व्यवस्थापन म्हणजे काय ? मॅनेजमेंट म्हणजे काय , व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये , व्यवस्थापनाची कार्य स्वाध्याय , महत्त्व आणि फायदे – Management information in Marathi , – सर्व प्रकारच्या जसे की खाजगी, सहकारी आणि सार्वजनिक क्षेत्रमध्ये तसेच लहान, मध्यम आणि मोठया आकारमानाच्या व्यवसायामध्ये व्यवस्थापकाची आवश्यकता असते. व्यवसायातील असंख्य लोकांना मार्गदर्शन करून आणि सतत प्रेरणा देऊन त्यांच्याकडून काम करून घेणारी व्यक्ति म्हणजे व्यवस्थापक होय.
या शिवाय व्यवसायाला योग्य दिशा दाखवून व्यवसायाचा विकास करणे आणि व्यवसायाची पूर्वनियोजीत उदिष्टांची पूर्तता करण्यासाठी सतत धडपड करणारी व्यक्ति म्हणजेच व्यवस्थापक होय. व्यवस्थापकाच्या विविध कार्यामध्ये व्यवस्थापन पूर्णत्वास येते. व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापकाची भूमिका महत्त्वाची असते.
व्यवस्थापन म्हणजे काय ? – Management information in Marathi
व्यवस्थापना शब्द भाषेतून आलेला आहे. त्याला इंग्रजीमध्ये Management असे म्हणतात. Man याचा अर्थ अनेक माणसे किंवा व्यक्तिसमूह होय. Manage याचा अर्थ व्यवस्था करणे व अशा प्रकारची व्यवस्था अगर व्यक्तिसमूहाकडून काम करून घेणाऱ्या व्यक्तिला Man- ager किंवा व्यवस्थापक असे म्हणतात. या सर्वांना मिळून Management किंवा व्यवस्थापन असे म्हणतात. आधुनिक व्यवसायामध्ये व्यवस्थापकांना विशेष महत्वाचे स्थान आहे. व्यवस्थापकाच्या नेतृत्त्वाखाली व्यवसायाची सर्व कार्ये पार पाडली जातात.
व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्याख्या – मॅनेजमेंट म्हणजे काय ?
व्यवस्थानाला जे काही करावे लागते त्याला व्यवस्थापन असे म्हणतात. (Management is what management does) व्यवस्थापनामध्ये नियोजन (Planning), पर्यवेक्षण (Supervision) आणि नियंत्रण (Control) या तीन महत्त्वाच्या संकल्पनांचा अंतर्भाव आढळून येतो.
आधुनिक व्यवस्थापनाचे जनक कोण आहेत
पीटर ड्रकर (1909-2005) हे व्यवस्थापनावरील सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावशाली विचारवंतांपैकी एक होते, ज्यांचे कार्य जगभरातील व्यवस्थापकांद्वारे वापरले जात आहे.
व्यवस्थापनाचे प्रकार –
व्यवस्थापनामध्ये नियोजन, संघटन, कर्मचारी, नेतृत्व किंवा दिग्दर्शन आणि संस्था किंवा उपक्रम नियंत्रित करणे समाविष्ट आहे.
व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये – व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा
वरील व्याख्यांच्या अनुषंगाने आपणास व्यवस्थापनाची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील.
1 व्यवस्थापन ही कला आहे
व्यवस्थापक है अनेक व्यक्तिकडून काम करून घेतात. त्यासाठी आपल्याजवळील कौशल्याचा वापर करतात म्हणूनच व्यवस्थापक यशस्वी होतात. व्यवस्थापकांच्या अंगी निर्णयक्ती असते. त्याद्वारे ते व्यवसायातील कामे करून घेतात. निर्धनशक्तीद्वारे ते व्यवसायातील अवघड आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवितात व्यवस्थापकांच्या निर्णयामध्ये ताकद असते. तसेच जादू असते..
2 व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे
व्यवस्थापन ज्ञानाधिष्ठीत आहे. व्यवस्थापनामध्ये सिद्धांताची मांडणी केलेली असते. शास्त्रीय कसोटांच्या आधारावर विश्लेषण करून ज्ञान संपादन केलेले असते. ज्ञानामध्ये तर्क संगत आणि सातत्य असते. अचूकतेकडे जाणे सोईचे जाते. शास्त्रीय कसोट्यांवर लोकांचा विश्वास बसतो.
3 .व्यवस्थापनासाठी सर्वांगीण ज्ञानाची आवश्यकता असते
त्यासाठी शैक्षणिक व्यवसायिक पात्रता असावी लागते किंवा विशिष्ट कौशल्य धारण करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते. इतर उत्पादन करणाऱ्या व्यवसायापेक्षा व्यवस्थापनाचे स्वरूप भिन्न आहे. उदा. शिक्षक, डॉक्टर, वकील इंजिनिअर, हिशेब तपासणीस इ. चा समावेश पेशामध्ये केला जातो. व्यवस्थापन अशाच प्रकारचे आहे. डॉक्टर किंवा वकीलांसारखा व्यवस्थापकांना फार मान सन्मान आणि किंमत असते.
4. व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून काम करून घेणे:
व्यवसायामध्ये अनेक लोक काम करत असतात. व्यवसायातील अधिकारी आणि असंख्य कर्मचारी इ. कडून व्यवस्थापकांना कामे करून घ्यायची असतात. व्यवसायातील विविध अधिकारी आणि कर्मचारी इ. च्या सहाय्याने व्यवस्थापक व्यवसायातील विविध कार्ये पार पाडतात व्यवसायातील विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समजावून घेणे, सल्ला देणे, कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण केली जाते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदराची वागणूक देण्यास ते अधिक जोमाने काम करतात.
5. व्यवस्थापनाची व्याप्ती अधिक आहे
व्यवस्थापनाची व्याप्ती आहे विविध प्रकारच्या व्यवस्थापनाचा अवलंब केला जातो. उदा. शैक्षणिक, क्रीडा, कारखानदारी, संरक्षण, आरोग्य, राजकारण, सहकार, धर्मदाय संस्था, वाहतूक वळण, करमणूक, विमा, बँकिंग, जाहिरात संशोधन इ. आधुनिक बाजारपेठे विविध क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाचा समावेश करण्यात आला आहे.
6. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे
व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापन करावयाच्या विविध कार्याचा समावेश केला जातो. नियोजन, संघटन, समन्वय, नियंत्रण, कर्मचारी विकास, अभिप्रेरणा इ. महत्त्वाच्या कार्याचा त्यामध्ये समावेश केला जातो. त्यामुळे व्यवसायातील मालक व्यवस्थापक आणि कामगार यांना एकत्र करून व्यवसायातील व्यवस्थापनविषयक कार्य सुरक्षितपणे पार पाडली जातात. जसे की साधनसामग्रीचे संकलन करणे, तिचा पुरेपूर वापर करणे.
7. व्यवस्थापन हे एक सामुहिक कार्य आहे
व्यवसाय संघटना ही समूहाद्वारे निर्माण झालेली असते. सामुहिक प्रयत्नाने आणि सहकार्याने व्यवसायाची उदिष्टे पूर्ण केली जातात. प्रत्येक व्यक्तिचे कार्य स्वतंत्र परंतु भिन्न असले तरी ती एक सामूहिक गजल जाते. सामुहिक प्रयत्नाशिवाय संघटनेला यह प्राप्त होत नाही व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न फार अपुरे पडतात.
8. व्यवस्थापन चांगल्या कामाचे फळ आहे
व्यवस्थापनाचा दृष्टिकोन नेहमी चांगला असतो. व्यवस्थापक हे सातत्याने व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ध्येय व धोरणे ठरवित असतात. व्यवसायाची कार्यक्षमता वाढवून अधिक नफा मिळवला जातो. त्याद्वारे विविध घटकांना योग्य मोबदला दिला जातो. व्यवसायाचा विकास साधला जातो. कामगारांना चांगल्या सुविधा पुरविल्या जातात. दर्जेदार मालाचे उत्पादन करून ग्राहकांचे अधिकाधिक धान केले जाते. हे व्यवस्थापनाच्या चांगल्या कामगिरीचे फलित आहे.
9. व्यवस्थापन हे अदृश्य स्वरूपाचे असते
स्थापन काय करते ते आपण दृश्य स्वरूपात पाहू शकत नाही परंतु व्यवस्थापन काय करते है मात्र आपण त्याच्या परिणामावरून समजू शकतो. व्यवस्थापनाच्या चांगल्या कामाची पावती हेच व्यवस्थापनाचा चांगला परिणाम असतो.
व्यवस्थापनाची कार्य – व्यवस्थापनाची कार्य स्वाध्याय
नियोजन (Planning) :- व्यवस्थापन भविष्यातील गरजांचा अंदाज घेते जेणेकरुन निर्धारित उद्दिष्टे लक्षात घेऊन केलेले सध्याचे प्रयत्न त्यांच्या अनुरुप करता येतील. नियोजन म्हणजे काय करावे, का करावे, कुठे करावे, केव्हा करावे, कसे करावे आणि कोणाकडून करायचे, या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या. यासोबतच प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याचे मार्गही नियोजनाअंतर्गत विचारात घेतले जातात.
संघटन :- नियोजन करून उद्दिष्टे आणि उद्दिष्टे ठरवल्यानंतर त्यांची अंमलबजावणी करण्याची समस्या येते, जी संस्थेमार्फत व्यवस्थापनाकडून केली जाते. संस्था ही निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एक यंत्रणा आहे. एंटरप्राइझच्या योजना कितीही चांगल्या आणि आकर्षक असल्या तरीही, चांगल्या संघटनेचा अभाव असल्यास, यशाची इच्छा व्यर्थ ठरेल. अशा प्रकारे, एक कार्यक्षम आणि प्रभावी संघटना तयार करणे खूप महत्वाचे आहे.
स्टाफिंग :- व्यवस्थापनाचे प्राथमिक कार्य म्हणजे कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे, म्हणजे – संस्थेच्या योजनेनुसार आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे.
दिग्दर्शन(Directing) :- व्यवस्थापन ही मुळात लोकांना गोष्टी करायला लावण्याची कला आहे. व्यवस्थापनाचे चौथे महत्त्वाचे कार्य म्हणजे एंटरप्राइझला दिशा किंवा दिशा देणे. दिग्दर्शन म्हणजे – संस्थेतील विविध नियुक्त व्यक्तींना काय करावे, ते कसे करावे, केव्हा करावे हे सांगणे आणि त्या व्यक्ती त्याच पद्धतीने त्यांचे काम करत आहेत की नाही हे पाहणे. दिग्दर्शन हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य आहे जे संघटित प्रयत्नांना सुरुवात करते.
मार्गदर्शनाखाली खालील चार उपक्रम समाविष्ट केले आहेत.
- पर्यवेक्षण
- संवाद
- नेतृत्व
- प्रेरणा
नियंत्रण :- नियंत्रण म्हणजे केवळ केलेल्या कामाची तपासणी करणे असा होत नाही, तर अशा उपाययोजना करणे जेणेकरुन एंटरप्राइझचा व्यवसाय निश्चित योजनांनुसार चालवला जाऊ शकेल आणि निश्चित उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आणि त्यात काही फरक असल्यास सुधारात्मक पावले उचलता येतील. घेतले. नियंत्रण हा व्यवस्थापनाचा एक भाग आहे.
व्यवस्थापनाचा हेतू, महत्त्व आणि फायदे
1. व्यवसाय संघटनेच्या नावलौकिकामध्ये वाढ होते
ज्या व्यवसायामध्ये चांगल्या व्यवस्थापनाचा अवलंब केला जातो. अशा व्यवसायातील एकूण कामकाजामध्ये सुधारणा होते जसे की, दर्जेदार मालाची निर्मिती करणे, कामगारांना विविध सुविधांचा लाभ देणे, शासनाकडे करांचा भरणा वेळेवर करणे, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे इ. मुळे व्यवसायाचे नावलौकिक सुधारते, तसेच व्यवसायाची समाजातील प्रतिमा विकसित होते.
भागधारकांना योग्य दराने लाभांशाचे वितरण, ग्राहकांना वाजवी दराने वस्तू आणि सेवांचा पुरवठा अशा बाबी व्यवस्थापनाचा सामाजिक दृष्टिकोन चांगला असण्याचे द्योतक आहे.
2. कर्मचान्यांमध्ये एकसंघ भावना निर्माण होते:
कर्मचान्यामध्ये एकजूट निर्माण करणे हे व्यवस्थानावर अवलंबून आहे. अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये एकसंघ भावना वाढीस लागण्यास अधिकाऱ्यांना कर्मचान्यांकडून काम करून घेणे सोईचे जाते त्यांच्यामध्ये आपुलकी, समन्वय आणि सहकार्य वृत्ती वाढीस लागते. प्रत्येक कामामध्ये व्यक्तिचा हातभार असणे गरजेचे आहे.
3. कर्मचान्यांना प्रेरणा देता येते
कर्मचाऱ्यांना कामामध्ये प्रोत्साहन देणे हे व्यवस्थापनाचे काम आहे. चांगल्या कामाबाबत शाबासकी आणि सदोष कामाध्ये मार्गदर्शन अशा प्रकारची व्यवस्थापकांची भूमिका असावी लागते. कर्मचान्यांना प्रेरणा दिल्यामुळे त्यांचा उत्साह व कार्यक्षमता वाढते.
कामे वेळेवर पूर्ण करता येतात, कामामध्ये सुधारणा होते. व्यवसायाच्या नफ्यात वाढ होते, त्यामुळे व्यवसायाचा विकास करणे शक्य आहे.
4. कर्मचान्यांची कार्यक्षमता वाढते
व्यवस्थापक कामाच्या ठिकाणी चांगल्या वातावरणाची निर्मिती करतात. कर्मचाऱ्यांना आवश्यक या सुविधा उपलब्ध करून देतात. कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि आर्थिकेत्तर प्रेरणा देतात. कामाचा दर्जा आणि कार्यक्षमतेतील वाढ यावर आधारित शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये वेतन देण्याची पद्धत आहे. आर्थिक लाभ अधिक मिळावा या हेतूने कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने काम करतात. त्यामुळे व्यवसायाची कार्यक्षमता वाढते.
5. साधनसामग्रीचा पुरेपूर वापर केला जातो
व्यवसायाला लागणारी सामग्री व्यवस्थापक प्रमाणानुसार खरेदी करतात. कर्मचाऱ्यांना सामग्री हाताळणी आणि वापर याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. सामग्रीचा अपव्यय होणार नाही, याची दखल घेतली जाते. व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना आदेश, सूचना, मार्गदर्शन करून साधन सामग्रीचा पुरेपूर वापर करण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवतात. नियोजनाद्वारे व्यवस्थापनाला हे सर्व शक्य आहे.
6. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करता येतो
व्यवस्थापनाचा दृष्टिकोन विकसित असल्यामुळे उत्पादनाचा दर्जा विकसित करणे, पर्यावरणामध्ये उपयुक्त बदल करणे. नवीन उत्पादनाचा शोध घेणे, नवीन उत्पादन पद्धतीचा अवलंब करणे याबाबत संशोधन करून बाजारामध्ये नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यास त्याचा व्यवसायामध्ये अवलंब करणे याबाबत व्यवस्थापक सातत्याने विचार करत असतात त्यामुळे उत्पादनाचा दर्जा | विकसित करणे, उत्पादन खर्चामध्ये बचत करणे याबाबी व्यवसायाच्या दृष्टिने सोईच्या जातात. उदा. संगणकीकरण, स्वयंचलीकरणाचा अवलंब करणे इ.
7. स्पर्धेमध्ये टिकून राहता येते
सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्यामुळे व्यावसायिकाला स्पर्धेचा विचार करावा लागतो. स्पर्धकांच्या उत्पादनाचाडचांचा विचार करून आपल्याला स्पर्धेमध्ये प्रवेश करण्यासाठी व प्रचंड स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी काय केले पाहिजे हे व्यवस्थापक तरवित असतात. त्यासाठी त्यांना ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार करून त्यानुसार उत्पादन करावे लागते, बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचे धोरण व्यवस्थापकांचे असते.
8. व्यवसायाचा विकास करता येतो
व्यवस्थापक है व्यवसायाची वाढ व वृद्धी व्हावी या हेतूने धोरणे ठरविणे व त्यांची अंमलबजावणी करणे हे काम करता असतात. त्यांच्या डोळ्यासमोर सतत नवीन योजना व भविष्यकाळामध्ये व्यवसायाचा अपेक्षित विकास कसा होईल असा डोळस दृष्टिकोन असतो व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणीवर ते अभ्यास करतात, व्यवसाय विकासासाठी नवीन आव्हाने स्वीकारण्याची त्यांची तयारी असते.
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
व्यापारी बँक म्हणजे काय आहे ? व्यापारी बँकेचे प्रकार , महत्त्व , व्यापारी बँकेची सूची
- शेड्युल बँक म्हणजे काय ? शेड्यूल बँकेचे कार्य
क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? क्रेडिट कार्ड कसे काढावे ,क्रेडिट कार्ड चे प्रकार
ई – बँकिंग म्हणजे काय ? – ई-बँकिंग चे प्रकार , इंटरनेट बँकिंग चे फायदे
विदेशी बँक म्हणजे काय ? विदेशी बँकेची भूमिका , विदेशी बँकेची नावे
सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
भारतीय रिझर्व बँक म्हणजे काय ? भूमिका ,मुख्य कार्य , स्थापना, राष्ट्रीयीकरण
व्यवस्थापन शास्त्राचे जनक कोण?
प्रसिद्ध फ्रेंच व्यवस्थापनतज्ज्ञ आंरी फेयॉल (१८४१–१९२५) हे या प्रणालीचे जनक असून
व्यवस्थापन म्हणजे काय व्याख्या?
व्यवस्थापन म्हणजे – उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे वापर करून लोकांच्या कृतींचे समन्वय साधणे जेणेकरून उद्दिष्टे साध्य करता येतील.
आधुनिक व्यवस्थापनाचे जनक कोण आहे?
पीटर ड्रकर