बोंड म्हणजे काय ? बाँडस ची वैशिष्ट्ये, बाँडस चे प्रकार – Bond information in Marathi , बंधपत्र (Bond) बाजाराची संकल्पना , बाँडस आणि भाग, दोन्हीचांही रोख्यांमध्ये समावेश होतो. परंतु यात महत्वाचा फरक म्हणजे भागधारक है कंपनीचे समभाग पाठिराखे / मालक असतात. दूसरा महत्वाचा फरक म्हणजे बाँडसची निश्चिती मुदत असते व त्यांनतर त्याचे विमोचन होते. परंतु भागामध्ये गुंतवलेली रक्कम कंपनीचे अस्तित्व असेपर्यंत कंपनीजवळ राहते. परत केली जात नाही.
बोंड म्हणजे काय ? – Bond information in Marathi
बाँड म्हणजे खरेदीदाराने बाँडस विक्रेत्याला दिलेले कर्ज होय. सरकार, वित्तसंस्था किंवा कंपन्या कुणीही बाँड निर्गमित करू शकते. बाँडधारकाला ठरलेल्या दराने व्याज तर मिळतेच त्याचबरोबर मुदत पूर्तीदिनी बाँडसचे मुद्दल / सममूल्य मिळण्याचा अधिकार त्याला असतो. बाँड हा एक करार असून त्यात बॉड प्रसृत करणारे नियमित कालखंडाने व्याज देण्याचे व मुदतपूर्तीदिनी मुद्दल / सममूल्य परत करण्याचे वचन देतात.
बाँडसना एक दर्शनीमूल्य असते तसेच एक निश्चित व्याजदर (कूपन ) व निश्चित कालावधी असतो. विशिष्ट कालावधीनंतर उदा. दरमहा, दरतीन महिन्यांनी, सहामाही असे व्याज दिले जाते. एकंदरीत बाँडस विकत घेणारे हे भांडवलदार / सावकार असतात तर बाँडस प्रसृत करणारे हे कर्जाऊ रक्कम देणारे असतात.
बाँडस हा कंपन्यांना दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी वित्तपुरवठा करणारा महत्वाचा बाह्यस्त्रोत आहे तर सरकारसाठी चालू खर्चासाठी वित्तपुरवठा करणारा महत्वाचा स्त्रोत आहे.
सरकारी बाँडस हे सर्वसाधारणपणे लीलाव पद्धतीने विकले जातात. सामन्य गुंतवणूकदार लोक • आणि बँका या बाँडससाठी बोली लावू शकतात. यात कधी व्याजाचा दर निश्चित केलेला नसतो तर कधी दर्शनीमूल्य जाहिर केलेले नसते. गुंतवणूकदार त्या बॉडसचा अभ्यास करून बोली बोलतात व जास्त व्याजदराच्या किंवा अधिक दर्शनी किंमतीच्या बोली स्विकरून बाँडस वितरीत केले जातात. प्रत्यक्ष परताव्याचा शेकडा दर हा बाँडस किंमती व कूपन दर (दर्शनी किंमतीवर दिला जाणारा व्याजदर या दोन्हीवरही अवलंबून असतो.)
बाँडस ची वैशिष्ट्ये – Bond features in Marathi
(१) दर्शनी मूल्य:
बाँडसना एक दर्शनी मूल्य असते. ज्यावर बाँडस इश्यूअर निश्चित दराने व्याज देतात व या दर्शनी रक्कमेची मुदतपूर्तीच्या वेळी परतफेड केली जाते. काही विशिष्ट प्रकारच्या बाँडसना विमोचन (Redumption) रक्कम असते व ती दर्शनी मूल्यापेक्षा वेगळी असते. आणि हे विमोचन मूल्य विशिष्ट मालमत्तेच्या कामगिरीशी संलग्न असू शकते.
उदा. शेअरबाजार किंवा कमॉडिटी (वस्तू) बाजार निर्देशांक, परकीय विनिमय दर इत्यादी त्यामुळे गुंतवणूकदारांना मूळच्या गुंतवणूकीपेक्षा मुदतपूर्तीच्या वेळी कमी किंवा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता असते.
२) विक्री किंमत (Issue Price):
बाँडस प्रथम प्रसृत केले जाताना गुंतवणूकदार ज्या किंमतीला ते खरेदी करतो, त्यास इश्यू किंमत म्हणतात. सामान्यपणे ही विक्रीकिंमत ही दर्शनी किंमत एवढी असते.
३) मुदत पूर्तीची तारिख :
ज्या तारखेला बाँडस प्रसृत करणाऱ्यांनी बाँडधारकांना दर्शनी रक्कमेची / मुद्दलाची परतफेड करावयाची असते. ती तारीख निश्चित असते. जर सर्व देणी देऊन झाली असतील तर मुदतपूर्तीच्या तारखेनंतर बाँडसविक्रीदांरावर (Issues), बाँडस धारकांचा बाबतीत कोणतेही उत्तरदायित्व रहात नाही.
मुदतपूर्तीचा कालखंड किंवा बाँडसची मुदत ही अल्प किंवा दीर्घ कितीही असू शकते. परंतु सर्वसाधारणपणे १ वर्षपिक्षा कमी मुदतीची साधने ही नाणेबाजारतील साधने म्हणून ओळखली जातात, त्यांना बौंडस समजले जात नाही. बऱ्याच बाँडसची मुदत ३० वर्षे एवढी दीर्घ सुद्धा असते. काही बाँडस हे १०० वर्षाच्या मुदतीसाठी सुद्धा प्रसृत केले गेले आहेत, तर काहींना अजिबाज मुदतपूर्ती नसते.
चिरंतन असेही बॉडस असू शकतात. २००५च्या सुरवातीला युरोपमधील बाँडसचा बाजार विकसीत होत होता, तेव्हा त्या बाँडसची मुदत ५० वर्षे होती. अमेरिकेच्या राजकोष रोख्यांच्या बाजारात तीन प्रकारचे मुदतपूर्तीचा कालखंड असलेले बाँडस आढळतात.
- अल्पकालीन हुंड्या (Bills) – एक वर्षांच्या आत मुदतपूर्ती
- मध्यम मुदत (चिठ्या Notes) एक ते दहा वर्षाच्या मुदतीचे
- दीर्घकाळ (बाँडस) – १० वर्षापेक्षा जास्त मुदतीचे
कूपन:
कूपन दर हा बाँडधारकांना दर्शनीमूल्यावर दिला जाणारा व्याजदर असतो. बाँडच्या पूर्ण मुदतीसाठी साधारणतः हा दर निश्चित व स्थीर असतो. काही वेळा हा दर नाणे बाजार निर्देशांकाप्रमाणे बदलतो उदा.- ( LIBOR) (London Inter Bank Offer Rate) लंडनमधील बँकानी आपापसातील कर्जासाठी निश्चित केलेला व्याजदर किंवा काहीवेळा / अन्य परकीय देशातील नाणेबाजाराशी संलग्न असू शकतो.
पूर्वी नैतिक स्वरूपातील बाँडस निर्गमित करताना, निश्चित कालवधीनंतरच्या व्याजाच्या रक्कमेचे कूपन्स बाँडसोबतच जोडलेले असत. त्यामुळे कूपन हा शब्द प्रचलीत झाला. कूपनवर लिहिलेल्या तारखेला बाँडधारकांनी बँकेला कूपन दिल्यावर त्यांना व्याजाची रक्कम मिळत असे.
बाँडस चे प्रकार – Bond type in Marathi
खालील बाँडसचे वर्णन हे परस्पर वगळणारे नाही, तर एकापेक्षा अधिक बाँडसना काही वेळा लागू पडते.
१) स्थीर व्याजदर बाँडस:
बाँडसच्या संपूर्ण मुदतीसाठी कूपनदर निश्चित व स्थीर असतात आणि विशिष्ट कालावधीनंतर नियमितपणे मिळणाऱ्या व्याजाचे कूपन त्यांना जोडलेले असते.
२) तरते व्याजदर बाँडस:
व्याजदर बदलते असतात व विशिष्ट कालावधीनंतर लागू होणारे व्याजदर जाहिर केले जातात. हे व्याजदर एखाद्या विशिष्ट मानक/ संदर्भदराशी जोडलेले असतात. उदा. ( LIBOR) किंवा (Eurobor) इत्यादी. भारतीय स्टेटबँकेने ठेवीवरील व्याजापेक्षा २% अधिक व्याजदर जाहीर केला होता.
किंवा (ICICI) ने मुंबई शेअर बाजार निर्देशांकाशी निगडीत ठेवला होता. कूपन दराचे नियमितपणे, साधारणतः प्रत्येक महिन्याला किंवा दर तीन महिन्यांनी पुन्हा मापन केले जाते.
३) शून्य कूपन बाँडस
हे बाँडस इश्यू करताना व्याजदर सांगितला जात नाही. हे बाँडस निर्गमित करताना दर्शनीमूल्यावर वटावाने विकले जातात, याचा अर्थ मुदतपूर्तीच्या वेळेपर्यत परिणामकारक व्याज पुढे ढकलून ते मुद्दलात एकत्र करून दिले जाते. बाँडधारकांवर विमोचनाच्या वेळी पूर्ण मूद्दल/दर्शनी रक्कम मिळते. विक्री किंमत व दर्शनी मूल्यातील फरक हा व्याज करासाठी व्याजाची हीच रक्कम गृहित धरली जाते.
शून्य कूपन बाँड्स हे वित्तीय संस्थांकडूनही जारी केले जातात. स्थीर व्याजदराच्या बाँडसपासून हे निर्माण करतात. मुद्दलापासून व्याजाची कूपन्स वेगळी काढून घेता येतील अशी जोडली जातात. वेगळे केलेले कूपन्स आणि बॉडसची अंतिम परतफेडीची मुद्दल रक्कम यांचे स्वतंत्र व्यवहार / व्यापार होऊ शकतात. त्यावर (IO) फक्त व्याज (Interest Only) आणि PO- फक्त मुद्दल (Principal Only) असे लिहिलेले असते.
४) महागाईच्या निर्देशांकाशी संलग्न बाँडसः
या बाँडसमध्ये व्याजाचा दर आणि / किंवा मुद्दल रक्कम ही महागाईच्या निर्देशकांशी संलग्न ठेवली जाते. हा व्याजदर सर्वसाधारणपणे समान मुदतीच्या स्थीर दर बाँडसवरील दरापेक्षा कमी असतो. परंतु बाँडसचे विमोचन महागाईच्या निर्देशकांशी सलंग्न असते त्यामुळे मुद्दलाचा महागाईपासून बचाव केला जातो. प्रथम इंग्लंडने १९८०मध्ये असे बाँडस प्रसृत केले. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतही असे बाँडस निर्गमित झालेले असून आपल्या देशात १९९७-९८ च्या वार्षिक अंदाजपत्रकात असे बाँडस जारी केले जातील असे जाहिर केले गेले.
५) इतर निर्देशकाशी संलग्न बाँडसः
समभागाशी (इक्वीटी) संलग्न चिठ्या, देशाचे स्थूल देशांतर्गत उत्पन्न, किंवा व्यवसायाच्या प्रगतीचे निर्देशक (उत्पन्न, मूल्यवाढ इ.) याच्याशी सलग्न बाँडस, सोन्याचा आतंरराष्ट्रीय दराशी संलग्न बाँडस इत्यादी बाँडस ही वितरीत केले जातात.
६) मालमत्तेचे समर्थन असणारे बाँडस (Asset Backed ):
मालमत्तेचे समर्थन असणाऱ्या बाँडसच्या व्याज व मुद्दल याला इतर मालमत्तेतून मिळणाऱ्या आंतरिक (Underlying) रोकड प्रवाहाचे समर्थन असते. उदाहरणार्थ -गहाणाचे समर्थन असलेले रोखे (CMOs Collateralised Mortgage Obligations. CDOs) (CollateralisedDebt Obligations) इत्यादी.
७) दुय्यम बाँडस (Subordinated Bonds)
कंपनीच्या विसर्जनाची वेळ आली तर या बाँडसना, कंपनीच्या इतर बाँडसच्या तुलनेने की प्राधान्य असते. दिवाळखोरीची वेळ आली तर कर्ज देणाऱ्यांची अग्रक्रमाने उतरंड लावली जाते. प्रथम दिवाळे वाजलेल्या कंपनीच्या देण्याचा घेण्याचा निकाल लावणाऱ्या (Liquidator) अधिकाऱ्याची देणी दिली जातात,
- सूक्ष्म वित्तपुरवठा) मायक्रोफायनान्स म्हणजे काय ? मायक्रो फायनान्स चे फायदे ,
- व्यवस्थापन म्हणजे काय ? व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये , व्यवस्थापनाची कार्य स्वाध्याय , महत्त्व आणि फायदे
- स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ? स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, वैशिष्ट्ये, व्याप्ती, महत्व, मर्यादा
- राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ? राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप , आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
- स्थिर भांडवल म्हणजे काय ? स्थिर भांडवल चा अर्थ आणि व्याख्या
- भाग बाजार म्हणजे काय ? भाग बाजाराची वैशिष्ट्ये , अर्थ आणि व्याख्या
- (पतमानांकन ) क्रेडिट रेटिंग म्हणजे काय ? पतमापन (Credit Rating ) संस्थेची स्थापना