सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय ? सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये , व्याप्ती , सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा – Micro Economic Information in Marathi – मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे जेव्हा व्यक्ती प्रोत्साहन, किंमती, संसाधने आणि/किंवा उत्पादन पद्धतींमध्ये बदलांना प्रतिसाद म्हणून निवड करतात तेव्हा काय घडण्याची शक्यता असते (प्रवृत्ती) याचा अभ्यास आहे. वैयक्तिक अभिनेते सहसा खरेदीदार, विक्रेते आणि व्यवसाय मालक यांसारख्या सूक्ष्म आर्थिक उपसमूहांमध्ये गटबद्ध केले जातात.
सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय ? Micro Economic Information in Marathi
सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्षी अर्थशास्त्र, व्यष्टी अर्थशास्त्र, विशिष्ट अर्थशास्त्र व एकलक्षी अर्थशास्त्र अशीही नावे आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीत Micro Economics असे म्हणतात. इंग्रजीतील Micro या शब्दाची उत्पत्ती मूळ ग्रीक शब्द Mikros यापासून झालेली आहे. Mikros या ग्रीक शब्दाचा मराठी अर्थ अत्यंत लहान किंवा दशलक्षांश भाग होतो.
अर्थशास्त्राचे जनक अॅडम स्मिथ यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासास सुरुवात केली. त्यानंतर रिकार्डो, जे. बी.से., प्रो. मिल मॉरिस डॉब, बोल्डिंग, डॉ. मार्शल पिगू, हिक्स, प्रो. सॅम्युअलसन, श्रीमती रॉबिन्सन इत्यादींनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात भर घातली.
सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ – Micro economic Meaning in Marathi
Micro म्हणजे लहान किंवा सूक्ष्म भाग यावरून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा संबंध हा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान आर्थिक घटकांशी आहे. वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा उत्पादनसंस्था, विशिष्ट वस्तूची किंवा उत्पादनाची किंमत इत्यादी वैयक्तिक आर्थिक वागणुकीचा आणि आर्थिक कृतीचा अभ्यास या शाखेत केला जातो.
सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ पुढील प्रमाणे समजून घेता येईल. अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकाचा किंवा छोट्या भागाचा स्वतंत्रपणे अभ्यास करणाऱ्या विश्लेषण पद्धतीला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात.
प्रा. के. ई. बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पुढीलप्रमाणे केली-
“एखादी विशिष्ट उद्योगसंस्था, विशिष्ट कुटूंब विशिष्ट वस्तूची किंमत, विशिष्ट व्यक्ती अथवा उद्योगसंस्थेचे उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय.”
प्रा. लर्नर यांच्या मते
” सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे जणू काही सूक्ष्मदर्शकातून निरिक्षण करून अर्थव्यवस्थेच्या शरीरातील प्रत्येक पेशीचा अभ्यास करते.”
सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरुप
आधुनिक अर्थशास्त्राचे जनक अॅडम स्मिथ यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राचा पाया घातला. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील निरनिराळे लहानात लहान एकक किंवा गट घेऊन त्यांचे विश्लेशण करण्यात येते. उदाहरणार्थ एखादा उपभोक्ता आपले संतुलन कसे साधतो याचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रात करण्यात येतो. संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उपभोगाचा विचार करीत नाही तसेच यात व्यक्तिगत मागणीचे किंवा उद्योगाच्या मागणीचे अध्ययन होते.
संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणीचा विचार हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय नाही वस्तूंची किंमत कशी निर्धारित होते. हा विचार होतो, देशातील सामान्य मूल्यस्तर कसा ठरतो याचा विचार होत नाही. विशिष्ट प्रकारचा मोबदला कसा ठरतो किंवा कोणत्या एखाद्या उद्योगात किती रोजगार उपलब्ध आहेत ह्याकडे सूक्ष्म अर्थशास्त्रात लक्ष देण्यात येते. संपूर्ण देशातील रोजगाराची पातळी कशी निर्धारित होते ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही.
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये – सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत-
1. वैयक्तिक युनिट्सचा अभ्यास
सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक उत्पादन आणि वैयक्तिक उपभोग स्पष्ट करण्यात मदत करते. हे गट किंवा व्यावसायिक परिस्थितीशी संबंधित नाही.
2.संपूर्ण अर्थव्यवस्थेवर प्रभावाचा अभाव
मायक्रोइकॉनॉमिक्समध्ये, युनिटचे स्वरूप इतके लहान आहे की त्याद्वारे केलेल्या बदलांचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर विशेष परिणाम होत नाही.
3.किंमत सिद्धांत
सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत किंवा मूल्याचा सिद्धांत देखील म्हणतात. या अंतर्गत मागणी आणि पुरवठा यानुसार विविध वस्तूंच्या वैयक्तिक किमती ठरवल्या जातात. या संदर्भात, आम्ही मागणी आणि पुरवठ्याच्या घटनांचा देखील अभ्यास करतो.
4.लहान चलांचा अभ्यास
सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहान चलांचा अभ्यास केला जातो, या चलांचा प्रभाव इतका कमी असतो की त्यांच्या बदलांचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत नाही.
5.संपूर्ण अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे गृहीत धरून
सूक्ष्म अर्थशास्त्रातील कोणत्याही एका घटकाच्या आर्थिक वर्तनाचे परीक्षण आणि विश्लेषण करताना, देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित गोष्टी जसे की राष्ट्रीय उत्पन्न, किमतीची पातळी, देशाची एकूण भांडवली गुंतवणूक, एकूण बचत आणि सरकारचे आर्थिक धोरण इ. . स्थिर मानले जाते. घेतले जाते.
सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती :
अर्थशास्त्राच्या उपभोग, उत्पादन, विनिमय व वितरण या विभागात सूक्ष्म विश्लेषण पद्धतीचा उपयोग करण्यातआला आहे.
- उपभोग सूक्ष्म विश्लेषण पद्धतीच्या आधारेच पटत्या सीमांत उपयोगीतेचा नियम, उपभोक्त्यांचे संतोषाधिक्य व समसीमांत उपयोगिता नियम इत्यादींचा अभ्यास केला जातो..
- उत्पादन विशिष्ट उद्योगातील उत्पादन परिमाण, त्यांचे उत्पादन खर्च इत्यादी गोष्टींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या साहाय्याने करण्यात येतो.
- विनिमय विशिष्ट वस्तूची व सेवेचे किंमत निरनिराळ्या परिस्थितीत कशाप्रकारे निश्चित होते याचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करते.
- वितरण: उत्पादन क्रियेत भाग घेणाऱ्या निरनिराळ्या उत्पादक घटकांमध्ये उत्पादनाची वाटणी कशा प्रकारे होते याचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रात होती.
सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व :
सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व पुढीलप्रमाणे सांगता येईल.
1. व्यक्तिगत आर्थिक प्रश्न समजण्यास उपयुक्त समाजात अनेक व्यक्ती राहतात, त्यातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे व्यक्तीला आपले आर्थिक प्रश्न कोणते आहेत, ते समजणे आवश्यक आहे. आपले आर्थिक प्रश्न कोणते आहेत ते समजल्याशिवाय व्यक्तीला त्यावर उपाय शोधता येत नाहीत. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाने व्यक्तीगत प्रश्न समजू शकतात. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तीगत प्रश्नांचा सखोल अभ्यास केला जातो.
2. व्यक्तिगत आर्थिक प्रश्न सोडविण्यास उपयुक्त देशातील असंख्य व्यक्तींना आपले आर्थिक प्रश्न सोडवावे लागतात. आपले मर्यादित उत्पन्न विविध वस्तूंवर कसे खर्च करावे? उत्पादनसंस्था आदर्श उत्पादन पातळी कशी निर्माण करतात? उत्पादन घटकांना रोजगार व उत्पन्न कोणत्या पद्धतीने मिळते? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विवेचनाने मिळतात. म्हणजेच व्यक्ती, कुटुंब, उद्योग संस्था यांना आपले आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो…
3.देशाच्या आर्थिक विकासास उपयुक्त देशातील अर्थव्यवस्थेत विविध घटक कार्य करत असतात.. उदा. भांडवलदार, कामगार, शेतकरी, उद्योगपती. देशाच्या अर्थव्यवस्थेतील व्यक्तिगत घटकांचा अभ्यास झाला नाही तर देशाचा आर्थिक विकास रोखला जातो. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाने अर्थव्यवस्थेतील व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करता येतो. त्यांचा विकास कसा होतो हे पाहता येते. त्यामुळे देशाचा आर्थिक विकास शक्य होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा आर्थिक विकास योग्य रीतीने करता येतो.
4.आर्थिक कल्याण समजण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तिच्या वर्तनाचा उपयोग यांचा अभ्यास केला जातो. समाजातील प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त कल्याण साध्य करण्याचा प्रयत्न करते. व्यक्तीच्या उत्पन्न पातळीवर त्याचे आर्थिक कल्याण अवलंबून असते. व्यक्तीचे उत्पन्न अधिक असेल, तिला अधिक वस्तू व सेवांचा उपभोग घेता येत असेल तर व्यक्तीचे कल्याण साधले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाने व्यक्तीचे आर्थिक कल्याण साध्य होते की नाही हे समजते.
5.अर्थव्यवस्थेचे कार्य समजते सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विश्लेषणाने अर्थव्यवस्थेचे कार्य कशाप्रकारे चालते हे समजते. अर्थव्यवस्थेमध्ये असंख्य उत्पादक विविध वस्तूंचे उत्पादनाचे कार्य करतात. उपलब्ध उत्पादन साधनाचे विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी वाटप कशा प्रकारे होते, वस्तू व सेवांचे उपभोक्त्यांमध्ये कसे वाटप करावे, यांचे विवेचन सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाने होते..
6.उद्योगसंस्थांना व उद्योगधंद्यांना उपयुक्त सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाने देशातील विविध उद्योगसंस्था आणि उद्योगांची काम करण्याची क्षमता समजते. तसेच देशातील उद्योगसंस्था व उद्योगधंद्यांना त्यांचे आर्थिक प्रश्न कसे सोडवावेत याचे मार्गदर्शन सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाने मिळते.
7.खाजगी अर्थव्यवस्थेचे कार्य समजते खाजगी अर्थव्यवस्थेत असंख्य उत्पादक व उपभोक्ते असतात. ते उत्पादक व उपभोक्ते विविध वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. केलेल्या उत्पादनाचे वाटप उपभोक्त्यांमध्ये कसे केले जाते, त्याचे मार्गदर्शन सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाने मिळते…
8.इतर फायदे आंतरराष्ट्रीय व्यापार, उत्पादन साधनांची किंमत, सार्वजनिक उत्पन्न खर्च, उत्पादन इ. : प्रश्नांची सोडवणूक करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते.
सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा :
सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा पुढीलप्रमाणे सांगता येतील.
1.संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येत नाही : सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करते वैयक्तिक घटकांच्या अभ्यासावरून देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेची माहिती होणे अशक्य असते. व्यक्तिगत घटकांपेक्षा देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती होणे अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाने संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येत नाही.
2.अवास्तव गृहीते सूक्ष्म अर्थशास्त्रात विविध आर्थिक घटकांचे विश्लेषण करताना कांही गृहीतांचा आधार घेतला जातो. परंतु ज्या गोष्टी गृहीत धरल्या आहेत त्या वास्तव परिस्थितीत कधीच नसतात. त्यामुळे गृहीत धरलेल्या गोष्टी चुकीच्या व अयोग्य वाटतात. उदा. – सूक्ष्म अर्थशास्त्र असे गृहीत धरते की, बाजारात पूर्णस्पर्धा असते. देशात पूर्ण रोजगाराची परिस्थिती असते इत्यादी. वास्तवात बाजारात कधीही पूर्ण स्पर्धा नसते व पूर्ण रोजगार नसतो. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राचे विश्लेषण अवास्तव किंवा चुकीच्या गृहीतावर आधारलेले आहे.
3. करणे अत्यंत महत्त्वाचे असते. उदा, एकूण बचत, गुतवणूक, राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वाटप, भांडवल, चलनविषयक धोरण, देशाचा आर्थिक विकास इत्यादी महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जात नाही..
4. सूक्ष्म अर्थशात्राच्या अभ्यासाने अविश्वसनीय निष्कर्ष: सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना विविध आकडेवारीचा वापर केला जातो. परंतु गोळा केलेली माहिती अविश्वसनीय असते. अशा माहितीवरून काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरतात. उदा. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घेतलेली व्यक्तिगत उत्पन्नाची माहिती योग्य असेलच असे नाही.
5. पूर्ण रोजगार असणाऱ्या अर्थव्यवस्थेला लागू : ज्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती असेल अशा अर्थव्यवस्थेला सूक्ष्म अर्थशास्त्र लागू पडते. परंतु प्रत्यक्षात जगातील कोणत्याही अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची परिस्थिती आढळत नाही. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राचे कार्यक्षेत्र खूपच मर्यादित आहे.
6. अनिश्चितता : सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिगत घटकांचा विचार करते. उदा. व्यक्तिगत उत्पन्न, बचत, उपभोग, परंतु देशाचे उत्पन्न, उत्पादन किती एकूण बचत किती, उपभोग किती यांचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जात नाही. वरील बाबींचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आधारे केल्यास त्यात मोठ्या प्रमाणात अनिश्चितता निर्माण होईल.
7. व्यक्तिगत निष्कर्ष समुहाला लागू पडणारे नसतात सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिगत घटकांचे अभ्यास करणारे शास्त्र आहे. परंतु व्यक्तिगत पटकावरून काढलेले निष्कर्ष समुहाला लागू पडत नाहीत. एखाद्या व्यक्तीने बचत केली असता ती फलदायी ठरेल. परंतु संपूर्ण समाजाने बचत केल्यास मागणी घटून मंदी व बेकारी निर्माण होईल. त्यामुळे व्यक्तिगत घटकासाठी काढलेले निष्कर्ष सर्व समुहाला लागू पडणारे नसतात.
8. समाजात स्वावलंबी घटक नसतात प्रत्यक्षात ज्या ठिकाणी प्रत्येक घटक हा स्वावलंबी असतो त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो. पण प्रत्यक्ष जीवनात स्वावलंबी घटक आढळत नाहीत. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासावर एक प्रकारची मर्यादा पडते.
अशाप्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाला काही मर्यादा पडत असल्या तरी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा स्थूल अर्थशास्त्रातील प्रश्नांवर प्रभाव पडतो ही गोष्ट नाकारता येत नाही.
- भांडवल बाजार म्हणजे काय ? भांडवल बाजाराचे कार्य , महत्व , भूमिका, घटक
- वित्तीय प्रणाली म्हणजे काय आहे ? अर्थ , महत्त्व, कार्य, भारतीय वित्तीय प्रणाली
फायनान्स म्हणजे काय ? फायनान्स चे अर्थ, प्रकार, कार्य ,फायनान्स चे महत्त्व
सूक्ष्म वित्तपुरवठा) मायक्रोफायनान्स म्हणजे काय ? मायक्रो फायनान्स चे फायदे ,
व्यवस्थापन म्हणजे काय ? व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये , व्यवस्थापनाची कार्य स्वाध्याय , महत्त्व आणि फायदे
स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ? स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, वैशिष्ट्ये, व्याप्ती, महत्व, मर्यादा
सूक्ष्म अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत?
आल्फ्रेड मार्शल हे इंग्रजी अर्थशास्त्रज्ञ आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे जनक होते. आल्फ्रेड मार्शल हे नवशास्त्रीय अर्थशास्त्राच्या तत्त्वांचे संस्थापक होते.
चार सूक्ष्म अर्थशास्त्राचे उदाहरण काय आहे?
सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक उत्पादन, फर्म, घरगुती, उद्योग, मजुरी, किंमती इत्यादींशी संबंधित आहे तर मॅक्रो इकॉनॉमिक्स हे राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, किंमत पातळी इ. यासारख्या एकूण गोष्टींशी संबंधित आहे.
सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग काय?
मायक्रोइकॉनॉमिक्स ही अर्थशास्त्राची एक शाखा आहे जी निर्णय घेण्याच्या आणि संसाधनांचे वाटप करताना वैयक्तिक, घरगुती आणि दृढ वर्तनाचा अभ्यास करते. यात वस्तू आणि सेवांच्या बाजारपेठांचा समावेश आहे आणि आर्थिक समस्यांशी संबंधित आहे.