बँकेची प्राथमिक कार्ये : Primary Functions of Bank in marathi,बँकेचे प्राथमिक कार्य कोणते – बँकेची प्राथमिक कार्य स्पष्ट करा , देशाच्या अर्थव्यवस्थेचा वित्तीय कणा असलेल्या बँकेची प्राथमिक कार्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे ही बँकेची प्राथमिक कार्ये आहेत. प्राथमिक कार्याद्वारे बँक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. बँकेची प्राथमिक कार्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील :
बँकेचे प्राथमिक कार्य कोणते – Bank che Prathmik Karya
ठेवी स्वीकारणे (Accepting Deposits) :
ठेवी स्वीकारण्याच्या व्यवहारातूनच आधुनिक बँकेचा जन्म झाला असल्याने ठेवी स्वीकारणे हे व्यापारी बँकेचे प्रमुख कार्य मानले जाते. लोकांनी ठेवलेल्या ठेवी हे बँकेचे मुख्य भांडवल असते. लोकांचा शिलकी पैसा ठेव रूपाने स्वीकारणे, तो सुरक्षित ठेवणे, ठेवींवर आकर्षक व्याज देणे आणि लोकांच्या गरजेनुसार ठेवींचे पैसे लोकांना परत देणे ही जबाबदारी बँका स्वीकारतात.
1.चालू ठेवी :
बँकेची कार्ये ठेवीदाराने मागताक्षणी परत करण्याच्या अटींवर या ठेवी स्वीकारलेल्या असतात. ठेवीदाराला बँकेच्या कामकाजाच्या वेळेत कितीही वेळा रक्कम ठेवता येते अथवा काढता येते. या खात्यावर नेहमीच व्यवहार चालू असतात, म्हणूनच याला चालू ठेव खाते असे म्हणतात.
चालू ठेव खात्यावरील पैसा बँकांना गुंतवणुकीसाठी फारसा वापरता येत नाही म्हणून या ठेवींवर व्याज दिले जात नाही. भारतासारख्या भांडवल टंचाई असलेल्या देशात मात्र लोकांची बचत एकत्र गोळा व्हावी म्हणून काही बँका या ठेवीदारांनाही अर्धा टक्का नाममात्र व्याज देतात.
2.बचत ठेवी
मध्यमवर्गीय लोकांना आपल्या अल्प उत्पन्नातून बचत करण्याची सवय लागावी आणि त्यांची शिल्लक बचत ठेवरूपाने गोळा करता यावी या उद्देशाने बँकांनी बचत ठेवीचे खाते सुरू केलेले आहे. लोकांनी नियमितपणे काटकसर करून बचत करण्यास प्रवृत्त व्हावे यासाठी हे खाते उपयोगी पडते. या ठेवी ठेवीदारांना त्यांच्या मागणीप्रमाणे परत दिल्या जातील असे बँकांनी आश्वासन दिलेले असते.
खात्यात फार मोठी रक्कम जमा करता येत नाही. ठरावीक मर्यादेपेक्षा ठेव अधिक झाल्यास त्यावर व्याज दिले जात नाही. खात्यातून मोठी रक्कम काढावयाची झाल्यास बँकेला पूर्वसूचना द्यावी लागते. बचत ठेव खात्यातील रक्कम काढण्यासाठी बँकेत उपलब्ध असलेल्या विशिष्ट फॉर्मचा अथवा धनादेशाचा वापर करावा लागतो. खातेदाराला धनादेशाची सोय हवी असेल तर किमान ५०० रु. खात्यावर शिल्लक ठेवावे लागतात.
या खातेदाराला पासबुक दिले जाते. त्यात त्याच्या व्यवहारांच्या नोंदी असतात. मध्यमवर्गीय अथवा अल्प उत्पन्न गटातील लोकांची आर्थिक उलाढाल मर्यादित असल्याने ते वारंवार ठेवीतील पैसा काढत नाहीत. लाखो ठेवीदारांची ही अल्पशी असणारी बचत बँकेत दीर्घकाळ राहते. हा पैसा बँका फायदेशीर व्यवहारात गुंतवून भरपूर नफा मिळवतात. म्हणून बँका बचत ठेवी ठेवणाऱ्यांना चालू ठेवीपेक्षा अधिक व्याजदर देतात. तो साधारणतः ४ टक्के ते ५ टक्के असतो.
3.मुदत ठेवी
मुदत ठेव खात्यात एका विशिष्ट मुदतीसाठी पैसे ठेव म्हणून ठेवले जातात. उदा. ३ महिने ते ५ वर्षे मुदतीसाठी या ठेवी ठेवल्या जातात. मुदत पूर्ण झाल्याशिवाय अशा ठेवींवरील पैसे काढता येत नाहीत. एखाद्या वेळी मुदत संपण्यापूर्वीच खात्यावरील पैसे काढण्यास बँकेने परवानगी दिली, तर त्या ठेवीवर पूर्वी ठरलेल्या व्याज दरापेक्षा कमी दराने व्याज दिले जाते. जास्त मुदतीच्या ठेवींवर अधिक दराने व्याज आकारले जाते.
बँकेत मुदत ठेव खातेदाराला पासबुक न देता ठेव पावती दिली जाते. त्यामुळे एकदा विशिष्ट रक्कम विशिष्ट मुदतीसाठी ठेवल्यानंतर पुन्हा जादाची रक्कम त्याच खात्यात जमा करता येत नाही. त्यासाठी त्या रकमेची दुसरी ठेव पावती तयार करावी लागते. मुदत ठेवीची रक्कम खातेदाराला वरचेवर काढता येत नसल्याने या खातेदाराला चेकची सुविधा उपलब्ध होत नाही.
4.आवर्ती ठेवी
बँकेची कार्ये या ठेवीला पुनरावर्ती ठेवी अथवा रिकरिंग ठेवी असेही म्हणतात. ठरावीक काळासाठी, मुदतीसाठी बँकेत खाते सुरू करून त्यात दरमहा काही विशिष्ट रक्कम भरत गेल्यास त्याला आवर्ती ठेव खाते असे म्हणतात.
अल्प उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये नियमितपणे बचत करण्याची सवय निर्माण व्हावी या उद्देशाने या ठेवी सुरू करण्यात आल्या आहेत. आवर्ती ठेव खाते हे विशिष्ट मुदतीकरिता चालू करता येते. साधारणतः १ वर्षे ते ५, ७ वर्षे अशा मुदतीची ही खाती असतात.
या खात्यात खातेदाराला दरमहा ५ रुपये, १० रुपये अथवा त्याच पटीत रक्कम भरावी लागते. मुदत संपल्यानंतर या खात्यावरील पैसे व्याजासह परत मिळतात. सहसा या खात्यावरील पैसे मुदत संपल्याशिवाय खातेदाराला परत मिळत नाहीत. आवर्ती ठेवीवर बचत ठेवीपेक्षा जास्त पण मुदत ठेवीपेक्षा कमी व्याज दिले जाते.
या ठेवीची मुदत जेवढी जास्त जास्त पण मुदत ठेवीपेक्षा कमी व्याज दिले जाते. या ठेवीची मुदत जेवढी जास्त तेवढे व्याज दर अधिक असतात.
अल्प उत्पन्न गटातील या ठेवीदारांना मुदतीनंतर एका हप्त्यात मोठी रक्कम मिळू शकते. मुदत संपण्यापूर्वी ठेवीदाराला पैसे हवे असतील तर बचत खात्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजदराने व्याजाची रक्कम ठरवून जमा रकमेवर कर्जही दिले जाते.
5 झालर विरहीत खाते (No Frills Account) :
झालर विरहीत खाते हे बँकेचे एक मूलभूत खाते आहे. या खात्यासाठी शून्य शिल्लक रक्कम किंवा अतिशय मर्यादित शिल्लक रकमेची आवश्यकता असते. या खात्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काची रक्कम देखील कमी असते. अशा खात्यावर मिळणाऱ्या सेवा देखील मर्यादित स्वरूपाच्या असतात.
वॉटरशीट अॅन्युअल पॉलिसी स्टेटमेंटनुसार आर. बी. आय. ने २००५-०६ मध्ये भारतीय बँकांना झालर विरहीत खाते सुरू करण्याचे आदेश दिले. कुठल्याही पूर्वअटीविना, अतिशय मर्यादित शिल्लक असणारे खाते ग्राहक ओळख (KYC) तत्त्वांनुसार सुरू करण्यात आले. सर्वसामान्य लोकांच्या गरजा लक्षात घेऊन तसेच त्यांची मिळकत क्षमता विचारात घेवून
बँक व्यवसाय आणि वित्तपुरवठा (बँक व्यवसायाची मूलतत्त्वे) त्यांच्यासाठी कमी शिल्लक असणारे खाते सुरू करण्यात आले. उत्पन्न पातळी अल्प असणाऱ्या घटकांसाठी बँकांमध्ये खाते सुरू करणे परवडणारे नसते. त्यामुळे अशा घटकांसाठी बँकींग सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व त्यांच्यात बचतीची प्रवृत्ती वाढीस लागावी यासाठी झालर विरहीत खाते ही व्यवस्था सुरू करण्यात आली. या खातेपद्धतीमुळे गरीब लोकांना बँकेत पैशाचे व्यवहार करणे शक्य झाले आहे.
भारतातील विविध व्यापारी बँकांनी झालर विरहीत खातेपद्धतीची सुरूवात केली असून भारतातील ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत बचतीच्या सवयी निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले आहे.
अ) झालर विरहीत खाते साठी पात्रता :
निवृत्तीधारक, शेतमजूर, असंघटीत क्षेत्रातील कामगार, स्वयंसहाय्यता गटाचे सदस्य, स्वयंरोजगारीत व्यक्ती, विद्यार्थी, ग्रामीण लोक इत्यादी घटक झालर विरहीत खाते बँकेत सुरू करू शकतात याऊलट संस्था, संघटना, अनिवासी भारतीय, बँकेतील कर्मचारी या घटकांना झालर विरहीत खाते बँकेत सुरू करता येत नाही. हे खाते बँकेत सुरू ठेवण्यासाठी शून्य रक्कम खात्यावर असली तरी चालते. म्हणजेच अगदी किरकोळ रक्कमेवरदेखील खाते व्यवहार करता येतात.
ब) झालर विरहीत खाते वैशिष्ट्ये आणि फायदे :
- झालर विरहीत खात्याद्वारे पुढील फायदे प्राप्त होतात.
- इंटरनेट बँकींग व दूरध्वनी बँकींगची सुविधा उपलब्ध.
- मोफत त्रैमासिक स्टेटमेंटद्वारे खाते व्यवहार करता येतो किंवा ई-स्टेटमेंट प्राप्त करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध असतो.
- शाखांच्या विस्तारित जाळ्यांची उपलब्धता आणि बँकींग विषयक गरजा पूर्ण
- करण्यासाठी देशात हजारो ए.टी.एम. मशिनची सुविधा.
- झालर विरहीत खात्यावर ए.टी.एम. ची मोफत सुविधा प्राप्त होते.
6 . इतर ठेवी
बँकेची कार्ये अलीकडे लोकांकडील बचत आकर्षित करण्यासाठी बँकांनी ठेवींच्या वेगवेगळ्या योजना तयार केल्या आहेत. त्यावर आकर्षक असे व्याज दर जाहीर केले जातात. उदा. दामदुप्पट ठेव योजना, शुभमंगल ठेव योजना, बचत कुंभ ठेवी इ.
7.व्युत्पन्न ठेवी
वर वर्णन केलेल्या प्रकारांनी बँकेकडे ज्या ठेवी जमा होतात त्यांना प्राथमिक ठेवी असे म्हणतात; परंतु दुसऱ्या बँकांच्या कर्ज अथवा गुंतवणुकीच्या व्यवहारात बँकांनी स्वतः निर्माण केलेल्या ठेवींना व्युत्पन्न ठेवी असे म्हणतात. चेकच्या साहाय्याने तत्काल देव ठेवींचे स्थानांतर व हस्तांतर केले जाते. बँकांनी स्वतः च्या पतिवर निर्माण केलेल्या दुय्यम ठेवी म्हणजे व्युत्पन्न ठेवी होत.
कर्ज व अग्रिमे देणे (Granting Loans and Advances) :
सामान्यपणे व्यापारी बँका अल्पमुदतीच्या स्वरूपाचा कर्जपुरवठा करीत असतात. म्हणजे आपल्या खातेदारांची खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी अल्पमुदतीची कर्जे किंवा अग्रिमे देण्याची बँकांची प्रथा आहे. बँकद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्जाचा समावेश अग्रिमांमध्ये केला जातो. बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या अग्रिमांचे स्वरूप पुढील मुद्यांच्या आधारे विशद करता येईल :
अ) रोख कर्ज (Cash Credit) :
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत वैयक्तिक पतिवर एक किंवा अधिक जामिन घेवून कर्ज देण्याच्या प्रकारास रोख कर्ज म्हणतात. कॅश क्रेडिटसाठी वचनचिया, सरकारी कर्जरोखे, धान्य, कंपनीचे भाग इत्यादी गोष्टींचा तारण म्हणून स्वीकार केला जातो. साधारणपणे ऋणकोची पत व बँकेशी असणाऱ्या त्याच्या व्यवहाराचे स्वरूप लक्षात घेवून कर्जाची रक्कम निश्चित केली जाते. प्रामुख्याने व्यापारी, व्यावसायिक व उद्योगसंस्था यांच्या खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी ‘कॅश क्रेडिट’ मंजूर केले जाते. रोख कर्जाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील :
- बँक ग्राहकाला तारणावर किती रोख कर्ज काढता येईल याची मर्यादा ठरवून देत असते..
- कर्जदार आवश्यकतेनुसार रक्कम काढू शकतो, तसेच रक्कम मिळेल त्यानुसार ती खात्यावर भरू शकतो.
- रोख कर्जासाठी ग्राहकाने योग्य असे तारण दयावे लागते.
- मागणी केल्यानंतर ताबडतोब परत मिळू शकेल अशी व्यवस्था करूनच बँक रोख कर्ज देत असते.
- रोख कर्ज ही भारतातील लोकप्रिय स्वरूपाची पद्धत आहे.
ब) अधिक सवलत (Over Draft) :
अधिकर्ष सवलत ज्या ग्राहकांची बँकेकडे चालू खाती असतात अशाच व्यक्तींना, संस्थांना मिळते. अधिकर्ष सवलत किंवा ओव्हरड्राफ्ट हा कॅश क्रेडिटचाच एक प्रकार मानता येईल. व्यापाऱ्याच्या चालू खात्यावर त्याच्या स्वतःच्या शिलकीपेक्षा जास्त रक्कम ठरावीक मर्यादिपर्यंत काढू दिली जात असल्याने त्यास अधिकर्ष सवलत म्हणतात. या पद्धतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील.
- अधिकर्ष सवलत ही बँकेत ज्यांचे चालू खाते आहे, त्यांनाच मिळू शकते.
- अधिकर्ष सवलत ही शेअर्स, कर्जरोखे, विमा पॉलिसी, सोने, चांदी किंवा व्यक्तीच्या वैयक्तिक तारणाच्या आधारे दिली जाते..
- ठेवीदाराला अधिकर्ष सवलती एवढी रक्कम आवश्यकतेनुसार एकदम किंवा काही प्रमाणात उचलता येते.
- खातेदाराने अधिकर्ष सवलतीपैकी किती रक्कम किती काळ वापरली, त्यानुसार व्याज आकारले जाते.
- अधिकर्ष सवलत ही अल्पकाळासाठी दिली जाते.
- व्यापारी, उद्योगपती व व्यावसायिकांच्या दृष्टीने अधिकर्ष सवलत उपयुक्त ठरते.
क) कर्ज (Loan) :
सर्वसाधारणपणे ग्राहकांनी केलेल्या प्रस्तावाचा सर्वांगीण विचार करून बँका कर्ज देत असतात. कर्ज मंजूर केल्यानंतर कर्जदार किंवा ऋणकोच्या नावे बँकेत नवीन खाते उघडून त्यात पैसे जमा केले जातात आणि ग्राहक खात्यावरून पैसे काढू शकतो. तसेच कर्जाइतकी रक्कम रोख स्वरूपात ग्राहकाला देण्याचीही पद्धत काही बँकांमधून अनुसरली जाते. कर्जाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील :
१) कर्जे ही ठरावीक मुदतीसाठी दिली जातात. तसेच कर्जाची रक्कम ही निश्चित असते.
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
- शेड्युल बँक म्हणजे काय ? शेड्यूल बँकेचे कार्य
- डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय – डिमांड ड्राफ्ट काय असते ?
- क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? क्रेडिट कार्ड कसे काढावे ,क्रेडिट कार्ड चे प्रकार
- व्यापारी बँक म्हणजे काय आहे ?, व्यापारी बँकेचे प्रकार , महत्त्व , व्यापारी बँकेची सूची
- रिटेल बँकिंग म्हणजे काय ? रिटेल बँकिंग चे प्रकार
- विदेशी बँक म्हणजे काय ? विदेशी बँकेची भूमिका , विदेशी बँकेची नावे
- सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
बँकेचे प्राथमिक कार्य कोणते ?
ठेवी ठेवणे आणि कर्ज देणे व्यतिरिक्त, बँका इतर गोष्टी देखील करतात, जसे की लोकांच्या मौल्यवान वस्तू जसे की सुरक्षिततेसाठी दागिने ठेवणे,
बँकेची मुख्य कार्ये कोणती आहेत?
ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, विविध कार्ये, क्रेडिट बिल्डिंग कार्ये आणि एजंट कार्ये
बैंक का क्या महत्व है?
मनी मार्केटचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून, देशाच्या आर्थिक विकासासाठी बँका ही महत्त्वाची साधने आहेत.