प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर संपूर्ण माहिती – Direct and indirect tax in Marathi, नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तसेच यात आपण प्रत्यक्ष कर नेमके काय असते, त्याचा अर्थ काय होतो,
प्रत्यक्ष कराचे फायदे आणि तोटे, अप्रत्यक्ष कर काय असते, त्याचे फायदे,-तोटे याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. तरी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर याबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होण्यास मदत होईल.
प्रत्यक्ष कर म्हणजे काय– What Is Direct Taxes In Marathi
प्रत्यक्ष कर हे ज्या व्यक्तीने भरावे, अशी शासनाची अपेक्षा असते त्याच व्यक्तीकडून भरले जातात. म्हणजे कर भरण्याची जबाबदारी व कराचा भार एकाच व्यक्तीवर पडतो तेव्हा त्या करायला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. ही संकल्पना प्रत्यक्ष कराच्या तज्ञांनी दिलेल्या व्याख्येवरून अधिक स्पष्ट होईल.
डॉ. डाल्टन :जो कर ज्या व्यक्तीवर लावला जातो व त्या व्यक्तीकडून भरला जातो अशा करार प्रत्यक्ष कर असे म्हणतात .
प्रा. बुलक:उत्पादनावर लावलेला कर हा अप्रत्यक्ष कर होय. तसेच उत्पन्नावर लावलेला कर प्रत्यक्ष होय.
बॅस्टॅबल: प्रत्यक्ष कर म्हणजे असा कर की जो स्थायी आणि वारंवार उत्पन्न होणाऱ्या घटनावर आकारला जातो.
प्रत्यक्ष कर व्यक्तीवर आकारला जातो. प्रत्यक्ष कर भरणाऱ्या व्यक्तीला कर – भार सहन करावा लागतो. तो त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर लावलेला असतो, त्यातून कर भरावा लागतो. या करापोटी व्यक्तीला कोणतेही व्यक्तिगत फायदे मिळत नाहीत. प्रत्यक्ष करांमध्ये आयकर, संपत्ती कर व करांचा समावेश होतो. प्रा.जे.एस.यांच्यानुसार प्रत्यक्ष कर अशाच व्यक्तीकडून मागितला जातो की ज्याचा भार त्यानेच सहन करावा,अशी शासनाची अपेक्षा असते .
प्रत्यक्ष कराचे फायदे
- क्षमता व न्याय्य :- प्रत्यक्ष कराचा भार सर्व व्यक्तींवर सारखाच पडत असल्याने त्यात क्षमता आहे. व्यक्तींच्या उत्पन्न वाढीनुसार प्रत्यक्ष कराचे दर वाढत जातात. श्रीमंतांना जास्त दराने तर गरीब व मध्यवर्गी यांना कमी दराने कर द्यावे लागतात. त्यामुळे असे कर न्याय्य आहेत, असे म्हटले जाते. ते प्रगतशील असतात.
- लवचिकता :- या करामुळे गरजेप्रमाणे उत्पन्न वाढविता अगर कमी करता येते. थोडा जरी दर वाढविला तरी उत्पन्न वाढतो. या उलट दर कमी केला तर उत्पन्न कमी होतो. त्यामुळे परिस्थिती व गरज लक्षात घेऊन त्याचप्रमाणे अर्थमंत्री कराचे दर सहन कमी – जास्त करू शकतात.
- काटकसरीपणा :- हे कर गोळा करण्यासाठी खर्च कमी येतो. त्यामुळे त्यात काटकसरीपणा आहे. खर्च कमी असल्यामुळे या कराचे उत्पन्न वाढते.
- निश्चितता :- कर कसोट्यांपैकी निश्चिततेची कसोटी हे कर पूर्ण करतात. आपल्याला किती कर भरावा लागेल, याची कल्पना करदात्याला असते.त्याचप्रमाणे या घरापासून किती उत्पन्न मिळू शकेल, याचा अंदाज सरकारला करता येतो.
- कर टाळता येत नाही :- हे कर सरकारला सहज वसूल करता येतात. करदाता आणि सरकार यांचे प्रत्यक्ष संबंध येत असल्यामुळे कर चुकविता येत नाहीत. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळते.
- जागृतता :- प्रत्यक्ष कर आपण भरतो, याची जाणीव करदात्याला असते. त्याला ते आपल्या उत्पन्नातून भरावे लागतात. त्यामुळे करदाते जागृत असतात.सरकारच्या खर्चाकडे, कामाकडे ते जागरूकतेने जाणीवपूर्वक लक्ष देतात. त्यामुळे सरकारचे कामकाज सुधारण्यास मदत होते. लोकशाहीच्या यशासाठी अशी जागरूकता आवश्यक असते.
- समानता :- प्रत्यक्ष कर हे प्रगतशील कर असतात. श्रीमंतावर जास्त दराने तर गरिबांवर कमी दराने आकारले जातात .त्यामुळे श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी कमी होते. परिणामी विषमता कमी करता येते. समाजवादी समाजरचनेसाठी हे आवश्यक असते.
प्रत्यक्ष कराचे तोटे
प्रत्यक्ष करात जसे महत्वाचे फायदे आहेत, तसेच पुढील प्रमाणे त्यात तोटेही आहेत –
- करपात्रता मापणेअवघड :- व्यक्तींचे, करपात्रेतेप्रमाणे प्रत्यक्ष कर आकारावे लागतात, परंतु इतर पात्रता ठरविणे अवघड असते. त्यामुळे कराचे दर अंदाजे एकतर्फीच ठरविले जातात. हे दर सरकारच्या राजकीय तत्व प्रणालीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, समाजवादी अगर साम्यवादी विचाराचे सरकार असल्यास वरच्या उत्पन्न पातळीवर भरमसाठ दराने कर आकारले जातात. या उलट लोकशाहीवादी, उदारमतवादी सरकार असल्यास कराचे दर कमी ठेवले जातात.
- गैरसोयीचे :- प्रत्यक्ष कर योग्य प्रमाणे निश्चित करण्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे, हिशेब ठेवावे लागतात. तसेच हे कर आगाऊच भरावे लागतात. त्यामुळे करदात्याला गैरसोयीचे वाटतात. त्याचप्रमाणे संकटप्रसंगी एकदम दर वाढविले जातात. परिणामी मध्यमवर्गीयांना ते त्रासदायक वाटतात.
- विरोध :- प्रत्यक्ष कर बऱ्याचदा भरमसाठ दराने आकारले जातात .त्यामुळे अशा कराला विरोध होतो. लोकांमध्ये असंतोष पसरतो. बुडवेगिरीला प्रोत्साहन मिळावे. लोक अप्रामाणिक होतात. खोटी कागदपत्रे तयार करून कर टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कर वसुलीसाठी कठोर उपाय योजावे लागतात. याची जाणीव ठेवून भारतात कराचे दर गेल्या कित्येक वर्षात फारसे वाढविण्यात आले नाहीत.
- खर्चिक :- प्रत्यक्ष कर वसुलीचा खर्च जास्त येतो. प्रत्येक करदात्यांशी कर अधिकाऱ्यांना संपर्क साधावा लागतो. कर आकाराने, तर निश्चित करणे व वसूल करणे यासाठी बरीच किचकट पद्धत असते. परिणामी व कर वसुली कायदेशीर बाबतीत अडकते वसुलीत दिरंगाई व खर्चिकपणा वाढतो.
- अन्यायकारक :- प्रत्यक्ष कर अन्यायकारक वाटतात. बऱ्याच लोकांकडून ते वसूल केले जात नाहीत. त्यामुळे ते करदात्याला अन्यायकारक वाटतात. उदाहरणार्थ, भारतात बडे बागाईतदारकर भरत नाहीत परंतु त्यामुळे त्याला हा कर अन्याय वाटतो. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होते.
- मर्यादित पाया :- प्रत्यक्ष कराचा पाया फार मर्यादित असतो. सर्व लोकांकडून हे कर वसूल करता येत नाहीत. गरीब व कनिष्ठ, मध्यम वर्ग यांच्यावर आयकर,संपत्तीकर आकारता येत नाही.त्यामुळे करदात्यांची संख्या मर्यादित होते. त्यामुळेच प्रत्यक्ष करापासून मिळणारे उत्पन्न मर्यादित राहते. राजकीय कारणामुळे ही प्रत्यक्ष करांचे जाळे व्यापक करण्यात भारत सरकारला अपयश आले .आज एकूण करांच्या उत्पन्नात प्रत्यक्ष करा वाटा त्यामुळेच कमी आहे.
अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? What is Indirect Taxes In Marathi
देशाच्या उत्पन्नातील मोठा वाटा अप्रत्यक्ष कराचा असतो. असे कल व्यक्ती पेक्षा वस्तूवर लावलेले असतात. प्रत्येक नागरिक हा ग्राहक असतो. तो वस्तू खरेदी करीत असतो. त्यामुळे त्याला कर भरावाच लागतो. असे कर वस्तूंच्या उत्पादनावर, विक्रीवर व आयातीवर भरावेच लागतात. गरीब व्यक्तीला त्याचप्रमाणे श्रीमंतांना ही हे कर भरावे लागतात.
अप्रत्यक्ष कर अर्थ व व्याख्या
अप्रत्यक्ष कर हे असे कर असतात की जे दुसऱ्या व्यक्तीवर संक्रमित करता येतात. त्यांना भार एका व्यक्तीवर तर ते भरण्याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर असते. उत्पादक वस्तूवर लावलेला कर सरकारकडे भरतो; परंतु तो ग्राहकांकडून वसूल करतो. ग्राहकाला हे कर सरकारकडे भरावे लागत नाहीत. त्यामुळे आपण हे कर भरतो, याची जाणीव ग्राहकाला नसते. अप्रत्यक्ष कराचा अर्थ अधिक सुस्पष्ट होण्यासाठी तज्ञांच्या पुढील व्याख्या अभ्यासात येतील.
डॉल्टन : जो कर व्यक्तीवर लावला जातो; परंतु अंशत:अथवा पूर्णतः दुसऱ्या व्यक्तींकडून भरला जातो अशा करास अप्रत्यक्ष कर असे म्हणतात.
प्रा. बुलक : उपभोक्त्यांवर लावलेला कर तसेच खर्चावर लावलेला कर म्हणजे अप्रत्यक्ष कर होय.
प्रा . जे . एस . गिल : ज्या वेळेस व्यक्तीवर लावलेला तर तो दुसऱ्या व्यक्तीवर ढकलू शकतो आणि सरकारचा उद्देशही त्या व्यक्तीने तो कर भरावा असा नसेल तर तो अप्रत्यक्ष कर होय.
अप्रत्यक्ष कराची वैशिष्ट्ये
अप्रत्यक्ष कराच्या विविध व्याख्यांवरून या करांची वैशिष्ट्ये थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येतील –
- अप्रत्यक्ष कर वस्तू अगर सेवांवर लावला जातो.
- हा कर व्यापारी अगर उत्पादक देत असतो.
- अप्रत्यक्ष कर भरणार या व्यक्तीला त्याचा भार सहन करावा लागत नाही तर तो ग्राहकांकडून वसूल करतो.
- कराचे संक्रमण करता येते. म्हणजेच कराचा भाग दुसऱ्या व्यक्तींवर – ग्राहकावर टाकता येतो.
- कर भरणा व व्यक्तिगत लाभ यात परस्पर संबंध नाही.उलट कर भरणारा कधीकधी अधिक लाभ अयोग्य मार्गाने उठवितो.
- कराचे ओझे ग्राहकाला अगर व्यापाराला प्रत्यक्ष जाणवत नाही; त्यामुळे अशा कराला फार विरोध होत नाही.
- अप्रत्यक्ष करापासून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.
अप्रत्यक्ष कराचे फायदे
- कर – भार जाणवत नाही :- अप्रत्यक्ष कर भरणारी व्यक्ती वस्तूंच्या खरेदीवर कर भरत असते. परंतु आपण असा कर भरत आहोत, याची जाणीव त्याला नसते; त्यामुळे अशा कराला फारसा विरोध होत नाही. ग्राहक आपल्या क्षमतेप्रमाणे वस्तू खरेदी करीत असतो. त्यामुळे कराच्या भाराचा जाच त्याला वाटत नाही.
- कराचे दर कमी :- वस्तूंवर अगर सिवांवर अल्प दराने कर आकारून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल, याचा प्रयत्न सरकार करते. कमीत कमी कर पातळी ठेवून विक्री वाढावी व आपले उत्पन्नही वाढावे हा दृष्टिकोन असल्याने कर – भार जाचक वाटत नाही.
- कुवतीप्रमाणे कर :- अप्रत्यक्ष कर व्यक्तींच्या करपात्रतेप्रमाणेच लावले जातात. व्यक्ती आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे वस्तू खरेदी करतो व त्याच प्रमाणात कर भरत असतो. चैनीच्या अगर विलासी वस्तूवर जास्त दराने कर लावले जातात. परिणामी श्रीमंताला जादा कर भरावे लागतात.
- काटकसरीपणा :- अप्रत्यक्ष कर उत्पादनावर, विक्रीवर आयात – निर्यातीवर लावले जातात. उत्पादक व व्यापारी त्याच्या उलाढालीवर कराच्या मोठमोठ्या रकमा सरकारकडे जमा करीत असतो. त्यामुळे सरकारला कर वसुलीचा फारसा भार पडत नाही. फार मोठी कर वसुली यंत्रणा यासाठी उभारावी लागत नाही.
- कर न्याय्य आहेत :- श्रीमंतांकडून जास्त कर तर गरिबांकडून कमी कर वसूल करावेत म्हणजे कर – भार समप्रमाणात पडेल असे समतेचे महत्त्व आहे. चैनीच्या वस्तू ज्यादा कर तर जीवनावश्यक वस्तूवर कमी कर लावल्यास समाजाला आर्थिक न्याय देता येतो.
- प्रगतशील कर :- साधारणतः अप्रत्यक्ष कर हे प्रगतशील कर मानले जात नाहीत. कारण एखादी वस्तू खरेदी केल्यास त्यावर श्रीमंत आणि गरिबांना सारख्याच प्रमाणात कर भरावा लागतो, परंतु विलासी व चैनीच्या वस्तूवर जास्त कर लावल्यास कर पद्धती प्रगतशील करता येते.
- कर टाळता येत नाही :- अप्रत्यक्ष कर वस्तू खरेदी करताना भरावेच लागतात. त्यामुळे ते टाळता येत नाहीत, परंतु उत्पादक व व्यापारी हे वसूल केलेले कर सरकारी तिजोरीत भरतात की नाही, यावर नियंत्रण ठेवावेत लागते. शासकीय यंत्रणेशी संगनमतकरून बऱ्याचदा असे पण बुडविले जातात.
अप्रत्यक्ष कराचे तोटे
पुढील अनेक तोट्यामुळे अप्रत्यक्ष करावर टीका केली जाते.
(1)अन्यायकारक व प्रतिगामी :- अप्रत्यक्ष कर प्रत्येकाला सारख्याच दराने भरावे लागतात. ज्या वस्तू अगर सेवा खरेदी केल्या जातात, त्यावर श्रीमंत आणि गरीब व्यक्तींना सारखाच कर भरावा लागतो. कारण की किमतीबाबत ग्राहका – ग्राहकात भेदभाव करता येत नाही. जीवनावश्यक व कार्यक्षमतेच्या गरजांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूवर सारख्याच दराने कर भरावे लागत असल्याने ते गरिबांवर अन्यायकारक ठरतात. ते क्षमतेच्या तत्त्वांत बसत नाहीत.
(2)उत्पन्न अनिश्चित :- अप्रत्यक्ष कर वस्तूंवर असतात. कर लावल्याने वस्तूंच्या किमती वाढतात. त्याचा परिणाम मागणीवर होतो. त्यामुळे त्या करापासून किती उत्पन्न मिळेल हे निश्चितपणे ठरविता येत नाही. विशेषतः ज्या वस्तूंची मागणी अधिक लवचिक आहे अशा वस्तूवर कर लावल्यानंतर त्या करामुळे किती उत्पन्न मिळू शकेल, हे ठरविणे अर्थमंत्र्यांना अवघड होते. त्यामुळे कर लावताना फार खबरदारी घ्यावी लागते.
(3)लोकजागृती नाही :- ग्राहकांना वस्तू खरेदी करताना आपण त्या वस्तूवर कर भरत आहोत, याची जाणीव नसते. त्यामुळे करदाते सरकारच्या उत्पन्न खर्चाबाबत जागृत नसतात. परिणामी अनावश्यक खर्चावर जागृत लोकमताचे दडपण येत नाही. सरकारमध्ये अनावश्यक अनियोजित खर्च करण्याची प्रवृत्तीं वाढते.
(4)काटकसरीपणा नाही :- अप्रत्यक्ष कर वसुलीचा खर्च जास्त असतो. आयात होणाऱ्या वस्तू गेर मार्गाने येऊ नयेत, यासाठी त्यावर देखरेख ठेवण्यासाठी फार तज्ञ अधिकारी नेमावे लागतात. त्याचप्रमाणे बऱ्याचदा लावलेल्या करा पेक्षा जास्त कर उत्पादक व व्यापारी वसूल करतात. त्यामुळे ग्राहकाची पिळवणूक होते. वसूल सर्व कर सरकारी तिजोरीतही जात नाही. त्यामुळे सरकारचेही नुकसान होते.
(5)कर – भार कळत नाही :- करदात्याला नेमका किती कर आपल्याला द्यावा लागेल, हे कळत नाही. व्यापारी मागेल ती किंमत त्याला द्यावी लागते. कोणत्या कराचा भार कुणावर किती पडेल हे सरकारलाही माहिती असले पाहिजे; नाहीतर ग्राहकाची अनावश्यक पिळवणूक होते.
अप्रत्यक्ष कर म्हणजे काय?
अप्रत्यक्ष कर हा वस्तू आणि सेवांच्या वापरावर आकारला जाणारा कर आहे
प्रत्यक्ष कर म्हणजे काय?
प्रत्यक्ष कर हा कराचा एक प्रकार आहे जेथे कर आकारणीची घटना आणि परिणाम एकाच घटकावर पडतात
भारतात प्रत्यक्ष कर कोणता आहे?
आयकर हा कदाचित व्यवसाय आणि व्यक्तींच्या वार्षिक उत्पन्नावर सरकारद्वारे लादलेला सर्वात प्रसिद्ध थेट कर आहे
कर संक्रमण म्हणजे काय?
त्पादक किंवा विक्रेता ग्राहकावर ढकलतो. उत्पादक हा कर उत्पादक घटक किंवा ठोक विक्रेत्याकडे ढकलतो.