भाग म्हणजे काय ? भागांचे प्रकार आणि भागांची वैशिष्ट्ये, सामान्य भाग म्हणजे काय?, अग्रहक्क भाग म्हणजे काय, – Bhag mhanje kay in marathi, या लेखात भाग या विषयी संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. यात आपण भाग म्हणजे नेमके काय असते, त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, व त्याचे प्रकार याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला भाग बद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होण्यास मदत होईल.
भाग म्हणजे काय – bhag mhanje kay in marathi
प्रमंडळाच्या अधिकृत भांडवलाच्या रकमेची विभागणी सारख्या रकमेच्या अनेक विषयात केली जाते. या प्रत्येक विषयाला भाग असे म्हणतात. प्रमंडळाचे भांडवल हे अशा रीतीने अनेक भागांचे मिळून बनलेले असते आणि त्यामुळे प्रमंडळाच्या भांडवलाला भाग भांडवल असे म्हणतात.
भारतीय प्रमंडळ कायदा 1956 च्या कलम 2(46) मध्ये भागाची व्याख्या दिलेली आहे ती खालील प्रमाणे–
भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा होय. त्यात कंधाचा(Stock) जर स्कंद आणि भाग यात फरक केला नसेल तर देखील समावेश होतो. भाग बाजार म्हणजे काय
भागांची वैशिष्ट्ये – Shares Features In Marathi
प्रमाणाच्या भागांची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत-
- भागांची खरेदी पैसे देऊन किंवा पैसे ऐवजी इतर मूल्य देऊन करता येते. प्रमंडळामार्फत भागांची जी विक्री केली जाते ती त्यांचे मूल्य पैशाच्या रूपात स्वीकारून केली जाते. प्रमंडळाने मालमत्ता खरेदी केली किंवा इतर व्यवसाय संस्था विकत घेतली तर त्याचे मूल्य प्रमंडळ आपल्या भागांच्या स्वरूपात देऊ शकते.
- भाग हा भाग भांडवलाचा एक हिस्सा असतो आणि प्रत्येक भागाला स्वतंत्र क्रमांक असतो.
- भागांचा मालकी हक्क बदलता येतो. भागधारकाला वाटले तर तो आपल्या नावावरील भाग इतर व्यक्तींना विकू शकतो. त्यामुळे भागांचे हस्तांतरण केले जाऊ शकते. भागांचे हस्तांतरण कसे करावे याची कार्यपद्धती प्रमाण मंडळाच्या व्यवस्थापनाकडून ठरवून दिली जाते.
- भाग नावावर असणे हा प्रमंडळाच्या सभासदत्वाचा पुरावा असतो. सभासदांच्या नोंदणी वहीत सभासदाचे नाव त्याचे नावावर असलेल्या भागांची संख्या आणि त्या भागांचे अनुक्रमांक याबद्दलची माहिती नोंदवलेले असते. भागधारक हे प्रमंडळाचे मालक असतात आणि त्यांचे ताब्यातील भागांची संख्येनुसार त्यांचा मालकी हक्क निश्चित होतो. प्रत्येक भागधारकाला त्यांच्या नावावर असलेल्या भागांच्या इतकी मते मतदानाच्या वेळी देता येतात कारणएक एक भाग, एक मत या नियमाचा अवलंब प्रमाणात केला जातो.
भागांचे प्रकार– Types Of Shares In Marathi
प्रमंडळाच्या भागांची खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या अपेक्षा सारखे असत नाहीत. काही गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीवर निश्चित उत्पन्न मिळावे असे वाटते तर काही गुंतवणूकदार अधिक प्रमाणात जोखीम पत्करून अधिक प्रमाणात उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा बाळगतात. गुंतवणूकदाराच्या या अपेक्षा लक्षात घेऊन प्रमंडळ विविध प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. भारतीय प्रमाण कायदा 1956 नुसार प्रमाणवेळेला खालील प्रकारच्या भागांची विक्री करता येते.
1]सामान्य भाग (Equity Shares) – सामान्य भाग म्हणजे काय?
समहक्क भागधारकांना त्यांच्या भागावर लाभांशाबद्दल कोणतीही हमी दिली जात नाही. म्हणजेच या भागांवर लाभांश दिलाच पाहिजे आणि तो विशिष्ट दरानेच दिला पाहिजे असे कोणतेही बंधन प्रमंडळावर असत नाही. प्रमंडळाकडे नफा उपलब्ध असल्यास आणि संचालक मंडळाने लाभांश देण्याची शिफारस केल्यास या भागांवर लाभांश दिला जातो.
त्याचप्रमाणे प्रमंडळाचे विसर्जन झाले तर भाग भांडवलाची परतफेड करताना समहक्क भागधारकांचा क्रमांक सर्वात शेवटी असतो. म्हणजेच बाकी सर्व देणेदारांची रक्कम परत दिल्यावर आणि अग्रहक्क भागांची परतफेड केल्यावर जर पैसे शिल्लक राहिले तर त्याचा वापर समहक्क भाग भांडवलाची परतफेड करण्यासाठी वापरता येते.
थोडक्यात लाभांश मिळणे आणि भांडवल परत मिळणे या दोन्ही बाबतीत या भागधारकांना जोखीम पत्करावी लागते. अर्थातच प्रमंडळाला मोठ्या प्रमाणात नफा झाल्यास लाभांशाचा दरही अशा भागावर जास्त असतो व त्यामुळे या भागांचे बाजारातील मूल्य वाढल्यामुळे या बाजारभावाप्रमाणे आपले भाग विकून गुंतविलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम मिळविण्याची संधी समहक्क भागधारकांना प्राप्त होते. समहक्क भागधारक हे प्रमंडळाचे खरे मालक समजले जातात. त्यामुळे या भागधारकांना मतदानाचा हक्क प्राप्त होतो.
2] अग्रहक्क भाग (Preference Shares) – अग्रहक्क भाग म्हणजे काय?
अग्रह भागधारकांना दोन बाबतीत अग्रह प्राप्त होतात. त्यांचा पहिला आग्रह हा लाभांशाच्या बाबतीत असतो. अग्रहक्क भागांवर त्यांची विक्री करताना प्रमंडळाने जाहीर केलेल्या दराने लाभांश दिला जातो आणि समक भागांवर लाभांश देण्या अगोदर अग्रहकांच्या भागांवर लाभांश द्यावा लागतो.त्यांचा दुसरा अग्रहक्क हा भांडवलाच्या परतफेडीच्या संदर्भात असतो.
प्रमंडळाचे विसर्जन झाल्यास समहक्क भागधारकांची भांडवलाची रक्कम परत करण्याअगोदर अग्रह भागधारकांची पूर्ण रक्कम त्यांना परत करणे बंधनकारक असते. अग्रहक्क भागधारकांच्या मतदानाच्या अधिकारावर मर्यादा असतात.
अग्रहक्कांच्या भागांचे खालील प्रमाणे उपप्रकार आहेत–
1) परतफेडीनुसार प्रकार :-
ज्या अग्रहक्क भागांची परतफेड विशिष्ट मुदतीनंतर करण्याचा अधिकार प्रमाणाला असतो अशा भागांना “परतफेड करावयाचे अग्रहक्क भाग” असे म्हणतात. ज्या आग्रहक भागांची परतफेड प्रमंडळाचे विसर्जन झाल्यानंतरच करावी लागते त्यांना “परतफेड न करावयाचे अग्रहक्क भाग” असे म्हणतात.प्रमंडळाला विशिष्ट कालावधीसाठी भांडवलाची गरज असल्यास प्रमंडळ परतफेड करावयाच्या अग्रहक्क भागांची विक्री करून असे भांडवल मिळविते.
याउलट कायमस्वरूपी भांडवलाची गरज असल्यास प्रमंडळ न करावयाच्या अग्रहक्क भागांची विक्री करते.
2) नफ्यातील सहभागानुसार प्रकार :-
ज्या अग्रहक्क भागांवर ठरलेल्या दराने लाभांश दिल्यानंतर उपलब्ध असलेल्या अतिरिक्त किंवा जादा नफ्यातून आणखी लाभांश दिला जातो अशा अग्रहक्क भागांना “नफ्यात सहभाग असणारे अग्रहक्क भाग” असे म्हणतात.या प्रकारच्या भागांवर नफ्यातून नेहमीच्या दराने लाभांश दिला जातो. परंतु प्रमंडळाला एखाद्या वर्षी मोठ्या प्रमाणात नफा झाल्यास त्या नफ्यातून काही भाग जादा लाभांशाच्या स्वरूपात या अग्रहक्क भागांवर दिला जातो.
ज्या अग्रहक्क भागावर अशा प्रकारे जादा लाभांश दिला जात नाही त्यांना “नफ्यात सहभागी न होणारे अग्रहक्क भाग” असे म्हणतात. म्हणजेच या भागांवर ठराविक दराने लाभांश दिला जातो. त्यापेक्षा अधिक लाभांशी मिळत नाही.
3) लाभांश साठविण्यानुसार प्रकार :-
ज्या अग्रहक्क भागांवर लाभांश दिला गेला नसल्यास लाभांशाची रक्कम न बुडता साचत जाते आणि ज्यावेळी लाभांश देण्यासाठी पुरेसा नफा शिल्लक असतो. त्यावेळी ही संपूर्ण साचलेली लाभांशाची रक्कम अग्रहक्क भागधारकांना दिली जाते अशा अग्रहक्क भागांना “लाभांश साठविणारे अग्रहक्क भाग” असे म्हणतात.या प्रकारच्या अग्रहक्क भागांवर लाभांशाची रक्कम बुडत नाही तर ती साजत जाते आणि ज्यावेळी पुरेसा नफा मिळतो त्यावेळी ही लाभांशाची रक्कम भागधारकांना मिळते.
अग्रहक्क भागांवर त्याची विक्री करताना ज्या दराने लाभांश दिला जाईल तो दर जाहीर केलेला असतो. लाभांशाची रक्कम प्रमंडळाच्या नफ्यातून देण्याचे बंधन प्रमंडळावर असते. त्यामुळे एखाद्या वर्षी प्रमंडळाला पुरेशा प्रमाणात नफा न झाल्यास आग्रहक्क भागांवरदेखील बुडतो आणि साठविला जात नाही अशा अग्रहक्क भागांना लाभांश साठविणारे अग्रहक्क भाग असे म्हणतात.
या प्रकारचे भाग धारण करणाऱ्या भागधारकांना न मिळालेला लाभांश पुढील कालावधीतील प्रमंडळाच्या नफ्यातून मागण्याचा अधिकार राहत नाही. म्हणजे त्यांना दरवर्षी लाभांश
मिळलेच याची खात्री नसते .
परिवर्तनानुसार प्रकार :-
ज्या अग्रहक्क भागांची विक्री करताना प्रमंडळाने असे जाहीर केलेले असते की, या अग्रहक्क भागाच्या रकमेचे पूर्णपणे किंवा अंशत: प्रमंडळाच्या समहक्क भागात एका विशिष्ट मुदतीनंतर आणि एका विशिष्ट किमतीला परिवर्तन करण्यात येईल त्यांना परिवर्तनीय अग्रहक्क भाग असे म्हणतात. या प्रकारचे अग्रहक्क भाग विकत घेणाऱ्या गुंतवणूकदारांना परिवर्तनाच्या अगोदरच्या काळात अग्रहक्क भागांचे ठराविक दराने लाभांश,
व परतफेडीत प्राधान्य यांसारखे फायदे मिळताततर परिवर्तनानंतर हे गुंतवणूकदार समहक्क भागधारक होत
असल्यामुळे त्यांना प्रमंडळाच्या वाढत्या नफ्यात अधिक दराने लाभांशात सहभागी होता येते आणि परिवर्तनाच्या वेळीअसलेल्या प्रमंडळाच्या समहक्क भागांच्या बाजारभावापेक्षा कमी रकमेत त्यांना असे समभाग प्राप्त होतात. ज्या अग्रहक्क भागांचे परिवर्तन समहक्क भागात केले जात नाही त्यांना अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग असे म्हणतात. हे अग्रहक्क भाग हे कायमच अग्रहक्क भाग म्हणून अस्तित्वात असतात.
अग्रहक्क भाग म्हणजे काय?
ज्या अग्रहक्क भागांवर लाभांश दिला गेला नसल्यास लाभांशाची रक्कम न बुडता साचत जाते आणि ज्यावेळी लाभांश देण्यासाठी पुरेसा नफा शिल्लक असतो. त्यावेळी ही संपूर्ण साचलेली लाभांशाची रक्कम अग्रहक्क भागधारकांना दिली जाते अशा अग्रहक्क भागांना “लाभांश साठविणारे अग्रहक्क भाग” असे म्हणतात.
सामान्य भाग म्हणजे काय?
एखाद्या कंपनीने एकाच प्रकारचे भाग काढले असल्यास त्यांना सामान्य भाग असे म्हणतात.
शेअरची व्याख्या काय आहे?
शेअर्स हे कॉर्पोरेशनमधील इक्विटी मालकीचे एकक आहेत. काही कंपन्यांसाठी, शेअर्स ही आर्थिक मालमत्ता म्हणून अस्तित्वात आहे जी लाभांशाच्या स्वरूपात कोणत्याही अवशिष्ट नफ्याचे समान वितरण प्रदान करते.