समहक्क भाग म्हणजे काय ? समहक्क भागांची वैशिष्ट्ये आणि व्याख्या – samhakk bhag mhanje kay

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (1 vote)

समहक्क भाग म्हणजे काय ? समहक्क भागांची वैशिष्ट्ये आणि व्याख्या – samhakk bhag mhanje kay, नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात समहक्क भाग याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. यात आपण समहक्क भाग म्हणजे नेमके काय असते, त्याची वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत,

याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला समहक्क भागाविषयी संपूर्ण माहिती मिळण्यास मदत होईल. 

samhakk bhag mhanje kay

समहक्क भाग म्हणजे काय ? – samhakk bhag mhanje kay

    ज्या भागांना लाभांश व भांडवलाची परतफेड कंपनी विसर्जना वेळी केली जाते अशा भागांना समहक्क भाग असे म्हणतात. समहक्क भागधारकांना त्यांच्या भागावर लाभांशाबद्दल कोणतीही हमी दिली जात नाही. म्हणजेच या भागांवर लाभांश दिलाच पाहिजे आणि तो विशिष्ट दरानेच दिला पाहिजे असे कोणतेही बंधन प्रमंडळावर  असत नाही. 

 

प्रमंडळाकडे नफा उपलब्ध असल्यास आणि संचालक मंडळाने लाभांश देण्याची शिफारस केल्यास या भागांवर लाभांश दिला जातो. त्याचप्रमाणे प्रमंडळाचे विसर्जन झाले तर भाग भांडवलाची परतफेड करताना समहक्क भागधारकांचा क्रमांक सर्वात शेवटी असतो. म्हणजेच बाकी सर्व देणेदारांची रक्कम परत दिल्यावर आणि अग्रहक्क भागांची परतफेड केल्यावर जर पैसे शिल्लक राहिले तर त्याचा वापर समहक्क भाग भांडवलाची परतफेड करण्यासाठी वापरता येते. 

 

थोडक्यात लाभांश मिळणे आणि भांडवल परत मिळणे या दोन्ही बाबतीत या भागधारकांना जोखीम पत्करावी लागते. अर्थातच प्रमंडळाला मोठ्या प्रमाणात नफा झाल्यास लाभांशाचा दरही अशा भागांवर जास्त असतो व त्यामुळे या भागांचे बाजारातील मूल्य वाढल्यामुळे या बाजारभावाप्रमाणे आपले भाग विकून गुंतविलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम मिळविण्याची संधी समहक्क भागधारकांना प्राप्त होते. समहक्क भागधारक हे प्रमंडळाचे खरे मालक समजले जातात. त्यामुळे या भागधारकांना मतदानाचा हक्क प्राप्त होतो. 

 

समहक्क भागाची व्याख्या :- 

“ज्या भागांना लाभांश व भांडवलाची परतफेड कंपनी विसर्जना वेळी केली जाते अशा भागांना समहक्क भाग असे म्हणतात.” 

 

समहक्क भागांची वैशिष्ट्ये – Features of samhakk bhag 

 

1]कायमस्वरूपी भाग भांडवल –

      समहक भाग हे न परतफेडीचे भाग आहेत. समहक्क भागांची रक्कम कंपनी अस्तित्वात असताना केली जात नसून त्यांची परतफेड कंपनी विसर्जना वेळी केली जाते. म्हणून समहक्क भाग भांडवल दीर्घ मुदतीचे व कायमस्वरूपी भांडवल आहे. 

 

2]अस्थिर लाभांशाचे दर –

      समहक्क भागांवर दिला जाणारा लाभांशाचा दर निश्चित नसतो. लाभांशाचा दर कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो. जर कंपनीला नफा जास्त झाला तर जास्तीच्या दराने लाभांश मिळतो. तर नफा कमी झाला तर कमी दराने लाभांश मिळतो. 

 

3]हक्क –

      समहक्क भागधारकांना मतदानाचा, लाभांश मिळविणे, लेखा पुस्तकाची तपासणी करणे, व्यवसायास सहभागी होणे, संचालाची निवड करणे, घटना पत्रक व नियमावली दुरुस्ती करणे, आपल्या मालकीचे भाग हस्तांतर करणे इत्यादी हक्क मिळतात. 

 

4]अगक्रम हक्क नाही –

      समहक्क भागधारकांना लाभांश वाटप व भांडवलाची परतफेड करतेवेळी अगक्रम दिला जात नाही. सुरुवातीला अग्रहक्क भागधारकांना लाभांश वाटप व भांडवलाची परतफेड केली जाते. नंतर समहक्क भागधारकांना दिला जातो. ते ही शिल्लक नफा असेल तर दिला जातो.

 

5]नियंत्रण –

     समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक आहेत. म्हणून ते कंपनीवर नियंत्रण ठेवू शकतात. कंपनीमध्ये मतदानांचा अधिकार फक्त समहक्क भागधारकांना दिला आहे. ते मतदान करून संचालक मंडळाचे प्रतिनिधीची निवड करू शकतात. 

 

6]जोखीम –

      समहक्क भाग हे जोखीमीचे भांडवल आहे. समहक्क भागधारक हे कंपनीची जोखीम स्वीकारतात. कारण कंपनीला एखाद्या वर्षी नफा कमी झाला तर समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जातो.

 

7] अवशेष भागाचे दावेदार ( हक्कदार) –

       समहक्क भागधारक कंपनीचे मालक असल्यामुळे, कंपनीच्या एकूण नफ्यातून सर्व खर्च, विविध कर दिल्यानंतर उर्वरित नफ्याचे हक्कदार असतात. 

 

8]कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही –

       कंपनी कायद्यानुसार स्थापन केली जाते त्यामुळे तिला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होते. म्हणून कंपनीची सर्व मालमत्ता तिच्या नावाने असते. त्या मालमत्तेवर समहक्क भागधारकांचा अधिकार नसतो. 

 

9]बोनस भाग / अधिलाभांश भाग –

       समहक्क भागधारकांना बक्षीस म्हणून विनामूल्य त्यांच्या भागांच्या प्रमाणात बोनस भाग दिले जातात. हे बोनस भाग जमा झालेल्या नफ्यातून ( राखीव निधी) दिले जातात.

 

10]हक्क भाग –

        कंपनीचा विस्तार करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. तेव्हा कंपनी नवीन भागांची विक्री विद्यमान भागधारकांना प्रथम प्राधान्य देऊन करते त्याला हक्क भाग असे म्हणतात.

 

11]दर्शनी मूल्य –

        समहक्क भागाचे दर्शनी मूल्य अग्रहक्क भागाच्या तुलनेत कमी असते. उदाहरणार्थ, अग्रहक्क भागाचे दर्शनी मूल्य 100 रुपये तर समहक्क भागाचे दर्शनी मूल्य 10 रुपये असते.

 

12]बाजार मूल्य –

       समहक्क भागांचे बाजार मूल्य आहे मागणी व पुरवठा चढउतार होत असते.कंपनीचे एकूण नफा आणि घोषित केलेला लाभांश या दोन गोष्टींवर अवलंबून असते. जेव्हा कंपनीला जास्त नफा होतो तेव्हा भागाचे बाजार मूल्य वाढते. जेव्हा कंपनीचा नफा कमी होतो तेव्हा त्यांचे बाजार मूल्य कमी होते.

 

 

 

     

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment