स्टेल चेक म्हणजे काय ? – Stale Cheque Meaning In Marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
Rate this post

 स्टेल चेक म्हणजे काय ? Stale Cheque Meaning In Marathi ,नमस्कार मित्रमंडळी!!आपण आज या लेखात बघणार आहोत की स्टेल  चेक काय असते, त्याचा अर्थ काय होतो याची संपूर्ण माहिती आपण  जाणून घेणार आहोत.जर तुम्ही चेकने पेमेंट घेण्यासाठी जात आहे अथवा बँकेत चेक प्रेझेंट करण्यासाठी जात आहात तर तुम्हाला स्टेल  चेक बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

 

 स्टेल चेक म्हणजे काय ? Stale Cheque Meaning In Marathi

स्टेल चेक म्हणजे काय – Stale Cheque Meaning In Marathi

जेव्हाही आपण कोणताही चेक भरत असतो तेव्हा आपण त्यात दिनांक नेहमीच टाकत असतो.  डेट शिवाय चेक व्हॅलिड मानल्या जात नाही. जेही डेट आपण  त्या चेक वर टाकतो तो चेक तीन महिन्यापर्यंत  व्हॅलिड असतो.

तुम्ही डेट च्या कॉलम मध्ये बघू शकता त्यातही Valid of three month असे लिहलेले असते म्हणजेच चेक वरती जी दिनांक टाकलेली आहे त्या तारखेनंतर तीन महिन्यापर्यंत ते चेक व्हॅलिड आहे. या दिनांक च्या आत मध्ये तुम्ही बँकेत जाऊन कधीही रोख रक्कम काढू शकता. 

 

स्टेल चेक म्हणजे  चेक  चा उपयोग जारी  केल्याच्या तीन महिन्यात नंतर सुद्धा केलेला नाही त्याला  स्टेल चेक म्हणतात. म्हणजेच एक्सपायर चेक लाच स्टेल चेक म्हटल्या जाते. या चेक ला तुम्ही बँकेमध्ये सब्मिट करू नाही शकत. जर तुम्ही कर देखील देत असाल तरी रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या नियमानुसार यांना  रिजेक्ट केल्या जाते. 

 

जर तुमच्याकडे चेक आहे व त्याची दिनांक तीन महिन्याच्या वरती झालेली आहे ते चेक स्टेल चेक आहे .जर  हा  चेक तुम्ही बँकेत घेऊन गेलास तर बँक तुम्हाला पेमेंट देण्यास नकार देईल आणि जर तुम्ही तो चेक क्लीअरन्स मध्ये प्रेझेंट करता तर तो चेक तुमचा बास होऊन जाईल. म्हणून कधीही तुम्ही चेक मधून पेमेंट घेत असाल  अथवा घेणार असाल तर तुम्ही चेक वरची दिनांक व्यवस्थित तपासून घ्या म्हणजे तुम्हाला माहित होईल की हा चेक  व्हॅलिड आहे की नाही.

 

चेकवर टाकलेल्या दिनांकापासून तीन महिन्यापर्यंत तुम्ही कधीही पेमेंट काढू शकता परंतु तीन महिन्याच्या नंतर एकही दिवस जास्त झाल्यास तुम्हाला पेमेंट मिळणार नाही त्यामुळे चेक घेताना दिनांक व्यवस्थित तपासून घ्यावे.

 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.