नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामधील फरक – पैसा बाजार व भांडवल बाजार यामधील फरक,Nane bazar ani Bhandval bazar – नमस्कार मित्रमंडळी!! आपण या लेखात पैसा बाजार व भांडवल बाजार यामध्ये नेमकी काय फरक आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
पैसा बाजार म्हणजे ज्या ठिकाणी खरेदीदार व विक्रेते एकत्र येतात आणि वस्तू व सेवांची किंमत निश्चित होऊन देवाण-घेवान होते असे ठिकाण होईल.
तसेच पैसा बाजारात अल्पकालीन कर्जाची होते तर भांडवल बाजारात मध्यम व दीर्घकालीन कर्जाची देवाण-घेवाण होते. मध्यम व दीर्घकालीन स्वरूपाच्या कर्जाची देवाण-घेवाण या यंत्रेनेमार्फत होते त्यास भांडवल बाजाराचे म्हणतात.
नाणे बाजार आणि भांडवल बाजार यामधील फरक – Nane bazar ani Bhandval bazar
पैसा बाजार(नाणे बाजार) | भांडवल बाजार |
1.अल्पमुदतीच्या कर्जाची देवाण-घेवान ज्या यंत्रणेमार्फत होते त्यास पैसा बाजार म्हणतात. | 1. दीर्घ मुदतीच्या कर्जाची देवाण-घेवाण जयंत्रेनेमार्फत होते त्याच भांडवल बाजार म्हणतात. |
2. उद्योग व्यवसायाची खेळत्या भांडवलाची गरज पैसा बाजारा मार्फत पूर्ण केली जाते. | 2.उद्योग व्यवसायाच्या स्थिर भांडवलाची गरज भांडवल बाजारा मार्फत पूर्ण केली जाते. |
3. पैसा बाजारात विनिमय विपत्रे, ठेव प्रमाणपत्रे, वगैरे साधनांच्या साहाय्याने व्यवहार केले जातात. | 3. भाग भांडवल बाजारात कंपन्यांचे भाग, कर्जरोखे, दीर्घ मुदतीच्या सरकारी रोखे, इत्यादी साधनांच्या मदतीने कर्जाची देवाण-घेवाण होते. |
4. मध्यवर्ती बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, परकीय बँका या पैसा बाजारातील प्रमुख संस्था आहेत. | 4. विकास बँक(उदा.IDBI,ICICI)विमा कंपन्या, परस्परनिधी इत्यादी भांडवल बाजारातील प्रमुख संस्था आहेत. |
5. मागणीदेय पैसा बाजार, तारण कर्जबाजार, विपत्र बाजार, अल्पमुदतीच्या सरकारी कर्जरोख्यांचा बाजार वगैरे पैसा बाजाराचे उपबाजार आहेत. | 5. भाग बाजार, कर्जरोख्यांचा बाजार, सरकारी कर्जरोखे बाजार हे भांडवल बाजाराचे उपबाजार आहेत. |
6. पैसा बाजारातील व्याजदरात बदल झाल्यास त्याचा परिणाम भांडवल बाजारातील व्याजदरावर होतो. | 6. भांडवल बाजारातील व्याज दरात बदल झाल्यास त्याचा परिणाम पैसा बाजारातील व्याजदरावर होतो. |
(नाणे बाजार) पैसा बाजार म्हणजे काय – What Is Money Market In Marathi
नाणे बाजार बाजार म्हणजे ज्या ठिकाणी खरेदीदार व विक्रेते एकत्र येतात आणि वस्तू व सेवांची किंमत निश्चित होऊन देवाण-घेवाण होत असते असे ठिकाण होय.या अर्थाने बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण नाहीतर ज्या ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री होते त्या सर्वच ठिकाणी बाजार अस्तित्वात येतो. पैसा बाजारात चलनाची देवाण-घेवाण होत नाही तर भांडवलाची देवाण-घेवाण होते. कर्ज व्यवहाराच्या रूपात ही देवाणघेवाण होत असते.
ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे ते आपल्याकडील पैसा ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्यांना वापरण्यासाठी देतात. कर्ज घेणारे पैसा वापरण्याचा मोबदला म्हणून व्याज देतात.
आर्थिक व्यवहारात सहभागी झालेले उद्योजक, व्यापारी, शेतकरी वगैरेंना वेगवेगळ्या कारणांसाठी व वेगवेगळ्या मुदतीसाठी कर्जाची आवश्यकता असते. या कर्जाची गरज भागविण्याचे कार्य ज्या व्यवस्थेतून होते त्या संदर्भात पैसा बाजाराचा विचार केला जातो. शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या खरेदीसाठी तसेच शेतात काम करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्यासाठी अल्पकालीन कर्जाची आवश्यकता असते.
भांडवलबाजार म्हणजे काय – What Is Term Capital Market In Marathi
पैसाबाजारात अल्पकालीन कर्जाची देवाण-घेवाण होते. तर भांडवल बाजारात मध्यम व दीर्घकालीन कर्जाची देवानघेवान होते. उद्योग व्यवसायास स्थिर व खेळते असे दोन प्रकारचे भांडवल आवश्यक असते. खेळते भांडवल दैनंदिन खर्च भागविण्यासाठी आवश्यक असते. या भांडवलाची गरज पैसा बाजारा मार्फत पूर्ण होते. स्थिर भांडवल हे टिकाऊ भांडवल्ली वस्तू, यंत्रसामग्री विकत घेण्यासाठी आवश्यक असते.
मुद्रा बाजार आणि भांडवली बाजार यांच्यात काय फरक आहे?
मनी मार्केटमध्ये, फक्त अल्पकालीन द्रव आर्थिक साधनांची देवाणघेवाण केली जाते. तर, भांडवली बाजारात, केवळ दीर्घकालीन रोख्यांवर व्यवहार केला जातो
भांडवल बाजारात किती काळासाठी कर्ज दिले जाते?
सर्व प्रकारचे गैर बँक व्यवहार आणि 13 महिन्यापेक्षा जास्त मुदतीचे व्यवहार भांडवली बाजारात होतात.
भांडवली बाजाराचे ३ प्रकार कोणते?
शेअर बाजार, रोखे बाजार आणि चलन आणि परकीय चलन (फॉरेक्स) बाजार