सत्यापन आणि प्रमाणन यातील फरक ? Verification आणि Certifying) यातील फरक – Satyapan ani Pramanan yatil farak 

मित्रांसह शेअर करा - Share this
Rate this post

सत्यापन (Verification) आणि प्रमाणन  (Certifying) यातील फरक व त्यांचे अर्थ,सत्यापन आणि प्रमाणन यातील फरक ? Verification आणि Certifying) यातील फरक – Satyapan ani Pramanan yatil farak

नमस्कार मित्रमंडळी!!! आपण यालेखात सत्यापन आणि प्रमाणान  यातील फरक पाहणार आहोत.तसेच आपण यांचे अर्थ देखील समजून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून  तुम्हाला सत्यापन  आणि प्रमाणान  यातील फरक समजण्यास  मदत होईल  व याची माहिती प्राप्त होईल.

खूप वेळ आहे प्रमाणन  आणि सत्यापन  दोन्हीही एकच असल्याचे समजले जाते. परंतु ही दोन्हीही एक नाही.  या दोघांमधील सीमारेषांनी निश्चित केलेल्या आहेत. प्रथम नोंदी पुस्तकात नोंदलेल्या व्यवहारांच्या खरेपणाबद्दल व अचूकतेबद्दल केली जाणारी तपासणी म्हणजे प्रमाणन. याउलट सत्यापन  म्हणजे ताळेबंदातील मालमत्ता देयतेच्या मूल्यांबद्दल खात्री करून घेणे होय. सत्यापन  आणि प्रमाणन यातील फरक खालील प्रमाणे आहे – 

सत्यापन आणि प्रमाणन यातील फरक - Satyapan ani Pramanan yatil farak
सत्यापन आणि प्रमाणन यातील फरक – Satyapan ani Pramanan yatil farak

सत्यापन आणि प्रमाणन यातील फरक – Satyapan ani Pramanan yatil farak 

 

          प्रमाणन (Certifying)                 सत्यापन (Verification)
1.प्रमाणनात पुस्तका प्रत्येक  व्यवहाराची सत्यता तपासून/ पडताळून पाहण्यासाठी संबंधित प्रमाणकांचा आधार घेतला जातो.1.सत्यापनात प्रमाणात शिवाय उपलब्ध असलेल्या सर्व संभाव्य साधनांचा उपयोग करून मालमत्ता किंवा देवतेच्या खरेपणाविषयी खात्री करून घेतली जाते. 
    2.प्रमाणन केव्हाही करता येते.विशिष्ट काळ  केले जाते असे नाही.2.सत्यापन सर्व लेखा पुस्तके बंद करून अधिके काढल्यावरच करता येते.
3.सत्यापन  करण्यापूर्वी संपत्तीचे/ मालमत्तेचे प्रमाणन करणे आवश्यक आहे.3. प्रमाणन करण्यासाठी आवश्यकता नसते.
4.प्रमाणनात नोंदीचे परीक्षण केले जाते.4. सत्यापनात संपूर्ण लेखनाचे/ खात्याचे परीक्षण करावे लागते.
5.प्रमाणनात मालमत्ता आणि देणी यांचे मूल्यांकन होत नाही.5. सत्यपणात मालमत्ता आणि देणी यांचे मूल्यांकन करावेच लागते.
6. व्यवहाराच्या अधिकृतपणाविषयी प्रमाणनाचे खात्री केली जाते.6. मालमत्ता आणि  देतेच्या सत्यापनाबद्दल खात्री होते.

 

सत्यापनाचा अर्थ – Verification Meaning In Marathi

 

सत्यापन म्हणजे सत्य सिद्ध करणे अथवा त्याची खात्री पटवणे, संपत्तीचे सत्यापन म्हणजे संपत्ती बाबत सत्य सिद्ध करणे होय.

 जिंदगीचे/ मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेचे मूल्य, मालकी व मालकी हक्क अस्तित्व,ताबा आणि तिची भारयुक्तता म्हणजेच तिच्या कारणावर काही कर्ज काढलेले असल्यास याची चौकशी करणे होय.

 जिंदगीचे/ मालमत्तेचे  सत्यापन म्हणजेच तिचा खरेपणा सिद्ध करणे आहे.

 

 संपत्तीचे व  देण्याचे सत्यापन म्हणजे ताळेबंदातील मालमत्ता आणि देणी खरोखरच अस्तित्वात आहेत याविषयी खात्री करून घेण्यासाठी करावी लागणारी कारवाई होय. सत्यापन म्हणजे स्थिती विवरणातील मालमत्ता व देयतेच्या मूल्याबद्दल खात्री करून घेणे, मालमत्ता मिळालेली आहे किंवा नाही हे पाहणे एवढेच हिशेब तपासणीसाचे काम नाही तर त्याला लेखा पुस्तकात नोंदवलेली मालमत्ता व्यवसायात अस्तित्वात आहे हे प्रमाणित करावे लागते तसेच ही संपत्ती पक्षकाराच्या/ अशिलाच्या मालकीची आहे व स्थितीवरणाच्या दिवशी तिचे अचूक मूल्यांकन झालेले आहे हे देखील प्रमाणित करावे लागते.

 

सत्यापनाची व्याख्या

  सत्यापन म्हणजे सत्य सिद्ध करणे अथवा त्याची खात्री पटवणे, संपत्तीचे सत्यापन म्हणजे संपत्ती बाबत सत्य सिद्ध करणे होय. 

 

प्रमाणनाचा अर्थ –  Certifying Meaning In Marathi

 

प्रमाणन  म्हणजे लेखा पुस्तकात  लिहिल्या गेलेल्या नोंदीच्या संदर्भाततील पुरावे होय. व्यवसायामधील व्यवहारांचे अंकेक्षण करीत असताना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. उदाहरणार्थ, एक हजार रुपयांचा  माल खरेदी केला, असा जर व्यवहार झालेला असेल तर हा एक हजार रुपये किमतीचा माल कुणाकडून खरेदी केला?  माल रोखीने खरेदी केला की उधारीने? या व्यवहारात काही सूट मिळाली का? 

मिळाल्यास किती? ती योग्य वाटते का? व्यवहारात पैसे कसे देण्यात आलेत म्हणजे चेकने की रोखीने? या सर्व अंकेक्षकाच्या प्रश्नांची उत्तरे देणारी कागदपत्रे, दस्तऐवज म्हणजेच  प्रमाणन होय. थोडक्यात, लेखा पुस्तकात लिहिले गेलेले खर्चाचे आकडे बरोबर आहेत याचा पुरावा म्हणजेच प्रमाणन. उदाहरणार्थ, पावती, बिजक, आदेश, कारनामा इत्यादी. 

 

प्रमाणनाची व्याख्या 

लेखा पुस्तकातील नोंदीची सत्यता पटवून देण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या लेखिकागतपत्राला, प्रपत्राला, दस्तऐवजाला किंवा लेखी पुराव्याला प्रमाणन असे म्हणतात. 

 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment