IFSC Code म्हणजे काय ? बँकेचा IFSC Code कसा शोधायचा ? – IFSC Code in Marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (2 votes)

   IFSC Code म्हणजे काय ? बँकेचा IFSC Code कसा शोधायचा ? – IFSC Code in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपण आता जाणून घेणार आहे IFSC code म्हणजे काय बहुतांश लोकांना IFSC code म्हणजे काय हे माहीत नसते त्याचा कुठे वापर करावा आणि ते कसे लिहावे ते त्यांना माहित नसते आज पासून चार पाच वर्षापूर्वी जेव्हा भारतात UPI  द्वारे पेमेंट करण्याचे प्रचलन नव्हते तेव्हा अशा वेळेस कोणत्याही व्यक्तीला किंवा फर्म ला पेमेंट करायची असेल तर आपल्याला त्यांचा अकाउंट नंबर किंवा त्यांच्या  बँकेचा IFSC  Code घेऊन बँकेत  जावे लागे आणि एका  रांगेत लागून पेमेंट करावे लागे

जेव्हा ही आपल्याला पेमेंट चा उपयोग कोणत्याही माध्यमातून करायचे असेल  जसे NEFT, IMPS,RTGS किंवा नेट बँकिंग असो या सर्व पेमेंट सिस्टीम मधून एक दुसऱ्यांना पेमेंट पाठवण्यासाठी त्यांच्या बँकेचा IFSC Code ला जाणून घेणे खूप आवश्यक आहे 

आपल्या भारत देशात दीडशे च्या  जवळपास बँका आहेत आणि त्यांच्या  हजारो शाखा पूर्ण भारतात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात स्थित आहेत आणि अशा वेळेस त्या सर्वांचे एक निश्चित नाव आणि  अचूक पत्ता लक्षात ठेवणे एवढे सोपे नाही अशा वेळेस या IFSC कोड  द्वारा भरपूर से मदत  मिळते ज्यामुळे आपल्या लक्षात येते की आपल्याला कोणत्या बँकेत पेमेंट करायचे आहे

 

 IFSC Code म्हणजे काय ? बँकेचा IFSC Code कसा शोधायचा ?

Table of Contents

IFSC Code Mhanje kay – IFSC code म्हणजे काय ?

IFSC code म्हणजे भारतीय वित्तीय प्रणाली कोड आहे ज्याला आपण  सर्वसामान्य भाषेत IFSC code म्हणतो हे कोड अकरा वर्णांचे अल्फान्यूमेरिक कोड असते ज्यामध्ये सुरुवातीचे चार शब्द हे इंग्रजी असतात व बाकीचे गणितीय संख्या असतात  सुरुवातीचे चार वर्ण हे बँकेचे नाव दर्शवितात या कोड मधील पाचवा  वर्णन हा नेहमी 0 (शून्य )असतो उरलेली शेवटची पाच अक्षरे हे शाखा दर्शवितात 

ifsc code meaning in Marathi – IFSC Code in Marathi  

IFSC कोड म्हणजे भारतीय वित्तीय प्रणाली कोड (भारतीय वित्तीय प्रणाली कोड) IFSC कोड कोणत्याही बँकेच्या शाखेचा IFSC कोड हा त्या शाखेचा निश्चित पत्ता असतो आणि त्याद्वारे त्या शाखेची माहिती मिळवली जाते.

IFSC कोड पूर्ण फॉर्म – IFSC code full form in Marathi

मित्रांनो IFSC कोडचा पूर्ण फॉर्म म्हणजे भारतीय वित्तीय प्रणाली कोड (भारतीय वित्तीय प्रणाली कोड)
IFSC कोडचा मुख्य वापर म्हणजे डिजिटल व्यवहार करणे म्हणजे ऑनलाइन व्यवहार करणे, आजकाल लहान पेमेंट UPI द्वारे अगदी सहज केले जातात परंतु जेव्हा आपण ₹ 100000 पेक्षा जास्त व्यवहार करतो तेव्हा UPI चा वापर केला जात नाही.
₹ 100000 पेक्षा जास्त पेमेंट पाठवण्यासाठी आम्ही NET Banking किंवा, RTGS, किंवा IMPS, NEFT वापरतो आणि त्यात IFSC कोड असणे खूप महत्वाचे आहे.

IFSC Code Cha Upyog-IFSC code चा उपयोग – आयएफएससी कोड महत्त्वाचा का आहे?

  IFSC Code चा उपयोग  बँक अकाउंट च्या ऑनलाइन देवानं घेवाण  म्हणजेच ऑनलाइन ट्रांजेक्शन करण्यासाठी होतो कोणतीही मोठी पेमेंट नेफ्ट आर टी जी एस चा  उपयोग करण्यासाठी आपल्याला बँकेचा IFSC Code चा उपयोग करावा लागतो 

जर मित्रांनो  तुमचा ही अकाउंट कोणत्याही बँकेत आहे तर तुमच्यासाठी IFSC Code बद्दल जाणून घेणे खूप आवश्यक आहे कारण तुम्हालाही IFSC Code  ची आवश्यकता केव्हाही पडू शकते

IFSC Code Chi Aavshakata – IFSC code ची आवश्यकता               

वर्तमान काळात भारतात डिजिटल देवाण-घेवाण मध्ये खूप जास्त वाढ झाली आहे आणि UPI पेमेंट सिस्टीम च्या द्वारे पेमेंट देवाण-घेवाण करणे खूप सोपे झाले आहे UPI द्वारा आपण एक लाख रुपया पर्यंत देवाण-घेवाण करू शकतो

मित्रांनो आजकालच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे खाते कोणत्या ना कोणत्या बँकेत चालू केलेले आहे जसे की बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ हैदराबाद, बुलढाणा अर्बन या बँकेचा IFSC Code जाणून घेणे  खूप आवश्यक आहे कारण आपले खाते देखील या बँकेत असू शकते 

IFSC Code Kasa Olkhava – आयएफएससी कोड कसा शोधायचा?

आपण बघणार आहोत की वेबसाइटच्या या माध्यमातून एकदम सोप्या पद्धतीने IFSC code कसा ओळखायचा  तर चला जाणून घेऊया विस्तारात 

Step–1. सर्वात  पहिले क्रोमो वर किंवा कोणत्याही ब्राउजर वर जा आणि bankifsccode.com या वेबसाईट वरती जा 

Step–2.   वेबसाईटत गेल्यावर खालील माहिती योग्यरीत्या भरा 

Select Bank Name:- हा सर्वात पहिले येणारा बॉक्स आहे, यात तुम्हाला कोणत्या  बँकेचा IFSC code पाहिजे त्या  बँकेला निवडा.जसे तुम्हाला बँक ऑफ  महाराष्ट्राचे IFSC code माहित करायचे आहे किंवा ओळखायचे आहे तर इथे बँक ऑफ महाराष्ट्रला निवडा 

State:-  आता इथे दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला कोणत्याही राज्याच्या बँकेचा IFSC code  माहित करायचा आहे त्या राज्याला निवडा जसे की महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश इत्यादी. 

District :- आता या  तिसऱ्या बॉक्स मध्ये तुम्हाला कोणत्याही जिल्ह्याचा IFSC code माहित करायचा असेल तर या जिल्ह्यांना सिलेक्ट करा जसे की मुंबई, पुणे, बुलढाणा, औरंगाबाद इत्यादी. 

Branch :- आता या या शेवटच्या या बॉक्समध्ये क्या ब्रांचला सिलेक्ट करा, ज्याचा IFSC code तुम्हाला माहित करायचा आहे. जसे की बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बुलढाणा  अर्बन  इत्यादी. 

 ही सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला बँकेचे नाव, बँकेचा पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर, आयएफसी आणि एमआयसीआर कोड इत्यादी दिसतील.अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही बँकेचा  IFSC code माहीत करू शकता.

आयएफएससी कोड कसा शोधायचा ? – IFSC Code कसा शोधायचा 

मित्रांनो, आजकाल प्रत्येक व्यक्तीचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक अशा कोणत्या ना कोणत्या बँकेत उघडलेच पाहिजे, या बँकांच्या IFSC कोडबद्दल जाणून घेऊया. या बँकांमध्ये आमचे खाते देखील असू शकते.

ifsc कोड कसा शोधायचा –  मित्रांनो, कोणत्याही बँकेचा आयएफएससी कोड जाणून घेण्यासाठी आमच्याकडे तीन ते चार पर्याय आहेत, आम्ही आमच्या बँकेचा आयएफएससी कोड या माध्यमांप्रमाणे सहजपणे जाणून घेऊ शकतो.

1.बँकेच्या पासबुक मधून IFSC code शोधायचा –  Bankechya Passbook Madhun IFSC Code Pahane 

हा आपला बँक खाते चा  IFSC code ओळखायचा सर्वात सोपा मार्ग आहे.  IFSC code प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम बँक पासबुक च्या प्रथम  पृष्ठावर तुम्हाला अकाउंट नंबर, पत्ता , शाखेचा कोड, यूजर आयडी, खाता धारकाचे नाव इत्यादी काही आवश्यक माहिती  च्या सोबत तुम्हाला तुमचा आयएसएससी कोड देखील दिलेला असतो

2. चेक बुक मधून IFSC code शोधायचा – Check book Madhun  IFSC Code Pahane

जर तुमच्याकडे बँकेचा चेक बुक असेल तर त्यावर देखील बँकेच्या ब्रांच  चा IFSC code दिलेला असतो. प्रत्येक बँकेचा चेक बुक चा IFSC code भिन्नभिन्न असतो. परंतु तुम्हाला आय एफ एस सी कोड कोणत्या  चेक बुक मध्ये  भेटून जाईल. 

3.ऑफिशियल वेबसाईड द्वारा  IFSC code शोधायचा – Official Website Dwara IFSC Code Pahne

 प्रत्येक बँकेचा इंडियन फायनान्शिअल सिस्टीम कोड त्यांच्या आधिकारिक साइटवर उपलब्ध असतो व आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला IFSC code चेक करू शकतो. सर्व बँका त्यांच्या ब्रांच या IFSC code त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देत असतात. याच्यासाठी तुम्हाला त्यांच्या वेबसाइटवर थोडीफार माहिती सिलेक्ट करावे लागते जसे की नाव , राज्य, जिल्हा ब्रांच इत्यादी. 

4.आरबीआयच्या वेबसाईट द्वारा IFSC code शोधायचा  – RBI Chya Website Dwara IFSC Code Pahane

तुम्ही आरबीआयच्या अधिकारी वेबसाईटवर जाऊन आय एफ एस सी कोड प्राप्त करू शकता.इथे देखील तुम्हाला थोडीफार माहिती  सिलेक्ट करावी लागेल. हे आरटीजीएस(RTGS),एनईएफटी(NEFT)नेटवर्कमध्ये भाग घेणारे बँकेच्या  सूचीमध्ये आहेत.

5.बँकेच्या ब्रांच वर कॉल करून IFSC code पाहणे–Bankechya Branch Var Call Karun IFSC Code Pahne

तुम्ही फोन वर आपल्या बँकेच्या शाखेमध्ये कॉल करून IFSC code विचारू शकता. हे नंबर तुमच्या पासबुक च्या फ्रंट  पेज वरून प्राप्त करू शकता.तुम्हाला काही अडचण असल्यास अथवा IFSC code जाणून घेण्यासाठी बँकेच्या ब्रांच वर कॉल करून विचारपूस करू शकता.

 

 

IFSC Code बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न – FAQ 

1.IFSC Code किती अंकांचा असतो ?

उत्तर:- IFSC Code 11 अंकांचा असतो.

2. सर्व बँकेच्या ब्रांच चे IFSC Code वेगवेगळे असतात ?

उत्तर:- होय. सर्व बँकेच्या ब्रांच चा IFSC Code  वेगवेगळा असतो.

3.बँकेचा IFSC  Code कसा माहित करायचा ?

ऑनलाइन वेबसाईट द्वारे माहित करू शकता, आपल्या अकाउंट खात्याच्या कार्ड द्वारा अथवा पासबुक  द्वारा  माहित करू शकता, बँकेने दिलेल्या चेक बुक द्वारा IFSC code   माहित करू शकता.

4.आपण IFSC Code  शिवाय पैसे पाठवू शकतो  का ?

IFSC Code  शिवाय बँक खात्याचे ओळख करणे आणि याप्रकारे विभिन्न बँकांमध्ये धन हस्तांतरित करणे संभव नाही. तरीही त्याच बँकेच्या अंतर्गत IFSC Code शिवाय पैसे ट्रान्सफर करणे आता पण संभव आहे.

 

2 thoughts on “ IFSC Code म्हणजे काय ? बँकेचा IFSC Code कसा शोधायचा ? – IFSC Code in Marathi”

Leave a Comment