व्यापारी बँका विविध प्रकारच्या ठेवी स्विकारतात – व्यापारी बँकेचे ठेवी स्वीकारणे हे कार्य स्पष्ट करा ?

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (1 vote)

व्यापारी बँका विविध प्रकारच्या ठेवी स्विकारतात – व्यापारी बँकेचे ठेवी स्वीकारणे हे कार्य स्पष्ट करा., व्यापारी बँकेचे कार्य, आधुनिक काळात व्यापारी बैंका अनेक कार्ये पार पाडतात. ग्राहकांना व जनतेला अनेक प्रकारच्या सोयी पुरवितात. सध्याच्या काळात अर्थव्यवस्था व बँकव्यवसायही अतिशय गतिमान झालेला असून, बँकांची कार्यकक्षा खूपच विस्तारली आहे, तरीही बँकांच्या प्रमुख कार्याचा आढावा पुढील प्रमाणे घेता येईल. व्यापारी बँकाच्या कार्याचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल –

व्यापारी बँका विविध प्रकारच्या ठेवी स्विकारतात

 

व्यापारी बँका विविध प्रकारच्या ठेवी स्विकारतात. – 

बँका लोकांकडून ठेवी स्विकारतात. या ठेवी तीन प्रकारच्या आहेत.

  •  चालू ठेवी
  •  बचत ठेवी
  •  मुदत ठेवी

 

1.ठेवी चालू 

सर्वसाधारणपणे व्यापारी, व्यावसायीक व उद्योजक वर्गाकडून या खात्यावर ठेवी ठेवल्या जातात. या ठेवीतून ग्राहकांना पूर्वसूचना न देता दिवसातून कितीही वेळा रक्कम काढता येते. त्यामुळे रोजचे देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी व्यावसायिकांना या ठेवींचा उपयोग होतो. व्यापारी बँकाच्या एकूण ठेवींमध्ये या ठेवींचे प्रमाण खूपच अधिक असते.

 

2.बचतठेवी

बचत ठेवी या सर्वसाधारण जनतेकडून ठेवल्या जातात. या खात्यावरील ठेवी धनादेशाच्या माध्यमाने काढता येतात. कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना बचतीची सवय लावण्यासाठी या ठेवी उपयुक्त ठरतात.

3. मुदत ठेवी 

मुदत ठेवी बँकेकडे विशिष्ट मुदतीसाठी ठेवल्या जातात. व मुदतपूर्वी काळानंतरच (Maturity) त्या काढता येतात. मुदत ठेवीवर सर्वात जास्त दराने व्याजाचे उत्पन्न मिळते. चालू खात्यावर व्याज दिले जात नाही. किंवा अतिशय अल्प दराने दिले जाते. बचत ठेवीवर मिळणारे व्याज हे या ठेवी बँकेजवळ किती काळ आहेत त्यावरून ठरते व साधारणतः व्याजदर ४% ते ६% च्या दरम्यान असते.ठेवींचा आणखी एक प्रकार म्हणजे आवर्ती ठेवी हा होय. या मध्ये दर महिन्याला विशीष्ट रक्कम विशिष्ट मुदतीसाठी नियमितपणे बँकेकडे जमा केली जाते.

 

व्यापारी बँकेचे ठेवी स्वीकारणे हे कार्य स्पष्ट करा.

बँकेची देवता किंवा देणी भागांचे वर्गीकरण, बँकेच्या देयता (देणी) या भागात पुढील बाबींचा समावेश होतो. 

  • मागणी ठेवी 
  • मुदत ठेवी
  •  इतर बँकांकडून घेतलेल कर्ज 
  • भारतीय रिझर्व्ह बँकांकडून घेतलेली कर्जाऊ रक्कम

 

भारतीय बँका प्रामुख्याने दोन प्रकाच्या ठेवी स्विकारतात. मागणी ठेवीचे वर्गीकरण चालू ठेवी, बचत ठेवी व अल्पसूचना ठेवी असे करता येते.

1. चालू ठेवी :

ग्राहकाने मागणी करताक्षणीच ताबडतोब या ठेवी परत द्याव्या लागतात. धनादेशाच्या सहाय्याने या ठेवीतून केव्हाही व कितिही रक्कम काढता येते. या ठेवी प्रामुख्याने उद्योजक व व्यावसायिक यांच्याकडून ठेवल्या जातात. बँका साधारणतः या ठेवीवर व्याज देत नाहीत. परंतु बँक या ठेवीदारांना अनेक मोफत सेवा देवू करते. उदा. बाहेरगावातील धनादेशाचे मोफत संकलन करणे, मागणी धनाकर्ष, लाभांशाचे वॉरंटस्, पोस्टल ऑर्डर्स इत्यादीचे वाटप करणे वगैरे.

 

2. बचत ठेवी

बचत खात्यावरील ठेवीवर व्याज मिळते. साधारणतः या ठेवीवर ४% ते ६% च्या दरम्यान व्याजदर असतो. या ठेवीतूनही धनादेशाच्या सहाय्याने रक्कम काढता येते. परंतु या खात्यातून कितीवेळा पैसे काढावयाचे यावर बंधन असते.

 

3.अल्पसूचना ठेवी

या ठेवी मागणी ठेवींचाच एक भाग आहे. या ठेवी इतर बँकांकडून स्वीकारल्या जातत. व मागताक्षणी परत द्याव्या लागतात. या ठेवीवर व्याज दिले जाते. या ठेवीचे एकूण ठेवींशी असलेले प्रमाण फारच अल्प आहे.

 

4.मुदत ठेवी

या ठेवी विशीष्ट मुदतीसाठी ठेवल्या जातात. ही मुदत १५ दिवसांपासून विशिष्ट वर्षापर्यंत असू शकते. या ठेवीवर धनादेशाची सोय नाही. किंवा मागताक्षणी परतही द्याव्या लागत नाहीत. या ठेवींमधील रक्कम मुदतपूर्ती नंतर परत करावी लागते. सध्या दंडात्मक व्याजदराने (म्हणजे मान्य केलेल्या व्याजदरापेक्षा कमी दराने ) मुदतीपूर्वीसुद्धा ही ठेव काढून घेता येते. इतर बँकाकडून कर्जाऊ घेतलेल्या रकमा या बँकांच्या ताळेबंदपत्रकात देयता भागात असतात. 

 

रिझर्व्ह बँकेकडून घेतलेल्या कर्जाऊ रक्कमा याही बँकांची देणी विभागात आहेत. या कर्जाऊ रकमांचे वेगळे महत्त्व यासाठी की भांडवल पर्याप्तता प्रमाण मोजताना त्यांचा पर्याप्ततेसाठी विचार केला जातो. रिझर्व्ह बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे प्रमाण सामान्यतः एकूण देयतेच्या ३% ते ६% असते. या शिवाय बँका भारतीय औद्योगिक विकास बैंक (IDBI) भारतीय निर्यात आयात बँक (EXIM), राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बैंक (NABARD), इत्यादी संस्थाकडूनही कर्ज घेतात.

 

राखीव निधी व भाग भांडवल याही बँकेच्या देयता भागातील बाबी आहेत. बँकेच्या नफ्यातून दरवर्षी काही रक्कम राखीव निधी म्हणून जमा केली जाते. या निधीवर भागधारकांची मालकी असते. त्यामुळे त्यांचा समावेश देणे विभागात असतो.

 

 

व्यापारी बँका विविध प्रकारच्या ठेवी स्विकारतात ?

 चालू ठेवी
 बचत ठेवी
 मुदत ठेवी

व्यापारी बँका अनेक कार्ये पार पाडतात

व्यापारी बँका विविध प्रकारच्या ठेवी स्वीकारतात जसे की बचत खाते ठेवी, चालू खाते ठेवी, आवर्ती खाते ठेवी आणि मुदत खाते ठेवी.

व्यापारी बँका किती प्रकारच्या आहेत?

सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँका
खाजगी क्षेत्रातील व्यावसायिक बँका
विदेशी क्षेत्रातील व्यावसायिक बँका

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment