बुलढाणा अर्बन बँक माहिती – बुलढाणा अर्बन बँक बद्दल माहिती /बुलढाणा अर्बन संस्थेविषयी संपूर्ण माहिती – Buldana urban bank information in marathi – नमस्कार मित्रमंडळी!!! आपण आज या लेखात बुलढाणा अर्बन बँक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जेवढी माहिती आमच्याकडे प्राप्त झाली तेवढी माहिती गोळा करून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून तुम्हाला बुलढाणा अर्बन बँक बद्दल थोडीफार माहिती प्राप्त होईल.
तुम्हाला या बँकेत खाते उघडायचे असल्यास अथवा काही शंका असल्यास या माहितीद्वारे तुम्हाला निर्णय घेण्यास सोपे होईल.
बुलढाणा अर्बन बँक माहिती – Buldana urban bank information in marathi
बुलडाणा अर्बनची स्थापना 1986 मध्ये केवळ रु.च्या भांडवलाने झाली. सुरुवातीला 72 सदस्यांसह 12,000/-. आज भारतातील 4 राज्यांमध्ये आमच्या 465 शाखा आहेत. शिवाय, आमच्याकडे विविध ठिकाणी ३५०+ गोदामे आहेत. समाजाची वाढ ही सतत चालणारी प्रक्रिया असणार आहे आणि तशीच आपली सामाजिक बांधिलकीही असेल.
समाजाने (बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी) सुरुवातीपासूनच नेहमीच आपल्या सामाजिक बांधिलकी पूर्ण केल्या आहेत या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष किंवा नाकारता येणार नाही.
समाजाला विविध स्तरांवर मान्यता मिळत राहते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. पृथ्वीराजजी चौव्हान यांच्या हस्ते शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत “जीवन गौरव पुरस्कार” देऊन माझा सत्कार करण्यात आला. आमचे टीमवर्क आणि तुमच्या प्रामाणिक शुभेच्छांमुळे आम्हाला आघाडीवर राहण्याची परवानगी मिळाली आहे. तुमच्यासाठी सर्वोत्तम साध्य करण्यासाठी आम्ही आमचे सर्वोत्तम देणे सुरू ठेवू. मला तुमच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव मिळतील अशी आशा आहे.
राधेश्याम चांडक
संस्थापक – अध्यक्ष
बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक आणि स्थापना
बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. राधेश्यामजी चांडक आहेत.या बँकेची स्थापना जवळपास 1989 साली झाली. या बँकेची सुरुवात राधेश्यामजिने 72 सभासद आणि 12,000 रुपये भांडवलावर बुलढाणाअर्बनची स्थापना केली. या संस्थेला सुरु करण्याचे उद्देश म्हणजेच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन येणे.वंचित घटकांना या समाजात, प्रगतीत, मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी चांडक जींनी बुलढाणा अर्बन ची स्थापना केली.बुलढाणा अर्बन चे मॅनेजिंग डायरेक्टर सुकेश झवर आहेत.
बुलढाणा अर्बन ची कोणकोणत्या शाखा आहेत –
बुलढाणा अर्बनचे मॅनेजिंग डायरेक्टर सुकेश झंवर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने 380+ पेक्षा जास्त शाखा,360+ पेक्षा अधिक गोदामे, 21शाळा,6000 ध्येयनिष्ठ कर्मचारी,7 लाख सभासद आणि 9000 कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल अशी नेत्रदीपक प्रगती केलेली आहे.
बुलढाणा अर्बनचे कार्यक्षेत्र कोणकोणत्या राज्यात आहेत –
बुलढाणा अर्बनचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान,तेलंगणा, सीमाधा,गोवा आणि अंदमान निकोबार या राज्यात आहेत. या राज्यात बुलढाणा अर्बनचे काही शाखा, गोदामे, शाळा, कर्मचारी इत्यादी आहेत.
बुलढाणा अर्बन बँकेकडून मिळणारी सुविधा –
1.बुलढाणा अर्बन चे मॅनेजिंग डायरेक्टर सुकेश झंवर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा अर्बन एक अत्याधुनिक बँकिंग सेवा देणारी तसेच आपुलकी आणि जिव्हाळा जपणारी एक वित्तीय संस्था म्हणून कार्यरत आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट बँकिंग,मोबाईल ॲप्लिकेशन, एटीएम (ATM) तसेच नेफ्ट (NEFT), आरटीजीएस (RTGS) यासारख्या आधुनिक सुविधा देणारे पहिलीच संस्था आहे.
- इंस्ट्रूमेंट ट्रेकिंग आणि कॅश ट्रेकिंग असलेली ही भारतातील एकमेव पथसंस्था आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा भरपूर फायदा घेत बुलढाणा अर्बनचे सर्व डॉक्युमेंटेशन ऑनलाईन झाले आहे.
- तारण ठेवलेल्या सोन्याचे निरीक्षण करण्यासाठी गोल्ड चेकिंग मशीन उपलब्ध आहेत या मशिनद्वारे पॉकेट न उघडता सोन्याचे परीक्षण करता येते.
4.बुलढाणा अर्बन मध्ये लोकर चे सेवा उपलब्ध आहे ज्यामध्ये आपली रोख रक्कम आणि सोने सुरक्षित ठेवल्या जाते.
- सोने तारण कर्ज, कॅश क्रेडिट,टम लोन, वैयक्तिक कर्ज ,शैक्षणिक कर्ज, घरबांधणीसाठी कर्ज इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी आपल्या सभासदांना बुलढाणा अर्बन विशेष सवलती च्या घरात विशेष पुरवठा केला जातो. समाजातील वंचित घटकांना अल्प दराने एलपीजी(LPG) गॅस कनेक्शन साठी कर्ज देऊन संस्था वृक्षतोड रोखण्यास हातभार लावत आहे.
6.इंडियन ओवरसिस बँके (Indian Overseas Bank )च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याज घरात पिक कर्ज उपलब्ध आहेत. सभासद शेतकऱ्यांच्या सहभागातून बुलढाणा अर्बन द्वारे डेरी प्रोजेक्ट हाती घेण्यात येत असून कोल्ड स्टोरेज प्रकल्प सुरु झाला आहे.
बुलढाणा अर्बन संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रात अनुदान –
बुलढाणा अर्बन चॅरिटेबल च्या माध्यमातून सहकार विद्या मंदिर या निवासी विद्यालयाचे स्थापना करून शैक्षणिक क्षेत्रातही बुलढाणा अर्बन ने आपली छाप सोडली. उत्तम निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था या बरोबरच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे नर्सरी ते बारावीपर्यंत शिक्षण, डिजिटल क्लासरूम, रोबोटिक्स, मॅथेमॅटिकल लॅब यासारख्या आधुनिक सुविधा देखील विद्यार्थ्यांना पुरविल्या जातात.
विविध साहसी खेळाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासावर भर दिला जातो. इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार शिक्षणाची सुविधा केवळ बुलढाणा शहरापुरती मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातही उपलब्ध करून दिली पाहिजे या उदात्त भावनेने कोमल झंवर यांनी पुढाकार घेतला.यातूनच बुलढाणा जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरात सहकार विद्या मंदिर शाळा सुरू करण्यात आल्या, अशाप्रकारे बुलढाणा अर्बन संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रात अनुदान दिलेले आहे.
बुलढाणा अर्बनचे सामाजिक क्षेत्रात कार्य –
1.तिरुपती, माहूर ,शिर्डी, ओंकारेश्वर या ठिकाणी भक्तनिवास बांधून कमी दरात निवासाची आणि भोजनाची सुविधा संस्थेने केलेली आहे.
2.गोरक्षण, रुग्णवाहिका, ब्लड बँक, वेद पाठशाळा, आणि वृद्धांसाठी स्वर्गाष्रम अशा विविध योजनातून बुलढाणा अर्बन ने सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे.
- IMPS संपूर्ण माहिती – IMPS म्हणजे काय , कार्य, फायदे, लिमिट, चार्जेस
- NEFT संपूर्ण माहिती – नेफ्ट म्हणजे काय , कार्य, फायदे, लिमिट, चार्जेस
- ऑर्डर चेक कसा भरायचा ? – Order Cheque In Marathi
- कोणताही बँक चा चेक कसा भरायचा ? – How To Fill Cheque In Marathi
- कॅन्सल चेक कसा तयार करावा ? – Cancel Cheque In Marathi
- बँक म्हणजे काय व्याख्या ? बँकेचे कार्य – बँकेचे प्रकार
- पेमेंट बँक म्हणजे काय असते ? पेमेंट बँकेचा उद्देश्य , पेमेंट बँकेचे कार्य
- चेक म्हणजे काय ? चेकचे किती प्रकार आहेत – चेक कसे कार्य करते
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
- शेड्युल बँक म्हणजे काय ? शेड्यूल बँकेचे कार्य
विदेशी बँक म्हणजे काय ? विदेशी बँकेची भूमिका , विदेशी बँकेची नावे
सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
व्यापारी बँक म्हणजे काय आहे ? व्यापारी बैंकांची कार्ये, व्यापारी बँकेचे प्रकार