युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया माहिती,( UTI म्हणजे काय ) , युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया चे उद्दिष्टे ,कार्य, वित्तीय साधन सामग्री – Unit Trust of India in Marathi , देशातील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील अल्प बचतीचा देशाच्या औद्योगिक विकासासाठी वापर करण्याच्या उद्देशाने युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना सन 1964 मध्ये करण्यात आली.
1 फेब्रुवारी 2003 रोजी, UTI औपचारिकपणे विभाजित झाले. UTI-I ची नियुक्ती US-64 सह सर्व 26 योजनांसाठी केली गेली आहे ज्यात गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा दिला जातो. UTI-II SEBI नियमांनुसार म्युच्युअल फंड म्हणून काम करत राहील
युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया मराठी माहिती – Unit Trust of India in Marathi
छोट्या बचतदारांची बचत गोळा करण्याच्या दृष्टिने युनिट ट्रस्टचे महत्त्व २० व्या शतकाच्या सुरवातीलाच लक्षात आले. १९५४ मध्ये श्रॉफ समितीने भारतात असा ट्रस्ट स्थापन करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला१९६४ साली युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ची स्थापना सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था म्हणून झाली.
यु.टी.आय चे सुरवातीचे अधिकृत भांडवल वैधानिक दृष्ट्या ५ कोटी रु. निश्चित करण्यात आले. हे भाग भांडवल रिझर्व्ह बँक (२.५ कोटी रु.), LIC (०.७५को. रु.), SBI व सहयोगी बँका (०.७५को रु.) व इतर वित्तीय संस्था व व्यापारी बँका (१ कोटी रु.) विकत घेतले आहे.
UTI च्या वित्तीय साधन सामग्रीत भाग भांडवल नाही. त्यामुळे ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर ही संस्था काम करते. गुंतवणूकीपासून मिळालेले सर्व उत्पन्न व लाभ हा विकास खर्च व इतर खर्च वजा करुन अंतिमतः युनिटधारक गुंतवणूकदारांना वाटला जातो.
युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया भांडवल :
UTI चा वित्तीय साधनसामग्रीचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे युनिट विकून गोळा झालेले भांडवल होय. वेगवेगळ्या योजना अंतर्गत लोकांना युनिटस विकून UTI पैसा उभा करते
युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया चे उद्दिष्टे – Unit Trust of India in Marathi
- लोकांच्यात बचतीची सवय वाढविणे.
- सुरक्षित व लाभदायक गुंतवणूकीसाठी निरनिराळ्या उत्पन्न गटातील लोकांची बचत करणे.
- औद्योगिक संयोजकांना त्याचे रोखे खरेदी करून किंवा रोख्यांच्या विक्रीची हमी देवून वित्तीय सहाय्य करणे. यू. टी. आय. ने आपल्या युनिट धारकांना आकर्षक लाभाशांचा परतावा दिला आहे. या उत्पन्नास आयकर माफी दिलेली आहे.
यू. टी. आय. च्या वित्तीय साधन सामग्री:
यू. टी. आय. च्या निधीचा प्रमुख स्त्रोत हा युनिटची विक्री आहे व सुरवातीचे ५को रु. भांडवल रिझर्व्ह बँक, भारतीय जीवन बीमा निगम, स्टेट बँक ऑफ इंडिया, व्यापारी बँका इत्यादिनी उभे केले आहेत.
आत्तापर्यंतचा एकूण निधीः
यू.टी.आय.कडे नोंदणी झालेल्या युनिटधारकांची संख्या सध्या २० दशलक्षपेक्षा जास्त असून, त्यानी धारण केलेल्या युनिटसचे मूल्य सुमारे ३४,००० कोटी रु. आहे.
यू.टी.आय.ची कार्ये – युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया चे कार्य
1. गुंतवणूक
विविध व्यवसायात संस्थांचे नवीन भाग भांडवल व कर्ज रोखे यू.टी.आय. खरेदी करते. त्याप्रमाणे दुय्यम बाजारातूनही रोख्यांची खरेदी केली जाते. यू. टी. आय. व LIC या आपल्या देशातील सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत.
2. निधी गोळा करणे
यू. टी. आय. ने आपल्या अनेक योजनाअंतर्गत लोकांकडून बचत गोळा करण्याचे काम केले आहे. काही प्रसिद्ध योजना पुढिल प्रमाणे
- US – १९६४
- मास्टर शेअर १९६४
- पुनगुंतवणूक प्लॅन १९६६
- मुलांना देणगी योजना (चिल्ड्रन गिफ्ट प्लॅन)
- युनिट संलग्न वीमा योजना
- US-१९७६
- मास्टर इक्वीटी प्लॅन १९९१, ९२ ९३
3. वीमा कंपन्याः
वीमा कंपन्यांसमोर आर्थिक व सामाजिक दोन्ही उद्दीष्टे असतात. वीमा कंपन्या लोकांनी उतरवलेल्या वीम्याच्या हप्त्यापोटी दरवर्षी प्रचंड रक्कम गोळा करतात त्यात प्रशासकीय व विक्रीखर्चाचाही समावेश असतो. मोबदल्यात या कंपन्या ग्राहकांना संरक्षण पुरवतात. या कंपन्या वेगवेगळा कालखंड, व्यक्ती व संघटना यामध्ये जोखीम विभागण्याचे कार्य करतात.
- आरोग्य (मेडिक्लेम)
- जीवन वीमा ( लाईफ इन्श्युरन्स)
- सामान्य वीमा (जनरल इन्श्युरन्स)
आयुर्विमा कंपन्या आपल्या देशात १८१८ पासून कार्यरत आहेत. ओरीएंटेड इन्शुरन्स कंपनी ही पहिली वीमा कंपनी कोलकात्यात स्थापन झाली. सामान्य वीमा कंपन्या १८५० पासून अस्तित्त्वात आहेत. खालील तक्त्यात नीमा कंपन्यांचे आकारमान व रचना स्पष्ट केलेली आहे.
यू.टी.आय.ची कामगीरी – UTI performance in Marathi
यू.टी.आय. ची अत्यंत नावाजलेली युनिटस स्कीम हा ६४ या योजनेची सुरवात ही वित्तीय व्यवस्थेच्या इतिहासातील एक ठळक घटना आहे. यू. टी. आय. चे ध्येय-धोरण, उद्दिष्ट कौतूकास्पद आहे. लहान बचतदारांकडून बचती गोळा करुन त्यांचा उपयोग उत्पादक अशा कंपनी गुंतवणूकीसाठी करण्याचे काम यू.टी.आयकरतेत्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना अप्रत्यक्षपणे औद्योगिक गुंतवणूकीत सहभागी होता येते.
ही संस्था सार्वजनिक क्षेत्रात असल्याने लोकांचा तीच्यावर विश्वास आहे. शिवाय या संस्थेतील गुंतवणूकीला व त्यावरील परताव्याला अनेक कर सवलती मिळाल्या आहेत. यू. टी. आय. मधील गुंतवणूक लोकांना सुरक्षितता व लाभप्रदता या दोन्हीचाही फायदा मिळवून देते.
यू. टी. आय. समोर उदभवलेली संकटे:
US-६४ या दोन्ही यू. टी. आय. च्या अत्यंत लोकप्रिय योजनेला २००१मध्ये गंभीर पेचप्रसंगाला
किंबहुना अरिष्टाला तोंड द्यावे लागले. भारत सरकारने २००१-०२मध्ये ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले व गुंतवणूकदाराचे संरक्षण केले. सरकारने काही रचनात्मक सुधारणांची सुरवात केली. त्या पुढीलप्रमाणे-
1. विशेष युनिट योजना (जून १९९९ ) :
या योजनेअंतर्गत सरकारने यू.टी. आय. कडून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे शेअर्स, त्यावेळच्या बाजार मूल्यापेक्षा अधिक किंमतीने पुनर्खरेदी केले. त्यामुळे US- ६४ मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास यू. टी. आय. ला मदत झाली.
2. मर्यादित पुनर्खरेदीच्या सवलतीत वाढः
गुंतवणूकदारांना कमाल ३००० युनिटस पर्यंत आपले युनिटस प्रशासित किमतीला (admin- istered determined Price ) यू. टी. आय. ला पुन्हा विकता येतील. निव्वळ मालमत्ता मूल्यापेक्षा अधिक किंमतीला यू. टी. आय. ने प्रत्येक युनिटची पुनर्खरेदी केली. यातील तूट शासनाने भरून द्यावयाची असे ठरले.
3. पुनर्खरेदीच्या सवलतीत वाढ:
डिसे. २००१ मध्ये गुंतवणूकदाराना युनिट विक्रीसाठी असलेली ३००० युनिटसची मर्यादा ५००० युनिटस पर्यंत वाढविण्यात आली. तसेच ५००० पेक्षा अधिक युनिटस धारण करणाऱ्या गुंतवणूकदाराना हमी देण्यात आली की त्यांच्याजवळच्या या वाढीव युनिटसना निव्वळ मालमत्ता मूल्यापेक्षा उच्च रक्कम (रू. १०) मिळेल. युनिटचे निव्वळ मालमत्ता मूल्य व पुनर्खरेदी किंमत यातील फरक सरकार भरून देईल. (संकटाचे स्वरूप- US-६४ मधून यू. टी. आय. ला मिळालेला निधी हा कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवले गेला. शेअर बाजार कोसळल्यावर प्रत्येक युनिटचे निव्वळ मालमत्ता मूल्य कमी झाले व गुंतवणूकदारात घबराहट उडाली)
- शेड्युल बँक म्हणजे काय ? शेड्यूल बँकेचे कार्य
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय ? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य,
सहकारी बँक म्हणजे काय ? सहकारी बँकेचे प्रकार, सहकारी बँकेचे कार्य
राज्य सहकारी बँक म्हणजे काय ? राज्य सहकारी बँकेचे कार्य , संचालक मंडळ
भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ माहिती | वित्त महामंडळाची स्थापना , महत्व आणि कार्य
औद्योगिक विकास बँक म्हणजे काय ? औद्योगिक विकास बँकेचे उद्दिष्टे आणि कार्य
राज्य वित्तीय महामंडळ म्हणजे काय ?, राज्य वित्तीय महामंडळाच्या उद्दिष्टे
युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही सरकारी कंपनी आहे?
त्याची स्थापना भारतीय रिझर्व्ह बँकेने केली होती आणि ती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियामक आणि प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत होती. 1978 मध्ये, UTI RBI पासून वेगळे झाले आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) ने RBI कडून नियामक आणि प्रशासकीय नियंत्रण ताब्यात घेतले.
युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्य कार्य काय आहे?
UTI मालमत्ता व्यवस्थापन कंपनी गुंतवणूक व्यवस्थापन करार, ट्रस्ट डीड, SEBI (म्युच्युअल फंड) नियम आणि योजनांच्या तरतुदींचे पालन करून UTI म्युच्युअल फंडाच्या सर्व व्यावसायिक सेवांसाठी (फंड व्यवस्थापन वगळता) व्यावसायिकरित्या व्यवस्थापित कार्यकारी समर्थन प्रदान करते.
युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे?
युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. त्याची स्थापना युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया कायदा 1963 द्वारे करण्यात आली आहे.
युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली?
1964 मध्ये भारत सरकारने युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या स्थापनेपासून भारतात याची सुरुवात केली. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही भारतातील आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपनीपैकी एक आहे. हे एका विशिष्ट कायद्याद्वारे शासित आहे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया कायदा, 1963.
युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली?
युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (UTI) ची स्थापना 1963 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे करण्यात आली. त्याची स्थापना भारतीय रिझर्व्ह बँकेने केली होती आणि ती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियामक आणि प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत होती.