भाडे खरेदी पद्धती म्हणजे काय ? भाडे- खरेदी पद्धतीची वैशिष्ट्ये आणि व्याख्या , भाडे- खरेदी पद्धतीचे फायदे व तोटे– Bhade kharedi paddhati in marathi –नमस्कार मित्र मंडळ! आपण या लेखात भाडे खरेदी पद्धती म्हणजे नेमकं काय असते याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. यात आपण भाडे खरेदी करण्याची पद्धत कशी असते,
त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, याच्या व्याख्या, भाडे खरेदी पद्धतीचे फायदे आणि तोटे तसेच भाडे खरेदी पद्धतीच्या मर्यादा काय असतात याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तरी हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला भाडे खरेदी पद्धती बद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होण्यास मदत होईल.
भाडे खरेदी पद्धती म्हणजे काय ? – Bhade kharedi paddhati in marathi
माल खरेदी करण्याच्या ह्या पद्धतीमध्ये खरेदीदार व विक्रेता यांच्यामध्ये एक लेखी करार केला जातो, त्याला भाडे खरेदी करार असे म्हणतात. या करारामुळे पहिला भाडे- हप्ता खरेदीदाराने रोखीने भरतात वस्तू खरेदी दाराच्या स्वाधीन केली जाते. म्हणजे खरेदी दाराला वस्तूचा ताबा लगेच मिळतो. खरेदीदार ती वस्तू वापरू शकतो; परंतु वस्तूची मालकी मात्र विक्रेत्याकडेच राहते.
ज्यावेळी खरेदीदार शेवटचा भाडे- हप्ता विक्रेत्याकडे भरतो, तेव्हाच वस्तूची मालकी हक्क खरेदी दाराला मिळतो.म्हणजेच शेवटचा हप्ता भरण्यापूर्वीच्या काळात खरेदीदार हा त्या वस्तूचा एक प्रकारेभाडेकरूच असतो. कारण तो वस्तू वापरत असतो. ठराविक तारखेला, ठराविक रक्कम खरेदीदार भाडे( हप्ता) म्हणून भरत असतो, परंतु तो वस्तूंचा मालक मात्र नसतो. खरेदीदार वस्तूचा मालक नसल्याने त्या काळात खरेदीदार ती वस्तू परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकू शकत नाही. तसेच काही कारणाने खरेदीदाराने करारानुसार एखादा हप्ता भरला नाही, म्हणजेच कराराचे पालन केले नाही तर, विक्रेता ती वस्तू पुन्हा स्वतःकडे घेऊ शकतो.
तत्पूर्वी खरेदी दाराने जे काही हप्ते बदल भरले असतील, ते हप्ते विक्रेता जप्त करतो, परत करत नाही. कारण कराराचे उल्लंघन करण्यापूर्वी जे हप्ते खरेदी दाराने भरलेले असतात, ते हप्ते म्हणजेच तेवढा काळ ती वस्तू वापरण्याबद्दल खरेदी दाराने दिलेले भाडेच असते. त्यामुळे ते भाडे- हप्ते परत करण्याचे बंधन विक्रेत्यावर राहत नाही.
उदाहरणार्थ:- “अ” या खरेदीदाराने “ब” या विक्रेत्याकडून एक पंखा1/7/2021रोजी भाडे -खरेदी पद्धतीनुसार करार करून विकत घेतला. भाडे- खरेदी पद्धतीनुसार त्या पंख्याची किंमत 1,200 रुपये आहे. ती किंमत “अ” ने120 रुपयांचा1 अशा 10 हप्त्यामध्ये भरायची आहे. जर “अ” ने सर्व हप्ते बरोबर भर, तर दहावा हप्ता भरल्याबरोबर म्हणजे एप्रिल 2022 पासून ”अ” हा त्या पंख्याचा मालक होईल. परंतु एप्रिल 2022 पूर्वी मात्र “अ” हा त्या पंख्याचा मालक नसल्याने तो पंखा विकू शकणार नाही आणि तरीही त्याने जर पंखा विकला तर विक्रेता “ब” कोर्टात जाऊन तो पंखा परत मिळवू शकतो.
समजा “अ” ने पहिली पाचही हप्ते बरोबर भरले,पण सहाव्या हप्त्यापासून त्याने हप्ता भरणे थांबविले तर विक्रेता “ब” हा कोर्टात जाऊन “अ” कडून पंख्याचा ताबा परत तर घेईलच शिवाय “अ” ने पूर्वी भरलेल्या पाचही हप्त्यापैकी काहीच रक्कम “अ” ला परत देणार नाही.
हल्ली काही देशात मात्र असे हप्ते व वस्तू जप्त करण्या विरुद्ध कायद्यात तरतुदी केल्या गेल्या आहेत.
भाडे खरेदी पद्धतीची व्याख्या –
भाडे- खरेदी अंतर्गत, ग्राहक एक हप्ता ताबडतोब भाडे म्हणून देऊन उरलेले हप्ते ठराविक रकमेचे व ठराविक काळाने देण्याचा करार करतो आणि शेवटचा हप्ता तो जेव्हा भरतो, तेव्हाच तो वस्तूचा मालक बनतो.
खरेदी दाराने पूर्ण हप्ते भरले, तर वस्तूच्या रोख विक्रीच्या किमतीपेक्षा कितीतरी जास्त पैसे विक्रेताला मिळतात. कारण प्रत्येक हप्त्याबरोबर शिल्लक राहिलेल्या किंवा येणे बाकी असलेल्या रकमेवर व्याज ही मिळते. उलट पक्षी खरेदी दाराला मात्र जास्त पैसे भरावे लागतात. सर्व भाडे- हप्ते भरणे न जमल्यास वस्तूचा ताबा सोडून द्यावा. भरलेले हप्ते भाडे स्वरूपात असल्याने ते पैसेही परत मिळत नाहीत.
भाडे- खरेदी पद्धतीची वैशिष्ट्ये –
भाडे- खरेदी पद्धतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील :
- खरेदी दार व विक्रेता यांच्यामध्ये लेखी, कायदेशीर करार होतो.
- ठराविक काळात,ठराविक रकमेचा भाडे- हप्ता खरेदीदाराने विक्रेत्याला न चुकता द्यायचा असतो.
- प्रत्येक हप्ता हा वस्तू वापरण्याबद्दल दिलेले भाडेच असते.
- पहिला भाडे- हप्ता भरण्याबरोबर वस्तूचा ताबा खरेदीदाराकडे जातो. मालकी मात्र विक्रेत्याचीच असते.
- शेवटचा भाडे- ह भरण्याबरोबर वस्तू खरेदीदाराच्या मालकीची होते.
- खरेदीदाराने मध्येच भाडे- हप्ते देण्याचे बंद केल्यास, त्याने तत्पूर्वी भरलेल्या हप्त्यांची रक्कम त्याला परत मिळत नाही ती रक्कम विक्रेता जप्त करतो.
- भाडे- खरेदी पद्धतीमध्ये खरेदीदाराने भाडे तत्त्वावर वस्तू ताब्यात घेतली असल्याने मालकी हक्क मिळण्यापूर्वी जर त्याने ती वस्तू कोणाला विकली, तर कायद्याने तो गुन्हा ठरतो.
- मालकी हक्क मिळण्यापूर्वी खरेदी दाराने वस्तू विकल्यास विक्रेता कोर्टाच्या मदतीने ती वस्तू परत मिळू शकतो.
भाडे- खरेदी पद्धतीचे फायदे व तोटे –
भाडे- खरेदी पद्धतीचे फायदे व तोटे यांचे दोन भागात विभागणी करता येईल–
1] भाडे- खरेदी पद्धतीचे खरेदीदाराला होणारे फायदे व तोटे
2] भाडे- खरेदी पद्धतीचे विक्रेत्याला होणारे फायदे व तोटे
1]खरेदी दाराला होणारे फायदे व तोटे
1.खरेदीदाराला होणारे फायदे–
भाडे खरेदी पद्धतीतून खरेदी दाराला मिळणारे फायदे पुढील प्रमाणे:
- महागड्या व चैनीच्या वस्तू खरेदी करणे शक्य होते.
- ठराविक तारखेच्या आत ठराविक रक्कम भाडे- फक्त म्हणून भरावीच लागते. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून खरेदीदाराची सक्तीची बचत होते.
- पहिला हप्ता भरतात वस्तू ताब्यात येते. त्यामुळे वस्तू वापरता येते.
- स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याने मानसिक समाधान व स्वास्थ मिळते.
- राहणीमान उंचावते.
- दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या किमतीमुळे बचत करून रोखीने वस्तू खरेदी करण्याचे ठरवून कदाचित निराश होण्यापेक्षा, भाडे- खरेदी पद्धतीने वस्तू खरेदी करून तिचा उपभोग घ्यायला मिळतो.
- स्पर्धेच्या युगात वावरणारा विक्रेता वस्तूच्या विक्रीचा करार करून झाल्यानंतरही विक्रीनंतरच्या सेवा पुरवितो.
2.खरेदी दाराला होणारे तोटे–
भाडे खरेदी पद्धतीतून खरेदीदाराला पुढील तोटे होतात:
- आर्थिक कुवतीचा नीट अंदाज न आल्यास एकाच वेळी अनेक वस्तू भाडे- खरेदी पद्धतीने विकत घेतल्यामुळे आर्थिक परिस्थिती खूपच खालावते.
- रोखीच्या खरेदी किंमतीपेक्षा जास्त पैसे खर्च होतात.
- वस्तूचा ताबा घेतल्यानंतर काही काळाने जर ती वस्तू निकृष्ट दर्जाची आहेत किंवा अनावश्यक आहे असे वाटले आणि म्हणून भाडे हप्ते थांबविले तर वस्तू आणि अगोदर भरलेले हप्ते दोन्हींना मुकावे लागते.
- कृत्रिमरीत्या काही काळापुरते उंचावलेले राहणीमान कालांतराने आर्थिक ओढाताणीमुळे खालावण्याची शक्यता असते.
- विनाकारण चैनीच्या वस्तूवर पैसा खर्च होतो.
- ह्या पद्धतीत खरेदी दाराच्या हितसंबंधाच्या रक्षणाची तरतूद नसते.
2] विक्रेताला होणारे फायदे व तोटे
1.विक्रेताला होणारे फायदे–
भाडे- खरेदी पद्धतीतून विक्रेताला होणारे फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील:
- विक्री व नफ्यात वाढ होते.
- विक्रीनंतरही सेवा पुरविल्याने ग्राहक खुश होऊन इतरही ग्राहक आकर्षित होतात.
- सतत संपर्कात राहिल्याने ग्राहकांच्या अडचणी जाणून घेऊन भविष्यात आवश्यक त्या सुधारणा करता येतात.
- वस्तू आणि पैशांची शाश्वती असते.
- रोख विक्रीच्या किंमतीपेक्षा जास्त किंमत मिळते.
- कायद्याचे संरक्षण मिळते.
विक्रेताला होणारे तोटे –
भाडे- खरेदी पद्धतीतून विक्रेताला होणारे तोटे पुढीलप्रमाणे सांगता येतील:
- अत्यंत काटेकोर हिशेब ठेवणे आवश्यक असते.
- पूर्ण वसुली होईपर्यंत भांडवल अडकून पडते.
- मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता भासते.
- कायद्याचा पाठिंबा असला तरी वसुली न झाल्यास कोर्टात जावे लागते. त्यात वेळ व पैशांचा अपव्यय होतो.
- मध्येच खरेदीदाराने हप्ते भरणे थांबविले, वस्तूचा ताबाही परत मिळाला तरी त्या वस्तूचा दर्जा घसरण्याची शक्यता असते.
- ग्राहकाशी वितृष्टही येऊ शकते. त्याची दुष्परिणाम धंद्यावर होऊ शकतात.
भाडे- खरेदी पद्धतीच्या मर्यादा –
भाडे- खरेदी पद्धतीचे फायदे- तोटे विचारात घेतल्यानंतर या पद्धतीच्या ज्या मर्यादा किंवा कक्षा लक्षात येतात त्या पुढील प्रमाणे:
- चांगल्या दर्जाच्या, दीर्घकाळ टिकणाऱ्या व महान वस्तूंची विक्री या पद्धतीने होऊ शकते.
- ज्या वस्तूंची खरेदी ह्या पद्धतीने करायची, त्या वस्तूचा ताबा देणे- घेणे ही सहज सोपे असले पाहिजे.
- भाडे- खरेदीचा करार करून ती वस्तू भाडे- पद्धतीने विकण्याइतकी त्या वस्तूची किंमत जास्त असली पाहिजे.
4.ज्या वस्तूच्या किमतीत, मागणीत वारंवार चढ-उतार होतात, त्या वस्तूंना ही पद्धत वापरता येणार नाही.
- ह्या पद्धती अंतर्गत विकलेल्या वस्तू पासून खरेदीदाराला लगेचच पैशाच्या स्वरूपात मोबदला मिळू लागणार असेल, तर जास्त चांगले. जसे, शिवण मशिनीमुळे शिलाईत बचत किंवा वॉशिंग मशीन मुळे कपडे धुण्याच्या खर्चात बचत, इस्त्री मुळे इस्त्री करण्याच्या खर्चात बचत, इत्यादी.
- ज्या वस्तूचे रूपांतर दुसऱ्या वस्तूत करता येणार नाही, म्हणजेच कालांतराने ही जी वस्तू ओळखू येईल, अशाच वस्तूची विक्री या पद्धतीने करता येईल. अन्यथा परत ताबा घेण्याची वेळ आल्यास अडचण येईल.
- विकत असलेल्या वस्तूचे दुसरे स्पर्धक विक्रेते कोण आहेत, ते खरेदीदारांना कोणत्या सवलती देत आहेत, हे देखील विचारात घेणे आवश्यक आहे.
भाड्याने खरेदी करण्याची पद्धत काय आहे?
भाड्याने खरेदी ही महागड्या ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करण्याची व्यवस्था आहे, जिथे खरेदीदार प्रारंभिक डाउन पेमेंट करतो आणि शिल्लक रक्कम आणि हप्त्यांमध्ये व्याज देतो
भाड्याने खरेदी आणि प्रकार म्हणजे काय?
भाड्याने खरेदी (HP) किंवा भाड्याने देणे हा मालमत्ता वित्ताचा एक प्रकार आहे जो फर्म किंवा व्यक्तींना मालमत्तेचे अवमूल्यन कव्हर करणारे भाडे किंवा हप्ते भरताना
भाड्याने खरेदी प्रणालीचा अर्थ आणि वैशिष्ट्ये काय आहेत?
भाड्याने खरेदीचा अर्थ असा व्यवहार आहे जेथे वस्तूंची खरेदी आणि विक्री केली जाते अशा अटींवर: (i) हप्त्याने पैसे दिले जातील, (ii) मालाचा ताबा ताबडतोब खरेदीदारास दिला जाईल, (iii) मालमत्ता (मालकी) शेवटचा हप्ता भरेपर्यंत वस्तू विक्रेत्याकडेच राहते, (iv) विक्रेता करू शकतो