राज्य म्हणजे काय ? राज्याच्या अर्थ आणि राज्याचे घटक स्पष्ट करा – rajya mhanje kay in marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
4.2/5 - (9 votes)

 rajya mhanje kay in marathi,  राज्य म्हणजे काय ? राज्याच्या अर्थ आणि राज्याचे घटक स्पष्ट करा – What is State In Marathi,   नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात राज्य म्हणजे काय, राज्याची व्याख्या आणि राज्याचे मूलभूत घटक पाहणार आहोत. 

कायद्याचा राज्याशी सखोल संबंध आहे आणि राज्याशिवाय त्याचे वेगळे अस्तित्व नाही. सामान्य अर्थाने, राज्य अशा राजकीय संघटनेला सूचित करते जी आपल्या नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा आणि सामाजिक प्रगतीसाठी अस्तित्वात येते.कायदेशीर दृष्टिकोनातून ‘राज्य’ हा शब्द वापरणारे मॅकियाव्हेली हे पहिले होते.

 प्राचीन ग्रीसमध्ये ‘राज्य’ नावाची संस्था नव्हती, त्या काळी ग्रीक विचारवंतांनी राज्याच्या जागी ‘पॉलिटी’ हा शब्द वापरला होता. ज्याचा अर्थ ‘शहर किंवा राज्य’ असा होतो.

प्राचीन रोममध्ये अशा सार्वजनिक समुदायांसाठी ‘सिव्हिटास’ हा शब्द वापरला जात असे. मध्ययुगात राज्य या शब्दाची संकल्पना केवळ राज्ये आणि संस्थांना पुरती मर्यादित होती. मध्ययुगीन काळात, राज्यकर्त्यांना सार्वभौमत्व निहित असल्यामुळे, ‘राज्य’ हे सर्वोच्च सत्तेचे प्रतीक मानले जाऊ लागले.

rajya mhanje kay in marathi

राज्य म्हणजे काय मराठी ? – rajya mhanje kay in marathi

सर्वसाधारणपणे, राज्य म्हणजे आपल्या नागरिकांच्या हक्कांचे, बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा आणि सामाजिक प्रगतीचे रक्षण करण्यासाठी अस्तित्वात आलेली राजकीय संघटना.

राज्य हे संघटित एकक असे म्हणतात जे एका शासनाच्या किंवा शासनाखाली असते. राज्ये सार्वभौम असू शकतात. आणि राज्य हे कोणत्याही सरकारी युनिटला किंवा त्याच्या कोणत्याही विभागाला ‘राज्य’ देखील म्हणतात, जसे भारतातील राज्यांना देखील ‘राज्य’ म्हणतात.

 

राज्याच्या अर्थ 

स्टेट हा शब्द ‘स्टेटस’ या लॅटिन शब्दापासून बनला आहे. ज्याचा शाब्दिक अर्थ “स्थायी” असा आहे ज्याचा अर्थ अस्तित्वात आहे, हा शब्द ‘स्थिती’ प्रकट करतो.

राज्याची व्याख्या –

1]  ऍरिस्टॉटल :- 

परिपूर्ण व स्वयंपूर्ण जीवनासाठी म्हणजेच सुखी व सन्माननीय जीवनासाठी निर्माण झालेला कुटुंब व गावे यांचा  संघ म्हणजे राज्य होय. 

 

2] ब्लटशली :-

निश्चित भूप्रदेशावर राजकीय दृष्ट्या संघटित झालेला लोकसमूह म्हणजे राज्य होय.

 

3]बुड्ड्रो विल्सन :-

निश्चित भूप्रदेशावर कायदेशीर कारभारासाठी संघटित झालेला लोकसमूह म्हणजे राज्य होय.

 

4] प्रा.  गेटेल :- 

निश्चित भूप्रदेशावर कायम वस्ती करून राहणारा, बाह्य नियंत्रणापासून कायदेशीर रित्या स्वतंत्र असणारा व आपल्या अधिकार क्षेत्रातील सर्व व्यक्ती व गट यांच्यासाठी कायदा करून ते अमलात आणणारी सुसंघटित शासन संस्था असणारा लोकसमूह म्हणजे राज्य होय. 

 

राज्य निर्माण होण्यासाठी आवश्यक घटक 

1]निश्चित भूप्रदेश असला पाहिजे.

2] त्या भूप्रदेशावर कायम वस्ती करून राहणारा लोकसमूह पाहिजे.

3] त्या लोकसमुहाची सामूहिक इच्छा ज्याद्वारे व्यक्त होते व  अमलात आणली जाते, अशी सर्वोच्च सत्ता असली पाहिजे.

4] तो लोकसमूह बाह्य नियंत्रणापासून मुक्त असला पाहिजे. 

 

राज्य निर्माण होण्यासाठी किती घटक आवश्यक आहेत? – राज्याचे घटक

1) लोकसंख्या :- 

  • राज्याच्या अस्तित्वासाठी लोक आवश्यक असतात. लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची विविधता असू शकते. ती भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक, वार्षिक इत्यादी स्वरूपाची असू शकते. 
  • म्हणजेच एखाद्या राज्यात अनेक राष्ट्रांचा समावेश असू शकतो.. उदाहरणार्थ, सोविएट रशियात अनेक राष्ट्रीय लोकांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, रशियन लिथूआणियन, लाटवियन, इस्टोनियम, युक्रेनियन इत्यादी. तसेच युनायटेड किंग्डम मध्ये इंग्लंड, स्कॉटलंड,  वेल्स आणि उत्तर आयलँड या राष्ट्रांचा समावेश होतो. 
  • प्लेटो च्या मते राज्याची लोकसंख्या 5040 असली पाहिजे.
  • रुसोच्या मते राज्याची लोकसंख्या 10,000 असावी.
  •  प्राचीन काळी राज्याची लोकसंख्या कमी असण्याची कारणे–

              – अपुरी दळणवळण साधने

              – अप्रगत समाज

              – लोकसंख्या वाढीचा कमी दर

  • कमी लोकसंख्या असणारी राज्य – इस्त्राईल, पनामा, सिलोन, नेपाळ
  •  जास्त लोकसंख्या असणारी राज्य – भारत, चीन 

 

2)भूप्रदेश :- 

  • राज्याच्या सीमेंतर्गत असलेला भौगोलिक प्रदेश म्हणजेच भूप्रदेश होय. राज्याला निश्चित भूप्रदेश असणे आवश्यक आहे.
  • ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे त्याला त्याचे अधिकार क्षेत्र म्हणतात.
  •  अधिकार क्षेत्र बाबत राज्याला निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार असतो.
  • क्षेत्रफळाने लहान असणारी राज्य –  नेपाळ, पोलांड, मॉरिशस
  •  क्षेत्रफळाने मोठी असणारी राज्य – भारत, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया 

 

3)सार्वभौमत्व :- 

  • सार्वभौमत्व म्हणजे राज्यातील सर्व नागरिक व प्रजाजन यांच्यावर चालणारी व कायद्याच्या बंधनात नसणारी सर्वश्रेष्ठ सत्ता होय. 
  • सार्वभौमत्वाचे प्रकार – 

           1]अंतर्गत सार्वभौमत्व : राज्यअंतर्गत सर्व व्यक्ती, संस्था व गट यावर शासन संस्थेचे कायदेशीर रित्या पूर्ण नियंत्रण असते.

 

           2] बाह्य सार्वभौमत्व : दुसऱ्या कोणत्याही सत्तेच्या नियंत्रणापासून स्वतंत्र असणे. 

 

  • कधी कधी सार्वभौमत्व हा स्वातंत्र्य या शब्दाऐवजी देखील वापरला जातो सार्वभौमत्व हा कायद्याच्या चौकटीतील शब्द आहे, तर स्वातंत्र्य या शब्दाचे स्वरूप राजकीय आहे.
  •  राज्य हे कायदेशीर दृष्ट्या सार्वभौम असते आणि त्याला स्वतःचे संविधान असते.उदाहरणार्थ भारत 1947  साली राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाला आणि 1950 साली संविधान अमलात आणल्यानंतर सार्वभौम राज्य झाले. 

 

4)शासन संस्था /शासन :-

  • राज्याची ध्येय/ उद्दिष्टे प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शासन होय. 
  • प्रत्येक सार्वभौम राज्याला स्वतःची शासन संस्था असणे आवश्यक असते.
  •  शासन हे सार्वभौम आणि स्वतंत्र असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ., ब्रिटिश राजवटीत भारतात शासन व्यवस्था होती, परंतु ती स्वतंत्र व सार्वभौम नव्हती. म्हणूनच स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारत हे राज्य नव्हते. 
  • राज्याच्या संस्था या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात. या सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, व न्याय मंडळ, नोकरशाही इत्यादी शासन व्यवस्थेच्या घटकांचा समावेश होतो.
  •  धोरण निर्मिती, कायदे करणे, निर्णय घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी सार्वजनिक संस्थांची असते. आपण सार्वजनिक संस्था आणि खाजगी संस्था याच फरक करतो. खाजगी संस्था या नागरी समाजाचा भाग असतात. उदाहरणार्थ, खाजगी व्यवसाय, मंडळ इत्यादी. त्यात सार्वजनिक संस्थानाच राज्याच्या नावे कार्य करण्याची अधीमान्यता असते.

 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment