सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे काय ? सहकारी पतपुरवठा संस्थेचे कार्य स्पष्ट करा – Sahakari patpurvatha Sanstha in marathi

मित्रांसह शेअर करा - Share this
2/5 - (1 vote)

Sahakari patpurvatha Sanstha ,सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे काय? सहकारी पतपुरवठा संस्थेचे कार्य स्पष्ट करा , Credit co operative credit society in marathi – सहकाराच्या व्याख्येनुसार सहकारी संस्थेचा कोणताही सदस्य वैयक्तिक फायद्यासाठी काम करत नाही. त्याचे सर्व सदस्य आपापली संसाधने गोळा करतात आणि त्यांचा जास्तीत जास्त वापर करतात आणि काही फायदे मिळवतात, जे ते आपापसात शेअर करतात.

 

आपल्या देशात (भारतातील सहकारी संस्था) सन 1901 मध्ये एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी संस्थांच्या शक्यता आणि यशाचा अहवाल देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्या अहवालाच्या आधारे 1904 मध्ये सहकारी पतसंस्था कायदा करण्यात आला.

उदाहरणार्थ, जर आपण सहकारी बँकेबद्दल बोललो, तर भारतातील सहकारी बँका अशा बँका आहेत ज्यांची निर्मिती आणि क्रियाकलाप सहकारी बँक ifsc कोडवर आधारित आहेत. जगाच्या बहुतांश भागात सहकारी बँका आहेत ज्या लोकांचे भांडवल गोळा करतात आणि लोकांना कर्ज देतात.

Sahakari patpurvatha Sanstha in marathi

 

सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे काय ? – Sahakari patpurvatha Sanstha

सहकारी तत्त्वावर शेती व्यवसायाच्या विकासासाठी योग्य व वाजवी व्याज दराने पुरेसा कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था म्हणजेच सहकारी पतपुरवठा संस्था होय. ज्या गावात किंवा खेड्यामध्ये सहकारी पतसंस्था स्थापन केली जाते, ते गाव किंवा खेड्यापुरते त्या संस्थेचे कार्यक्षेत्र मर्यादित असते. 

 

सहकारी पतपुरवठा संस्थेचे कार्य –

 

1]ठेवी स्वीकारणे :-

सहकारी पतपुरवठा संस्था व्यापारी बँका प्रमाणे चालू, बचत, मुदत  ठेवी स्वीकारण्याचे कार्य करतात. बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी ठेवीवर आकर्षक व्याज दिले जाते.

 

2] कर्ज पुरवठा करणे :- 

सहकारी पतपुरवठा संस्था शेतकरी व सभासदांना बी- बियाणे, खते, अवजारे, सिंचनाची साधने इत्यादी खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करते. 

 

3]कर्जाच्या वापरावर नियंत्रण व कर्जवसुली :- 

सहकारी पतपुरवठा संस्था कर्ज वसुली व कर्जाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करते. सभासदांना दिलेल्या कर्जाचा वापर योग्य कारणासाठी होतो किंवा नाही यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवते. तसेच दिलेल्या कर्ज रकमेची व्याजासह सुलभ हप्त्यामध्ये वसुली करते.

 

4] भांडवल निर्मिती :- 

बचतीला प्रोत्साहन देऊन ठेवी स्वीकारणे, शेती उत्पादक कामासाठी सभासदांना कर्ज पुरवठा करणे, गरजेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन सभासदांची भांडवलाची गरज पूर्ण करण्याचे कार्य पतपुरवठा संस्था करतात. यातूनच ग्रामीण भागातील बचतीचे भांडवलात रूपांतर होते.

 

5] शासकीय योजनांमध्ये सहभाग :- 

 केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच नाबार्ड यांच्याकडून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. या योजनांच्या प्रत्यक्ष कार्यवाही मध्ये सहकारी पतपुरवठा संस्थांचा मोठा सहभाग असतो.

 

6] आर्थिक सल्ला देणे :- 

सभासदांचे आर्थिक नुकसान होणार नाही या दृष्टीने आर्थिक कल्याण व अधिकाधिक सुधारणा कशी होईल या अनुषंगाने सभासदांना आर्थिक मदती बरोबरच आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत सल्ला देण्याचे कार्य सहकारी पतपुरवठा संस्था करते. 

 

7]समाज कल्याणकारी उपक्रमात सहभाग :- 

सहकारी पतपुरवठा संस्था त्यांच्या कार्यक्षेत्राच्या सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतात. ग्रामीण स्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी, प्रौढ साक्षरतेचा प्रचार प्रसार करणे, रक्तदान इत्यादी उपक्रमांना मदत करून परिसराच्या सामाजिक विकासासाठी योगदान देतात. 

 

8]लघु व कुटीर उद्योगांना सहाय्य :- 

ग्रामीण भागात स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना लघु व कुटीर उद्योगांच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे कर्ज अल्प व्याज दराने पुरविण्याचे कार्य या संस्था करतात. त्यामुळे ग्रामीण भागात लघु, कुटीर उद्योगाचा विकास होतो.

 

9] सहकाराचे शिक्षण आणि प्रशिक्षण :- 

ग्रामीण भागात अजूनही निरक्षरता आहे. सहकारी पतपुरवठा संस्थांच्या कार्यामुळे सभासदांना सहकाराच्या तत्त्वांचे, सहकारी जीवन पद्धतीचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे शिक्षण दिले जाते त्याचबरोबर व्यावहारिक शिक्षण सुद्धा दिले जाते.

 

10] कृषी आधारित व्यवसायात वाढ करणे :- 

कृषी उत्पादनासाठी भांडवल पुरवठा केल्यामुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन साखर कारखाने, सूत गिरण्या, डाळ मिल, पोहा मिल यासारख्या कृषी आधारित व्यवसायात वाढ घडवून आणण्याचे कार्य सहकारी पतपुरवठा संस्था करतात. 

 

11]विपणन कार्य संदर्भात सभासदांना मार्गदर्शन :- 

सहकारी पतपुरवठा संस्था सभासद शेतकऱ्यांना शेतमाल विक्री बाबत मदत व मार्गदर्शन करतात. तसेच शेतमालाची मागणी, पुरवठा, किंमतीतील बदल, निर्यातीची शक्यता, निर्यातीची केंद्रे, निर्यात वाढीसाठी गुणवत्ता वाढ इत्यादी बाबत माहिती देतात. 

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment