(परकीय विनिमय बाजार) विदेशी विनिमय बाजार म्हणजे काय ? परकीय विनिमय दर ,बाजाराची रचना ,सहभागी घटक – Videshi vinimay bajar mhanje kay, परकीय विनीमय बाजार हा आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे. देशा- देशांमधील व्यापारी व वित्तीय व्यवहारांमुळे आतंरराष्ट्रीय स्तरावर देणी-घेणी निर्माण होतात.
आयात- निर्यात व्यापार पर्यटन, वाहतूक, रॉयल्टीज, गुंतवणूक उत्पन्न, अल्पकालीन व दीर्घकालीन भांडवली प्राप्ती व देणी इत्यादी व्यवहारांमुळे निर्माण होणाऱ्या आंतरराष्ट्रीय देणी-घेणी व्यवहारांसाठी एका चलनाचे रूपांतर दुसऱ्या चलनात करावे लागते त्यासाठी परकीय विनिमय बाजाराची आवश्यकता लागते.
विकसनशील देशांसाठी विदेशातून येणारा अल्पकालीन भांडवली प्रवाह व दीर्घकालीन गुंतवणूक यासाठी हा बाजार महत्वाचा ठरतो. त्यासाठीही चलनांचे रूपांतर करावे लागते. जागतिक अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण म्हणून उदयास येत असलेल्या भारतासारख्या बाजाराधिष्ठीत अर्थव्यवस्थांच्या दृष्टीने परकीय चलनाच्या
विनिमय दराचे व्यवस्थापन, परकीय चलनाची गंगाजळी आणि विदेशी कर्ज यांच्या धोरणांना खूपच महत्व आहे. देशातील परकीय गंगाजळीचा मोठा साठा व त्यामुळे रूपयांचे झालेले उर्ध्वमूल्य (Appriciation) यांच्या पार्श्वभूमीवर विनिमय दराच्या लवचिकतेच्या व्याप्तीवरही भरपूर चर्चा, वादविवाद झाले.
परकीय विनिमयाची संकल्पना – Videshi vinimay bajar
परकीय चलन म्हणजेच परकीय विनिमय होय. यामध्ये देशाच्या नागरिकांजवळ असलेल्या, परकीय चलनावर हक्क सांगणाऱ्या सर्व पतसाधनांचा समावेश होतोपरकीय विनिमय यंत्रणा म्हणजे आंतरराष्ट्रीय देणी देण्याची यंत्रणा होयया व्यवस्थेच्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या चलन पद्धती असलेल्या देशांमधील देणी देण्याचे काम केले जाते.
त्यासाठी देशाच्या अंतर्गत चलनाचे दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये परिवर्तन करण्याचे काम ही यंत्रणा करते हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी एका देशाच्या चलनाचे मूल्य, दूसऱ्या देशातील चलनाशी ठरवावे लागते. या वित्तीय व्यवहारातून परकीय विनिमय बाजार व परकीय विनिमय दर या संकल्पना अस्तित्वात आल्या आहेत.
परकीय विनिमय बाजार – विदेशी विनिमय बाजार म्हणजे काय?
ज्या बाजारात परकीय चलनांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात त्यास परकीय विनिमय बाजार म्हणतात. देशांतर्गत चलन देऊन त्या बदल्यात विदेशी चलन खरेदी करणे किंवा विदेशी चलनाची देशांतर्गत चलनासाठी विक्री करण्याचे व्यवहार यामध्ये होतात. हा बाजार म्हणजे विशिष्ट भौगोलिक जागा नाही. परकीय चलनाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार प्रामुख्याने सरकारी राजकोष, मध्यवर्ती बँक, परकीय विनिमय बँका मोठ्या व्यापारी बँकाचा विदेशी विनिमय विभाग यांच्या मार्फत चालतो.
परकीय चलनाचे व्यवहारकर्ते, दलाल, व्यापारी अशा बँकातून व्यवहार करतातया सर्व सहभागी घटकांचा टेलिफोन, टॅलेक्स, संगणक अशा माध्यमातून परस्परांशी संपर्क व संबंध प्रस्थापित होतो व ही संपूर्ण व्यवस्था बाजारातील विदेशी चलनाचे व्यवहार करणाऱ्या खरेदीदार व विक्रेत्यांना एकत्र आणते. विदेशी विनिमय बाजारातील व्यवहार दररोज २४तास दूरध्वनी, टेलेक्स, फॅक्स, संगणक यांच्या माध्यमाने चालतात. या बाजारात साधारणतः तज्ञ व्यक्ती काम करतात.
बहुतेक व्यवहार सुरवातीला तोंडी स्वरूपात होतात व नंतर लिखित दस्तऐवज तयार केले जातात. एक अनौपचारिक नैतिक शिस्तिची नियमावली असल्याने व्यवहारकर्त्यांच्या शब्दाला एक वजन व दर्जा प्राप्त असतो.
परकीय विनिमय दर – परकीय विनिमय दर म्हणजे काय
परकीय विनिमय दराचा उल्लेख विनिमय दर असाच होतो. एका देशाच्या चलनाची दुसऱ्या चलनात सांगितलेली किंमत म्हणजे विनिमय दर होयविदेशी चलनाचे एक परिमाण विकत घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी स्थानिक चलनाचे किती परिमाण लागतेत्यास विनिमय दर म्हणतात. उदा. एका अमेरिकन डॉलरची रूपयातील किंमत ४५.७५रूपये आहे तर परकीय विनिमय दर १९ (डॉलर): = ४५.७५ रुपये असा आहे.
विदेशी विनिमय बाजारात दोन चलनाचे बाबतीत एकाच वेळी वेगवेगळे विनिमय दर आस्तित्वात असतात. विनिमयासाठी वापरल्या जाणाऱ्या पतसाधनावर हे दर अवलंबून असतात
परकीय विनिमय दराचे प्रकार
- हजर दर किंवा केबल दर
- दर्शनी विनिमय दर (Sight Rate)-विदेशी चलनाच्या हुंड्यांशी संबंधित
- मुदतीदर (Usance / Long Rate) हा एका महिन्याचा किंवा तीन महिन्याचा दर असू शकतो.
- वायदा दर भावी व्यवहारासांठी असलेला विदेशी विनिमय बाजारात प्रामुख्याने दोन प्रकारचे विनिमय व्यवहार होतात.
१) हजर दर
परकीय चलनाचे विक्रेते व ग्राहक यांच्यात विदेशी चलनाचे तत्काळ प्रत्यक्ष हस्तांतरण चालू तारखेला ज्या दराने होते त्यास हजर बाजार दर ‘ म्हणतात
२) वायदा दर (Forward Rate) :
विनिमय दरात विविध कारणांनी उतार-चढ होत असतात. त्यातून निर्माण होणारी अनिश्चितत दूर करण्यासाठी वायदे व्यवहार केले जातात. पुढच्या तारखेला विदेशी चलनाची खरेदी-विक्री करण्यासाठी आजच निश्चित विनिमय दराने करार केला जातो. यालाच वायदा म्हणतातवर्तमानकाळात ठरलेल्या ज्या दराने भविष्यकाळात चलनाची खरेदी-विक्री होणार असेल त्याला वायदा दर म्हणतात.
३) अंतरपणन व्यवहारः
काहीवेळा दोन परकीय विनिमय बाजारात, विनिमय दर वेगवेगळे असतातउदामुंबईत १ डॉलर ९४५.७५ असेल व न्यूयॉर्क मध्ये १ डॉलर = ४५.७७ ए असेल तर मुंबई मध्ये डॉलर्सची खरेदी करून व न्यूयॉर्कमध्ये त्यांची विक्री करून एका डॉलरमागे २ पैशाचा फायदा कमविता येतो. विनिमय दरातील फरकाचा लाभ घेण्यासाठी एकाच वेळी एका बाजारात चलनाची खरेदी व दुसऱ्या बाजारात विक्री केली जाते.
त्याला अंतरपणन म्हणतात. यामुळे दोन बाजारातील विनिमय दर पून्हा एकाच पातळीवर येतात. अतरपणन व्यवहार फक्त दोनच बाजाराशी संबंधित असतील तर त्यास द्विपक्षीय (Two Points) आंतरपणन म्हणतात व हा व्यवहार तीन किंवा अधिक बाजाराशी संबंधित असेल तर त्या बहु-पक्षीय (Multi Points) आंतरपणन म्हणतात.
परकीय विनिमय बाजाराची रचना
भारतातील विनिमय बाजाराची रचना त्रीस्तरिय आहे. त्यामध्ये
- सर्वोच्च स्थानावर भारतीय रिझर्व्ह बँक.
- रिझर्व्ह बँकेने परवाना दिलेले मान्यताप्राप्त व्यवहारकर्ते
- ग्राहकः आयात व निर्यात करणारे व्यापारी, निगम, विदेशी चलन मिळविणारे इतर लोक इत्यादी.
या मुख्य सहभागी घटकांबरोबरच परकीय चलन परिवर्तन करणारे (Money changes) ज्यांना रिझर्व्ह बँकेकडून विदेशी चलनाच्या खरेदी-विक्रीचा विशेष परवाना दिला जातो. ते ही या बाजारात महत्वपूर्ण आहे. हुंडी दलाल ही या बाजारात मध्यस्थ म्हणून कार्य करतात. हुंडी दलाल ही या बाजारात मध्यस्थ म्हणून कार्य करतात.
हुंडी दलाल फक्त हुंड्यांची खरेदी / विक्री करण्यास इच्छुक व्यक्ती व व्यवहारकर्ते यांना एकत्र आणतात. त्यांच्यात संपर्क साधून दिला की त्यांचे कार्य संपते. त्याबद्दल त्यांना अडत मिळते. हे हुंडी दलाल प्रत्यक्ष चलनाची खरेदी / विक्री करत नाहीत.
अधिकृत व्यापारी / व्यवहारकर्ते यांनी ‘भारतीय विदेशी चलन व्यापार संघटना’ (Foreign Exchange Dealers Association of India FEDAI) स्थापन केली असून या संस्थेच्या नियममार्गदर्शक तत्वे व सूचनांप्रमाणे व्यवहारकर्ते व्यापार करतात.
परकीय चलन बाजारात, आयात / निर्यात करणारे. व्यापारी गुंतवणूकदार व इतर ग्राहक आणि व्यवहारकर्ते यांच्यातील चलनाचे व्यवहारव्यवहारकर्त्यामधील आपापसातील होणारे चलनांचे व्यवहार, समुद्रापार बँकाशी होणारे व्यवहार आणि अधिकृत व्यवहारकर्ते व रिझर्व्ह बँक यामध्ये होणारे व्यवहार या व्यवहारांचा समावेश असतो.
सध्या भारतात विदेशी चलनाचे व्यवहार करणाऱ्या अधिकृत बँकांची संख्या ९२ असून त्यांच्या ‘मान्यताप्राप्त व्यवहारकर्ते / व्यापारी म्हणून उल्लेख केला जातो. यापैकी बऱ्याचशा विदेशी बँका व मोठ्या भारतीय बँका दुतर्फा किंमत जाहीर करतात. बँका आपापसात प्रत्यक्ष व्यवहार करतात किंवा परकीय विनिमय दलालांच्या मध्यस्थीने व्यवहार करतात.
सध्या अशा दलालांची संख्या ४७ आहे बँकाव्यतिरिक्त काही मुदतकर्जे देणाऱ्या वित्तीय संस्थानाही मर्यादित प्रमाणात विदेशी विनिमय व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ‘भारतीय विदेशी चलन व्यापारी संघटनाही संस्था कमिशन व इतर देणी यासंबंधी नियम ठरवते तसेच मान्यताप्राप्त व्यवहारकर्त्यांच्या परस्परहितांच्या विषयातही लक्ष घालते. हजर आणि वायदा विनिमय करारांचे व्यवहार या बाजारात मुक्तपणे चालतात व काही मर्यादित प्रमाणात अनुजात व्यवहारही चालतात.
बाजाराची रोखता व कार्यक्षमता ही बोली मागणी तफावतीवरून (Bid Ask Spread) निर्देशित होते. भारतात हजर दरातील बोली मागणी तफावत ही ०.२५ ते ०.५० पैसे अशी सामान्यपणे आढळते तर अदलबदल (Swap) दरातील बोली मागणी तफावत ही १ ते २ पैसे आढळते. परकीय विनिमय बाजारातील उलाढाल ही अनेक वर्षे वाढीची प्रवृत्ती दर्शवित आहे.
परकिय विनिमय बाजारातील सहभागी घटक : (Players)
परकीय विनिमय बाजारातील सहभागी घटक पुढिलप्रमाणे सांगता येतील.
- मध्यवर्ती बँक-मध्यवर्ती बँक देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याची खरेदी व विक्री करीत असते. रूपयाचा विनिमय दर आवश्यक पातळीवर ठेवण्यासाठी गरजेप्रमाणे जाणीवपूर्वक विदेशी चलनाची खरेदी किंवा विक्री करते.
- अधिकृत व्यापारी बँका व काही बँकेतर वित्तीय संस्थांना भारतीय रिझर्व्ह बँकेने विदेशी चलनाची खरेदी विक्री करण्याची परवानगी दिलेली आहे. सध्या ९२ बँका आणि (IDBIIFCIICICI) या वित्तीय संस्थाना विदेशी चलनाचा व्यवहार करण्याची मान्यता आहे. नफा मिळविण्यासाठी विदेशी चलनाची “खरेदी-विक्री करण्याचा अधिकार त्यांना मिळतो. व्यवहारकर्त्यांमधील स्पर्धेमुळे हा बाजार कार्यक्षम राहतो.
- व्यक्ती आणि व्यवसाय संस्था-निर्यातदार, आयातदारआंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार, पर्यटक व इतर व्यक्ती, बहुराष्ट्रीय कंपन्या व इतर व्यवसायसंस्था या व्यापारी व्यवहार किंवा गुंतवणूक व्यवहार करण्यासाठी या बाजारात सहभागी होतात
- दलाल – दलाल हे परकीय विनिमय खरेदी करू पाहणारे व विक्रेते यांच्यात संपर्क प्रस्थापित करतात. व त्यांना व्यवहार पूर्ण करण्यास मदत करतातत्यासाठी ते खरेदीदार व विक्रेते दोघांकडूनही कमिशन घेतात. सर्वसाधारणपणे डॉलर, पौंड, येन यासारख्या महत्त्वाच्या चलनाचे ते व्यवहार करतातअशा चलनांचे ते तज्ञ असून विनिमय दराविषयी माहिती देण्याचे काम ते करतात.
- सट्टेबाज व अंतरपणक (Arbitragers): सट्टेबाज व आंतरपणक या बाजारात नफा कमविण्यासाठी विदेशी चलनाचे सामान्य व्यवहार
भारतीय विदेशी चलन व्यापार संघटना (FEDAI Foreign Exchange Dealers Association of India):
विदेशी व्यापारात वेगाने वाढ झाल्यापासून भारतीय रिझर्व्ह बँकेने अनेक अनूसूचित व्यापारी बँका / परकीय विनिमयाचे व्यवहार करण्यास परवानगी दिली १९५८ मध्ये रिझर्व्ह बँकेची मान्यता घेवून
भारतीय विदेशी चलन व्यापारी संघटनेची स्थापना करण्यात आली. प्रत्येक सभासद बँकेला रिझर्व्ह बँकेला हमी द्यावी लागते की परकीय विनिमयाचे व्यवहार करताना (FEDAI) ने ठरविलेले नियम व कायदेकानून आणि विनिमय दर त्यांच्यावर बंधनकारक राहील.
१ एप्रिल १९९० पासून भारतीय विदेशी चलन व्यापारी संघटनेचे रूपांतर नोंदणीकृत कंपनीमध्ये झालेले आहे. व्यवस्थापकीय समितीमध्ये प्रमुख कार्यकारी व्यवस्थापक Chief Executive) व २० सदस्यांचा समावेश आहे. या कंपनीचे मुंबईत नोंदणीकृत कार्यालय असून दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई व कोचीन येथे स्थानिक बँकर्सचा समावेश असलेल्या स्थानिक समित्या स्थापन केलेल्या आहेतही कंपनी अधिकृत व्यवहारकर्ते/व्यापारी यांच्यासाठी परकिय विनिमय व्यवहार करण्यासाठी, नियम व मार्गदर्शक तत्वे ठरवून देते.
अधिकृत व्यापारांकडून रिझर्व्ह बँकेच्या नियमांची अमंजबजावणी व पालन केले जात आहे. यावर देखरेख ठेवणे हे कंपनीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
- विकास बँक म्हणजे काय ? विकास बँकेचे कार्य
व्यापारी बँक म्हणजे काय आहे ? व्यापारी बँकेचे प्रकार , महत्त्व , व्यापारी बँकेची सूची
विदेशी बँक म्हणजे काय ? विदेशी बँकेची भूमिका , विदेशी बँकेची नावे
सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
भारतीय रिझर्व बँक म्हणजे काय ? भूमिका ,मुख्य कार्य , स्थापना, राष्ट्रीयीकरण
वित्तीय प्रणाली म्हणजे काय आहे ? अर्थ , महत्त्व, कार्य, भारतीय वित्तीय प्रणाली
फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय ? फॉरेक्स ट्रेडिंग कसे करावे , फॉरेक्स ट्रेडिंग संपूर्ण माहिती
परकीय चलन बाजार म्हणजे काय ?
परकीय चलन बाजार एक विकेंद्रित जागतिक बाजारपेठ आहे जिथे जगातील सर्व चलने एकमेकांच्या विरोधात व्यवहार करतात आणि चलनाच्या किंमतीतील बदलांमुळे व्यापारी नफा किंवा तोटा करतात.
जगातील सर्वात मोठी परकीय चलन बाजारपेठ कोणती आहे?
लंडन, न्यूयॉर्क, सिंगापूर आणि टोकियो ही परकीय चलन व्यापारासाठी सर्वात मोठी व्यापारी केंद्रे आहेत.
भारतात FEMA म्हणजे काय?
परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) चे उद्दिष्ट विदेशी व्यापार आणि देयके सुलभ करणे आणि भारतातील परकीय चलन बाजाराचा सुव्यवस्थित विकास आणि देखभाल करण्यास प्रोत्साहन देणे आहे.
FEMA ची स्थापना कधी झाली?
परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA), 1999.
देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याचा संरक्षक कोण आहे?
भारताच्या परकीय चलनाच्या साठ्याचा संरक्षक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे
विनिमय दरातील चढ उतार याचा फायदा कोण घेतो?
विनिमय दरातील चढ-उतारांमुळे विदेशी मुद्रा व्यापारात गुंतवणूक करणाऱ्या सर्व विविध प्रकारच्या बँकांना आणि सर्व विदेशी मुद्रा व्यापार्यांना चांगला नफा मिळतो.