व्यवस्थापक म्हणजे काय ? व्यवस्थापकच्या अर्थ आणि व्याख्या, व्यवस्थापकाची कार्ये – Manager information in Marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
5/5 - (1 vote)

व्यवस्थापक म्हणजे काय ? व्यवस्थापकच्या अर्थ आणि व्याख्या, व्यवस्थापकाची कार्ये – Manager information in Marathi , manager meaning in marathi , general manager meaning in marathi – व्यवस्थापक काय म्हणतात ते जाणून घ्या. मॅनेजर चा अर्थ इंग्रजीत किंवा मराठीत अर्थ काय किंवा मराठीत व्यवस्थापक म्हणजे काय?

व्यवस्थापक म्हणजे काय - manager information in Marathi

Table of Contents

व्यवस्थापक म्हणजे काय – manager information in Marathi

व्यवसाय संघटनांमध्ये कामाची व्यवस्था पाहण्यासाठी व्यवस्थापकांची नेमणूक केली जाते. व्यवसायाचे मालक किंवा संचालक व्यवस्थापकांची नेमणूक करतात. व्यवस्थापकांना व्यवसाय संघटनेतील सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवावे लागते. व्यवसाय संघटना स्थापन करताना जी उद्दिष्ट्ये ठरविलेली असतात त्यांची पूर्तता करण्याचे काम व्यवस्थापकांना करावे लागते.

 

व्यवस्थापक महत्वाचे का आहेत? – व्यवस्थापक च्या महत्व 

 व्यवसाय संघटनेमध्ये असंख्य अधिकारी व कर्मचारी काम करतात त्यांच्याकडुन काम करून घेणे ही कला आहे ती व्यवस्थापकांकडे अवगत असावी लागते. या सर्वांना एकत्रित करून, त्यांना कामाचे स्वरूप समजावून देऊन, कामाचे विभाजन करून, त्यांच्याकडून काम करून घ्यावे लागते. तसेच ही प्रक्रिया सातत्याने करावी लागते. व्यवस्थापनाला जी कार्ये करावी लागतात ती सर्व कार्ये व्यवस्थापकांना पार पाडावी लागतात. व्यवसाय संघटनेचे यशापयश कार्यक्षमता ही व्यवस्थापकांवर अवलंबून असते. म्हणून कंपनी क्षेत्रामध्ये गतिमान व्यवस्थापकांना फार मागणी आहे.

 

व्यवस्थापकच्या अर्थ आणि व्याख्या – Manager meaning in Marathi

 

“व्यवसाय संघटनेतील विविध लोकांकडून काम करून घेणारी व्यक्ती म्हणजे व्यवस्थापक होय.

 हेन्री फेऑल

“अनुमान करणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे, समन्वय साधणे व नियंत्रण करणे इ. व्यवस्थापकीय कार्ये करणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थापक असे म्हणतात.” ” A person does to manage is to forecast, to plan, to organise, to command, to co-ordinate and to control is called Manager.”

 

प्रो. जेम्स लंडी:

“व्यवस्थापकाचे व्यवस्थापन हे असे कार्य आहे की, ज्याद्वारे नियोजन, समन्वय, संघटन, प्रेरणा, नियंत्रण याद्वारे विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो.”स्थान स्पष्ट होते. वरील व्याख्याद्वारे आपणास व्यवस्थापकांच्या कार्यावरून त्यांची संघटनेतील भूमिका व

 

व्यवस्थापकाची कार्ये (Functions of Manager):

व्यवसाय संघटनेतील सर्व प्रकारच्या व्यवस्थापकीय व प्रशासकीय कार्याशी व्यवस्थापकांचा संबंध येतो.

व्यवस्थापकीय कार्ये : Managerial Functions

 

 नियोजन करणे : ( Planning)

संघटनेतील विविध प्रकारची कार्ये करताना व्यवस्थापकांना प्रथम नियोजनाचा अवलंब करावा लागतो. व्यवसायाची उद्दिष्टे पार पाडताना सुरुवातीला कामाची दिशा ठरवावी लागते व आराखडा तयार करावा लागतो. नियोजनामध्ये पूर्वानुमान, उद्दिष्टे, धोरणे, कार्यक्रम, कार्यपद्धती, कार्यवेळापत्रक व अंदाजपत्रक तयार करणे इ. कार्याचा समावेश केला जातो. प्रत्येक कार्य कसे करावे याबाबत निर्णय घ्यावे लागतात.

त्यासाठी योजना तयार करावी लागते. निर्णय घेताना व्यवस्थापकांसमोर विविध पर्याय उपलब्ध असतात परंतु त्यापैकी योग्य पर्यायाची निवड करण्याला विशेष महत्त्व आहे. भविष्यकालीन अंदाजाद्वारे अडचणी दूर करून उपलब्ध संधीचा अधिक लाभ घेता येतो. नियोजनाद्वारे कामकाज कसे करावे याबाबतचा आगावू अंदाज तयार करता येतो.

 

संघटन करणे : (Organising)

संघटन म्हणजे व्यवसायामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधनांद्वारे समन्वय निर्माण करून कामकाज पद्धतशीरपणे आणि कार्यक्षमतेने करावे लागते. संघटनेतील एकून कामाची विभागणी करावी लागते.. • उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करून त्यांच्याद्वारे संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करावी लागते. व्यवस्थापकांनी दिलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी सामान्य उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी परस्पर सहकार्याने काम करावे लागते.

 

मार्गदर्शन करणे (Directing):

व्यवस्थापकांनी आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांना सतत मार्गदर्शन करावे लागते. नवीन काम समजावून देणे, नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे इ. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या कौशल्यात वाढ होते. मार्गदर्शनामध्ये सूचना, प्रेरणा आणि नियंत्रणाचा समावेश असावा लागतो. कर्मचान्यांना मार्गदर्शन केल्यामुळे त्यांचा प्रतिसाद चांगला लाभतो त्यामुळे व्यवस्थापकांना निर्णय घेणे सोईचे जाते. कर्मचाऱ्यांचे। सहकार्य लाभल्यास कामाला गती प्राप्त होते. व त्यांची कार्यक्षमता वृद्धिगंत होते….

 

कर्मचारी प्रशासन ( Staffing):

संघटनेमध्ये कर्मचारी भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, कर्मचारी विकास, बढती व नियोजन इ. बाबीकडे व्यवस्थापकांना लक्ष दयावे लागते. मनुष्यबळाचा विकास केल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. त्याद्वारे व्यवसायाच्या कार्यक्षमतेत वाढ होते.

मनुष्यबळ ही व्यवसाय संघटनेची मालमत्ता असल्यामुळे व्यवस्थापकांना मनुष्यबळ विकासाकडे सातत्याने लक्ष दयावे लागते. कुशल कर्मचारी प्रत्येक काम दर्जेदार व जलद गतीने करतात. कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ देण्याबरोबर त्यांच्या कल्याणाच्या योजना राबवाव्या लागतात.

अभिप्रेरणा देणे (Motivation):

कर्मचाऱ्यांना कामाची विभागणी करून दिल्यानंतर त्यांनी आपले काम उत्तम रितीने करावे यासाठी त्यांना प्रोत्साहन दयावे लागते. रेनासिस लिकर्ट यांच्यामते कर्मचाऱ्यांना प्रेरणा दिल्यास ते जबाबदारीपेक्षा अधिक काम चांगल्या प्रकारे करतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणे फार गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांची व्यवसायाबाबत चांगली निष्ठा तयार होते व ते मनापासून काम करायला तयार होतात. काम करण्याची त्यांची इच्छा तयार होते. त्यांचे मनोबल वाढते. कर्मचारी व अधिकारी यातील सुसंवाद व संबंध विकसित होतात.

 

नेतृत्व करणे ( Leadership):

व्यवस्थापक हा संघटनेतील कर्मचाऱ्यांचा नेता असतो. त्यांचे नेतृत्व गतिमान असावे लागते. व्यवसाय संघटनेचे यशापयश चांगल्या हुशार, अनुभवी व कार्यक्षम नेतृत्त्वावर अवलंबून असते. व्यवस्थापकांना संघटनेतील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करून काम करावे लागते.

चांगल्या नेतृत्वाला कर्मचारी यामध्ये चांगले संबंध निर्माण करण्याचे काम व्यवस्थापकांना करावे लागते. चांगले नेतृत्व असलेले व्यवस्थापक कर्चचाऱ्यांकडून उत्तम प्रकारे कामे करून घेतात. व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना कामामध्ये सतत प्रेरणा दयायची असते.

 

 समन्वय निर्माण करणे ( Co-ordinating):

मोठ्या व्यवसाय संघटनेमध्ये कामाच्या सोईसाठी विविध विभाग तयार केले जातात. उदा. खरेदी, उत्पादन, विक्री, अर्थ, प्रशासन, व्यवस्थापन, हिशोब, इ. या सर्व विभागांमध्ये आणि त्यातील कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर समन्वय निर्माण करावा लागतो तरच कामामध्ये योग्य रितीने मेळ घालणे शक्य असते.

त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते. प्रत्येक विभाग इतर विभागांवर अवलंबून असल्यामुळे त्यामध्ये परस्पर संबंध निर्माण करणे गरजेचे असते. समन्वयामुळे संघटनेचे एकूण कामकाज सुरळितपणे पार पाडणे शक्य होते.

 नियंत्रण करणे (Controlling):

कामाची अंमलबजावणी नियोजनानुसार केली जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी नियंत्रणाच अवलंब करावा लागतो. संघटनेमध्ये कार्ये करताना कच्चा माल, उत्पादन, यंत्रसामग्री, मनुष्यबळ खर्च आणि दैनंदिन कामकाज इ. वर लक्ष ठेवावे लागते. प्रत्येक कर्मचाऱ्याला दिलेले काम किंव जबाबदारी त्याने नीट पार पाडली आहे की नाही यासाठी नियत्रणांचा अवलंब व्यवस्थापकांना कराव लागतो त्यासाठी त्यांची दृष्टी चौफेर असावी लागते.

त्यामुळे व्यवस्थापकांना कामाचा आढावा घेत येतो. व कामाचे मूल्यमापन करता येते. कामातील दोष दूर करता येतात. कर्मचाऱ्यांना सूचना देऊन कामामध्ये विकसित बदल घडवून आणता येतात..

 

 व्यवस्थापकाची प्रशासकीय कार्ये (Administrative functions of Manager):

 

धोरणे तयार करणेः

व्यवसायाचे मालक किंवा संचालक मंडळाने सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापकांना संघटनेच्य कामकाजाबाबत धोरणे तयार करावी लागतात त्यामध्ये नियोजन, आराखडा, पूर्वानुमान, अंमलबजावणी अचूक निर्णय इ. बाबींचा समावेश असावा लागतो. संघटनेला योग्य दिशा दाखवून योग्य प्रकारे का करण्याची क्षमता त्यामध्ये असावी लागते.

अंदाजपत्रक तयार करणे:

व्यवस्थापकांना दरवर्षी संघटनेचे अंदाजपत्रक तयार करावे लागते. प्रथमतः संघटनेती प्रत्येक विभाग प्रमुखाने अंदाजपत्रक व्यवस्थापकांकडे सादर करावे लागते. सर्व विभागाच्य अंदाजपत्रकाचे एकत्रिकरण म्हणजेच व्यवसायाचे अंदाजपत्रक होय. त्यानुसार रक्कम उपलब् करणे व खर्च करणे साईचे जाते.

 

कामाची अंमलबजावणी करणेः

व्यवस्थापक धोरणे आखणे, नियोजन तयर करणे, निर्णय घेणे इ. बरोबर त्यांना कामाची अंमलबजावणी करावी लागते. नियोजनानुसार अंमलबजावणी झाली आहे किंवा नाही याकडे सातत्याने पहावे लागते. जर एखादया ठिकाणी कामामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास त्या दूर कराव्या लागतात.

 

 कामाचा पाठपुरावा करणे:

संघटनेतील कर्मचारी व विभागांना जी कामे वाटून दिलेली आहेत ती त्यांनी व्यवस्थितपणे करण्यासाठी व्यवस्थापकांनी कामाचा आढावा घेतला पाहिजे. कामातील अडचणी दूर करून कामे वेळेवर, अचूक व सुलभतेने होतील हे त्यांना पहावे लागते.

 

जबाबदारी व अधिकाराचे वितरण करणे:

संघटनेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या पात्रतेनुसार व पदानुसार कामाचे वाटप केले पाहिजे तसेच त्याला आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी योग्य त्या प्रमाणात अधिकाराचे वाटप केले पाहिजे. त्यामध्ये समानता असावी लागते.

 

जमाखर्चावर नियंत्रण ठेवावे

अंदाजपत्रकानुसार प्रत्येक विभागाला रक्कम उपलब्ध करून दिली जाते तिचा त्यांनी योग्य कारणासाठी विनियोग केला आहे काय हे पाहण्यासाठी जमाखर्चावर व्यवस्थापकांना नियंत्रण ठेवावे लागते त्यामुळे उपलब्ध सामग्री व पैशाचा अपव्यय होत नाही.

 

कामाचे मूल्यमापन करणे:

कामाची अंमलबजावणी केल्यानंतर नियोजनानुसार ते केले जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याचे मूल्यमापन करावे लागते. मूल्यमापनामुळे कामातील दोष किंवा त्रुटी दूर करून कामातील अचूकता व कार्यक्षमता वाढविता येते.

 

व्यवस्थापकांची भूमिका – व्यवस्थापकांच्या तीन वैयक्तिक भूमिका 

व्यवस्थापकांना कार्याबरोबर व्यवस्थापक म्हणून उत्तम प्रकारे भूमिका बजवावी लागते. त्यामध्ये त्यांच्या जबाबदाऱ्यांचा समावेश होतो.

मालकांबाबतची भूमिका:

व्यवसायाचे व्यवस्थापन व प्रशासन पाहण्यासाठी मालकांनी व्यवस्थापकांची नेमणूक केलेली असते. संघटनेतील उपलब्ध सामग्रीचा योग्य प्रकारे वापर करून सभासदांना अधिकतम दराने लाभांश देणे, सल्ला देणे, व्यवसायाचा भविष्यकालीन विकास करणे त्यांच्या पैशाचा योग्य प्रकारे विनीयोग करणे, त्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे कामाची अंमलबजावणी करणे याबाबत व्यवस्थापकांना भूमिका पार पाडावी लागते.

विनीयोग करणे, त्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे कामाची अंमलबजावणी करणे याबाबत व्यवस्थापकांना भूमिका पार पाडावी लागते.

 

 संचालकांबाबतची भूमिकाः

सभासदांनी आपल्यातील प्रतिनिधी व्यवसायाची देखरेख करण्यासाठी संचालक मंडळावर पाठविलेले असतात. संचालक एकत्र येऊन व्यवसायाची धोरणे ठरविणे, उद्दिष्टे ठरविणे, इ. कार्ये करतात अशावेळी व्यवस्थापकांनी संचालक मंडळाला मार्गदर्शन करणे. सल्ला देणे, माहिती पुरविण्याचे काम करावे लागते. संचालक मंडळाचा प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापकांना भूमिका पार पाडावी लागते.

 

कामगारांबाबतची भूमिका:

व्यवसायातील मनुष्यबळाची नेमणूक करणे, प्रशिक्षण देणे, कर्मचारी विकासाच्या योजना आखणे, कर्मचाऱ्यांना आर्थिक व आर्थिकोत्तर प्रेरणा देणे, कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविणे, संघटनेमध्ये चांगल्या वातावरणाची निर्मिती करणे, कर्मचारी व अधिकारी यामध्ये सलोख्याचे वातावरण तयार होईल. याबाबत प्रयत्न करावे लागतात.

 

शासनाबाबतची भूमिका:

व्यवसायाचे व्यवस्थापन आणि प्रशासकीय कार्ये करताना व्यवस्थापकांना शासकीय नियम आणि कायद्याचा अवलंब करावा लागतो. उदा. व्यवसाय संघटनेची स्थापना करणे, शासनाकडे करांचा भरणा करणे, कायदेविषयक पुस्तके ठेवणे, जमाखर्च, हिशेब तपासणी इ. शासनाने व्यवसायबाबत जर काही माहिती मागविली असेल तर ती त्यांना वेळेवर व अचूकतेने उपलब्ध करून देणे, शासकीय धोरणाचा अवलंब करणे, नियमांत बदल झाल्यास तसा बदल स्विकारणे इ.

 

व्यवसायातील प्रमुख अधिकारी म्हणून कार्य करणेः

व्यवस्थापक हा व्यवसायातील सर्वोच्च किंवा सर्वेसर्वा अधिकारी असतो म्हणून त्याने व्यवसायाच्या व्यवस्थापनाची व प्रशासनाची सर्व जबाबदारी पार पाडायची असते. व्यवसायातील प्रत्येक कामाला त्यांना जबाबदार धरले जाते म्हणून त्यांना प्रत्येक कामामध्ये बारकाईने लक्ष दयावे लागते.

 

दैनदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे:

व्यवस्थापक हे व्यवसायातील प्रमुख अधिकारी असले तरी त्यांना संघटनेतील दैनंदिन कामावर नीट लक्ष ठेवावे लागते त्यामुळे संघटनेतील सर्व कामकाज सातत्याने सुलभतेने पार पाडले जाते. जसे की आजच्या कामावर उद्याच्या कामाचे नियोजन अवलबून असते. दैनंदिन कामामध्ये येणाऱ्या अडचणी वेळेवर निवारण केल्यास समस्या साचून राहत नाहीत.

 

जमाखर्चावर नियंत्रण ठेवणे:

व्यवसाय संघटनेमध्ये प्रचंड प्रमाणावर सामग्रीसाठी खर्च करावा लागतो. म्हणून व्यवस्थापकांचे सामग्री उपलब्धतेप्रमाणे वापरावर नियंत्रण असावे लागते. दैनंदिन जमाखर्चावर नियंत्रण ठेवल्यास रोख रक्कमेचा अयोग्य वापर होत नाही त्यामुळे खर्चात बचत होते, अयोग्य खर्चाला आळा घातला जातो. अंदाजपत्रकानुसार रक्कम उपलब्धता व खर्च यामध्ये समन्वय राखला जातो.

 

 

व्यवस्थापक काय करतो?

व्यवस्थापक विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संसाधनांची योजना करतात, व्यवस्थापित करतात, निर्देशित करतात आणि नियंत्रित करतात . नियोजन करताना,

व्यवस्थापक महत्वाचे का आहेत?

कोणत्याही संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवस्थापक महत्त्वाचे असतात. ते कोणत्याही संस्थेचा कणा असतात आणि कंपनीत सर्व काही सुरळीत चालेल याची खात्री करणे ही त्यांची भूमिका असते

सोप्या शब्दात व्यवस्थापक कोण आहे?

व्यवस्थापक हा एक व्यावसायिक असतो जो संस्थेमध्ये नेतृत्वाची भूमिका घेतो आणि कर्मचार्‍यांच्या संघाचे व्यवस्थापन करतो .

व्यवस्थापकाची कर्तव्ये काय आहेत?

कर्मचार्‍यांची नियुक्ती, निवड, अभिमुखता आणि प्रशिक्षण देऊन कर्मचारी राखते . सुरक्षित, सुरक्षित आणि कायदेशीर कामाचे वातावरण सुनिश्चित करते. वैयक्तिक वाढीच्या संधी विकसित करते

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment