उत्पन्न म्हणजे काय ? उत्पन्नाची वैशिष्ट्ये ,आणि उत्पन्नाची व्याख्या व संकल्पना – What Is Income In Marathi नमस्कार मित्रमंडळी!!! आपण या लेखात उत्पन्न म्हणजे नेमके काय असते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत आणि उत्पन्नाची व्याख्या व संकल्पना हेही आपण या लेखात पाहणार आहोत. तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला उत्पन्नाबद्दल माहिती मिळण्यास मदत मिळेल.
उत्पन्न म्हणजे काय – What Is Income In Marathi
काय कर कायद्याअंतर्गत काही संकल्पनांच्या व्याख्या करणे आजही अवघड आहे. उदाहरणार्थ,उत्पन्नाची व्याख्या करणे सोपे वाटत असेल तरी आयकर कायद्यात त्याची परिपूर्ण व्याख्या दिलेली नाही. त्यामुळे दरवर्षी उत्पन्नात समाविष्ट होणाऱ्या विविध बाबींचा शोध घेतला जातो आणि उत्पन्नाची वैशिष्ट्ये विचारात घेऊनही यादी दिवसेंदिवस वाढत आहे.
अशा आयकर कायद्याची किमान तोंड ओळख करून घेण्यासाठी काही महत्त्वाचे संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे. म्हणून त्यापैकी उत्पन्न ही संकल्पना आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. उत्पन्न हा शब्द फार व्यापक आहे. अनेक प्रकारची व्याप्ती उत्पन्नात समाविष्ट होते. त्यामुळे उत्पन्न या शब्दाची निश्चित व्याख्या करणे अवघड आहे. आयकर कायद्याअंतर्गत त्याची व्याख्या करण्यात आलेली नाही. हाय तर कायदा कलम 2(24) मध्ये उत्पन्नात समाविष्ट केलेल्या बाबींचा उल्लेख केलेला.
उत्पन्नाची व्याख्या व संकल्पना – Definition And Concept Of Income In Marathi
उत्पन्न हा शब्द फार व्यापक आहे. अनेक प्रकारची व्याप्ती उत्पन्नास समाविष्ट होते. त्यामुळे उत्पन्न या शब्दाची निश्चित व्याख्या करणे अवघड आहे. आयकर कायद्यातही त्याची व्याख्या करण्यात आलेली नाही. आयकर कायदा कलम 2(24) मध्ये उत्पन्नात समाविष्ट केलेल्या बाबींचा उल्लेख केलेला आहे. उत्पन्नात पुढील प्राप्ती समाविष्ट होते–
- नफा किंवा अधिक्य
- लाभांश
- संचालक किंवा हितसंबंधी व्यक्तींना प्रमंडळाकडून मिळणारा फायदा
- वेतन, वेतना बरोबर होणारी प्राप्ती व इतर आर्थिक फायदे.
- संचालक किंवा कर्मचारी, अधिकारी यांची देय रक्कम प्रमंडळाने दिल्याने त्यांना मिळणारे फायदे.
- धर्मदाय संस्थांना मिळणारी देणगी व वर्गणी
- कर्मचाऱ्याला मालाकडून मिळणाऱ्या सोयी व सवलतीचे मूल्य.
- व्यवसायात असलेल्या स्थिर संपत्तीच्या विक्रीपासून होणाऱ्या लाभ.
- पुढील व्यक्तींना मिळणारी नुकसान भरपाई ची रक्कम–
अ) संस्थेच्या व्यवस्थापनात असलेल्या व्यक्तीला सेवा मुक्त केल्यास किंवा तिच्या नोकरीच्या अटीत
बदल केल्यास दिलेली रक्कम.
आ)विदेशी प्रमंडळाचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्ती सेवा मुक्त केल्यास किंवा त्याच्या सेवाशर्तीतील
बदलामुळे दिलेली रक्कम.
इ) एखाद्या व्यक्तीच्या संपत्तीचे किंवा व्यवसायाचे व्यवस्थापन सरकारने केल्यास त्याला मिळणारी भरपाई.
- भांडवली स्वरूपाचे उत्पन्न
- आयुर्विमा महामंडळ किंवा सहकारी विमा महामंडळाने मिळविलेला नफा व लाभ.
- लॉटरी, शब्द कोडे, पैज, शर्यत, घोड्यांची शर्यत यापासून मिळणारे उत्पन्न.
- बुडीत कर्ज लाभांश
- व्यापार किंवा व्यवसाय केल्यामुळे होणारा फायदा किंवा आव्हानंतर प्राप्ती पैशात रूपांतर होऊ शकत
नाही.
- येणे असलेली वार्षिक रक्कम.
उत्पन्नाची वैशिष्ट्ये – Features Of Income
1.निश्चित उगम स्थान:-
उत्पन्न ठरविण्यासाठी मिळालेली प्राप्ती ही निश्चित अशा साधनांपासून मिळालेली असावी. उदाहरणार्थ, नोकरी पासून वेतन, कर्जरोख्यापासून व्याज, गुंतवणुकीमुळे लाभांश, घरापासून भांडे, व्यवसायापासून नफा. थोडक्यात प्राप्तीचे उगम स्थान निश्चित करता आले पाहिजे.
2.उत्पन्न बाह्य साधनापासून मिळावे
व्यक्तीला मिळालेले उत्पन्न हे बाह्य साधनापासून असावे. पतीने पत्नीस दिलेली रक्कम, वडिलांनी मुलांना किरकोळ खर्च साठी दिलेली रक्कम उत्पन्न होऊ शकत नाही. याउलट कर्जरोखे, भाग यात रक्कम गुंतवली तर त्यापासून मिळणारी प्राप्ती उत्पन्न ठरते. घर बांधले व त्यापासून भाडे मिळाले तर घर भाडे उत्पन्न ठरते.
3.उत्पन्न नियमित असावेत असेही नाही
उत्पन्न वर्षात केव्हाही मिळाले तरी चालते. त्यासाठी वर्षभर सातत्यपूर्ण काम करणे आवश्यक असते असेही नाही.वर्षातील दोन महिन्यात अनेक पुस्तके लिहिली व त्यापासून मानधन मिळाले. पुढे वर्षभर त्यांनी काहीच काम केले नाही तरीही पुस्तकाचे मानधन उत्पन्न सदरात येईल.
4.अर्जित उत्पन्न
एखाद्या व्यक्तीस उत्पन्न प्रत्यक्ष मिळाले नसेल परंतु ते मिळविण्याचा अधिकार मिळाला असेल किंवा ते देय झाले असेल तर ते उत्पन्न या शब्दात समाविष्ट होते. उदाहरणार्थ, कर्जरोख्यावरील व्याज देय झाले असेल परंतु कंपनीकडून व्याज अधिपत्र अजून मिळाले नसेल तरीही ते व्याज त्या वर्षातील उत्पन्न म्हणून दाखवावे लागते.
5.खर्चातून मुक्तता म्हणजे उत्पन्न नव्हे
एखाद्या प्रमाणाने खर्च न करता बचत केली असेल तर या वाचविलेल्या खर्चाला उत्पन्न म्हणता येणार नाही. संस्थेने काटकसरीने काम केले. त्यामुळे जर पैसे वाचले तर त्याला उत्पन्न म्हणता येत नाही.नुकसान भरपाई देय होती परंतु ती व्यक्तीने घेतली नाही. त्यामुळे त्या पोटी होणारा खर्च वाढला तर त्याला उत्पन्न म्हणता येत नाही.
6.उत्पन्नाचे स्वरूप:-
उत्पन्न रोख अगर पैशाच्या स्वरूपातच मिळाले पाहिजे, असेही नाही. अनेक प्रमंडळे आपल्या अधिकाऱ्यांना पगाराशिवाय इतर अनेक सोयी उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ, बंगला, फर्निचर, खाजगी कामासाठी गाडी, इत्यादी. या सर्वांचे मूल्य उत्पन्न म्हणून समजले जाते व त्यावर आयकर भरावा लागतो.
7.वादातील उत्पन्न
उत्पन्न वादातील असावे, असेही नाही. एखाद्या व्यक्तीस उत्पन्न मिळाले परंतु ते मिळविण्याला त्याला अधिकार होता की नाही असा वाद निर्माण झाल्यास मिळालेले उत्पन्न, उत्पन्न म्हणून आयकर कायद्यात मानले जाईल व त्यावर आयकर द्यावा लागेल.
8.एकदम व एकत्रित उत्पन्न
उत्पन्न सतत वर्षभर मिळत असेल अगर वर्षात केव्हाही एकत्रितरित्या रक्कम मिळालेली असेल तरी त्याला उत्पन्न समजले जाईल.ते दरमहा मिळावे अगर सतत मिळत राहणे आवश्यक नाही.
9.उत्पन्न वास्तव (Real)असावे
उत्पन्न वास्तव असावे. एका खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात भरण्याने उत्पन्न निर्माण होत नाही. स्वतःशी स्वतः व्यवहार केल्याने उत्पन्न निर्माण होत नाही.
10.करमुक्त उत्पन्न (Tax Free Income)
मालक कर्मचाऱ्याला करमुक्त उत्पन्न देऊ शकत नाही. कर कपात न करता कोणतीही रक्कम कर्मचाऱ्याला दिली तर त्यावर मालकाला आयकर भरावा लागतो. कर्मचाऱ्याने आपल्या ऐकून उत्पन्नात त्याला मिळालेली रोख रक्कम अधिक मालकाने त्यावर भरलेला कर अशी ऐकून रक्कम दाखविली पाहिजे.
11.बेकायदेशीर उत्पन्न
कायदेशीर व बेकायदेशीर उत्पन्न असा कोणताही भेदभाव उत्पन्न निश्चित करताना केला जात नाही. सर्व प्रकारच्या उत्पन्नावर कर आकारला जातो. काळ्या बाजारातून मिळालेले उत्पन्न सुद्धा करपात्र आहे.
12.उत्पन्नातील कपाती
कर्मचाऱ्याच्या देण्यापोटी मालकाने कपात करून घेतली ती कपात कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचाच भाग समजला जाईल. हा फक्त कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचा त्याच्या कामासाठी केलेला उपयोग असे समजले जाईल.उदाहरणार्थ, कर्मचाऱ्याची क्लब ची वर्गणी मालकाने भरली तर ती कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात जमा केली जाईल.
उत्पन्न परिणाम म्हणजे काय?
उत्पन्नाचा परिणाम हा ग्राहक निवड सिद्धांताचा एक भाग आहे जो ग्राहकांच्या उपभोग खर्चातील बदल स्पष्ट करतो ज्यामुळेमागणी वक्र. उत्पन्न वाढल्याने महत्त्वाच्या वस्तूंसाठी ग्राहकांची मागणी वाढेल
उत्पादन खाते म्हणजे काय?
उत्पादन खाते राष्ट्रीय खात्यांमध्ये परिभाषित केल्यानुसार वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाच्या क्रियाकलापांची नोंद करते
निव्वळ नफा म्हणजे काय?
नेटउत्पन्न खर्च आणि स्वीकार्य कपातीनंतर तुमचा व्यवसाय कमावलेला नफा आहे. हे सर्व ऑपरेटिंग खर्चानंतर शिल्लक राहिलेल्या पैशाचे प्रतिनिधित्व करते