भाग बाजार म्हणजे काय ? भाग बाजाराची वैशिष्ट्ये , अर्थ आणि व्याख्या , भाग बाजाराची कार्ये – Share market in marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (3 votes)

भाग बाजार म्हणजे काय ? भाग बाजाराची वैशिष्ट्ये , अर्थ आणि व्याख्या , भाग बाजाराची कार्ये, bhag bazar mhanje kay , भाग बाजारात विविध कंपन्यांचे भाग (Stock), सरकारी व निमसरकारी कर्जरोखे यांची खरेदी-विक्री होत असते. ज्या गुंतवणूकदारांनी विविध भाग, कर्जरोख्यात गुंतवणूक केलेली असते ते आपल्या जवळील कर्जरोखे भाग अन्य इन्छुकांना विकू शकतात. भांडवलशाही किंवा समिश्र अर्थव्यवस्थेत विविध क्षेत्रातील कंपन्या, महामंडळे आपले भांडवल भाग विकून उभे करतात किंवा कर्जरोखे विकून दीर्घकालावधीसाठी कर्ज उभारतात.

 

भाग बाजार म्हणजे काय - bhag bazar mhanje kay

Table of Contents

भाग बाजार म्हणजे काय – bhag bazar mhanje kay

भाग बाजार म्हणजे भागांची खरेदी-विक्री करण्याची विशिष्ट जागा किंवा ठिकाण नसून ती एक अशी संपूर्ण यंत्रणा आहे की ज्यात भागाची खरेदी करणारे क्रेते आणि भागाची विक्री करणारे विक्रेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्कात येवून भागांची खरेदी-विक्री करतात. या संपूर्ण कार्ययंत्रणेला भाग बाजार म्हणतात. भाग बाजारात नविन जुन्या अशा दोन्ही प्रकारचे भाग, रोखे व प्रतिभूतींची खरेदी-विक्री होत असते. भाग बाजारात व्यापारी, औद्योगिक, सरकारी आणि गैरसरकारी प्रतिभूतींची खरेदी-विक्री होत असते.

 

 

भाग बाजार संकल्पना स्पष्ट करा

देशाच्या भांडवल बाजारात शेअर बाजाराचे म्हणजेच Stock Exchange वे महत्व फार असते. देशातील विविध लोकाच्या संस्थाच्या बनती कार्यक्षमतेने भाग बाजारामार्फत जास्त परिणामकारकरीत्या उपयोगात आणणे शक्य होते. अर्थव्यवस्थेतील शेती, उद्योग, वाहतूक व इतर क्षेत्रांना त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारे भांडवल भाग बाजारामार्फत एकत्रित केले जाऊन त्या क्षेत्रांना उपलब्ध करून दिले जाते. बाजारामध्ये विविध कंपन्यांच्या, सरकारी तसेच निमसरकारी संस्थाच्या रोख्याचा (Stock) व्यवहार होत असतो. अशा बाजाराला रोखे बाजार म्हणतात.

 

भाग बाजाराची व्व्याख्या 

 

पाईल यांच्या मते, 

“जेथे गुंतवणूक किंवा परिकल्पनाच्या हेतूने मान्यता प्राप्त प्रतिभूतींची खरेदी व विक्री केली जाते. अशा बाजाराच्या जागा म्हणजे भाग बाजार होय”

हेस्टिंग्ज यांच्या मते, 

भाग बाजार किंवा प्रतिभूतीच्या बाजारामध्ये अशा सर्व जागांच्या अंतर्भाव होतो जेथे भाग आणि बॉन्डसचे ग्राहक आणि विक्रेते किंवा त्यांचे प्रतिनिधी प्रतिभूतींच्या विक्रीचे व्यवहार घडवून आणतात. “

 

भारतीय प्रतिभूती करार कायदा १९५६ नुसार, “भाग बाजार ही व्यक्तींची नोंदणी करण्यात आलेली किंवा नोंदणी करण्यात न आलेली एक संस्था असून या संस्थेची स्थापना प्रतिभूतींच्या खरेदी आणि विक्री व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी तसेच या व्यवसायाचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी केली जाते. “

 

भाग बाजाराची वैशिष्ट्ये / शेअर बाजाराची वैशिष्ट्ये 

स्कंध विपणीच्या व्याख्यांवरुन स्कंध विपणीची पुढील वैशिष्टये स्पष्ट होतो…

  •  भाग बाजार एक वैशिष्टपूर्ण अशी बाजारपेठ आहे. 
  • भाग बाजार ही एक संघटीत बाजारपेठ आहे.
  • या बाजारपेठेत विविध कंपन्यांचे भाग, स्कंध, कर्जरोखे तसेच सरकारी प्रतिभूती यांची खरेदी आणि विक्री केली जाते.
  • भाग बाजार ही व्यक्तींची एक संघटना आहे. त्यामुळे या विपणीचे सभासदत्व केवळ व्यक्तीनांच प्राप्त होते. (५) भाग बाजार कार्ये योग्यप्रकारे व्हावीत यासाठी तेथे होणान्या व्यवहारांचे नियमन आणि नियंत्रण केले जाते.
  • भाग बाजारची नोंदणी करण्यात येते किंवा नोंदणी न करण्यात आलेली देखील स्कंध विपणी असते.
  •  भाग बाजारामध्ये करण्यात येणाच्या व्यवहारांचा हेतु गुंतवणूकीप्रमाणेच परिकल्पनेचा देखील असतो.
  • भाग बाजारामुळे भांडवल निर्मितीला प्रोत्साहन मिळून देशात भांडवलाचा प्रवाह अव्याहतपणे चालू राहतो.
  •  भाग बाजारात ग्राहक आणि विक्रेते या दोघांचेही प्रतिनिधी त्यांच्यासाठी खरेदी-विक्रीचे व्यवहार करु शकतात.
  • भाग बाजारामुळे देशातील उद्योगांची भांडवलविषयक गरज भागविण्यासाठी मदत मिळते.
  • भाग बाजारामुळे नविन उद्योगांची स्थापना होवून चालू उद्योगांना अविरत भांडवल पुरवठा होतो. त्यामुळे देशात औद्योगिकरणाचा वेग वाढून देशाचा विकास घडून येण्यास मदत मिळते.

 

भाग बाजाराची उद्दिष्टे –

 

  • राष्ट्रीय स्तरावर शेअर्स, ऋणपत्रे व अन्य संमिश्र प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुलभतेने पूर्ण करण्यासाठी प्रतिभूती बाजार उपलब्ध करुन देणे,
  • राष्ट्रीय शेअर बाजाराद्वारे देशातील सर्व गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची संधी उपलब्ध करुन देणे.
  • व्यवहार पूर्तीचा कालखंड कमी करून भांडवल बाजारातील व्यवहार वाढविण्यास सुलभेतेने पूर्ण करण्यास मदत करणे.
  •  शेअर बाजारात इलेक्ट्रॉनिक ट्रेडींग सिस्टीम उपलब्ध करून देऊन त्याद्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीबाबत पारदर्शक व्यवहाराची खात्री देणे.
  • भारतातील रोखे बाजाराचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, त्यासाठी योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे.

 

भाग बाजाराची कार्ये / शेअर बाजाराची कार्ये – भाग बाजाराची कार्ये स्पष्ट करा

 भाग बाजाराची काही महत्वपूर्ण कार्ये खालीलप्रमाणे आहेत..

 

 नियम व कार्यपद्धती ठरविणे

प्रतिभूती खरेदी-विक्रीचे नियम आणि कार्यपद्धती ठरविण्याचे महत्वपूर्ण कार्य भाग बाजाराद्वारे केले जाते. तसेच नियमांच्या अमलबजावणीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा उभारण्याचे कार्यही भाग बाजार करतो. एवढेच नाही तर नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे कार्य सुद्धा भाग बाजाराद्वारे केले जाते.

 

आवश्यक माहितीचे प्रसारण करणे-

गुंतवणूक करु इच्छिणान्या गुंतवणूकदारांना आवश्यक असणाऱ्या माहितीचे प्रसारण करण्याचे अत्यंत महत्वाचे कार्यही भाग बाजाराद्वारे केले जाते. हे प्रसारण इंटरनेट, टिव्ही सारख्या माध्यमातून अत्यंत झपाट्याने केले जाते. गुंतवणूकदारांना आवश्यक असल्यास वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे कार्य देखील भाग बाजाराद्वारे केले जाते.

 

गुंतवणूकदार व कंपन्यांना एकत्रित आणणे

गुंतवणूकदार व ज्या कंपन्यांना आपले भाग विकून भांडवल प्राप्त करावयाचे आहे अशा कंपन्यांना एकत्रित आणण्याचे कार्य भाग बाजाराद्वारे केले जाते. विकसनशील देशात औद्योगिकरणाच्या वाढत्या वेगाबरोबर गुंतवणूकदार आपली गुंतवणूक शेअर्समध्ये गुंतविण्याचा विचार करतात. नेहमीच्या बचत गुंतविण्याच्या मार्गाच्या तुलनेत एक चांगला पर्याय म्हणजे शेअर्स असतो.

 

भांडवल निर्मिती करणे-

गुंतवणूकदार आपली बचत विविध औद्योगिक संस्थेच्या प्रतिभूतींमध्ये गुंतवितात त्यामुळे भांडवल निर्मिती घडून येते. भाग बाजारात मान्यता प्राप्त प्रतिभूतींमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित समजले जाते कारण अशा प्रतिभूतींची विक्री करून पैसा उभा करता येते.

 

कर्ज उभारणीत सरकारला मदत

विकसनशील देशात सरकारला आर्थिक विकासासाठी अनेक योजना अमलात आणाव्या लागतात व योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला पैशाची गरज असते. अशा वेळी सरकार कर्जरोखे विक्रीस काढते. भाग बाजारामुळे सरकारी कर्ज रोख्यांना बाजारपेठ मिळते व कर्ज उभारणीस मदत होते.

 

प्रतिभूतींची बाजारपेठ निर्माण करणे-

प्रतिभूतींच्या खरेदीविक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करण्याचे कार्य भाग बाजाराद्वारे केले जाते. आवश्यक असणान्या इतर सोयी व सुविधांचा पुरवठा करण्याचे कार्य देखील भाग बाजार करतो.

 

किंमतीची माहिती देणे-

भाग बाजारात उपलब्ध विविध प्रतिभूतींच्या किंमती प्रसारीत करण्याचे महत्वाचे कार्य भाग बाजार करतो. जेणे करून जनतेला प्रतिभूतीच्या किमती माहिती होवून योग्य प्रतिभूतीमध्ये ते आपली बचत गुंतवू शकतील.

 

शोधनाच्या सोयी उपलब्ध करुन देणे-

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार जर प्रतिभूतींच्या खरेदी व्यवहारात असतील तर त्यांना शोधनाच्या सोयी निर्माण करण्याचे कार्य भाग बाजार करतो.

 

विदेशात भांडवल गुंतविणे –

विदेशी उद्योगांमध्ये भांडवल गुंतविण्याचे कार्य देखील भाग बाजाराद्वारे केले जाते… भारतात सहा स्थितीत मुंबई रोखे बाजार व राष्ट्रीय रोखे बाजार हे प्रमुख बाजार आहेत..

 

मुंबई शेअर बाजार – मुंबई भाग बाजार म्हणजे काय 

मुंबई रोखे बाजार हा भारतातील एक महत्वाचा व प्रथम दर्जाचा रोखे बाजार आहे. १८७५ मध्ये स्थापन झालेला तो भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात जुने आहे. १९५७ मध्ये कायमस्वरुपी मान्यता प्राप्त झालेले मुंबई रोखे बाजार हा भारतातील पहिले स्टॉक एक्सचेंज ठरले.

भारतातील विविध रोखे बाजारांचे स्वरुप वेगवेगळे आहे. मुंबई, अहमदाबाद व इंदोर रोखे बाजार या नफा न मिळविणाऱ्या स्वेच्छा संस्था आहेत तर कलकत्ता, कोचीन, बंगलोर, दिल्ली येथील रोखे बाजारांचे स्वरुप जॉईंट स्टॉक कंपनी असे आहे. मद्रास, पूणे, हैद्राबाद येथील स्टॉक एक्सचेंज या हमी मर्यादीत आहेत. परंतु केंद्र सरकारने केलेल्या विविध तरतुदींमुळे आज मान्यता प्राप्त सर्वच रोखे बाजाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर साम्य निर्माण झाले आहे…

 

मुंबई रोखे बाजाराच्या नियंत्रण मंडळावर (Governing Body) नऊ संचालकांची

मुंबई रोखे बाजाराच्या नियंत्रण मंडळावर (Governing Body) नऊ संचालकाची निवड मुंबई रोखे बाजाराचे सभासद करतात. या सभासदांची संख्या ६०० च्या जवळपास आहे. एका कार्यकारी संचालकाची नियुक्ती सरकार करते. तीन संचालक सेवी पुरस्कृत असतात. एक संचालक रिझर्व्ह बँक आपला प्रतिनिधी म्हणून पाठविते, अन्य पाच संचालक हे विविध क्षेत्रातील तज्ञ असतात. अशा रितीने १९ संचालक नियंत्रण मंडळात असतात. हे नियंत्रण मंडळ मुंबई रोखे बाजाराचे नियंत्रण करते व योग्य धोरण ठरविते. सभासदांनी निवडून दिलेले संचालक दरवर्षी अध्यक्ष, उपाध्यक्ष व खजिनदार यांची निवड करतात. कार्यकारी संचालक हा रोखे बाजाराच्या दररोजच्या व्यवस्थापनाला जबाबदार असतो.

 

राष्ट्रीय शेअर बाजार- राष्ट्रीय भाग बाजार म्हणजे काय (National Stock Exchange)-

 

फेरवानी समितीने राष्ट्रीय बाज़ार पद्धतीची (National Market System) रोखे बाजाराच्या संदर्भात शिफारस केली होती. त्या शिफारशीच्या अनुशंगाने सरकारने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या स्थापनेच्या दृष्टीने पावले उचलली व दि सिक्युरिटीस कॉन्टॅक्टस (Regulation) अॅक्टनुसार भारतातील २३ वे मान्यता प्राप्त रोखे बाजार म्हणून राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना झाली. या बाजारात डेट मार्केटचे व्यवहार ३० जून १९९४ पासून तर कॅपिटल मार्केटचे व्यवहार ३ नोव्हेंबर १९९४ पासून सुरु झाले.

 

 

मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली?

१८७५ मध्ये स्थापन झालेला तो भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात जुने आहे. १९५७ मध्ये कायमस्वरुपी मान्यता प्राप्त झालेले मुंबई रोखे बाजार हा भारतातील पहिले स्टॉक एक्सचेंज ठरले.

भाग बाजारात व्यवहार करू न शकणाऱ्या कंपनीला काय म्हणतात?

भाग बाजारात व्यवहार करू न शकणाऱ्या कंपनीला Unlisted company म्हणतात?

राष्ट्रीय रोखे बाजार म्हणजे काय ?

भारतीय राष्ट्रीय शेअर बाजार NSE म्हणजे काय? 1992 मध्ये स्थापित, भारतातील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड (NSE) हे भारतीय शेअर बाजारातील पहिले डिमटेरियलाइज्ड इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज आहे.

राष्ट्रीय रोखे बाजार कुठे आहे

राष्ट्रीय शेअर बाजार हे भारतातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे, जे मुंबई, महाराष्ट्र येथे आहे.

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment