खेळते भांडवल म्हणजे काय ? (चालू भांडवल) , खेलते भांडवलची वैशिष्ट्ये, महत्त्व ,घटक आणि प्रकार – Working capital in Marathi 

मित्रांसह शेअर करा - Share this
3.7/5 - (4 votes)

खेळते भांडवल म्हणजे काय? working capital meaning in marathi, khelte bhandval in marathi , खेलते भांडवलची वैशिष्ट्ये, महत्त्व , खेळत्या भांडवलाचे घटक आणि प्रकार – Working capital in Marathi  ,

स्थिर मालमत्तेची खरेदी केल्यानंतर उद्योगव्यवसायाची स्थापना होते परंतू उत्पादनाचे कार्य सुरु होत नाही. उत्पादनाचे कार्य सुरु करण्यासाठी कच्च्या मालाची खरेदी मजूरांची मजूरी, भाडे करु, कार्यालयीन खर्च, विक्री व वितरणांचा खर्च भागविण्यासाठी जे भांडवल उपयोगात आणले जाते त्याला चालू भांडवल / खेळते भांडवल म्हणतात.

प्रत्येक कारखान्याच्या किंवा उपक्रमाच्या उभारणीकरिता व कारभार चालविण्याकरिता स्थिर आणि अस्थिर अशा दोन्ही प्रकारच्या संपत्तीची आवश्यकता असते. कारखान्याला आवश्यक असलेल्या अस्थिर संपत्तीची खरेदी करण्याकरिता, कारखान्याचा दैनंदिन कारभार चालविण्याकरिता तसेच त्या कारखान्याच्या अल्पकालीन गरजांची पूर्णता करण्याकरिता ज्या भांडवलाचा उपयोग केला जातो त्याला खेळते भांडवल, परिचल भांडवल किंवा कार्यशील भांडवल असे म्हणतात.

 

खेळते भांडवल म्हणजे काय  – Working Capital In Marathi

Table of Contents

खेळते भांडवल म्हणजे काय ? – Working capital in Marathi 

अनेक ग्रंथकारानी खेळत्या भांडवलाची व्याख्या केली आहे. स्थूलमानाने ह्या व्याख्यांचे वर्गीकरण दोन प्रकारांत करता येईल. एका विचारधारेनुसार खेळते भांडवल म्हणजे कारखान्याच्या चालू (Current) संपत्तीची बेरीज होय.

ह्या चालू संपत्तीमध्ये अल्पमुदतीसाठी प्राप्त करुन घेतलेले भांडवल गुंतविण्यात आले आहे की दीर्घमुदतीसाठी प्राप्त करुन घेतलेले भांडवल गुंतविण्यात आले आहे, ह्याचा अजिबात विचार केला जात नाही. प्रस्तुत विचारधारेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही व्याख्यांचा पुढे उल्लेख केला आहे.

चालू संपत्तीची बेरीज म्हणजे खेळते भांडवल होय. मीड, मॅलट व फील्ड कोणत्याही निधीची प्राप्ती, त्यामुळे चालू संपत्तीची वाढ होत असेल, खेळत्या भांडवलामधील वाढ मानली जाईल; कारण ह्या दोन्ही गोष्टी समान आहेत. 

 

वर्किंग कॅपिटल ला मराठी मध्ये काय म्हणतात  – working capital meaning in marathi

वर्किंग कॅपिटल ला मराठी मध्ये खेळते भांडवल म्हणतात , ज्याचा अर्थ-  व्यवसायाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जो पैसा वापरला जातो त्याला खेळते भांडवल होतो

 

खेळते भांडवल व्याख्या – khelte bhandval in marathi

व्याख्यांच्या पुढे उल्लेख केला आहे.

१) “चालू संपत्तीचे चालू देयतेवरील आधिक्य म्हणजे खेळते भांडवल अशी खेळत्या भांडवलाची सामान्यपणे व्याख्या करण्यात आली आहे.” (It has ordinarily been defined as the excess of current assets over current liabilities.”) – गस्र्टेनबर्ग

२) “खेळत्या भांडवलाची सर्वमान्य व्याख्या चालू संपत्ती व चालू देयता यामधील अंतर अशीच आहे. ” (“The most common definition of net working capital is the difference of firm’s current assets and current liabilities.”) – गिटमन.

खेळत्या भांडवलाच्या व्याख्येबद्दल दोन विचारप्रवाह वर नमूद केले आहेत. पहिल्या विचारप्रवाहाशी संबंधित ज्या व्याख्या आहेत त्यात व्यापक दृष्टिकोन आहे तर दुसऱ्या विचारप्रवाहासी संबंधित असलेल्या व्याख्यांमध्ये संकुचित दृष्टिकोन आढळतो. पहिल्या विचारप्रवाहामध्ये भांडवलाच्या परिणामत्मक बाजूवर भर देण्यात आहे तर दुसऱ्या विचारप्रवाहामध्ये भांडवलाच्या गुणात्मक बाजूवर भर देण्यात आला आहे.

 

खेलते भांडवलची वैशिष्ट्ये :

  1. चालू भांडवल हे चालू मालमत्तेच्या स्वरुपात असते.
  2. चालू भांडवलाचा फक्त एकदाच वापर करण्यात येतो. उदा. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रुपांतर.
  3. चालू भांडवलाचे नेहमी रोख रकमेत रुपांतर होत.
  4.  चालू भांडवलाचे प्रमाण हे उत्पादनाच्या प्रमाणानूसार कमी जास्त होत असते.
  5.  व्यवसायाच्या संचालनाकरिता चालू भांडवलाचा सतत पूरवठा करावा लागतो.

 

चालू भांडवलाचे महत्त्व

  1. मानवी शरीरात जशी रक्ताची गरज असते त्याप्रमाणे कंपनीमध्ये चालू भांडवलाची आवश्यकता असते. महत्त्व पुढीलप्रमाणे :
  2. पुरेशा चालू भांडवलामुळे कंपनीत तीचे कर्तव्य पार पाडणे शक्य होते..
  3. पुरेशा चालू भांडवलामुळे कंपनीस आपली पत राखणे शक्य होते.
  4. चालू भांडवलामुळे कंपनीस बँकेतून ऋण घेणे सोपे जाते. 
  5. चालू भांडवलामूळे कंपनी ऋणको त्यांची देय ताबडतोब देणे शक्य होते व त्यामुळे कंपनीस ऋणकोकडून काही सवलतही मिळते.
  6. चालू भांडवलामुळे कंपनी कठीण समयी प्रसंगाना तोंड देवू शकते.
  7. वेळेवर देय दिल्याने कंपनीचे नाव तयार होण्यास मदत होते.
  8. कंपनीचा विकास होण्यास मदत होते.
  9. अशा प्रकारे चालू भांडवलाचे महत्त्व फार मोठे आहे..

 

खेळत्या भांडवलाचे प्रकार

खेळत्या भांडवलाच्या प्रकारांबद्दल पुढे स्पष्टीकरण केले आहे.

 

 नियमित खेळते भांडवल (Regular Working Capital)

 कारखान्यामधील उत्पादनाचे कार्य निरंतर चालू ठेवण्याकरिता नियमितपणे ज्या भांडवलाची गरज पडते अशा भांडवलाला नियमित खेळते भांडवल असे म्हणतात. नियमित खेळते भांडवल हा खेळत्या भांडवलाचा असा भाग आहे की जो सामान्य परिस्थितीमध्ये व्यवसायाचे

संचालन करण्यासाठी आवश्यक असतो. प्रत्येक कारखान्यात कामगांराना मजुरी व कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी ज्या भांडवलाची तरतूद केली जाते असे भांडवल नियमित खेळते भांडवल या वर्गातच मोडणारे असते. अशा भांडवलाचे स्वरुप नियमित व स्थायी असल्यामुळे ते उभारण्यासाठी अल्पमुदतीचा कर्जाचा उपयोग केला जात नाही. अंश व कर्जरोख्याची विक्री करुन मिळविलेल्या भांडवलाचाच एक भाग असा खर्च करण्यासाठी राखून ठेवला जातो.

 

 मोसमी खेळते भांडवल (Seasonal Working Capital) 

खेळत्या भांडवलाचा काही – भागाची गरज जेव्हा विशिष्ट मोसमावर अवलबून असते तेव्हा ह्या भागालाच मोसमी खेळते भांडवल असे म्हणतात. ठराविक मोसमातच ह्या प्रकारचा भांडवलाची गरज उद्भवते व मोसम संपल्यानंतर ही गरज संपुष्टात येते. सुती कापड गिरण्यांना दरवर्षी कापसाची खरेदी करुन कापसाचा साठा करुन ठेवावा लागतो. ह्या कापड गिरण्यांचा दृष्टिकोतून विचार केल्यास कापसाच्या साठ्यामध्ये गुंतविण्यात आलेल्या खेळत्या भांडवलाला मोसमी खेळते भांडवल असे म्हणता येईल.

 

विशिष्ट खेळते भांडवल (Special Working Capital)

 विशिष्ट कारणासाठी उपयोगात येणाऱ्या खेळत्या भांडवलाला विशिष्ट खेळते भांडवल अशी संज्ञा दिली जाते. उदाहरणार्थ, सौदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या एका कारखानदाराने काही नवीन प्रकारच्या प्रसाधनांचे उत्पादन केले. ह्या सौंदर्य प्रसाधनांकरिता बाजारात मागणी निर्माण करण्यासाठी जाहिरातींची एक विस्तृत योजना तयार करुन ती राबविणे आवश्यक आहे. जाहिरातीची योजना राबविण्यासाठी जे भांडवल उपयोगात आणले जाईल त्यालाच विशिष्ट खेळते भांडवल असे म्हणता येईल.

व्यवसायात काही वेळेस विशेष प्रकारची परिस्थिती निर्माण होते. बाजारात मंदी आल्यामुळे, स्पर्धेची तीव्रता वाढल्यामुळे किंवा तात्कालिक कारणांमुळे उत्पादित वस्तूंची विक्री न झाल्यास माल साचून राहतो. अशा परिस्थितीतसुध्दा कारखान्यामधील उत्पादनाचे कार्य निरंतरपणे चालू ठेवावे लागते. उत्पादनाचे कार्य नेहमीप्रमाणे चालू ठेवून विक्री न झालेल्या वस्तूंचा संग्रह करण्यासाठी नेहमीपेक्षा जे अतिरिक्त भांडवल उपयोगात आणले जाते त्याला सुध्दा विशिष्ट खेळते भांडवल असेच म्हणतात.

 

खेळत्या भांडवलाचे विविध स्त्रोत 

खेळत्या भांडवलाचे प्रकार वर नमूद केले आहेत. काळ किंवा मुदतीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास खेळत्या भांडवलाचे स्त्रोत दीर्घकालीन व अल्पकालीन असे दोन प्रकारचे असतात. हे विभिन्न स्त्रोत पुढे दर्शविले आहेत.

दीर्घकालीन स्त्रोत

अंश भाग अंशांचे निर्गमन करून प्राप्त होणारे भांडवल हे प्रमंडळाजवळ नेहमीकरिता राहणार असल्यामुळे हा भांडवलाची गुंतवणूक करुन स्थिर संपत्ती संपादन केली जाते. अंश भांडवलाचा उपयोग व्यवसायाच्या नैमित्तिक गरजा भागविण्याकरिताही केला जाऊ शकतो. अंशांचे प्रकार व अंशांचे फायदे व तोटे ह्याबद्दल ह्यापूर्वीच विस्ताराने चर्चा करण्यात आली आहे.

कर्जरोखे अंशांप्रमाणेच कर्जरोख्यांचे निर्गमन करुन प्राप्त केलेले भांडवल हे विशिष्ट

परिस्थितीमध्ये स्थिर संपत्तीप्रमाणेच चल संपत्तीची खरेदी करण्याकरिता गुंतविता येते. कर्जरोख्यांचे निर्गमन करून प्राप्त होणारा पैसा खेळते भांडवल म्हणून उपयोगात आणावयाचा किंवा नाही हा महत्त्वपूर्ण धोरणविषयक निर्णय संचालकांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवा. कर्जरोख्यांचे फायदे व तोट्यांबद्दल ह्यापूर्वी सविस्तर स्पष्टीकरण केले आहे.

नफ्यांची पुनर्गुतवणूक अंशधारी हे प्रमंडळाचे खरे मालक असल्यामुळखे प्रमंडळाने मिळविलेल्या नफ्यावर अंशधाऱ्यांचा अधिकार असतो. प्रमंडळाने मिळविलेला नफा

अंशधाऱ्यांमध्ये वितरित न करता हवा नफ्यामधून एक संचिती निर्माण करुन था निधीमध्ये असलेला पैसा खेळते भांडवल म्हणून उपयोगात आणता येतो. नफ्याची पुनर्गुतवणूक हा प्रत्येक विकसनशील प्रमंडळाच्या दृष्टीने खेळत्या भांडवलाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. नफ्याच्या पुनर्गुतवणूक धोरणाचे विविध पैलू पुढच्या प्रकरणात स्पष्ट केले आहेत.

 

अल्पकालीन स्त्रोत 

उपक्रमांच्या खेळत्या भांडवलाचे अल्पकालीन स्त्रोत अंतर्गत स्त्रोत व बहिर्गत स्त्रोत असे दोन प्रकारचे असतात.

अंतर्गत स्त्रोत

अवक्षयण निधी (Depreciation Funds)  संपत्तीच्या मूल्यात कोणत्याही कारणामुळे हळूहळू होणारा जो हास असतो त्यालाच अवक्षयण म्हणतात. ह्या प्रक्रियेमुळे ठराविक कालमर्यादेनंतर स्थिर संपत्ती निरुपयोगी बनते.

अवक्षयणामुळे स्थिर संपत्ती निरुपयोगी झाल्यानंतर त्याऐवजी नवीन संपत्ती सहजपणे खरेदी करता यावी, या हेतूने दरवर्षी अवक्षयणाची एक ठराविक रकम बाजूला सारुन अवक्षयण निधी निर्माण केला जातो. अवक्षयण निधीमध्ये असलेल्या रकमेचा खेळते भांडवलाच्या स्वरुपात उपयोग करता येईल.

 करांच्या शोधनाकरिता निधी करांचे शोधन योग्य वेळी करता यावे याकरिता एक निधी निर्माण करण्याचे धोरण काही उपक्रमांमध्ये राबविले जाते. ह्या निधीचाही खेळत्या भांडवलाच्या स्वरुपात प्रसंगविशेषी उपयोग केला जाऊ शकतो.

उपर्जित खर्च (Accrued Expenses) अनेकदा काही बाबींवर खर्च करण्यात आलेला असतो, पण प्रत्यक्षात ह्या रकमांचे शोधन केले जात नाही. अशा खर्चाला ‘उपर्जित खर्च’ असे म्हणतात. उपर्जित खर्चाची रकम अत्यल्प काळाकरिता व्यवसायाच्या प्रासंगिक गरजा भागविण्याकरिता (विशेष परिस्थितीमध्येच) उपयोगात आणता येईल.

 

चालू भांडवलाचे प्रमाण निश्चित करणारे घटक – खेळते भांडवल निश्चित करणाऱ्या घटकांवर चर्चा करा

व्यवसाय करणाऱ्या एखाद्या प्रमंडळाजवळ किंवा उपक्रमाजवळ किती खेळते भांडवल असायला हवे? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा असला तरी त्याचे नेमके उत्तर देण्याकरिता गणितीय पध्दतीचा अवलंब करता येणार नाही. प्रत्येक उपक्रमाची खेळत्या

भांडवलासंबंधीची जी गरज आहे, तिच्यावर अनेकघटकांचा प्रभाव पडतो. या सर्व घटकांचा बारकाईने अभ्यास करुन नंतरच उपक्रमाला आवश्यक असलेल्या खेळत्या भांडवलाची मात्रा ठरविता येईल. उपक्रमाला आवश्यक असलेल्या खेळत्या भांडवलाची मात्रा किंवा परिमाण निश्चित करताना खालील घटकांचा विचार करणे आवश्यक असते.

 

व्यवसायाचे स्वरुप (Nature of Business) 

– आहे यावर त्या प्रमंडळाला आवश्यक असलेल्या खेळत्या भांडवलाचे प्रमाण अवलंबून असते. मूलभूत उद्योगांमध्ये स्थिर भांडवलाच्या तुलनेत खेळत्या भांडवलाचे प्रमाण कमी असते, हे यापूर्वी नमूद केले आहे.

उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांची खेळत्या भांडवलाची गरजही उत्पादित वस्तूचे स्वरुप, ह्या वस्तूकरिता असलेली मागणी, बाजारपेठेचे क्षेत्र, कच्चा माल हाणून वापरण्यात येणाऱ्या सामग्रीचे स्वरुप, ही सामग्री बाजारात उपलब्ध असणारा एकूण काळ, कच्च्या मालाचे स्त्रोत व त्याचे कारखान्यापासून असणारे एकूण अंतर अशा अनेक बाबींवर अवलंबून असते.

 

 व्यवसायाचे प्रमाण (Nature of Business)

 प्रमंडळाला आवश्यक असलेल्या खेळत्या भांडवलाची मात्रा ते प्रमंडळ करीत असलेल्या एकूण व्यवहारांवर अवलंबून असते. वस्तूंचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करणारे प्रमंडळ ज्या प्रमाणात वस्तूंचे उत्पादन करील त्या प्रमाणात संबंधित प्रमंडळाला खेळत्या भांडवलाची गरज राहील.

वस्तूंचे वितरण किंवा वस्तूंची खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रमंडळालासुध्दा ते प्रमंडळ करीत असलेल्या व्यवहारांच्या प्रमाणात खेळत्या भांडवलाची गरज राहील.. प्रमंडळाचे कार्य वस्तूंचे उत्पादन असो किंवा वस्तूंची खरेदी-विक्री असो, व्यवहारांच्या प्रमाणात जसजशी वाढ होईल तसतशी खेळत्या भांडवलाची गरज सुध्दा वाढत जाईल.

 

उत्पादनकार्याला लागणारा काळ (Average Length of Manufacturing Process 

– उत्पादनाचे कार्य पूर्ण होण्यासाठी एकंदर किती काळ लागतो ह्यावर सुध्दा खेळत्या भांडवलाची मात्रा अवलंबून असते. उत्पादनाची क्रिया ही बरीच लांब व गुंतागुंतीची असेल तर ह्या प्रक्रियेमध्ये कच्च्या मालाचे निर्मित वस्तूमध्ये परिवर्तन करण्यासाठी बराच काळ लागेल.

उत्पादनाची क्रिया पूर्ण करण्यासाठी बराच काळ लागत असल्यास या काळात व्यवसायाचे संचालन करण्यासाठी आवश्यक असलेला विभिन्न प्रकारचा खर्च करण्याकरिता बऱ्याच रकमेची गरज राहील. उत्पादनाचे कार्य पूर्ण करण्यासाठी जितका जास्त काळ लागेल त्याप्रमाणात खेळत्या भांडवलाच्या मात्रेमध्ये वाढ होईल.

 

कच्चा माल व इतर सामग्री प्राप्त करण्यासाठी लागणारा काळ

 प्रत्येक कारखान्यात विशिष्ट वस्तूचे उत्पादन करण्यासाठी कच्चा माल व इतर सामग्रीची आवश्यकता असते. उत्पादनकार्यातील सातत्य कधीही धोक्यात येऊ नये या करिता कच्चा माल व इतर सामग्रीचा साठा करुन त्याचे नियंत्रण केले जाते. उत्पादनकार्याला आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या सामग्रीला प्राप्त करण्यासाठी जितका कमी काळ लागेल त्या प्रमाणात सामग्रीचे साठे कमी राहतील व सामग्रीचे साठे निर्माण करण्यासाठी गुंतविण्यात येणाऱ्या खेळत्या भांडवलाची मात्रासुध्दा बरीच कमी राहील.

आदेश देण्याकरिता, सामग्री खरेदी करण्याकरिता व खरेदी केलेल्या सामग्रीचे प्रदान मिळविण्याकरिता साठ्याची मात्रा (Quantitiy) जास्त राहील. उत्पादनकार्याला आवश्यक असलेल्या सामग्रीचे मोठ्या प्रमाणावर साठे निर्माण करण्यासाठी खेळत्या भांडवलाची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आवश्यक असते. तुलनेत बरीच कमी राहील..

 

खेळत्या भांडवलाचा टर्नओव्हर 

व्यवसायात गुंतविलेल्या खेळत्या भांडवलाचे स्वरुप बदलत असते, या मुद्याचा उल्लेख वर आला आहे. भांडवलाच्या हेरफेरीचे वर्षात जे प्रमाण असते त्यालाच खेळत्या भांडवलाचा टर्न ओव्हर असे म्हणतात. खेळत्या भांडवलाच्या टर्नओव्हरसुध्दा खेळत्या भांडवलाची मात्रा अवलंबून असते.

ज्या व्यवसायात खेळत्या भांडवलाचा टर्नओव्हर जास्त असतो तेथे आवश्यक खेळत्या भांडवलाची मात्रा कमी असते, उलट ज्या व्यवसायात खेळत्या भांडवलाचा टर्नओव्हर कमी असतो तेथे खेळत्या भांडवलाची आवश्यक मात्रा जास्त असते.

 

व्यवसायामधील जोखीम (Risk in Business)

 व्यवसायात विभिन्न कारणांमुळे जोखीम उत्पन्न होते. वस्तूची मागणी अस्थिर असेल किंवा उत्पादित वस्तूंच्या किंमतींमध्ये असाधारण चढउतार होत असतील तर अशा व्यवसायात अधिक खेळत्या भांडवलाची गरज राहील. ज्या व्यवसायात जोखिमीचे प्रमाण जास्त असते तेथे गुंतविण्यात येणाऱ्या खेळत्या भांडवलाची मात्रा इतर व्यवसायांपेक्षा जास्त राहील. एखाद्या व्यवसायात कोणत्याही प्रकारची अजिबात जोखीम नसेल तर तेथे गुंतविण्यात आलेल्या खेळत्या भांडवलाची मात्रा बरीच कमी राहील.

खरेदी-विक्रीच्या अटी प्रत्येक कारखान्यात व्यवस्थापकाला उत्पादनाचे कार्य निरंतरपणे सुरु ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या सामग्रींची सतर खरेदी करावी लागते. ज्या अटींवर उत्पादनकार्याला आवश्यक असलेल्या सामग्रीची खरेदी केली जाते त्या अटींचा सुध्दा खेळत्या भांडवलाच्या मात्रेवर परिणाम होत असतो. उत्पादनकार्यात आवश्यक असलेली सामग्री उधारीवर खरेदी करण्यात आल्यास तसेच विक्रेत्यांकडून काही सवलती प्राप्त झाल्यास खेळत्या भांडवलाची गरज काही प्रमाणात निश्चित कमी होईल.

 अस्थिर संपत्तीची तरलता (Liquidity of Current Assets)

 एखाद्या प्रंमडळाची – अस्थिर संपत्ती किती तरल आहे यावरसुध्दा त्या प्रमंडळाला आवश्यक असलेल्या खेळत्या भांडवलाची मात्रा अवलंबून असते. अस्थिर संपत्तीचे स्वरुप तरल असल्यास अशा संपत्तीचे अगदी अल्प मुदतीत रोक रकमेमध्ये परिवर्तन करता येते.

अस्थिर संपत्तीचे रोक रकमेमध्ये परिवर्तन करणे अगदी सहज शक्य असल्यामुळे अशा प्रमंडळाला जास्त प्रमाणात खेळत्या भांडवलाची गरज नसते. याउलट अस्थिर संपत्तीचे रोक रकमेमध्ये परिवर्तन करणे फार कठीण किंवा अशक्य असल्यास ह्या प्रमंडळाला इतर प्रमंडळाच्या तुलनेत जास्त प्रमाणावर खेळत्या भांडवलाची गरज असते.

 

व्यवस्थापकांचे बँकाशी असणारे संबंध (Manager’s Relations with Banks) 

औद्यागिक व व्यावसायिक उपक्रमांना आवश्यक असलेला पतपुरवठा करण्याचेकार्य देशामधील व्यापारी बँका व काही विशेष स्वरुपाच्या वित्तीय संस्था करीत आहेत. प्रत्येक कारखान्याच्या व्यवस्थापकाने व्यापारी बँकाशी तसेच उद्योगांना परपुरवठा करणाऱ्या संस्थासी निकटचे संपर्क प्रस्थापित करुन त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या सवलतींचा पूर्ण उपयोग करुन घ्यायला हवा.

कारखान्यांच्या व्यवस्थापकांचे व्यापारी बँकांशी चांगले संबंध असल्यास ते बँकाकडून योग्य दरावर पुरेसे कर्ज मिळवू शकतात. ज्या प्रमंडळाला व्यापारी बँकाकडून किंवा इतर संस्थाकडून माफक दरावर पुरेसा किंवा कर्ज प्राप्त होते अशा प्रमंडळाच्या व्यवसायात खेळत्या भांडवलाची गुंतवणूक कमी राहील.

 

 व्यापारचक्र (Trade Cycle)

 तेजी व मंदीच्या व्यापारचक्राचा सुध्दा खेळत्या – भांडवलाच्या मात्रेवर बराच परिणाम होत असतो. मंदीच्या काळात उत्पादित वस्तूंची मागणी बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यामुळे वस्तूंची विक्री कमी होते. अशा परिस्थितीत एकीकडे उत्पादनाचे कार्य सुरु असते तर दुसरीकडे उत्पादित वस्तूंची विक्री मात्र अपेक्षित प्रमाणावर केली जात नाही. त्या परिस्थितीमध्ये विकण्यात न आलेल्या वस्तूंचे प्रचंड साठे निर्माण होतात व त्यामध्ये गुंतविण्यात आलेले खेळते निष्क्रिय बनते. 

 

स्थिर भांडवल म्हणजे काय एका वाक्यात उत्तरे लिहा?

व्यवसायाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जो पैसा वापरला जातो त्याला खेळते भांडवल म्हणतात. व्याख्येनुसार तुम्हाला ते समजल्यास – व्यवसायातील एकूण उपलब्ध निधी आणि दायित्वांमध्ये शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजे खेळते भांडवल.

खेळते भांडवल आणि त्याचे महत्त्व काय आहे?

व्यवसायाच्या ऑपरेशनशी संबंधित दैनंदिन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी काही मालमत्ता आवश्यक आहेत. या मालमत्तेमध्ये रोख रक्कम, प्राप्त बिले, गुंतवणूक, कच्चा माल, उत्पादित वस्तू आणि अल्पकालीन कर्ज इत्यादींचा समावेश आहे.

माझे नाव Arti Thakur आहे.मी आपला मराठी (Aplamarathi.com) ची फाउंडर आणि owner आहे.माझे B.COM पूण॔ झाले आहे.मित्रांनो मला Banking ,Finance , loan आणि Online income याची माहिती आहे म्हणून मी तुम्हाला मदत करु इच्छिते.

Leave a Comment