प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यामधील फरक स्पष्ट करा, Pratyaksh kar Ani apratyaksh kar Farak, नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यामधील फरक जाणून घेणार आहोत. तसेच प्रत्यक्ष कर म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय हे
देखील जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यामध्ये फरक काय असतो हे समजेल आणि तसेच प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर नेमके काय असते हे देखील माहीत होईल.
प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर फरक स्पष्ट करा – Pratyaksh kar Ani apratyaksh kar Farak
प्रत्यक्ष कर (Direct Taxes) | अप्रत्यक्ष कर(Indirect Taxes) |
1. ज्या करार कर-भार व कर भरण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीवर असते, त्याला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. | 1. यात कर-भार एका व्यक्तीवर तर कर भरण्याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर असते. |
2. हा कर व्यक्तीवर असतो. | 2. हा कर वस्तू किंवा सेवेवर असतो. |
3. कर- भारांची संक्रमण करता येत नाही.ज्या व्यक्तीने कर भरावा, अशी सरकारची अपेक्षा असते, त्यालाच कर भरावा लागतो. | 3. कर दुसऱ्या व्यक्तीवर संक्रमित केला जाऊ शकतो.
व्यापारी ग्राहकावर कर- भार टाकून मोकळा होतो. |
4. करदात्याला कोणताही वैयक्तिक फायदा मिळत नाही. | 4.यातही करदात्याला कोणताही वैयक्तिक फायदा मिळत नाही. |
5. एकूण उत्पन्नात सरकारच्या दृष्टीने या करामुळे होणारी वाढ मर्यादित असते. | 5. अनेक वस्तूवर उत्पादन कर,विक्रीवर कर व आयात- निर्यात कर लावून सरकारला भरपूर उत्पन्न मिळवता येते. यात भरपूर लवचिकता असते. |
प्रत्यक्ष कर म्हणजे काय ? – What Is Direct Tax In Marathi
प्रत्यक्ष कर हे ज्या व्यक्तीने भरावेत, अशी शासनाची अपेक्षा असते त्याच व्यक्तीकडून भरले जातात. म्हणजे कर भरण्याची जबाबदारी व कराचा भार एकाच व्यक्तीवर पडतो तेव्हा त्या कराला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. ही संकल्पना प्रत्यक्ष कराच्या तज्ज्ञांनी दिलेल्या व्याख्यावरून अधिक स्पष्ट होईल-
डॉ.डाल्टन –जोकर ज्या व्यक्तीवर लावला जातो व त्या व्यक्तीकडून भरला जातो अशा करास प्रत्यक्ष कर असे म्हणतात.
प्रा. बुलक – उत्पादनावर लावलेला कर हा अप्रत्यक्ष कर होय. तसेच उत्पन्नावर लावलेला कर प्रत्यक्ष होय.
बॅस्टॅबल – प्रत्यक्ष कर म्हणजे असा कर की जो स्थायी आणि वारंवार उत्पन्न होणाऱ्या घटना वर आकारला जातो.
प्रत्यक्ष कर व्यक्तीवर आकारला जातो. प्रत्यक्ष कर भरणाऱ्या व्यक्तीलाच कर- भारसहन करावा लागतो. तो त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर लावलेला असतो, त्यातून कर भरावा लागतो. या करापोटी व्यक्तीला कोणतेही व्यक्तिगत फायदे मिळत नाही. प्रत्यक्ष करांमध्ये आयकर, संपत्ती कर व देणगी करांचा समावेश होतो. प्रा. जे. एस. यांच्यानुसार प्रत्यक्ष कर अशाच व्यक्तीकडून मागितला जातो की ज्याचा भार त्यानेच सहन करावा, अशी शासनाची अपेक्षा असते.
अप्रत्यक्ष कर म्हणजे काय ? – What Is Indirect Tax In Marathi
अप्रत्यक्ष कर हे असे कर असतात की जे दुसऱ्या व्यक्तीवर संक्रमित करता येतात. त्यांचा भार एका व्यक्तीवर तर ते भरण्याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर असते. उत्पादक वस्तूवर लावलेला कर सरकार कडे भरतो, परंतु तो ग्राहकाकडून वसूल करतो. ग्राहकाला हे कर सरकारकडे भरावे लागत नाहीत. त्यामुळे आपण हे कर भरतो, याची जाणीव ग्राहकाला नसते. अप्रत्यक्ष कराचा अर्थ अधिक सुस्पष्ट होण्यासाठी तज्ज्ञांच्या पुढील व्याख्या अभ्यासता येतील.देशाच्या उत्पन्नातील मोठा वाटा अप्रत्यक्ष कराचा असतो.
डॉल्टन – “जो कर व्यक्तीवर लावला जातो, परंतु अक्षत: अथवा पूर्णत: दुसऱ्या व्यक्तीकडून भरला जातो अशा करास अप्रत्यक्ष कर असे म्हणतात.”
प्रा. बुलक – “उपभोक्त्यावर लावलेला कर तसेच खर्चावर लावलेला कर म्हणजे अप्रत्यक्ष कर होय”.
प्रा. जे.एस. मिल – “ज्या वेळेस व्यक्तीवर लावलेला कर तो दुसऱ्या व्यक्तीवर ढकलू शकतो आणि सरकारचा उद्देशही त्या व्यक्तीने तो कर भरावा असा नसेल तर तो अप्रत्यक्ष कर होय”.
खूप छान माहिती दिली त्याबद्दल
Thanks