कर म्हणजे काय ? कराचे प्रकार, करा ची वैशिष्ट्ये आणि कराची व्याख्या – Tax information in Marathi 

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (1 vote)

कर म्हणजे काय ? कराचे प्रकार, करा ची वैशिष्ट्ये , प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर- Tax information in Marathi नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात कराबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. यात आपण कराची व्याख्या व त्याचा अर्थ, कर म्हणजे नेमके काय असते, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, व त्याची वेगवेगळे प्रकार त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तरी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला कराबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होण्यास मदत होईल.

कर म्हणजे काय  Tax information in Marathi 

कर म्हणजे काय ? Tax information in Marathi 

आयकर म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नावरील कर होय. ज्या व्यक्तीचे उत्पन्न कर पात्र मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला कर भरावा लागतो. त्यासाठी अर्थविधेयकात (Finance Act) करपात्र उत्पन्न ठरविले जाते.भारतात इंग्रजी राजवटीतील 1860 पासून कर सुरू झाला.? सरकारला आपले खर्च भागविण्यासाठी महसूल मिळवावे लागते. 

 

सरकारला देशात शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित करावी लागते. त्याचप्रमाणे देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारला असते. आज सरकारच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे देशाचे संरक्षण करणे व शांतता प्रस्थापित करणे एवढे सरकारचे काम नाही. देशाचा आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास घडवून आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारला खर्च करावा लागतो. हा खर्च करण्यासाठी विविध मार्गाने उत्पन्न मिळवावे लागते. कर आकारणी द्वारे उत्पन्न मिळवण्याचा मार्ग  हा योग्य मार्ग आहे.

 

सरकारी खर्च  भागविण्यासाठी कररूपाने उत्पन्न मिळवण्याचे तत्व सर्वसामान्य झालेले आहे. कराद्वारे आपले उत्पन्न कसे वाढवता येईल, याचा विचार अंदाज पत्रक मांडताना अर्थमंत्र्यांना करावा लागतो. कर आकारणी करताना सरकारला भरपूर उत्पन्न मिळेल व जनतेला कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने कराचे स्वरूप व दर ठरवावे लागतात. भारतीय कर रचनेतील संधीग्धता दूर करून ती पारदर्शक व प्रभावी ठरावी तसेच त्यात दीर्घकालीन सुधारणा व्हाव्यात,

 या हेतूने श्री. विजय केळकर समितीने नुकतेच काही शिफारशी केले आहेत. त्या कर रचनेतील सवलती रद्द करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. भविष्यकालीन आर्थिक घडामोडींमध्ये होणाऱ्या बदलांची नोंद आहे. त्या दृष्टिकोनातून देखील कर आकारणी समजावून घेणे अत्यावश्यक ठरते. 

 

करा ची व्याख्या व अर्थ – Definition And Meaning Of Taxation In Marathi

सरकारच्या उत्पन्नाच्या साधनांपैकी कर हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. कर म्हणजे जनतेने सरकारला सक्तीने द्यावयाची रक्कम होय. कराच्या मोबदल्यात काही विषय सवलतींची आश्वासन सरकारने करदात्याला दिलेले नसते. म्हणजे कर भरल्यामुळे करदात्याला प्रत्यक्ष असा विशिष्ट मोबदला मिळत नाही. 

 

या कराच्या उत्पन्नातून सरकार सर्वसामान्य जनतेसाठी काही सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देत असते. याचा फायदा सर्व व्यक्तींनाच होतो. त्याचा प्रत्यक्ष संबंध व्यक्तीने भरलेल्या कराशी नसतो. कर म्हणजे विविध कार्य पार पाडण्यासाठी सरकारद्वारे सक्तीने वसूल केलेली वर्गणी होय. कराची संकल्पना विविध तज्ञांनी खालील प्रमाणे स्पष्ट केली आहे–

 सेलिंगमन: कर म्हणजे लोकांकडून सक्तीने वसूल केलेली वर्गणी आहे व तिचा उपयोग सर्वांचे हितासाठी केला जातो. वैयक्तिक लाभाशी त्याचा काही संबंध नाही.

 

टेलर:कोणत्याही प्रत्यक्ष लाभाची अपेक्षा न करता जनतेने सरकारला केलेले सक्तीचे शोधन म्हणजे कर होय.

 

ॲडम्स: कर म्हणजे राज्यासाठी जनतेने केलेले योगदान  होय.

 

 डॉ. डाल्टन: कर हे सक्तीचे देणे आहे व त्याचा सममूल्य सेवेची काही संबंध नाही. 

 

करा ची वैशिष्ट्ये – Features Of Taxation In Marathi

 

1)कर सक्तीचे आहेत:

 प्रत्येक व्यक्तीला त्याच्यावर आकारलेले कर सक्तीने द्यावे लागतात. कर न भरणे कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी व्यक्तीला शिक्षक देखील होऊ शकते. काही कर हे संरक्षणात्मक करत असतात. उदाहरणार्थ, लहान उद्योगाला संरक्षण मिळावे म्हणून मोठ्या उद्योगात तयार होणाऱ्या वस्तूंवर कर आकारणे, देशी उद्योगाला संरक्षण देण्यासाठी विदेशी वस्तूंचे आयातीवर कर लावणे.

 

2) सार्वजनिक फायदे:

 करामुळे विशिष्ट व्यक्तीला, करदात्याला काही ठराविक फायदे देण्याची हमी सरकारने दिलेली नसते. कराचा उपयोग सार्वजनिक सेवा, सुविधा निर्माण करण्यासाठी केला जातो. त्याचा फायदा जनतेला होतो. उदाहरणार्थ, रस्ते, शाळा, दवाखाने, सार्वजनिक वाचनालय, इत्यादी.

 

3) कराराचा अभाव:

 सरकार व करदाता यांच्यामध्ये कराराबाबत कोणताही करार झालेला नसतो. कराराच्या मोबदल्यात प्रत्यक्ष करदाराला विशिष्ट फायदे दिले जातील, असे आश्वासन किंवा कोणतीही हमी सरकार कराद्वारे देत नाही. कराची रक्कम उपलब्ध सार्वजनिक सेवा यांचा काही संबंध नाही. करआकारणीनुसार कर दाता कर भरतो. सरकार आपल्या नियोजनाप्रमाणे सार्वजनिक सेवांसाठी खर्च करते. विशिष्ट सेवा  करदात्यांना पुरवण्याबाबत सरकार व करदाते यांच्यामध्ये करार होत नसतो.

 

4) कर न देणे गुन्हा:

 करआकारणीप्रमाणे करदात्याला कर भरावे लागतात. कर न भरल्यास तर गुन्हा आहे असे समजून करता त्यावर कारवाई केली जाते. कर सार्वजनिक खर्च करून काढण्यासाठी आकारले जातात. शासनाचा महसूल वाढविण्यासाठी कर लावले जातात. विविध विकास प्रकल्प राबविण्यासाठी शासकीय उत्पन्न वाढविणे आवश्यक असते. त्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे कर आकारले जातात.

 

5)व्यक्तींच्या उत्पन्नातील तफावत दूर करण्यासाठी श्रीमंतांवर कर लावून गोरगरिब लोकांना जादा सवलती उपलब्ध करण्यासाठी प्रगतशील कर आकारले जातात. कर फक्त सरकारच आकारू शकते. कर म्हणजे राज्यासाठी नागरिकांनी केलेले योगदान होय.

 

कराचे प्रकार – Taxation Types In Marathi

कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारला विविध प्रकारचे कर आकारावे लागतात. प्रत्येक नागरिकांनी कर भरला पाहिजे यासाठीही सरकारला आपल्या कराची जाळी व्यापक करावे लागतात.

 

1) प्रमाणशीर कर (Proportional Taxes)

व्यक्तीच्या उत्पन्नावर जेव्हा एकाच दराने कर आकारले जातात, त्याला प्रमाणशीर कर असे म्हणतात. उदाहरणार्थ, सर्व व्यक्तींच्या उत्पन्नावर 25% कर लावला जातो तर तो प्रमाणशीर कर होय. गरीब  किंवा श्रीमंत व्यक्ती एकाच दराने कर देतील. आधुनिक युगात अशा प्रकारे आकारला जात नाही; कारण तो प्रतिगामी ठरतो.

2)प्रगतशील कर(Progressive Taxes)

व्यक्तीच्या उत्पन्न वाढीच्या प्रमाणात जेव्हा कराची दरही वाढत असतात तेव्हा अशा कराला प्रगतशील कर म्हणतात. यात केवळ स्वराची रक्कमच नव्हे तर कराचे दरही वाढत्या उत्पन्नाच्या पातळीप्रमाणे वाढत जातात. उदाहरणार्थ, भारतातील आयकर हा प्रगतशील कर आहे. समजा 50,000 रुपये  उत्पन्न असलेल्या व्यक्तीला कुठलाही कर नाही.

50,000 ते 1,00,000 =15%,1,00,000 ते 2,00,000=20% व त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 30% असे कर आकारले जातात तर ते प्रमाणशील कर होतात. यामागे नैसर्गिक न्यायाची तत्त्व आहे. प्रत्येकाने आपले कर देण्याच्या क्षमतेनुसार कर भरावेत म्हणजे प्रत्येकावर करायचा प्रभाव सारखा पडेल.

 

3)प्रतिगामी कर(Regressive Taxes)

 

प्रतिगामी कर हे नेहमी प्रगतशील कराच्या अगदी विरुद्ध असतात. यात उत्पन्न वाढत जाते तसे कराचे दर कमी होत जातात. म्हणजे श्रीमंत व्यक्तीला कमी दराने तर गरीब व्यक्तीला जास्त दराने कर भरावे लागतात. असे कर कोणत्याही   सुसंस्कृत राष्ट्रात लावले जात नाही. उलट असा प्रयत्न केला जातो की प्रत्येक कर हा प्रगतशील कसा करता येईल.

 

4)विशिष्ट कर(Specific Tax )

विशिष्ट कर वस्तूवर तिच्या वजनानुसार आकारले जाते.जड परंतु कमी किमतीच्या वस्तूवर हे कर लावले जातात. असे कर प्रतिगामी समजले जातात.

 

5)किमतीनुसार कर(Ad-Valorem Tax)

असे कर वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतात. किंमत जास्त असल्यास करही जास्त भरावा लागतो. हलक्या परंतु भारी किमतीच्या वस्तूवर हे कर आकारले जातात. उदाहरणार्थ, सोने व चांदी.

 

6)प्रत्यक्ष कर(Direct Taxes)

प्रत्यक्ष कर हे ज्या व्यक्तीने भरावेत, अशी शासनाची अपेक्षा असते त्याच व्यक्तीकडून भरले जातात. म्हणजे कर भरण्याची जबाबदारी व कराचा भाग एकाच व्यक्तीवर पडतो तेव्हा त्या करायला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. जोकर ज्या व्यक्तीवर लावला जातो व त्या व्यक्तीकडून भरला जातो अशा करार प्रत्यक्ष करत असे म्हणतात.

 

7)अप्रत्यक्ष कर(Indirect Taxes)

देशाच्या उत्पन्नातील मोठा वाटा अप्रत्यक्षक कराचा असतो. असे कर व्यक्ति पेक्षा वस्तूवर लावलेले असतात. प्रत्येक नागरिक हा ग्राहक असतो. तो वस्तू खरेदी करत असतो. त्यामुळे त्याला कर भरावाच लागतो. असे कर वस्तूच्या  उत्पादनावर, विक्रीवर व आयातीवर भरावेच लागतात. गरीब व्यक्तीला त्याचप्रमाणे श्रीमंतांनाही हे कर भरावे लागतात. 

 

अप्रत्यक्ष कर म्हणजे काय?

अप्रत्यक्ष कर हा वस्तू आणि सेवांच्या वापरावर आकारला जाणारा कर आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर थेट आकारले जात नाही

भारतात अप्रत्यक्ष कर काय आहेत?

सीमाशुल्क, वस्तू आणि सेवा कर (GST), उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर (VAT), विक्रीकर हे भारतात लागू होणारे काही प्रमुख अप्रत्यक्ष कर आहेत

उत्पादन कर म्हणजे काय?

उत्पादन कर किंवा उत्पादन अनुदान हे उत्पादनाच्या संबंधात दिले जातात किंवा प्राप्त केले जातात आणि वास्तविक उत्पादनाच्या परिमाणापेक्षा स्वतंत्र असतात 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment