संयुक्त भांडवल म्हणजे काय ? संयुक्त भांडवलाचे प्रकार, संयुक्त भांडवलाची व्याख्या – Sanyukt Bhandawal iIn Marathi ,नमस्कार मित्र मंडळ!!! आपण या लेखात संयुक्त भांडवल याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. यात आपण संयुक्त भांडण म्हणजे नेमके काय असते, त्याची वैशिष्ट्ये कोण कोणती आहेत, संयुक्त भांडवलाची निर्मिती कशी झाली आहे,
त्याचे प्रकार कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. तरी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला संयुक्त म्हणजेच प्रमंडळ भांडवला विषयी संपूर्ण माहिती प्राप्त होण्यास मदत मिळेल.
संयुक्त भांडवल म्हणजे काय – Sanyukt Bhandawal iIn Marathi
स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, स्वतःची मुद्रा आणि कायमचे सातत्य असणारी, कायद्याने निर्माण केलेली कृतीम व्यक्ती म्हणजे संयुक्त भांडवल मंडळ होय. हस्तांतरणीय भागांमध्ये विभागलेले भांडवल असणारी, ज्या वरील मालकीही सदस्यत्वाची अट असते. अशी नफ्याच्या उद्देशाने स्थापन झालेली व्यक्तींची ऐच्छिक संस्था म्हणजे संयुक्त भांडवल मंडळ होय.
इतर कोणत्याही व्यवसाय संस्थेप्रमाणेच प्रमंडळाला देखील व्यवसाय स्थापन करण्यासाठी आणि तो चालविण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते.. प्रमंडळाचा व्यवसायाचा व्याप मोठा असल्यामुळे सहाजिकच भांडवलाची गरज देखील मोठ्या प्रमाणात असते.. संयुक्त भांडवलाच्या/प्रमंडळाच्या व्यवसायासाठी आवश्यक असणारी जमीन, इमारत, यंत्रसामग्री, फर्निचर इत्यादी स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी स्थिर भांडवलाची गरज असते आणि कच्चामाल, ग्राहकांना द्यायची उधारीची सवलत, दैनंदिन स्वरूपाने खर्च भागविण्यासाठी लागणारी रोख रक्कम व बँकेत ठेवावी लागणारी रक्कम इत्यादी गोष्टींसाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते.
संयुक्त भांडवलासाठी लागणारे भांडवल भागांची विक्री करून, कर्जरोख्यांची विक्री करून, बँका व वित्तीय संस्थांकडून दीर्घ, मध्यम व अल्प मुदतीची कर्जे घेऊन तसेच जनतेकडून ठेवी स्वीकारून उभारता येते.
संयुक्त भांडवलाची व्याख्या
भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार प्रमाणदळाची व्याख्या खालील प्रमाणे करण्यात आले आहे– संयुक्त भांडवल ब्रमंडळ म्हणजे 1956 च्या भारतीय प्रमंडळ कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार प्रमंडळ म्हणून निर्माण झालेली, नोंदणी केलेली आणि अस्तित्वात असलेली संस्था आहे.
वर दिलेल्या व्याख्या वरून असे लक्षात येते की, संयुक्त भांडवली मंडळ किंवा प्रमंडळ ही कायद्यातील तरतुदीनुसार स्थापन करण्यात आलेली संस्था असते. या संस्थेचे भांडवल हे अनेक भागात विभागलेले असते.
या संस्थेचे भांडवल हे अनेक भागात विभागलेले असून हे भाग हस्तांतरणीय असतात आणि भागांवरील मालकी हक्क हा त्या संस्थेच्या सदस्यत्वाचा पुरावा समजला जातो. अशा संस्थेची स्थापना व्यवसाय चालवून नफा कमविण्याच्या उद्देशाने झालेले असते आणि तिला कायमचे अस्तित्व असते.
संयुक्त भांडवलाचे प्रकार
भारतामध्ये संयुक्त भांडवलाची स्थापना भारतीय प्रमंडळ कायद्याच्या तरतुदीनुसार केली जाते. या कायद्यातील तरतुदीनुसार संयुक्त भांडवलाचे प्रकार खालील प्रमाणे आहेत-
1.खाजगी संयुक्त भांडवल
ज्या प्रमंडळातील सभासदांची कमीत कमी संख्या दोन आणि जास्तीत जास्त संख्या 50 इतकी मर्यादित असते त्या संयुक्त भांडवलाला खाजगी संयुक्त भांडवल असे म्हणतात. जास्तीत जास्त सभासद संख्या विचारात घेताना प्रमंडळाचे सध्याचे आणि पूर्वीचे कर्मचारी सभासद वगळण्यात येतात. खाजगी संयुक्त भांडवलाला काही सवलती प्राप्त होतात परंतु अशा संयुक्त भांडवलाला भाग विक्री आणि भागांचे हस्तांतरण या संदर्भात काही बंधनांची पालन करावे लागते.
सार्वजनिक संयुक्त भांडवल
ज्या संयुक्त भांडवलात सभासदांची किमान संख्या साथ इतकी असावी लागते आणि जास्तीत जास्त संख्येवर कोणतीही मर्यादा असत नाही अशा संयुक्त भांडवलाला सार्वजनिक संयुक्त भांडवल असे म्हणतात.
मर्यादित जबाबदारीचे संयुक्त भांडवल
ज्याप्रमाणे सभासदांची जबाबदारी ही त्यांनी विकत घेतलेल्या भागांच्या दर्शनी मूल्य एवढी मर्यादित असते अशा संयुक्त भांडवलाला मर्यादित जबाबदारीचे संयुक्त भांडवल असे म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या सभासदाने अशा संयुक्त भांडवलाचे 100 रुपये प्रत्येकी दर्शनी मूल्य असलेले वीस भाग घेतलेले असल्यास त्या सभासदाची एकूण जबाबदारी रुपये 2000 इतकी मर्यादित असेल तर त्या सभासदाने प्रत्येक भागासाठी रुपये 60 इतकी रक्कम प्रमंडळाला अगोदरच भरलेली असेल तर त्याची जबाबदारी रुपये 800 इतकी शिल्लक राहील.
अमर्यादित जबाबदारीचे संयुक्त भांडवल
ज्या संयुक्त भांडवलातील सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित असते अशा संयुक्त भांडवलाला अमर्यादित जबाबदारी असलेले संयुक्त भांडवल असे म्हणतात. अशा संयुक्त भांडवलाचे स्वरूप जबाबदारीच्या संदर्भात भागीदारी संस्थेसारखेच असते म्हणजेच अशा प्रमाणाच्या सभासदांची खाजगी मालमत्ता सुरक्षित नसते आणि प्रमंडळाची देणे फेडण्यासाठी आवश्यकता भासल्यास भागधारकांची खाजगी मालमत्ता विकली जाऊ शकते.
संयुक्त भांडवलाचे वैशिष्ट्ये
संयुक्त भांडवलाच्या विविध व्याख्यांच्या आधारे संयुक्त भांडवलाची प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत–
- संयुक्त भांडवलाची निर्मिती ही विशिष्ट कायद्यातील तरतुदीनुसार करण्यात येते आणि त्या कायद्याखाली तिची नोंदणी करण्यात येते.
- . संयुक्त भांडवलाला कायद्याने निर्माण केलेली कृतीम व्यक्ती समजण्यात येते. त्यामुळे सामान्य व्यक्तीप्रमाणे संयुक्त भांडवलाला स्वतःच्या नावाने व्यवसाय चालविण्याचा, मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा, करार करण्याचा तसेच न्यायालयात दावा दाखल करण्याचा अधिकार प्राप्त होतो.
- संयुक्त भांडवलाला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असते. हे अस्तित्व भागधारक किंवा संचालक यांच्या अस्तित्वापेक्षा स्वतंत्र असते. त्यामुळे भागधारक किंवा संचालक बदललेले किंवा त्यांचा मृत्यू झाला तरी त्यांचा संयुक्त भांडवलाच्या अस्तित्वावर परिणाम होत नाही. याच कारणामुळे संयुक्त प्रमाणवेळेला कायमचे अस्तित्व प्राप्त होते व दीर्घकाळपर्यंत व्यवसाय चालविणे शक्य होते.
- संयुक्त भांडवलाचे भांडवल हे भागात विभागलेले असते आणि हे भागधारक करणारी व्यक्ती संयुक्त भांडवलाची भागधारक म्हणून समजली जाते. संयुक्त भांडवलाचे भाग हे हस्तांतरणीय असतात.
- संयुक्त भांडवलाला स्वतःची मुद्रा असते आणि तिचा वापर संयुक्त भांडवलाच्या सही सारखा केला जातो. संयुक्त भांडवलाने केलेल्या विविध करारपत्रावर तसेच संयुक्त भांडवलाच्या इतर दस्तऐवजावर प्रमंडळाची मुद्रा उमटविली जाते. त्यामुळे सांभाळून ठेवण्याची जबाबदारी महत्त्वाच्या अधिकाऱ्याकडे सोपविली जाते.
- संयुक्त भांडवलाची स्थापना व्यवसाय चालवून त्यातून नफा मिळवणे या उद्देशाने केलेली असते.
संयुक्त भांडवलाची निर्मिती
संयुक्त भांडवलाची निर्मिती करण्यासाठी केलेल्या प्रतिक्रियेची पूर्तता करावी लागते.. प्रमंडळ निर्मितीच्या प्रक्रियेत खालील चार टप्पे पूर्ण करावे लागतात.
1)प्रवर्तन
व्यवसाय चालवून नफा कमविण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती स्वइच्छेने एकत्र संयुक्त भांडवलाची स्थापना करण्याचे ठरवितात या व्यक्तींना प्रवर्तक असे म्हणतात. या व्यक्ती प्रमंडळाचा उद्देश, जागा, भांडवल, इत्यादी गोष्टींवर विचार करून निर्णय घेतात. या प्रवर्तकांना प्रमंडळाचे घटनापत्रक, नियमावली, संचालकांची यादी, संचालक म्हणून काम करण्याची व पात्रता भाग खरेदी करण्याची तयारी इत्यादी विविध कागदपत्रे तयार करावी लागतात आणि ी राज्याच्या प्रमंडळ नोंदणी अधिकार्याकडे सादर करावी लागतात.
2 )नोंदणी
नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणीसाठी अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर केल्यानंतर नोंदणी अधिकारी ती सर्व कागदपत्रे तपासून पाहतो व कायद्याचे सर्व तरतुदी पूर्ण झाल्याची खात्री पडल्यास तो प्रमंडळाची नोंदणी करतो. नोंदणी अधिकारी संयुक्त भांडवलाची नोंदणी केल्याचे नोंदणी प्रमाणपत्र देतो. नोंदणी प्रमाणपत्र हा संयुक्त भांडवल अस्तित्वात आल्याचा दाखला समजला जातो आणि संयुक्त भांडवल नोंदी प्रमाणपत्राच्या तारखेला अस्तित्वात आले असे समजले जाते.
3) भांडवल गोळा करणे
संयुक्त भांडवलाचा कारभार सुरू करण्यासाठी संयुक्त भांडवलाला भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल गोळा करण्याची व्यवस्था नोंदणी- पत्र मिळाल्यानंतर सुरू करता येते. भाग भांडवल गोळा करण्यासाठी भांडवलाची रक्कम, त्याची विशिष्ट संख्येच्या भागात विभागणी आणि त्यापैकी किती भाग सुरुवातीला विक्रीला काढावेत याबद्दल चा निर्णय व्यवस्थापनाकडून घेतला जातो.
साधारणपणे जनतेला भाग विकत घेण्याचे आवाहन करून भाग भांडवल गोळा केले जाते. जनतेला भाग खरेदीसाठी आव्हान करण्यासाठी माहितीपत्रक प्रकाशित केले जाते. या माहिती पत्रातसंयुक्त भांडवला बद्दलची माहिती दिली जाते.
4) व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र
माहितीपत्रकात नमूद केलेली किमान भांडवलाची रक्कम गोळा करण्यात संयुक्त भांडवल यशस्वी झाले तर संयुक्त भांडवलाला व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळते. त्यासाठी भाग विक्री, भाग- वाटप, जमा झालेली भांडवलाची रक्कम, त्यादी सर्व तपशिलासह आवश्यक ती कागदपत्रे नोंदणी अधिकार्याकडे सादर करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी असा अर्ज करावा लागतो.
भांडवल उभारणीचे कार्य योग्य प्रकारे पूर्ण झाले आहे हे नोंदणी अधिकारी या कागदपत्रांची तपासणी करून खात्री करून घेतो व त्यानंतर संयुक्त भांडवलाला व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र देतो. हे प्रमाणपत्र मिळाल्यावर संयुक्त भांडवलाला आपला व्यवसाय सुरू करता येतो.
भारतीय भांडवल बाजार म्हणजे काय?
भांडवल बाजार म्हणजे संस्थांनी भांडवल उभारणीसाठी तसेच भांडवलांच्या समभाग देवाण घेवाण करण्यासाठी आणि कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालवण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था होय
भारतात भांडवली बाजार कधी सुरू झाला?
1875 मध्ये कापूस व्यापारी प्रेमचंद रॉयचंद, एक कुमाउनी व्यापारी यांनी स्थापन केलेले, हे आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे आणि जगातील दहावे सर्वात जुने आहे.
भारतात किती शेअर बाजार आहेत?
भारतात 23 स्टॉक एक्सचेंज आहेत. त्यापैकी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ही दोन राष्ट्रीय-स्तरीय स्टॉक एक्सचेंज आहेत
भांडवल बाजारात किती काळासाठी कर्ज दिले जाते?
13 महिन्यापेक्षा जास्त मुदतीचे व्यवहार भांडवली बाजारात होतात. भांडवली बाजाराचा विकास करणाऱ्या वित्त संस्थांचा समावेशही भांडवली बाजारात केला जातो.