राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ? राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप ,आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती – National income Information in Marathi , राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ,
हे सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी, ही सर्व उत्पादने आणि सेवांची बेरीज आहे (जीएनपी पूर्ण फॉर्म) दिलेल्या कालावधीत रहिवाशांच्या मालकीच्या उत्पादनाच्या सर्व साधनांनी.
कोणताही देश. मूल्यांकन होते. , सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ची तुलना सकल राष्ट्रीय उत्पादनाशी (GNP) केली जाऊ शकते, जे परदेशात राहणाऱ्या नागरिकांसह, परदेशातील देशांतर्गत उत्पादन वगळून अर्थव्यवस्थेच्या नागरिकांचे एकूण उत्पादन मोजते.
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ? – National income Information in Marathi
राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना असून स्थूल अर्थशास्त्रात (Macro Economics) राष्ट्रीय उत्पन्नाचे विश्लेषण महत्त्वाचे असते. साधारणतः एका वर्षांत तयार होणाऱ्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजमाप न होऊ देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असते. भारतात १ एप्रील ते ३१ मार्च पर्यंत आर्थिक वर्ष मोजले जात असून याच कालखंडात देशात विविध क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या सर्व वस्तु व सेवांची मोजणी करुन राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते.
डॉ. मार्शल:
“प्रतिवर्षी एखाद्या देशातील श्रम व भांडवल या नैसर्गीक साधनसामग्रीच्या सहाय्याने मूर्त आणि अमूर्त अशा वस्तू व सेवांचे जे एकूण उत्पादन केले जाते. ते राष्ट्रीय उत्पन्न होय.”
प्रा. पिगूः
“देशातील उत्पादनापैकी ज्या उत्पादनाचे मोजमाप पैशाच्या स्वरुपात केले जाते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात अर्थात या मध्ये परकीय देशामधून मिळावीलेल्या उत्पन्नाचाही समावेश होतो. “
प्रा फिशर
“विशिष्ट काळातील देशातील लोकांनी प्रत्यक्ष उपभोगलेल्या वस्तु आणि सेवा म्हणजे त्या देशाचे त्या वर्षांचे राष्ट्रीय उत्पन्न होय.”
राष्ट्रिय उत्पन्नाच्या संकल्पना – NATIONAL INCOME CONCEPTS in Marathi
राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना साठा नसून प्रवाही आहे. त्यामध्ये सातत्याने बदल होत असतो. एका विशीष्ट कालखंडात ते मोजले जाते. देशात तयार होणाऱ्या एकूण वस्तू व सेवांचे मापन केल्यास एकूण उत्पादन प्राप्त होते. त्या एकूण उत्पादनाचे पैशात मूल्य व्यक्त केल्यास ते एकूण राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होते. तर देशातील एकाचा खर्च हे दुसऱ्याचे उत्पन्न असते. म्हणून असे म्हटले जाते. एकूण उत्पादन एकूण उत्पन्न एकूण खर्च होय. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना पुढील प्रमाणे.
- स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP)
- निव्वळ राष्ट्रीय उत्पादन (NNP)
- स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP)
- निव्वळ देशातंर्गत उत्पादन (NDP)
- दरडोई उत्पन्न (PCI) ६) वैयक्तीक उत्पन्न (PI)
- व्ययशक्य उत्पन्न (DI)
स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय ? – (Gross National Product)
एका विशिष्ट कालखंडात किंवा वर्षात देशात तयार झालेल्या वस्तु आणि सेवा यांचे दुहेरी मापन न होऊ देता केलेले मोजमाप म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. यालाच एकूण राष्ट्रीय उत्पादन असेही म्हणतात. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात फक्त अंतीम वस्तु व सेवांचा विचार केला जातो. स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे मोजमाप करतांना घसारा (Depreciation) विचारात घेतला जात नाही. . वस्तुच्या किंमतीतील वाढ किंवा घटीमुळे हा आकडा कमी जास्त होत असतो.
निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ? – Net National Income in Marathi
निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ही देशात राष्ट्रीय उत्पन्नाची एक महत्त्वपूर्ण संकल्पना होय. देशात एका विशिष्ट कालखंडात तयार होणाऱ्या सर्व वस्तु व सेवांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. हे या सर्व वस्तु व सेवांची निर्मिती करण्यासाठी विविध प्रकारची
यंत्रसामग्री, इमारती व इतर अनेक भांडवली साधनांचा वापर करावा लागतो. विशिष्ट कालावधीनंतर या भांडवली साधनांची झीज होत असते. ती झीज भरून काढण्यासाठी विशिष्ट रक्कम बाजूला काढून ठेवावी लागते. तिला घसारा (Depreciaction) असे म्हणतात. हा घसारा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून वजा केल्यास जे उत्पन्न प्राप्त होते. त्यालाच निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात.
(स्थूल देशांतर्गत उत्पादन) GDP म्हणजे काय ? (Gross Domestic Product – GDP in Marathi
राष्ट्रीय उत्पन्नाची ही संकल्पना अत्यंत समर्पक असून जगातील बहुतेक देशात या संकल्पनेचा वापर केला जातो.
व्याख्या :
देशात एका विशिष्ट कालखंडात (आर्थिक वर्षात) देशातील सर्व उत्पादक घटकांच्या साह्याने देशाच्या भौगोलीक सीमारेषेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तु व सेवा यांचे पैशातील मुल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय.
म्हणजेच देशाच्या भौगोलीक सिमारेषेच्या आत देशातील व परकीय नागरीकांनी निर्माण केलेल्या वस्तु व सेवा यांचे एकूण मुल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय.हेच आपण सुत्ररुपाने पुढीलप्रमाणे स्पष्ट करु. स्थूल देशांतर्गत उत्पादन स्थूल राष्ट्रीय उत्पादन भारतीय नागरीकांचे = विदेशातील उत्पादन मुल्य विदेशी नागरिकांचे भारतातील उत्पादन मुल्य होय. –
म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून भारतीय नागरीकांनी विदेशातून मिळवीलेले उत्पन्न वजा केले जाते तर विदेशी नागरीकांनी भारतात निर्माण केलेले उत्पन्न जमा केले जाते. उउड़ ही संकल्पना अलीकडील काळात अत्यंत महत्त्वपूर्ण मानाली जात असून अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, राज्यकर्ते, बँका, व वित्तीय
संस्था या संकल्पनेचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. या संकल्पनेमुळे देशाच्या वास्तव स्थितीचे दर्शन घडते.
निव्वळ देशातंर्गत उत्पादन म्हणजे काय ? – Net Domestic Product NDP in Marathi
स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP असो किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP असो या दोन्ही उत्पादनात घसारा हा महत्त्वाचा असतो. ज्या प्रमाणे स्थुलराष्ट्रीय राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केल्यास निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (NNP) मिळते. अगदी त्याच प्रमाणे स्थल देशांतर्गत उत्पादनातून (GDP) घसारा वजा केल्यास निव्वळ देशांतर्गत उत्पादन (NDP) मिळते म्हणून सुत्ररूपाने हे पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल.
घसारा म्हणजे भांडवली साधनांची झीज झाल्यास त्याची पूनर्स्थापना करण्यासाठी सुरवातीपासून केलेली विशिष्ट तरतूद होय. भांडवली साधनाच्या उत्पादनातू विशिष्ट रक्कम दरवर्षी बाजूला काढून ठेवली जाते. तिलाच घसारा म्हटले जाते.
दरडोई उत्पन्न म्हणजे काय ? (Per Capital Income PCI in Marathi
राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेतील सर्वात लोकप्रीय संकल्पना म्हणजे दरडोई उत्पन्न होय. देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला देशातील एकूण लोकसंख्येने भाग दिल्यास जे उत्पन्न प्राप्त होते. त्यालाच दरडोई उत्पन्न असे म्हणतात. सुत्र रूपाने हे पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल,
दरडोई उत्पन्न = एकूण राष्ट्रीय उत्पन्न (Total National Income) एकूण लोकसंख्या (Total Population)
दरडोई उत्पन्न = एकूण राष्ट्रीय उत्पन्न (Total National Income)
वैयक्तीक उत्पन्न म्हणजे काय ? Personal Income in marathi
राष्ट्रीय उत्पन्नातील ही देखील एक महत्त्वपूर्ण संकल्पना होय. वैयक्तीक उत्पन्नालाच व्यक्तिगत उत्पन्न असेही म्हणतात. “एका विशिष्ट कालखंडात देशातील व्यक्तिंना सर्व मार्गांनी पैशाच्या स्वरुपात मिळालेले उत्पन्न म्हणजे वैयक्तिक उत्पन्न होय.”
वैयक्तिक उत्पन्नात व्यक्तिना मिळणारे वेतन, बँकेतील पैशावर मिळणारे व्याज, लाभांश, घर भाड्याने दिल्यास ते भाडे, जमीनीपासून मिळणारा खंड, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता व इतर सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश केला जातो..
व्ययशक्य / खर्च योग्य उत्पन्न म्हणजे काय ? (Disposable Income in marathi
व्यक्तीला मिळणारे सर्वच्या सर्व उत्पन्न खर्च करता येण्या जोगे नसते. व्यक्तीला विविध मार्गांनी जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नावर प्राप्ती कराच्या तरतूदी प्रमाणे कर भरावा लागतो. अर्थात प्राप्ती कराचे दर उत्पन्नाच्या वेगवेगळ्या टप्यांवर वेगवेगळे आकारले जातात. सध्या ते दर १० टक्के, २० टक्के व ३० टक्के असे आहेत. व्यक्तीला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातून प्राप्ती कर वजा केल्यास जे उत्पन्न शिल्लक राहते त्याला खर्च करता येण्यासारखे किंवा व्ययशक्य उत्पन्न असे म्हणतात. थोडक्यात खर्च योग्य उत्पन्न म्हणजे व्यक्तीकडील असे उत्पन्न की जे त्या व्यक्तीला खर्च करता येते. म्हणजेच व्यक्तीच्या एकूण उत्पन्नातून कराची रक्कम वजा केल्यास जे उत्पन्न शिल्लक राहते. ते व्ययशक्य उत्पन्न होय.
राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप (MEASUREMENT OF NATIONAL INCOME )
राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या करण्यात येते. देशातील विविध घटक उदा. उत्पादक, उपभोक्ते, ग्राहक, विक्रेते, शासन, देशी व विदेशी नागरीक उद्योजक व इतर सर्व लोक सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काहींना काही आर्थिक क्रिया करत असतात. वस्तूंचे निर्माते व विक्रेते वस्तु व सेवांची विक्री करतात. तर त्या वस्तू व सेवांच्या उपभोग घेणारे त्या खरेदी करतात. म्हणजे अर्थव्यावस्थेत आर्थिक व्यवहार सातत्याने चालू असतात. या आर्थिक व्यवहाराचे योग्य मापन करणे आवश्यक असते.
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती – (Methods of Measurements of National Income)
राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या तीन प्रमुख पद्धती आहेत. त्या पुढील प्रमाणे.
- उत्पादन पद्धत (Production Method)
- उत्पन्न पद्धत (Income method)
- खर्च पद्धत (Expenditare Method)
- उत्पादन पद्धती (Production Method):
1 उत्पादन पद्धत (Production Method)
या पद्धतीने देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना देशातील विविध क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या सर्व वस्तु व सेवांचे पैशात मुल्य मोजले जाते. उदा. शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक दळणवळण, सेवा, बँका, खाणकाम इत्यादी विविध क्षेत्रात निर्माण झालेल्या अंतीम वस्तु व सेवांच्या उत्पादनाची बेरीज केली जाते. यातून जे एकूण उत्पन्न प्राप्त होते, त्यातून घसाऱ्याची रक्कम वजा केली जाते. जे उत्पन्न प्राप्त होते. त्यालाच स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादनात विदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा देखील समावेश केला जातो.
थोडक्यात या पद्धतीनुसार मिळणारे राष्ट्रीय उत्पन्न देशातील सर्व क्षेत्रातील अंतीम वस्तु व सेवांच्या उत्पादनाचे मूल्य विदेशातून मिळणारे निव्वळ उत्पन्न घसारा होय.
2 .उत्पन्न पद्धती (Income Method):
← Macro-Economics-… होय. वृतीनुलातील व्यक्ती व संस्थान मिळणान्या उत्पन्नाची बेरीज केली जाते. मोडल्यात “देशातील उत्पन्नाच्या सर्व घटकांना मिळणारा मोबदला म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय.”
देशात उत्पादनाचे भुमी, श्रम, भांडवल व संयोजन हे चार घटक असून यांना अनुक्रमे खंड, वेतन व्याज व नफा या स्वरुपात मोबदला प्राप्त होत असतो. म्हणून उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याची बेरीज म्हणजे उत्पन्न पद्धतीनुसार येणारे राष्ट्रीय उत्पन्न होय.
3. खर्च पद्धती (Expendliture method):
राष्ट्रीय उत्पन्न मापनाची ही तिसरी पद्धती होय. या पद्धतीनुसार एका विशिष्ट आर्थिक वर्षात देशात होणाऱ्या एकूण खर्चाचे मापन केले जाते. देशातील सर्व ग्राहक, खाजगी व्यक्ती, शासकीय संस्था, उद्योग व व्यावसाय संस्था इत्यादी उपभोग व गुंतवणूकीवर खर्च करत असतात त्या सर्वांचे मापन करुन राष्ट्रीय उत्पन्न मिळते. यामध्ये प्रामुख्याने पुढील चार प्रकाराच्या खर्चाची बेरीज केली जाते.
अ) उपभोग खर्च :
यामध्ये वस्तु व सेवा खरेदी करण्यासाठी केलेला खर्च विचारात घेतला जातो.
ब) खाजगी गुंतवणूक खर्च:
देशातील उद्योग व व्यावसाय संस्थांनी आपल्या उद्योग वाढीसाठी केलेला भांडवली खर्च विचारात घेतला जातो. उदा. यंत्रासामग्री, तंत्रज्ञान, जागा इत्यादी साठी केलेला खर्च विचारात घेतला जातो.
क) परकीय गुंतवणूक:
आयात वस्तूंचे उत्पादन विदेशात होते. तर निर्यात वस्तु व सेवांचे उत्पादन स्वदेशात होते. म्हणून निर्यातीतून आयात वजा केल्यास जे उत्पन्न शिल्लक राहते ते निव्वळ विदेशी गुंतवणूक होय. याचा समावेश खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना केला जातो.
(ड) शासकीय खर्च
शासन विविध वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी खर्च करते. अर्थात खर्च तसेच भांडवली खर्च देखील असतो. म्हणून शासकीय खर्चाचा राष्ट्रीय उत्पन्ना केला जातो. म्हणून खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न उपभोग खर्च गंतवणूक खर्च परकीय = + + गुंतवणूक शासकीय खर्च होय.
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या अडचणी ( DIFFICULTIES IN MEASUREMENT OF NATIONAL INCOME)
एका विशिष्ट कालखंडात देशात तयार वस्तु व सेवांचे दुहेरी मापन न होऊ देता केलेले मोजमाप म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. परंतु राष्ट्रीय उत्पन्न प्रत्यक्षात मापन करताना अनेक अडचणी येतात. देशात करोडो लोक लाखो वस्तू व सेवांची निर्मिती करतात. ते लोक साक्षर आणि निरक्षर अशा दोन्ही प्रकारचे असतात. ते आपल्या सर्वच व्यवहाराची नियमित नोंद ठेवतीलच याची शाश्वती नसते. शिवाय कर टाळणे किंवा चुकविण्यासाठी देखील उत्पन्नाची संपूर्ण माहिती दिली जात नाही. यास्तव राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अनेक अडचणी येतात त्या पुढील प्रमाणे.
वस्तू विनिमय पद्धतीचे अस्तित्वः
भारतात आजही अनेक आर्थिक व्यवहार करतांना वस्तु विनिमय पद्धतीचा वापर केला जातो. उदा. बलुतेदारी व्यावस्थेमध्ये वस्तू देवून सेवा घेतली जात असते किंवा वस्तू ठेवून वस्तू घेतली जाते. अशा वस्तुविनिमय व्यवहाराचे पैशात मापन केले जात नाही. त्यामुळे वास्तव राष्ट्रीय उत्पन्न कमी येण्याची शक्यता असते.
दुहेरी मापनाची समस्या :
याचा अर्थ असा की देशातील सर्व अंतीम वस्तु व सेवांची किंमत राष्ट्रीय उत्पन्नात घेणे आवश्यक असते. परंतु अर्थव्यवस्थेत अशा अनेक वस्तु असतात की ज्यांची दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा मोजमाप होण्याची शक्यता असते.
मोठे असंघटित क्षेत्र:
भारतात अनेक लघु, कुटीर व अतिलहान उद्योग संघटीत क्षेत्राकडून चालविले जातात. संघटीत क्षेत्रात चालणाऱ्या उद्योग व्यवसायाच्या उत्पन्नाची नोंद करणे शक्य असते. परंतु असंघटित क्षेत्रातील चालणारे लहान मोठे उद्योजक स्वतः आपल्या व्यवसायाची व उत्पन्नाची नोंद ठेवत नाहीत. शिवाय त्यांनी निर्माण केलेल्या एकूण उत्पादनापैकी फार मोठा भाग ते स्वतःच्या उपभोगासाठी वापरतात
व्यवसायानुसार उत्पन्नाचे मापन करणे कठीण :
भारतात एकच व्यक्ती एका वर्षात वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात काम करते. उदा. भारतीय शेतकरी काही दिवस शेतात काम करतो तर काही दिवस उद्योगात काम करतो तर काही दिवस इतर छोटा मोठा व्यावसाय करतो. अशा परिस्थीतीत त्याच्या उत्पन्नाची विविध व्यवसायात पाहणी करणे कठीण असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे योग्य मापन होत नाही..
काळा पैसा :
भारतात काळी व पांढरी अर्थव्यवस्था अस्तीत्वात आहे. काळ्या पैशाची निर्मिती चोन्य करणे, तस्कऱ्या करणे, उत्पन्न लपवून ठेवणे, कमी दाखवीणे यातून होते. प्रा. गुप्ता एस. यांच्य अभ्यासाप्रमाणे भारतात काळ्या पैशाचे प्रमाण जवळ जवळ ५० टक्के एवढे आहे. हा सर्व पैस राष्ट्रीय उत्पन्न मापनात दर्शविला जात नाही. त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्न कमी येते.
विश्वसनिय माहितीचा अभाव :
भारतात राष्ट्रीय उत्पनाच्या मापनाची विश्वसनीय अशी पद्धती अस्तित्वात नाही भारतीय सांख्यीकीय संघटना ज्या विविध भागाकडून आकडेवारी गोळा करते. त्या विभागांन दिलेली माहिती विश्वसनीय नसते. उदा. ऊस, कापूस, धान्य या बाबत माहिती असते त भाजीपाला व फळ प्रक्रिया बाबत माहिती उपलब्ध नसते. अनेक डॉक्टर, वकील, चार्टअकौंटंट क्लास चालवीणारे आपल्या उत्पन्नाची योग्य ती माहिती देत नाहीत. या शिवाय छोटे छोटे व्यावसायीक व उद्योजक आपल्या उत्पन्नाची सर्व माहीती देत नाहीत. परिणामी राष्ट्री उत्पन्न मापनात अनेक अडचणी येतात.
बदली उत्पन्नाचा हस्तांतरीत उत्पन्नात समावेश केला जात नाही:
शासकीय व निमशासकीय निवृत्ती धारकांना मिळणारे निवृत्ती वेतन, भविष्य निर्वा निधी व इतर प्रकारचे भत्ते यांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. कारण हे निवृत्त धारकांचे उत्पन्न असले तरी शासनाचा तो खर्च असतो. म्हणून अशा उत्पन्नाचा समावेश राष्ट्री उत्पन्नात केला जात नाही.
अमौद्रिक व्यवहार :
ज्या वस्तु व सेवांची खरेदी विक्री पैशाच्या साह्याने केली जाते. अशा व्यवहाराच समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. परंतु भारतात अनेक व्यवहार पैशाच्या साह्याने केले जा नाहीत. आजही ग्रामीण भागात अनेक लोक स्वतःचे घर स्वतःच तयार करतात. तर शेतकर भाजीपाला धान्य, दुध, कुकूटपालन व्यावसाय करतात तेव्हा या सर्व वस्तू स्वतःच्य उपभोगासाठी देखील वापरतात. परंतू त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही.
- फायनान्स म्हणजे काय ? फायनान्स चे अर्थ, प्रकार, कार्य ,फायनान्स चे महत्त्व
- सूक्ष्म वित्तपुरवठा) मायक्रोफायनान्स म्हणजे काय ? मायक्रो फायनान्स चे फायदे ,
- व्यवस्थापन म्हणजे काय ? व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये , व्यवस्थापनाची कार्य स्वाध्याय , महत्त्व आणि फायदे
- स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ? स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, वैशिष्ट्ये, व्याप्ती, महत्व, मर्यादा
- भांडवल बाजार म्हणजे काय ? भांडवल बाजाराचे कार्य , महत्व , भूमिका, घटक
- वित्तीय प्रणाली म्हणजे काय आहे ? अर्थ , महत्त्व, कार्य, भारतीय वित्तीय प्रणाली
- फायनान्स म्हणजे काय ? फायनान्स चे अर्थ, प्रकार, कार्य ,फायनान्स चे महत्त्व
- सूक्ष्म वित्तपुरवठा) मायक्रोफायनान्स म्हणजे काय ? मायक्रो फायनान्स चे फायदे ,
- व्यवस्थापन म्हणजे काय ? व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये , व्यवस्थापनाची कार्य स्वाध्याय , महत्त्व आणि फायदे
- स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ? स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, वैशिष्ट्ये, व्याप्ती, महत्व, मर्यादा
भारताचे राष्ट्रीय उत्पन्न किती आहे?
आर्थिक वर्ष 2022 मध्ये, भारतातील सध्याच्या किमतींनुसार एकूण राष्ट्रीय उत्पन्न 230 ट्रिलियन भारतीय रुपयांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे.
राष्ट्रीय उत्पन्न किती वर्षाच्या कालावधीसाठी मोजली जाते?
भारतात १ एप्रील ते ३१ मार्च पर्यंत आर्थिक वर्ष मोजले जात असून
व्ययशक्य उत्पन्न म्हणजे काय?
कर आणि सामाजिक सुरक्षा शुल्काच्या कपातीनंतर उरलेले उत्पन्न, एका इच्छेनुसार खर्च किंवा जतन करण्यासाठी उपलब्ध.