सत्यापन म्हणजे काय ? सत्यापन चा अर्थ आणि त्याचे उद्देश व प्रकार – Satyapan in Marathi 

मित्रांसह शेअर करा - Share this
Rate this post

सत्यापन चा अर्थ आणि त्याचे उद्देश व प्रकार. सत्यापन म्हणजे काय ? सत्यापन चा अर्थ आणि त्याचे उद्देश व प्रकार – Satyapan in Marathi –नमस्कार मित्रमंडळी!!!! आपण या लेखात सत्यापन म्हणजेच मोजमापाचा संपूर्ण अर्थ व त्याचे प्रकार आणि उद्देश याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला सत्यपणाबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होण्यास मदत होईल.

सत्यापन म्हणजे काय  Satyapan in Marathi 

सत्यापन म्हणजे काय ? Satyapan in Marathi 

  सत्यापन म्हणजे सत्य सिद्ध करणे अथवा त्याची खात्री पटवणे, संपत्तीचे सत्यापन म्हणजे संपत्ती बाबत सत्य सिद्ध करणे होय.

  स्पायसरआणि ते कलर या लेखकांच्या मते- जिंदगीचे/ मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेचे मूल्य, मालकी व मालकी हक्क अस्तित्व, ताबा आणि तिची भारयुक्तता म्हणजेच तिच्या तारणावर काही कर्ज काढलेले असल्यास त्याची चौकशी करणे होय.

 टंडन ह्या लेखकाच्या मते, जिंदगीचे/ मालमत्तेचे सत्यापन/ मोजमाप म्हणजे तिचा खरेपणा सिद्ध करणे होय. 

 

  सत्यापनाचे/ मोजमापाचे उद्देश – Objective Of Verification In Marathi

मालमत्तेच्या सत्यापनाचे उद्देश खालील प्रमाणे आहेत –

  1. ताळेबंदातील सर्व मालमत्ता अस्तित्वात आहे याची खात्री करणे.
  2.  ताळेबंदात मालमत्ता योग्य मूल्याने दाखविल्याबाबत समाधान करून घेणे.
  3.  मालमत्तेवर कोणताही  प्रभार नसल्याची खात्री करून घेणे.
  4. ताळेबंदात दाखवलेली सर्व मालमत्ता व्यवसायाच्या मालकीची असल्याची खात्री करून घेणे.
  5.  मालमत्तेचा उपयोग व्यवसायाकरिताच केला जातो याची खात्री करून घेणे.
  6.  मालमत्तेविषयी केलेला खोटेपणा शोधून काढणे.

 

 देयत्यांच्या सत्यापनाचे उद्देश खालील प्रमाणे आहे –

  1. व्यावसायिकाच्या/ पक्षकाराच्या सर्व देण्याचा उल्लेख ताळेबंदात केला आहे, याची खात्री करून घेणे.
  2.  ताळेबंदात दाखवलेली सर्व देणे वास्तविक असल्याबद्दल खात्री करून घेणे.
  3.  ताळेबंदात दाखवलेली सर्व देणे योग्य मूल्याने दाखविली असल्याबाबत खात्री करून घेणे.
  4.  देयतेविषयी केलेला खोटेपणा शोधून काढणे.

 वरील सर्व गोष्टींची तपासणी करून त्याबद्दल स्वत:चेसमाधान व खात्री करून घेणे हा सत्यापनाचा उद्देश असतो.

 

सत्यापनाचे  – Types Of Verification In Marathi

 

सत्यपानाचे/ मोजमापाचे प्रकार खालील प्रमाणे आहेत –

 

संपत्ती व देयतांचे सत्यापन – Verification Of Assets And Liabilities 

 संपत्तीचे व देण्याचे  सत्यापन  म्हणजे  ताळेबंदातील मालमत्ता आणि देणी खरोखरच अस्तित्वात आहे याविषयी खात्री करून घेण्यासाठी करावी लागणारी कारवाई होय,  सत्यापन म्हणजे  स्थिती विवरणातील मालमत्ता व देयतेच्या मूल्याबद्दल खात्री करून घेणे, मालमत्ता मिळालेली आहे किंवा नाही हे पाहणे एवढेच  हिशेब तपासणीसाचे काम नाही तर त्याला खालील गोष्टी प्रमाणे कराव्या लागतात.

1)  लेखा पुस्तकात नोंदवलेली मालमत्ता व्यवसायात अस्तित्वात आहे.

2) ही संपत्ती पक्षकाराच्या/ शिलाच्या मालकीची आहे.

3) स्थितीवरणाच्या दिवशी तिचे अचूक मूल्यांकन झालेले आहे.

4) मालमत्तेचा दैनंदिन व्यवहारात उपयोग केला जातो. 

 

विविध मालमत्ता/ संपत्तीचे सत्यापन – Verification Of Various Assets

ताळेबंदात दर्शविण्यात येणाऱ्या विविध मालमत्ता/ संपत्तीची सत्ता पण कसे केले जाते ते खालील प्रमाणे –

  1. ख्यातीमूल्य/ छातीत्व 
  2.  जमीन (भूमी)  व इमारत
  3.  यंत्रसामग्री
  4.  फर्निचर, फीक्चर, फिटिंग
  5.  मोटार व इतर वाहने
  6.  एकस्व किंवा एकस्ववाधिकार व व्यापारी चिन्ह

 

विविध देयता/देण्याचे सत्यापन – Verification Of Liabilities 

मालमत्तेचे सत्यापन करणे ज्याप्रमाणे महत्त्वाचे समजले जाते त्याचप्रमाणे देयतांचे देखील सत्यापन करणे अत्यंत आवश्यक असते. जर देयता अगर देनी कमी किंवा जास्त दाखवण्यात आली तर ताळेबंदात आर्थिक परिस्थितीचे खरे स्वरूप प्रदर्शित होणार नाही.त्याचबरोबर नफा तोटा खाते देखील खरा नफा  दाखविणार नाही. म्हणून देयता खरी व अधिकृत असल्याची खात्री अंकेक्षकाने करणे आवश्यक ठरते.

 विविध देण्याचे सत्यापन खालील प्रमाणे आहे –

  1. विविध धनको/ व्यापारी देणी
  2.  कर्जाच्या संदर्भातील देयता
  3.  कर्जरोखे
  4.  देय विपत्र/ देणे हुंड्या
  5.  अदत्त देणी/, वेळ खर्च बद्दल देणी
  6.  संभाव्य देयता

 

सत्यापनासंबंधी अंकेक्षकाची कर्तव्य

 व्यवसायातील मालमत्तेच्या सत्यापनाविषयी आणि देयतेच्या सत्यापना संबंधित अंकेक्षकाची कर्तव्य निश्चित केली आहेत.

अ) मालमत्तेच्या सत्यापनाविषयी अंकेक्षकाचे कर्तव्य खालील प्रमाणे सांगता येतील–

  1. सर्व खात्यांची ताळेबंदाशी तुलना करणे.
  2.   लेख्यामध्ये लिहिलेली प्रत्येक संपत्ती/ मालमत्ता अस्तित्वात असल्याची खात्री करणे.
  3.  मालमत्तेवर व्यवसायाच्या मालकाचा ताबा आहे हे सिद्ध करणे.
  4.  व्यवसायातील मालमत्ता गहाण टाकली  असल्यास शोधून काढणे.
  5.  मालमत्तेचा उपयोग व्यवसायाकरिताच केला जातो याविषयी खात्री करून घेणे.
  6.  मूळ मालमत्तेमध्ये कोणत्या प्रकारचा बदल केला गेला किंवा काय याबद्दल खात्री करून घेणे.
  7.  मालमत्तेवर घसारा व त्याचा दर योग्य असल्याची खात्री करून घेणे.
  8.  व्यवसायातील मालमत्तेवर कोणताही प्रभाव नसल्याची खात्री करून घेणे.
  9.  व्यवसायातील एकूण सर्व मालमत्तेचा उल्लेख ताळेबंदात योग्य प्रकारे केल्या असल्याची खात्री करून घेणे.
  10.  मालमत्तेविषयी केलेला खोटेपणा शोधून काढणे. 

 

आ) देयतेच्या सत्यापना संबंधित अंकेक्षकाचे खालील प्रमाणे कर्तव्य निश्चित करता येतील–

 

  1. व्यवसायातील सर्व देयतेच्या नोंदी ताळेबंदात योग्य प्रकारे केल्या गेल्या आहेत याविषयी खात्री करून घेणे.
  2.   ताळेबंदात दर्शविलेली देयता व्यवसायाशी संबंधित असल्याची खात्री करून घेणे.
  3.  त्याच्या रकमा कमी अथवा जास्त दाखविलेल्या नाहीत याविषयी खात्री करून घेणे.
  4.  या तारखेचा ताळेबंद आहे त्या तारखेला ती देयता आणि त्याची तपासणी करणे.
  5.  प्रत्यक्ष  देयतेमध्ये संधीग्ध देयतेचा समावेश केला असेल तर त्याचा शोध घेणे आणि अशी देयता स्वतंत्रपणे दर्शविणे.
  6.  थकीतदायत्वाची योग्य ती नोंद घेतली गेली आहे याविषयी खात्री करून घेणे.
  7.  दायित्व संबंधीच्या रकमा  व्यवसायाच्याच आहेत, व्यक्तिगत नाहीत याविषयी खात्री करून घेणे.
  8. ताळेबंदात संभाव्य देयता दर्शविली असल्यास ती योग्य व अधिकृत आहे याविषयी खात्री करून घेणे.
  9. देयते विषय केलेला खोटेपणा शोधून काढणे,

 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment