम भांडवलाची गरज या बाजारात पूर्ण होते. दीर्घकालीन निधीची मागणी प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्र, व्यापार, शासन यांच्याकडून होते. केंद्र व राज्य सरकार वाहतुक सिंचन प्रकल्प, वीजपुरवठा इत्यादी पायाभूत सोयींबरोबरच मूलभूत व उपभोग्य वस्तूंच्या उद्योगातही गुंतवणूक करतात. त्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणात भांडवल बाजारातून निधीची आवश्यकता भासते. औद्योगिक क्षेत्राला उद्योग उभारणीसाठी मोठ्या प्रमाणातील गुंतवणूकीसाठी दीर्घ मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते.
भांडवल meaning in hindi – भांडवल ला हिंदीत काय म्हणतात
पूंजी – भांडवल ला हिंदीत पूंजी म्हणतात
भांडवल meaning in english – भांडवल ला इंग्रजीत काय म्हणतात
Capital – भांडवल ला इंग्रजीत कॅपिटल (Capital) म्हणतात
भांडवल बाजाराचे महत्व – भांडवल बाजाराची भूमिका
देशात भांडवल निर्मिती करण्यासाठी भांडवल बाजार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या जलद आर्थिक विकासासाठी भांडवलनिर्मिती मोठया प्रमाणात होणे आवश्यक असते. भांडवलबाजाराचे प्रमुख कार्य हे बचतीचे एकत्रीकरण करणे व बचतीचा ओघ औद्योगिक विकासाकडे वळविणे हाच आहे. भांडवल बाजाराच्या या कार्यामुळे भांडवलनिर्मिती होते व त्यातून आर्थिक विकासाला चालना मिळते.
1.बचतीचे संकलन व भांडवल निर्मितीचा वेग वाढविणे:
भांडवल बाजारात गुंतवणूकीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिभूती (रोखे) उपलब्ध करुन दिले जातात. मुदत, परताव्याचा दर, तरलता, कर्ज मागण्याची व कर्ज परतीची वेळ, रक्कम परत मिळण्याची हमी, गुंतवणूकीची रक्कम अशा वेगवेगळ्या कसोट्यांवर उतरणारे, विविधता असलेले रोखे गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात.
त्यामुळे बचतदार रोख्यामध्ये गुंतवणूक करतात. वेगवेगळ्या उत्पन्न गटातील लोकांजवळील बचती तसेच विविध संस्थाकडील अतिरिक्त पैसा या माध्यमाने संकलित केला जातो.
2. दीर्घ मुदतीच्या भांडवलाचा पुरवठा:
रोखेबाजारामुळे कॉर्पोरेट कंपन्याना दीर्घकालीन व कायम स्वरुपाचे भांडवल उभारणे शक्य होते. कंपन्याना कायम स्वरुपाच्या भांडवलाची गरज असते. परंतु गुंतवणूकदार आपली बचत दीर्घकाळासाठी अडकून ठेवण्यास तयार नसतात. या संघर्षातून भांडवलबाजार मार्ग काढतो. रोखे बाजारामुळे गुंतवणूकदाराना रोखे विकण्याची किंवा खरेदी करण्याची संधी मिळते तर दुसरीकडे कंपन्यांच्या कायम स्वरुपाच्या भांडवलावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे देशात भांडवलनिर्मिती होवून भांडवलाचा साठा वाढतो नवीन कंपन्यांना भांडवल उभारण्यास हा बाजार मदत करतो.
3. औद्योगिक विकास
रोखे बाजारामुळे औद्योगिक क्षेत्राकडे वित्तीय साधनसामग्री वळविली जाते. रोखे बाजारामुळे लोकाना सोने-चांदी, जमीन जुमला अशा अनुत्पादन मालमत्तांच्या ऐवजी उत्पादक गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन
4. निधीचा योग्य उपयोग व वितरण :
कार्यक्षम भांडवलबाजार सर्वात कार्यक्षम उद्योगांकडे निधीचा ओघ वळवितो. रोख्यांचे बाजारमूल्य व त्यावरील परतावा हे लोकांना कोणत्या उद्योगात पैसा गुंतवावा यासाठी मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे बचतीचा परिणामकारक व कार्यक्षम वापर होणे शक्य होते.
5.नेहमीच तत्पर (Ready) व सातत्याने काम करणारा बाजारः
गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणूक साधने सतत उपलब्ध करुन देण्याचे काम हा बाजार करतो. रोखे खरेदी करणारे व रोखे विक्री करणारे यांचा सतत वावर या बाजारात असतो. रोख्यांमधील गुंतवणूक ही अधिक रोख व तरल असते. भांडवल बाजार हा प्रामुख्याने रोखे बाजाराशी निगडीत असल्याने व रोख्यांची खरेदी-विक्री सहजपणे व सातत्याने या बाजारात चालू असल्याने हा बाजार सातत्याने काम करणारा व तत्पर असलेला दिसतो.
6. सरकारला कर्ज उभारण्यास मदतः
सरकारच्या कार्यामध्ये सतत वाढ होत असून त्यामुळे सार्वजनिक खर्चासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागते. भांडवल बाजारात कर्जरोखे विकून सरकार अशी कर्जे उभारते. यामुळे शासनाला दीर्घकालीन प्रकल्प व योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध होतो.
7 . गुंतवणूकदाराना पसंतीप्रमाणे गुंतवणूकीची संधीः
भांडवलबाजार गुंतवणूकीचे अनेक पर्याय लोकाना उपलब्ध करुन देते. मध्यम व दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्यासाठी विविधता असणारी गुंतवणूक साधने उदा. रोखे, कंपन्यांचे समभाग बोंडस, म्युच्युअल फडाचे युनिट्स, बीमा पॉलीसी इत्यादी उपलब्ध होतात. त्यामुळे गुंतवणूकदार आपल्या पसंतीनुसार गुंतवणूक करू शकतात.
भांडवल बाजाराची कार्ये – भारतीय भांडवल बाजाराची कार्य
- भांडवल बाजारामुळे लोकांच्या बचतीतून उद्योग व्यवसायाला दीर्घमुदतीचे भांडवल उपलब्ध होते.
- सम भागाच्या (Equity Capital) रुपाने धोका पत्करणार भांडवल व्यवसायाला उपलब्ध होत
- भांडवल बाजारामुळे अनेक छोटे मोठे गुंतवणूकदार मोठया व्यवसायातील भागीदार बनू शकतात.
- दुय्यम बाजारामुळे गुंतवणूक आवश्यकतेनुसार काढून घेण्याची सोय उपलब्ध होते. म्हणजेच गुंतवणूकीला रोखता प्राप्त होते.
- गुंतवणूकदारामध्ये स्पर्धा निर्माण झाल्यामुळे व्यवसायाला कमिन कमी खर्चात भांडवल उपलब्ध होते. तसेच गुंतविलेल्या रकमेला नंतर चांगली किंमत मिळू शकते. ६) गुंतवणूकदारांच्या ज्ञानात भर पडते व ते आपली बचत योग्य ठिकाणी गुंतवू शकतात.
- भांडवल बाजारामुळे गुंतवणूकीतील धोका कमी होतो. वायदे व्यापाराद्वारे किंमतीतील चढ उतारामुळे होणारा संभाव्य तोटा कमी करता येतो. शेअर बाजारातील गुतवणूकदाराना संरक्षण फंडाचाही (Investor Protector Fund) आवश्यकतेच्या वेळी वापर करता मेलो.
- बाजाराच्या गुणवत्तेत भर पडते व प्रत्येक व्यवहारामागील खर्च कमी करता येतो. व्यवहाराला (Transaction) लागणारी वेळ कमी करणे शक्य होते. आजकाल संगणकाची कळ दाबून क्षणभरात शेअर खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार पूर्ण करता येतो.
भारतीय भांडवल बाजार किती भागात विभागला गेला आहे
भारतीय भांडवल बाजार दोन भागात विभागला गेला आहे – प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार (Primary and Secondary Markets)
भारतीय भांडवल बाजारातील सहभागी
भारतातील भांडवल बाजाराच्या प्रगतीत पुढील संस्थाच योगदान महत्त्वपूर्ण आहे. जसे आय्. डी. बी. आय. आय. सी आय सी आयु औद्यागिक वित्त पुरवठा महामंडळ (IFCI) राज्य वित्त पुरवठा महामंडळे, वगैरे. या अशा संस्थामुळे उद्योग धंद्याला मोठया प्रमाणावर दीर्घ मुदतीचा भांडवल पुरवठा होऊ शकला.
१९९२ पर्यंत भांडवल नियंत्रक हा (Controller of Capital Issues) कंपनीने किती रकमेचे भाग विक्रीस काढावे. भागांची किंमत काय असावी म्हणजे प्रीमियम किती घ्यावा व कंपन्यानी किती लाभांश वाटावा इत्यादी गोष्टी ठरवीत असे.
सेबी (Security Exchange Board of India) भाग विक्री महामंडळ (Securities Exchange Trading Corporation) इत्यादी संस्था नंतरच्या काळात अस्तित्वात आल्या व त्यांच्यामुळे भागांच्या खरेदी व विक्री व्यवहारात पारदर्शिकता आली. बाजारातील मागणी व पुरवठ्यापाटी या व्यवहारावर परिणाम झाला. १९९१ साली शेअस बाजारात मोठा घोटाळा उघडकीस आला.
तरीही सेबी वगैरे संस्थाच्या स्थापनेमुळे शेअस बाजारातील व्यवहारावर कडक नियंत्रण आले. भाग भांडवलात पैसे गुंतविल्यामुळे मोठया प्रमाणावर होणारा नफा सामान्य जनतेच्या लक्षात आल्यामुळे लोक आपली बचत शेअर बाजारात गुंतवायला लागले. बँकेतील मुदत ठेवीचे आकर्षण कमी झाले.
भांडवल बाजाराचे नियंत्रण –
भारतीय भांडवली बाजारांचे नियमन आणि देखरेख वित्त मंत्रालय, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे केली जाते.
१९८८ साली सेबीची स्थापना करण्यात आली. १९९२ साली सेबीला कायदेशीर अधिकार प्राप्त करुन देण्यात आले. सेबीच उद्दिष्ट म्हणजे भांडवल बाजाराचा विकास योग्य पध्दतीने होईल हे पाहणे तसेच गुंतवणूकदारांच्या हक्काचे संरक्षण करणे. सेबी भांडवल गोळा करण्याऱ्या मर्चंट बँकर्स, म्युच्युअल फंडस्, गुंतवणूकीचे सल्ला देणारे, भाग विक्रीची व्यवस्थाकरणारे, भागविणेकरी व धोकादायक व्यवसायांना भांडवल उपलब्ध करून देणारे (Venture Capital Funds) इत्यादी लोकांच्या कामावर देखरेख करते. १९४७ चा भांडवल नियंत्रण कायदा रद्द करण्यात आल्यामुळे नवीन भाग विक्रीवर देखरेख करण्याची जबाबदारी सेबीवर सोपविण्यात आली
भांडवल बाजाराचे घटक – भांडवल बाजाराची रचना
बाजार दीर्घकाल गुंतवणूकीसाठी उपलब्ध बाजार भांडवल बाजारात कंपन्या सरकारला भांडवल किंवा कर्ज उपलब्ध करून दिले जाते व गुंतवणूकदारा त्याची बचत दीर्घकालासाठी गुंतविण्याची संधी प्राप्त होते. भांडवल बाजारात दोन विभाग आहेत – प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार (Primary and Secondary Markets) प्राथमिक बाजारात दीर्घकालीन गुंतवणूकीची संधी प्राप्त होते. ही गुंतवणूक सरकारी रोख्यात कंपन्यांच्या भागात, बँका मधून किंवा बँकेतर वित्तीय संस्थामधून केली जाते (NBFC- Non Banking
- रोखे बाजार
- वित्तीय संस्था
भांडवल बाजारामध्ये वित्तीय संस्था म्हणजे काय –
वित्तीय संस्थांमध्ये
- (IFCI) भारतीय औद्योगिक वित्त मंडळ,
- ICICI भारतीय औद्योगिक पत,
- व गुंतवणूक महामंडळ)
- IDBI, भारतीय औद्योगिक विकास बँक,
- UTI (युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया),
- LIC व GIC
सारख्या वीमा कंपन्या इत्यादी संस्था प्रमुख असून या संस्था दीर्घकालीन व मध्यम कालीन कर्जाच्या सवलती पुरवतात. रोखे बाजारात रोख्यांची मुक्तपणे खरेदी विक्री होते. रोखे बाजाराचे वर्गीकरण अ) सरकारी रोख्यांचा बाजार व ब) औद्योगिक (निगम) रोखे बाजार असे करता येते.
सरकारी रोखे बाजार
या बाजारात सरकारी रोख्यांचा किंवा सरकारने हमी घेतलेल्या रोख्याचा व्यापार चालतो. सरकारी रोख्यांमध्ये जोखीम नसल्याने या रोख्यांना उत्तम दर्जाचे (Gilt edged market) किंवा सुवर्णरोखे म्हणून ओळखले जाते. राजकोष हुंड्या (ट्रेझरी बील्स), मध्यम व दीर्घ मुदतीचे सरकारी रोखे, निम- शासकीय रोख्यांची खरेदी विक्री या बाजारात चालते.
सरकारी रोखे बाजाराचेही दोन भाग आहेत. प्राथमिक किंवा नवीन, रोख्यांचा बाजार आणि दुय्यम बाजार, नवीन रोख्यांच्या बाजारात सरकारचे नवीन रोखे रिझव्ह बँकेतर्फे विक्रीला आणले जातात तर दुय्यम बाजारात जुन्या सरकारी रोख्याचे व्यवहार चालतात.
1.प्राथमिक बाजार
या बाजारांत नवीन शेअर्स किंवा कर्जरोखे गुंतवणूकदाराना विकले जातात. सार्वजनिक मर्यादित
कंपन्या एखादी नवीन कंपनी काढण्यासाठी किंवा व्यवसायाच्या विस्तारासाठी नवीन शेअर्स व कर्जरोखे यांच्या विक्रीतून भांडवल उभारतात. प्राथमिक भांडवल बाजारात नवीन कंपन्याा प्रथमच भाग भांडवल उभारतात. प्राथमिक भांडवल बाजारात गुंतवणूकदारांचा निधी रोखे विकणाऱ्या कंपनीला मिळतो. त्यामुळे औद्योगिक विकास व भांडवल निर्मितीच्या दृष्टीने हा बाजार अत्यंत महत्त्वाचा आहे.
2 .दुय्यम बाजार (स्टॉक मार्केट):
या बाजारात जुन्या रोख्यांची खरेदी विक्री होते. आधीच खरेदी विक्री झालेली आहे व ज्यांची नोंदणी रोखे बाजारात झालेली आहे. अशा रोख्यांची पुनर्खरेदी विक्री या बाजारात होतो. या रोख्यांच्या विक्रीतून मिळणारा निधी हा कंपनीला मिळत नाही, तर गुंतवणूकदाराला मिळतो त्यामुळे गुंतवणूकदाराला रोखता उपलब्ध होते.
भांडवल बाजारात खरेदी विक्री घडवून आणण्यासाठी मदत करणारे वित्तीय मध्यस्थ हा ही भांडवलबाजाराचा महत्त्वाचा घटक आहे. व्यापारी बैंक लिजींग वीत्त कंपन्या, दलाल सहयोग निधी, हमीदार, लीड मॅनेजर्स, प्रकल्प सेवा बैंका इत्यादी घटक रोख्यांच्या खरेदी विक्रीसाठी मदत करतात.
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
व्यापारी बँक म्हणजे काय आहे ? व्यापारी बँकेचे प्रकार , महत्त्व , व्यापारी बँकेची सूची
विदेशी बँक म्हणजे काय ? विदेशी बँकेची भूमिका , विदेशी बँकेची नावे
सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
भारतीय रिझर्व बँक म्हणजे काय ? भूमिका ,मुख्य कार्य , स्थापना, राष्ट्रीयीकरण
वित्तीय प्रणाली म्हणजे काय आहे ? अर्थ , महत्त्व, कार्य, भारतीय वित्तीय प्रणाली
भांडवल बाजाराचा नियंत्रक कोण आहे?
सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया
भांडवल बाजाराचा उद्देश काय आहे?
सरकार, बँका आणि कॉर्पोरेशनसाठी दीर्घकालीन निधी उभारणे ही भांडवली बाजाराची प्राथमिक भूमिका आहे आणि सिक्युरिटीजच्या व्यापारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे
भारतीय भांडवल बाजार किती भागात विभागल्या गेला आहे?
भारतीय भांडवल बाजार दोन भागात विभागला गेला आहे